हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १९ मार्च, २०२६

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

 

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

तुम्ही फ्लॅट किंवा घराचा ताबा घेणार असाल, तर थोडं थांबा आणि आधी तुमच्या बिल्डरकडून ताबा प्रमाणपत्र म्हणजे occupation certificate घ्यायला विसरू नका. या प्रमाणपत्राशिवाय घर किंवा फ्लॅटचा ताबा घेतल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता, तुमचे पैसे बुडू शकतात आणि तुम्हाला राहण्याची जागाही नाकारली जाऊ शकते.

भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये एका बिल्डरने ताबा प्रमाणपत्र न घेताच घर खरेदीदारांना घराचा ताबा देऊन मोकळे होतात. लोक आपल्या कष्टाच्या कमाईने घेतलेल्या घराचा ताबा घेऊन आधी सुरुवातीला हर्षवायू होतात, पण नंतर काही दिवसांनंतरच त्यांच्या आनंदावर विरजण पडलं जेव्हा प्रशासनाकडून त्यांना नोटीस मिळते की इमारतीला अद्याप OC प्रमाणपत्र मिळालेले नाही आणि तिथे राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.अशा परिस्थितीत, लोक पैसे भरूनही घर खरेदीदार बिल्डरच्या फसवणुकीला बळी पडतात आणि त्यांना फसवल्यासारखे वाटत आहे. तुम्हीसुद्धा घराचा ताबा घेणार असाल, तर या दस्तऐवजाचे महत्त्व नक्की समजून घ्या.

भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे काय ?

भोगवटा प्रमाणपत्र किंवा OC म्हणजे नक्की काय आणि घर खरेदीदारांसाठी इतके महत्त्वाचे का आहे? कोणतीही इमारत पूर्ण झाल्यावर, संबंधित विकास प्राधिकरण, महामंडळ किंवा इतर सरकारी संस्थेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य जे एक कायदेशीर दस्तऐवज आहे आणि यावरून घर किंवा इमारत नियमांनुसार बांधली गेली आहे आणि सर्व मानके पूर्ण केल्याचे दर्शवते. सरकारी संस्थेने इमारतीला मंजुरी दिल्यानंतरच इमारत खरेदीदारांच्या ताब्यात देण्याचा नियम आहे, पण अनेक बांधकाम व्यावसायिक यात फसवणूक करतात, ज्याचे परिणाम खरेदी करणाऱ्यांना भोगावे लागतात.


OC कागदपत्रात नेमकं काय असतं?

  1. इमारत शासकीय संस्थेने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार बांधली गेल्याचे ओसी दस्तऐवज दर्शवते.
  2. तसेच, इमारत राष्ट्रीय बांधकाम संहिता आणि अग्निसुरक्षा व बांधकाम सुरक्षा यांसारख्या सुरक्षा मानकांचे पालन करते.
  3. इमारतीच्या बांधकामासाठी पर्यावरणीय नियम आणि जलनिःसारण व सांडपाणी व्यवस्था यांसारख्या इतर सर्व मंजुऱ्या मिळवलेल्याचे या कागदपत्रात नमूद केलेले असते.
  4. शेवटी संबंधित घर किंवा इमारत पूर्णपणे सुरक्षित आणि राहण्यायोग्य असल्याचे या कागदपत्रावरून सिद्ध होते.

OC शिवाय घराचा ताबा घेतल्यास काय होतं?

घर किंवा फ्लॅटचा ताबा मिळवण्यासाठी ओसी आवश्यक आहे.रेरा कायद्यानुसार, OC शिवाय ताबा घेणे पूर्णपणे बेकायदेशीर मानले जाते.अशा परिस्थितीत, सरकारी एजन्सीद्वारे इमारत बेकायदेशीर घोषित केली जाऊ शकते आणि रहिवाशांना बाहेर काढले जाऊ शकते. इमारतीला आग लागली, लिफ्ट कोसळली किंवा इतर कोणताही अपघात झाल्यास ओसीशिवाय इमारतीत राहणाऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क राहणार नाही. इतकेच नाही, तर अधिकारी बिल्डर आणि रहिवाशांवर दंडही आकारू शकतात.

