हा ब्लॉग शोधा

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

"काय आहे भिमाकोरेगावचा इतिहास?"


( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.


आपणही जर कट्टर भीमसैनिक असाल तर जरूर भीमकोरेगाव पुणे येथे 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी  नक्की या.

" ह्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी खरा इतिहास घडवला आहे . 

"काय आहे भिमाकोरेगावचा इतिहास?"

पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात 1 जानेवारी 1818 रोजी ही लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले.


महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे इतिहासकार म्हणतात. विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या 28 हजारांपेक्षा जास्त होती तर इंग्रजांनी केवळ 500 महार रेजीमेंटच्या सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते. तरीही महार रेजिमेंटने  आपल्यापेक्षा संख्येने 40 पट अधिक असणाऱ्या पेशव्यांच्या पराभव केला. महार रेजिमेंटने पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवला. अवघ्या 16  तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली. त्यानंतर महार समाजातील सैनिकांनी अखेर 1 जानेवारी 1818 ला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला. भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटमने इंग्रजांना विजय मिळवून दिला.

भिमाकोरेगावच्या लढाईचे कारण

इ.स. 1800 च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागलेले होते. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे तुकड्यांमुळे कमकुवत साम्राज्य होते.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता. 13 जून इ.स. 1817 रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली. व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला. यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटिश अधीनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले.

अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा प्रयत्न केला खडकीची लढाईत केली परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई 5 नोव्हेंबर इ.स. 1817 रोजी झाली होती.


त्यानंतर पेशवे यांनी तेथून सातारा येथे पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली होते. आणि ते पेशव्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील, म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली.

दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल थेओफिलस प्रिझलर सैन्यासह तयार होताच, ते पाहून पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वळले.

डिसेंबर इ.स. 1817 च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भिमा या गावात झाली.

पेशवेंचे सैन्य

पेशव्यांचे 28.000 सैन्य होते, ज्यातील 20.000 घोडदळ, 8000 पायदळ सतत तैनात असे.

कंपनी सरकाराच्या सैन्यांनी हल्ला करू नये यासाठी प्रत्येकी 600 सैनिकांच्या तीन तुकड्या तैनात असत.

या सैनिकांत अरब, गोसावी व पेशव्यांचे सैनिक असत. हे सैन्य पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर करीत असे. तसेच त्यासाठी भाडोत्री सैनिक व त्यांचे वारस यांचाही सैन्यात वापर केला जात असे. सैन्यात घोडदळ आणि तोफखाना असे दोन विभाग ठेवलेले असत. लढाईचे नेतृत्व बापू गोखले, अप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगळे ह्यांनी केले होते. पैकी त्रिंबकजी डेंगळे हे कोरेगाव लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते. तर अन्य जवळच्या फूलसेहर (आत्ताचे फुलगाव) येथे होते.

ब्रिटिशांचे सैन्य

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे 834 सैनिक होते. दुसऱ्या बटालियन (बॉम्बे नेटिव्ह आर्मी तुकडी क्र १०२) मधील महार जातीचे सुमारे 500 सैनिक होते. या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉंटन यांनी केले. अन्य अधिकाऱ्यांमध्ये लेप्टनंट आणि अड्जुटंट पिटसन, लेफ्टनंट जॉन्स, असिस्टंट सार्जंट विंजेट हे होते. 

लेफ्टनंट स्वान्सटन नेतृत्व करीत असलेले सुमारे 300 सैनिकांचे घोडदळ होते. 24 युरोपियन आणि 4 तोफा चालवणारे स्थानिक मद्रासी गोलंदाज व सहा पावडर तोफा होत्या. यांचे नेतृत्व लेफ्टनंट चिसलोम करत होते. याचबरोबर साहाय्यक सार्जंट वायली (वायल्डे) यांचा तोफाखान्यात समावेश होता. महारांचे नेतृत्व रतननाक, जाननाक व भकनाक हे तिघांनी केले.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क करा.7900094419

1) पीफ ( PF )

2) ई एस आय सी ( ESIC )

3) आधार सुधार ( Aadhaar Update )

4) वाहन परवाना ( Vehicle license )

5) पासपोर्ट ( Passport )

6) उद्यम आधार ( Udaym Aadhaar )

7) मतदार नोंदणी ( Voter registration )

8) ई पेन कार्ड ( e pan Card )

9) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ( Marriage Registration Certificate )

10) Fssai प्रमाणपत्र ( Fssai Certificate )

11) किसान KYC ( Kisan KYC)

12)  आयुष्यमान भारत योजना ( Aayushman Bharat Yojana )  

इतर सरकारी योजना आणि त्या योजनाचा मिळणारा लाभ या बद्दल कामे केली जातील. व माहिती ही मिळेल.

आमच्याकडे वरील सर्व कामे आॕनलाईन केली जातील.

महार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून  म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला. कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.


कोरेगांवच्या युद्धात २० महार सैनिक आणि ५ अधिकारी शहीद झाले. शहीद झालेल्या महारांची नावे, त्यांच्या सन्मानार्थ बनवल्या गेलेल्या स्मारकावर अंकित आहे. जे या प्रकारे आहे 

या युद्धात शहीद झालेल्या महार योद्धांची नावे खालिल प्रमाणे आहे –

1) गोपनाक मोठेनाक

2) शमनाक येशनाक

3) भागनाक हरनाक

4) अबनाक काननाक

5) गननाक बालनाक

6) बालनाक घोंड़नाक

7) रूपनाक लखनाक

8) बीटनाक रामनाक

9) बटिनाक धाननाक

10) राजनाक गणनाक

12) बापनाक हबनाक

13) रेनाक जाननाक

14) सजनाक यसनाक

15) गणनाक धरमनाक

16) देवनाक अनाक

17) गोपालनाक बालनाक

18) हरनाक हरिनाक

19) जेठनाक दीनाक

20) गननाक लखनाक

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.

या लढाईत महारांचे नेत्रत्व करणाऱ्यांची नावे खालिल आहेत –

1) रतननाक

2) जाननाक

3) भकनाक

या युद्धात जख्मी झालेल्या महार योद्धांची नावे खालिल प्रमाणे आहे –

1) जाननाक

2) हरिनाक

3) भीकनाक

4) रतननाक

5) धननाक

महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.


1 जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतीस्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली. त्या वर्षीचा स्मृतिदिन साजरा केला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या या मानवंदने नंतर दरवर्षी 1 जानेवारीला मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब  आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात.व शूर सैनिकांना मानवंदना देतात.

आपणही जर कट्टर भीमसैनिक असाल तर जरूर भीमकोरेगाव पुणे येथे 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी  नक्की या .

" ह्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी खरा इतिहास घडवला आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...