मुंबई महानगरपालिकेचा दिलासा! दिव्यांगांना मिळणार दरमहा 1000 ते 3000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य,असा करा अर्ज
दिव्यांगांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
यांना मिळणार लाभ
या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवासी असला पाहिजे. तसेच तो दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजने अंतर्गत वय वर्ष 18 वरील 40 टक्के दिव्यंग असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये वितरित करण्यात येईल.
लाभार्थी पात्रता निकष -
- बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असावा.
- अर्जदार पिवळे व निळे वैश्विक ओळखपत्रधारक (UDID Card) असावा.
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
- अर्जदार हा केशरी / पिवळे शिधापत्रिकाधारक असावा.
- दिव्यांग व्यक्तींचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक उपक्रम | खाजगी आस्थापनेवर नोकरीत अथवा उदयोग करत नसल्याचे स्वयं घोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील.
- सदर योजनेचा लाभ घेणा-या अर्जदाराने हयात असल्याबाबतचा दाखला संचालक (नियोजन) विभागातील समाज विकास अधिकारी यांचेकडून खातरजमा करुन हयातीचे दाखले प्रत्येक अर्जासोबत संचालक (नियोजन) विभागाकडे सादर करणे बंधनकारक राहील.
- आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र
- वैश्विक ओळखपत्र Unique Disability ID (UDID) प्रत
- अर्जदार हा केशरी / पिवळे शिधापत्रिकाधारक असावा.
- बँक खात्याचा तपशील दर्शविणारी बँक पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची प्रत किंवा रद्द धनादेश
- प्रतिज्ञापत्र (स्वंयघोषणापत्रक)
या योजनेअंतर्गत लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी 45 दिवसांच्या आत बृहन्मुंबई महानगरपालिका, संचालक (नियोजन) विभागाकडे मयत दाखला किंवा मृत्यू वार्तापत्र जोडून योजनेच्या लाभ बंद करणेसाठी अर्ज सादर करावा.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याचे दिव्यांग स्टॉल धारक (HPCO) असल्यास दिव्यांग अनुज्ञापनधारक व्यक्तींस सदर योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
अटी व नियम यात बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे राहिल.
या योजनेच्या लाभासाठी अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही.
सर्व कागदपत्रांसहित अर्ज भरा. अर्ज पूर्ण भरा आणि अर्ज संबंधित विभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करा.
अर्ज करण्याची वेळ - सकाळी्10.00 ते संध्याकाळी 04.00
अर्ज करण्यासाठीच ठिकाण - बृहनमबई् महानगरपालिका् A ते T विभाग्
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी
जाहिरात
सन 2024-25 या आर्थिक वर्षात दिव्यांग व्यक्तींसाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्याच्या अर्जाकरिता लाभार्थ्याची पात्रता / निकष.
------------------------------------------------------------------
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा