हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ९ जुलै, २०२४

जेष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये !!



 जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये !!

समाजकल्याण विभागा मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी शासनाने ' मुख्यमंत्री वयश्री योजना' सुरु केली असून 31 डिसेंबर 2023 रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

काय आहे ही योजना?

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता 3 हजार त्यांना मिळणार आहे.

पात्र जेष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेक्स, लंबर बेल्ट,


सर्व्हयकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र, मनःशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे.

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ 
नागररकाांना त्याांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी राज्यात “मुख्यमांत्री वयोश्री योजना” राबरवण्यास मान्यता देिेल्याबाबतचा शासन निर्णयसाठी(GR) येथे क्लिक करा.



मुख्यमंत्री वयोश्री  योजनेच्या अर्जाची प्रत प्राप्त करुन घेण्याकरिता येथे क्लिक करावे.


अर्ज डाऊनलोड करुन सर्व सहपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह पोस्टाने/कुरीयर ने सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर / मुंबई उपनगर यांचे कार्यालयाकरीता खालील पत्यावर पाठविण्यात यावा.

नवीन प्रशासकीय इमारत, 4 था मजला, आर.सी.चेंबुरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – 400071.


योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1. आधारकार्ड / मतदान कार्ड

2. राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स

3. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो

4. स्वयं-घोषणापत्र

5. शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे

6. लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखांच्या आत असावे. याबाबत लाभार्थीने स्वयंघोषणापत्र सादर करावे.


मुख्यमंत्री वयोश्री योजना सदर योजनेची जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ,उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत "माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान" अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते त्या सर्वेक्षणाबरोबरच या योजनेचा लाभार्थींची तपासणी करण्यात येत आहे.

महानगरपालिकास्तरावर आयुक्त महानगरपालिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण /जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची समिती मार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी वरील सर्व संबंधित कार्यालयात संपर्क साधावा.

समाजकल्याण विभागा मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.-

----------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.


पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...