( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
(10 एप्रिल 2022) बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. तुम्हालाही बुस्टर डोस घ्यायचाय?; मग समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया
कोरोना संसर्ग रोखण्यात महत्त्वाच्या ठरलेल्या लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट आढळून आलेला असतानाच केंद्र सरकारने 18 वर्षांपुढील सर्वांसाठी प्रतिबंधात्मक डोस म्हणजेच बुस्टर डोस देण्यास परवानगी दिली आहे.
या आधी केंद्र सरकारने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांपुढील सर्वांसाठी बुस्टर डोस देण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आता 18 वर्ष पुर्ण झालेल्या सर्वांना बुस्टर डोस देण्यास परवानगी दिली आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस खासगी रुग्णालयात जाऊन घेता येणार आहे. यासाठी ठराविक शुल्क भरावं लागणार आहे. तर जाणून घेऊया बुस्टर डोसबद्दल संपूर्ण माहिती...
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
बुस्टर डोस का दिला जातोय?
जागतिक आरोग्य संघटनेनं बुस्टर डोसबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, दोन्ही डोस घेतल्यानंतरही लसीमुळे शरीरात तयार झालेली इम्युनिटी कमी होत असल्याचंही समोर आलेलं आहे. कोरोना लसीची परिणामकारकता काय कायम ठेवण्याच्या उद्देशाने बुस्टर डोस दिला जात आहे.
संरक्षण करेल बूस्टर डोस
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर मेडिकल सेंटरच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की लसीचा बूस्टर डोस भविष्यात महामारीच्या नवीन लाटेपासून आणि कोरोनाच्या नवीन प्रकारांपासून संरक्षण करण्यासाठी देखील प्रभावी आहे. अमेरिकेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ६०० लोकांवर २४ वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या संशोधनानंतर हा दावा करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ओमिक्रॉन लाटेमध्ये लोकांचे प्राण वाचवण्यात लसीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..*
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.
*साळवे इंटरप्राईजेस / सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419*
बुस्टर डोस कोण घेऊ शकतात?
कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्यासाठीही काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. बुस्टर डोस घेण्यासाठी वयाची 18 वर्ष पुर्ण झालेली असावीत. त्याचबरोबर दुसरा निकष म्हणजे लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला असावा.
बुस्टर डोस कोणत्या लसीचा असणार?
पहिल्या आणि दुसऱ्या डोस वेळी जी लस तुम्हाला देण्यात आली. त्याच लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही पहिला आणि दुसरा डोस कोविशिल्ड लसीचा घेतला असेल, तर तुम्हाला बुस्टर डोसही कोविशिल्ड लसीचाच दिला जाईल.
बुस्टर डोसची किंमत किती आहे?
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक वगळता इतरांना बुस्टर डोस घेण्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड, तर भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात 225 रुपयांना बुस्टर डोस घेता येईल. यापूर्वी कोविशिल्डचा एक डोस 600 रुपये, तर कोव्हॅक्सिनचा डोस 1,200 रुपयांना होता. 225 रुपयांबरोबर रुग्णालयाकडून सेवाशुल्क आकारलं जाईल जे जास्तीत जास्त 150 रुपये असेल.
बुस्टर डोस घेण्यासाठी नोंदणी कशी करायची?
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे बुस्टर डोस घेण्यासाठी नव्याने कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याची गरज नाही. बुस्टर डोस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर जाऊन आधीच्याच मोबाईल नंबरने (पहिल्या आणि दुसऱ्या डोस वेळी ज्या नंबरवरून नोंदणी केली, तो मोबाईल नंबर) लॉगिन करायचं आहे आणि पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी ज्या पद्धतीने स्लॉट बुक केला, त्याच पद्धतीने बुस्टर डोस घेण्यासाठी स्लॉट बुक करायचा आहे. त्यानंतर लसीकरण केंद्र, तारीख आणि वेळ आदींची निश्चित करायची आहे.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा