कल्याण स्टेशनवर उतरल्यावर 'या' सुविधांचा लाभ अवश्य घ्या
कल्याण जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या मध्यवर्ती मार्गावर असलेले एक महत्त्वाचे जंक्शन आहे. हे स्टेशन मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पूर्व मार्गांच्या जंक्शनवर स्थित आहे.
हे स्टेशन मुंबईच्या ईशान्येकडे 54 किमी (34 मैल) आहे. महत्वाचे म्हणजे भारतातील सर्वात व्यग्र रेल्वे स्टेशनमध्ये या स्टेशनचा क्रमांक टॉप 10 मध्ये येतो.
सर्व प्रमुख गाड्यांसाठी हा महत्त्वाचा थांबा आहे. लक्षात असू द्या, नागपूर दुरांतो आणि डेक्कन क्वीन या दोन गाड्या कल्याणला थांबत नाहीत. यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पांतर्गत कल्याण जंक्शनला 6 नवीन प्लॅटफॉर्म मिळणार आहेत. या प्रकल्पासाठी रेल्वे गुड्स यार्डच्या पूर्व भागात जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
कल्याण रेल्वे स्टेशनवर तुम्हाला विविध प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई-ठाणे-नवी मुंबईच्या रेल्वे सेवांचे वैशिष्ट्य म्हणजे इथे दिवसभरात अनेक ट्रेन्स धावतात, तरी देखील त्यांची सेवा उत्तम असते.
कल्याण स्टेशनवर मिळणार्या सुविधा :
वेटिंग रूम :
इथे प्रवाशांसाठी आरामदायी वेटिंग रुम आणि क्षेत्र आहे.
प्रथमोपचार कक्ष :
वैद्यकीय मदतीसाठी प्रथमोपचार कक्ष नेहमीच तैनात असते.
जेवणाची खोली :
निवांतपणे जेवण किंवा नाश्त्याचा आस्वाद घेण्यासाठी डायनिंग रुम्सची व्यवस्था केली आहे.
वायफाय (इंटरनेट कनेक्टिव्हिटी) :
वायफायद्वारे तुम्ही नेहमीच जगाशी जोडलेले राहू शकता.
स्तनपान कक्ष :
लहान मुलं आणि महिलांची इथे विशेष काळजी घेतली जाते. महिलांना स्तनपान करण्यासाठी स्तनपान कक्ष उभारण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना आणि बालकांना चांगली सुविधा प्राप्त होते.
प्रसाधनगृहे :
इथली प्रसाधनगृहे चांगल्या दर्जाची आणि स्वच्छ आहेत.
उपासनेच्या सुविधा/प्रार्थना कक्ष :
प्रत्येक व्यक्तिला आपापल्या पद्धतीने उपासना करण्याचा हक्क आहे. हे लक्षात घेऊन इथे पार्थना कक्ष तयार करण्यात आले आहे.
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
----------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419