आयुष्य संपवण्याच्या टोकाच्या विचारांपासून परावृत्त कसं व्हाल? या 9 पॉइंटमधून घ्या समजून
सद्या आत्महत्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . मागील एका महिन्यात तीन आत्महत्याच्या घटनाने मनाला हेलावून टाकलं आहे. नुकताच अटल सेतुवर एका इंजिनिअरने समुद्रात उडी घेऊन आपलं जीवन संपवलं तर दुसरीकडे चंद्रपुर मध्ये MBBS ची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणीने नदीत जाऊन आत्महत्या केली.
इतकच काय तर,भायंदरच्या रेल्वे रुळावर पिता पुत्राने आत्महत्या केली होती. आत्महत्याचं प्रमाण का वाढत चाललं आहे ? आत्महत्या करण्याची भावना मनात का येऊ लागली आहे ?
- मुळात कोणत्याही समस्यातून मार्ग काढणं म्हणजे आत्महत्या नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे.
- मनात आत्महत्याची भावना येत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलून मन मोकळं करा, आत्महत्याची भावना (Emotion)का निर्माण होते ? यावर आपल्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला.
- नकारात्मक विचार मनात आणू नका, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली किंवा मनाविरुद्ध झाली की आपण निराश होतो. कधी कधी नकारात्मक विचाराचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होत असतो आणि त्यातूनच नैराश्यपणा येतो.
- लक्षात घ्या यश (success)अपयश हे चढउतार आपल्या वाटेला येतच असतात म्हणून संयम राखा, आज ना उद्या गोष्टी सुरळीत होतील म्हणून मनात नकारात्मक विचार आणू नका.
- अनुकूल परिस्थितीचा सामना करायला शिका, परिस्थिती हालाखीची असल्यास आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींशी बोला, त्यावर योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.
- प्रेमसंबंधातून मनात नकारात्मक विचार येत असतील तर, काही दिवस बाहेर फिरून या. मनात सकारात्मक विचार आणा याकरता आपल्याला हवी ती गोष्ट करा, गाणं ऐका, एखादं पुस्तक वाचा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारा, त्यांच्यासोबत फिरायला जावा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या.
- डिप्रेशन मध्ये सतत राहिल्याने आपल्या मनात आत्महत्याची भावना येऊ शकते अशा वेळी समुपदेशनचा योग्य सल्ला घेऊ शकता.
- लक्षात ठेवा आपलं जीवन हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अमूल्य आहे, काही गोष्ट विपरीत घडल्यास आपलं जीवन व्यर्थ आहे अशी भावना मनात आणू नका.
- नेहमी आनंदित राहायला शिका. आहे त्या गोष्टींत समाधानी रहा. बिकट परिस्थितीत तडकेफाड निर्णय घेऊ नका.
-------------------------------------------------------------
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा