हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक स्कॉलरशिप

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक स्कॉलरशिप

सुभद्राबाई शिक्षण निधी मुलुंड, मुंबई यांच्या विद्यमाने आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खराब असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक वर्ष 2024 - 2025 साठी शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

ही शिष्यवृत्ती केवळ रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असून दहावी उत्तीर्ण होऊन सरकार मान्य अशा कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला मिळू शकते.


स्कॉलरशिप आवश्यक कागदपत्रे

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण भरलेली फी पावती, 
  • मागील वर्षाची गुणपत्रिका, 
  • कुटुंबाची शिधा पत्रिका, 
  • उत्पन्नाचा दाखला
  • शाळेच्या 2 शिक्षकांची प्रमाणपत्रे
  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड पीडीएफ फॉरमॅट मध्ये तयार असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024

अर्जांची छाननी झाल्यावर प्राथमिक निवड झालेल्यांना मुलाखतीसाठी ई-मेल द्वारा बोलाविले जाईल. मुलाखतीनंतर अंतिम निवड करून शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना ई-मेलने तसे कळविले जाईल आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती / मदत जमा केली जाईल


जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. अधिक माहितीसाठी कोकण संस्थेच्या माणगाव ऑफिस येथे संपूर्ण कागदपत्रांसह भेट द्यावी

सुभद्राबाई शिक्षण निधी मुलुंड, मुंबई च्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

--------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.


पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...