हा ब्लॉग शोधा

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवावा कसा?



मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवावा कसा ?

महाराष्ट्रात CMRF चा मुख्य उद्देश

1) राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.

2) जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

3) दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

4) रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

5) अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

6) आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 6 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419

7) शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

8) शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

मंगेश नरसिंह चिवटे,

कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.

फोन - 9619951515

संपर्क - 022 - 22025540

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : 8650567567

Email id:- aao.cmrf-mh@gov.in

महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.

वैद्यकीय उपचारांचा खर्च सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असताना महाराष्ट्रातील राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून विविध शस्त्रक्रिया अथवा वैद्यक उपचारांसाठी या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशिष्ट रकमेची मदत केली जाते. ही रक्कम मिळवण्यासाठी नेमका कसा अर्ज करायचा त्यासाठी कुठे संपर्क साधायचा याची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी धिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.mahacmmrf.com/form/


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1) अर्ज ( विहीत नमुन्यात)

2) निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)

3) तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला. (रु.1.60 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)

4) रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक

5) रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)

6) संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

7) अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे.

8) अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे./ शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.

9) रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास Email id:- aao.cmrf-mh@gov.in अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.

व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.

1) कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष 2 ते 6),

2) हृदय प्रत्यारोपण

3) यकृत प्रत्यारोपण

4) किडणी प्रत्यारोपण

5) बोन मॅरो प्रत्यारोपण

6) फुफ्फुस प्रत्यारोपण

7) हाताचे प्रत्यारोपण

8) हिप रिप्लेसमेंट

9) कर्करोग शस्त्रक्रिया

10) अपघात शस्त्रक्रिया

11) लहान बालकांचे शस्त्रक्रिया

12) मेंदूचे आजार

13) हृदयरोग

14) डायलिसिस

15) अपघात

16) कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)

17) नवजात शिशुंचे आजार

18) गुडघ्याचे प्रत्यारोपण

19) बर्न रुग्ण

20) विद्युत अपघात रुग्ण

या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

संपर्क क्र. 022-22026948 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे. official website

https://www.mahacmmrf.com/

रुग्णालयास वैद्यकीय शस्त्रक्रिया / उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या रुग्णांना त्यांचेवर करावा लागणाऱ्या खर्चापोटी अंशत: अर्थसहाय्य म्हणून खालीलप्रमाणे देण्यात य़ेते.

1) वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खाजगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च 1.00 लक्षाच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे)

2) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे.

3) महाराष्ट्रातील रेशन कार्ड / रहिवासी दाखला/ आधार कार्ड क्रंमाक

4) तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून मागिल आर्थिक वर्षाचे उत्पन्न रु. 1.60 लाखापेक्षा कमी असलेबाबत)

5) नोंदणीकृत भ्रमणध्वणी क्रमांक

6) मा. आमदार/खासदारांचे शिफारस पत्र

7) रुग्णालयास प्रदानाबाबत तपशिल:

8) बँक खाते क्रमांक, आय एफ एस सी (IFSC) कोड नंबर

9) रुग्णालयाचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बँकेचे नांव व शाखा

10) रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहे ते नांव

11) रुग्णालयाचा ई-मेल

12) सदर मदत हि प्रत्येक रुग्णास 3 वर्षातून एकदा देण्यात येईल.

13) उपरोक्त गोष्टिंची पूर्तता केल्यानंतर खालील प्रमाणे अंशत: अर्थसहाय्य करण्यात येते 

ना वशिला, ना ओळख; थेट मदत ! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या 'या' क्रमांकावर कॉल करा;

गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे.

त्यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट मोबाईलवर आलेला अर्ज भरून द्यायचा आहे.

"महात्मा फुले जन आरोग्य योजना" तुम्हाला माहिती आहे का ? अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/03/blog-post.html




मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबतची कार्यपध्दती

आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राथम्याने कार्यवाही होते..

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालये यामध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या योजना मध्ये उपलब्ध कमीतकमी निधीचा वापर व्हावा म्हणून वरील योजनांचा लाभ मिळू न शकणान्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून लाभ देण्यात येतो.

राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते. तसेच त्यांचेकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णांलयाना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.

 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचेकडील समितीच्या शिफारशीनुसार व त्यांनी अर्थसहाय्याची शिफारस केल्यास त्या रक्कमेच्या 50% इतकी रक्कम प्रदान करण्यांत येत आहे.


मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर  करा.आणि फॉलो करायला विसरू नका

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...