ओसी आणि सीसीमध्ये गोंधळू नका

बरेच लोक ओसी आणि सीसीमध्ये गोंधळून जातात. लोकांना वाटतं की बिल्डरने बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (CC) दिले, तर OC ची गरज नाही. पण, बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र केवळ घराचे बांधकाम पूर्ण झाल्याची पुष्टी करते, जे एका सरकारी संस्थेद्वारे जारी केले जातात. त्याच वेळी, ओसीइमारत केवळ इमारत राहण्यायोग्य असल्याची पुष्टी करते. त्यामुळे, घर खरेदीदारांनी ताबा घेण्यापूर्वी दोन्ही प्रमाणपत्रांची मागणी केली पाहिजे.

--------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि  फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 




सोमवार, १६ मार्च, २०२६

SBI Youth for India Fellowship 2026-2027 | पदवीधरांसाठी मोठी फेलोशिप

 

SBI Youth for India Fellowship 2026-2027 | पदवीधरांसाठी मोठी फेलोशिप संधी | ₹16,000 स्टायपेंड + ₹1लाख 10,000 बोनस

देशातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी SBI Youth for India Fellowship 2026-2027 ही एक उत्कृष्ट संधी आहे. ही फेलोशिप SBI Foundation द्वारे आयोजित केली जाते आणि निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील विविध ग्रामीण भागात सामाजिक प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते.

जर तुम्ही पदवीधर असाल आणि समाजासाठी काम करण्याची इच्छा असेल तर ही फेलोशिप तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते.

SBI Youth for India Fellowship हा कार्यक्रम ग्रामीण भारतातील समस्या सोडवण्यासाठी तरुणांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी देतो. या फेलोशिपद्वारे उमेदवारांना गावात राहून शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि रोजगार निर्मिती यासारख्या क्षेत्रात काम करता येते.

या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये नेतृत्व कौशल्य, सामाजिक जाणीव आणि प्रत्यक्ष अनुभव विकसित होतो.

पात्रता (Eligibility Criteria)

SBI Youth for India Fellowship साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

✔ उमेदवाराने Bachelor’s Degree पूर्ण केलेली असावी किंवा 4 ऑक्टोबर 2026 पूर्वी पूर्ण होणार असावी

✔ वय 21 ते 32 वर्षे असावे

कोणासाठी ही फेलोशिप योग्य आहे?

ही फेलोशिप खालील विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे:

Engineering / MBA / Arts / Science Graduates

Freshers

Social sector मध्ये करिअर करायचे असलेले युवक

ग्रामीण विकासात काम करण्याची इच्छा असलेले उमेदवार

फेलोशिप दरम्यान मिळणारे फायदे

निवड झालेल्या उमेदवारांना खालील सुविधा दिल्या जातात:

1️⃣ मासिक स्टायपेंड

₹16,000 – राहणीमान खर्चासाठी

2️⃣ अतिरिक्त भत्ते

₹2,000 – प्रवास खर्च

₹2,000 – प्रोजेक्ट खर्च

₹1,000 – व्यावसायिक प्रशिक्षण

3️⃣ अन्य सुविधा

ग्रामीण भागात राहण्यासाठी मदत

अनुभवी मेंटर्सचे मार्गदर्शन

आरोग्य व अपघात विमा

NGO संस्थांसोबत काम करण्याची संधी

4️⃣ पूर्ण झाल्यावर बोनस

₹1,10,000 रिअ‍ॅडजस्टमेंट अलाउन्स दिला जातो.

निवड प्रक्रिया (Selection Process)

फेलोशिपसाठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होते.

Stage 1 – Online Application

Registration

Online Assessment

Essay / Video submission

Stage 2 – Final Selection

Group Exercise

Personal Interview

फेलोशिप कालावधी

एकूण कालावधी – 13 महिने

सुरुवात – साधारण ऑगस्ट / सप्टेंबर 2026

भारतातील विविध ग्रामीण भागात प्रकल्पांवर काम करावे लागते.

SBI Youth for India Fellowship 2026-2027 ही सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. या फेलोशिपमुळे तुम्हाला ग्रामीण भारतात काम करण्याचा अनुभव मिळतो तसेच नेतृत्व आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात करिअर घडवण्याची संधी मिळते.

अधिक माहितीसाठी व या फेलोशिप मध्ये सहभागी होण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा। 👇👇👇

SANTOSH SALVE - 7900094419

-----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि  फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 


भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...