हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

प्रवास करताना रस्त्यात पेट्रोल किंवा डिझेल संपले तर नका घेऊ टेन्शन! या टोल फ्री नंबरवर करा कॉल आणि जागेवर मिळवा पेट्रोल


प्रवास करताना रस्त्यात पेट्रोल किंवा डिझेल संपले तर नका घेऊ टेन्शन! या टोल फ्री नंबरवर करा कॉल आणि जागेवर मिळवा पेट्रोल


बऱ्याचदा आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा रात्री- बेरात्री किंवा दिवसा देखील गाडीचे पेट्रोल किंवा डिझेल संपते. त्यामुळे रस्त्यात आपली तारांबळ उडते व खूप मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते.

आपल्याला माहित आहे की रस्त्यावर जर कधी अपघात झाला तर मदतीला देखील जास्त करून कोणी धावून येत नाही. अशा प्रसंगी आपल्याला काय करावे हे उमजत नाही. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून जर अशा काही घटना प्रवासाच्या दरम्यान घडल्यात तर तुम्ही एका टोल फ्री नंबरवर कॉल करून उभ्या राहिलेल्या या समस्यांचे निराकरण करू शकतात.

आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण रस्त्याने प्रवास करतो तेव्हा रस्त्यांवर टोलनाके असतात व या टोलनाक्यांवर आपण टॅक्स म्हणून पैसे भरत असतो. हा टॅक्स आपण त्या रस्त्यावरून गाडी चालवतो म्हणून भरतो. परंतु या टॅक्स भरल्यामुळे आपल्याला काही सुविधा देखील या माध्यमातून मिळतात.


मित्रांनो तुमचे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, PF KYC, Final PF Withdrawal, PF Nominee ad,  date claim

आणि ESIC संबंधित Aadhar KYC,  Family Ad, ESIC Card, व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.👇🏻

-----------------------------

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

परंतु बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नसते. टोल टॅक्स भरल्यानंतर तुम्ही तो रस्त्याचा वापर तर करू शकतात परंतु कोणत्याही मेडिकल इमर्जन्सी मध्ये किंवा पानांमध्ये काही बिघाड झाला किंवा पेट्रोल, डिझेल संपले तर अशा प्रसंगी तुम्हाला मदत देखील मिळू शकते. याकरिता फक्त तुम्हाला देण्यात आलेल्या काही हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करणे गरजेचे असते. यातील महत्त्वाचे म्हणजे…


1)  पेट्रोल संपले तर :–

बऱ्याचदा आपण हायवेवरून प्रवास करत असताना अचानक पेट्रोल किंवा डिझेल संपते. दूर दूर पर्यंत आपल्याला पेट्रोल पंपाचा सुगावा लागत नाही व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते. परंतु अशाप्रसंगी चिंता न करता तुमच्या टोल टॅक्स पावतीवर दिलेला जो काही हेल्पलाइन क्रमांक असतो त्यावर तुम्ही कॉल करणे गरजेचे आहे.

त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला काही प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल दिले जाते किंवा पुरवले जाते. साहजिकच यामध्ये तुम्हाला पैसे द्यावे लागतात परंतु होणारी समस्या मिटते. याकरिता पेट्रोल हेल्पलाइन क्रमांक पाहिले तर 8577051000 आणि 7237999944 यावर तुम्ही कॉल करू शकता.


2) वाहनामध्ये बिघाड झालातर :–

बऱ्याचदा प्रवास करत असताना दुचाकी असो किंवा कार यामध्ये काही बिघाड झाला तर समस्या निर्माण होऊ शकते. अशाप्रसंगी तुम्ही मेकॅनिक किंवा कार सेवेची देखील मदत घेऊ शकतात. याकरिता तुम्हाला 8577051000 आणि 7237999955 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकतात. त्यामध्ये मेकॅनिक येण्याची सुविधा ही फ्री मध्ये आहे. परंतु वाहनामध्ये काही समस्या निर्माण झाली असेल तर मेकॅनिक शुल्क आकारतो. जागेवर जर संबंधित वाहन दुरुस्त करता आले नाही तर ते सर्विस स्टेशनकडे देखील नेले जाते.


3) मेडिकल इमर्जन्सी मध्ये :–

बऱ्याचदा प्रवास करत असताना रस्त्यातच कोणी आजारी पडते व अशावेळी आपल्याला काय करावे हे समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेळ न घालवता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेला 8577051000 आणि 7237999911 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून मोफत ॲम्बुलन्स मिळवू शकतात.


याशिवाय तुम्हाला रस्त्यावर कुठल्याही प्रकारची इतर समस्या आली तर तुम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 1033 किंवा 108 वर कॉल करू शकतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...