हा ब्लॉग शोधा

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: राज्य सरकार विद्यार्थ्यांना देतंय आर्थिक मदत जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: राज्य सरकार विद्यार्थ्यांना देतंय आर्थिक मदत जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2024 - 25 या शैक्षणिक वर्षापासून पुणे जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.

hmas.mahait.org

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 30 जुलै 2024 पासून सुरू आहे. पात्र विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज व आवश्यक कागदपत्रे जमा करून त्याची प्रत समाजकल्याण कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील कार्यालयात किंवा संपर्क साधावा.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत इयत्ता 10 वी नंतरच्या इयत्ता 11 वी व 12 वी आदी अभ्यासक्रमांना तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सन 2016-17 पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे.

तुमच्या निवास व इतर खर्चासाठी या आर्थिक सुविधा दिल्या जातील. यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 

महाराष्ट्र समाज कल्याण विभागामार्फत स्वाधार योजना राबविण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना पात्रता असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश दिला गेला नाही असे सर्व विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत राज्य सरकार विद्यार्थ्यांना बोर्डिंग, निवास आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत करत आहे. परंतु योजनेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला काही पात्रता पूर्ण करावी लागेल. या पात्रता निकषांची पूर्तता केल्यानंतरच तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील हे जाणून घेऊया.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक खाते क्रमांक (जो आधार कार्डशी जोडलेला आहे)
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ओळखपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र


तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या.

मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.

स्वाधार योजनेंतर्गत मिळणारी मदत

  • बोर्डिंग सुविधा - 28,000 रुपये
  • निवास सुविधा - 15,000 रुपये
  • विविध खर्च - 8,000 रुपये
  • वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी 5,000 रुपये (अतिरिक्त)
  • इतर शाखा - 2,000 रुपये (अतिरिक्त)
  • एकूण - 51,000 रुपये


आवश्यक पात्रता
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.
  • उमेदवाघाल वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. हे ओलांडल्यास तुम्ही अर्ज करण्यास पात्र नाही.
  • विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असावे. बँक खाते आधारशी जोडलेले असावे.
  • 10वी किंवा 12वी नंतर विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी अर्ज केला तर तो 2 वर्षांपेक्षा जास्त नसावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मागील वर्गात 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार विकलांग किंवा दिव्यांग असल्यास त्यांच्या मागील वर्गात 40 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी गुण असल्यास तुम्ही अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.

असा करा अर्ज.....

ज्या उमेदवारांना या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते अर्जाची PDF काढून सहजपणे अर्ज करू शकतात. येथे आम्ही तुम्हाला योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी काही स्टेप्स सांगत आहोत. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अर्ज करू शकता.

https://www.syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=%2f

  • सर्वप्रथम उमेदवाराने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना फॉर्म PDF ची लिंक होम पेजवर देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करा.
  • तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर PDF फॉर्म उघडेल.
  • हा फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
  • प्रिंट आऊट घेतल्यानंतर अर्जात सर्व माहिती भरा आणि अर्जासोबत तुमच्या अभ्यासक्रमांनुसार सर्व कागदपत्रे जोडा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाकडे सबमिट करा.
  • कर्मचाऱ्यांनी तुमचा अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सरकारकडून तुमच्या बँक खात्यावर आर्थिक मदत पाठवली जाईल.
  • अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तुम्ही अगदी सहजपणे आर्थिक मदत मिळवू शकता.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या  व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...