हा ब्लॉग शोधा

सोमवार, २२ जुलै, २०२४

Gratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला



Gratuity Calculation : ग्रॅच्युटीची रक्कम नेमकी कोणाला मिळते? नोकरी करणाऱ्या प्रत्येकानं समजून घ्यावा हा फॉर्म्युला

जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी या महत्त्वाच्या माहितीची माहिती असणं खूप गरजेचं आहे. ग्रॅच्युइटीबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

ग्रॅच्युइटी म्हणजे कर्मचाऱ्याने पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी केलेल्या कामाबद्दल कंपनीकडून दिले जाणारे बक्षीस.

ग्रॅच्युटीच्या स्वरुपात दिली जाणारी ही रक्कम कर्मचाऱ्यांना मोठी आर्थिक मदत देऊ करते. पण, सरसकट प्रत्येक कर्मचारी ग्रॅच्युटीसाठी पात्र असतोच असं नाही. मग ही ग्रॅच्युटी मिळते तरी कोणाला? जाणून घ्या... 


Gratuity Payment Act 1972 नुसार 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारीसंख्या असणाऱ्या कंपनीमध्ये 5 वर्षांच्या सातत्यपूर्ण सेवेसाठी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी दिली जाते. यात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही कंपन्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दुकाने, कारखाने यांचाही त्याच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. ग्रॅच्युइटीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमची कंपनी ग्रॅच्युइटी अॅक्टअंतर्गत नोंदणीकृत आहे की नाही हे तपासून पाहावे.

कारण जर तुमची कंपनी रजिस्टर्ड असेल तर त्याला तुम्हाला नियमानुसार ग्रॅच्युइटी द्यावी लागेल, पण जर कंपनी रजिस्टर्ड नसेल तर ग्रॅच्युइटी द्यायची की नाही हे कंपनीच्या इच्छेवर अवलंबून असते.

ग्रॅच्युइटी मिळणारी रक्कम

ग्रॅच्युइटी (अंतिम वेतन) x (कंपनीत किती वर्षे काम केले) x (15/26) मोजण्याचा नियम आहे. महिन्यातील रविवारचे चार दिवस आठवड्याची सुट्टी म्हणून गणले जात नाहीत, त्यामुळे एका महिन्यात केवळ 26 दिवस मोजले जातात आणि 15 दिवसांच्या आधारे ग्रॅच्युइटी मोजली जाते.


उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने कंपनीसाठी 20 वर्षे काम केले असेल आणि त्याचा शेवटचा पगार सुमारे 25,000 रुपये असेल तर आम्ही त्याची ग्रॅच्युइटी रक्कम शोधण्यासाठी हा फॉर्म्युला लागू करू. या सूत्रानुसार व्यक्तीच्या ग्रॅच्युइटीची रक्कम 20x25000x15/26 = 2,88,461.54 रुपये असेल.

-------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...