वेळेत करा कर्जाची परतफेड, नाहीतर आरबीआय करणार मोठी कारवाई, कुणावर करणार कारवाई जाणून घ्या.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नुकतेच विलफुल डिफॉल्टर्स आणि मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अंतर्गत बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना (NBFCs) 25 लाख आणि त्यापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व नॉन-परफॉर्मिंग ॲसेट खात्यांमधील विलफुल डिफॉल्टरची चौकशी करावी लागणार आहे.
तपासात जर कोणी विलफुल डिफॉल्टर आढळले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आरबीआयने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. आरबीआयने अनेक वेळा विलफुल डिफॉल्टर्सबाबत विधाने जारी केली आहेत आणि बँकांना सूचनाही दिल्या आहेत, यावेळी आरबीआयने डिफॉल्टर्सवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
विलफुल डिफॉल्टर कोण आहे?
विलफुल डिफॉल्टरचे पुरावे ओळख समितीद्वारे तपासले जाणार असून 'विलफुल डिफॉल्टर्स' म्हणजे कर्जदार किंवा जामीनदार ज्याने जाणूनबुजून कर्जाची परतफेड केली नाही आणि त्याची थकबाकी 25 लाखांपेक्षा जास्त असते.
कर्ज परतफेड करू न शकल्यास काळजी करू नका !! काय आहे तुमचा अधिकार
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://digitalsalve.blogspot.com/2024/07/blog-post_20.html
विलफुल डिफॉल्टर आढळल्यास
आरबीआयने असे म्हटले आहे की, "बँका 25 लाख आणि त्यापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व एनपीए खात्यांमध्ये 'विलफुल डिफॉल्टर्स'ची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.
बँकांनी स्पष्ट निकष असणारे धोरण तयार केले पाहिजे ज्याच्या आधारावर विलफुल डिफॉल्टर घोषित केलेल्या व्यक्तीची छायाचित्रे छापण्यात येतील. यामध्ये असे म्हटले आहे की, कोणतीही बँक एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या संस्थेला कर्ज देणार नाही, ज्याने विलफुल डिफॉल्टर केले आहे. त्याला विलफुल डिफॉल्टरच्या यादीतून काढून टाकल्यानंतर एक वर्षासाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत.
-------------------------------------------------------------
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
----------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा