हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 12 ते पदवीधारक विद्यार्थ्यांना मिळेल 6 ते 10 हजार रुपये प्रती महिना



मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 12 ते पदवीधारक विद्यार्थ्यांना मिळेल 6 ते 10 हजार रुपये प्रती महिना

शिक्षण पूर्ण करून रोजगार, नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरूण-तरूणींना कामाचा अनुभव नसल्याने अपेक्षित नोकरी मिळत नाही.

बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळात शासनाकडून दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे.


पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग व ॲप्रेंटिस बंधनकारक असून त्या तरूणांनाही या योजनेतून विद्यावेतनाचा लाभ दिला जाणार आहे.

एका महिन्यात तो दहा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास, त्यांना विद्यावेतन मिळणार नाही. 

'लाडका भाऊ' 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्येक शासकीय कार्यालयात 'इंटर्नशीप'ची संधी मिळणार

राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना 'इंटर्नशीप'-प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी मिळणार आहे. त्या अनुषंगाने मंजूर पदाच्या कमीतकमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल, यासाठी नियोजन करा,'असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, दि.25 जुलै 2024 रोजी दिले

यात पात्र बहिणींना संधी मिळणार आहे, म्हणून उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी होणार आहे.


शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा विद्यावेतन

  • इयत्ता बारावी उत्तीर्ण : प्रतिमहा 6000
  • आयटीआय, पदविका : दरमहा 8000
  • पदवीधर-पदव्युत्तर : दरमहा 10.000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्रता

  1. अर्जदाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.
  2. अर्जदाराची किमान किमान शैक्षणिक पात्रता जी आहे ती इय्यता 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर असावी.
  3. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  4. उमेदवाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  5. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावा.
  6. उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.


जीआर (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये !!अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2024/07/blog-post.html

---------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...