( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस? तुम्हाला माहितीये याचा इतिहास?
भारतीय घटनेत नमूद केलेले कायदे, हक्क आणि अधिकार आणि तत्त्वांचं पालन भारतीय नागरिक करतात ती राज्यघटना सर्व प्रथम 26 नोव्हेंबर 1949 रोजी संसदेनं स्वीकारली. हा दिवस साजरा करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय राज्यघटना दिवस किंवा संविधान दिवस म्हणून पाळला जातो.
या घटनेत मूलभूत राजकीय संहिता, रचना, कार्यपद्धती, अधिकार, सरकारी संस्थांची कर्तव्य, मूलभूत हक्क आणि नागरिकांची कर्तव्यं नमूद केलेली आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी शपथ घेण्यासाठी सरकार आणि नागरिकांसाठी भारतीय राज्यघटना हा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.पृथ्वीवरील लिखित स्वरूपातील सर्वांत मोठी राज्यघटना असा या घटनेचा गौरव केला जातो. भारतीय राज्य घटनेला एक सुंदर कलाकृतीच समजलं जातं आणि ही कलाकृती घडवणाऱ्या संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या राज्यघटनेचे शिल्पकार मानले जातात.
भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला लागू झाली त्यामुळे तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मात्र 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संसदेने संविधानाचा स्वीकार केला त्यामुळे तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. हे संविधान लागू झाल्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट 1935 हा कायदा संपुष्टात आला. भारतीय संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर साजरा करण्याचा निर्णय सन 2015 मध्ये अंमलात आणला गेला. केंद्र सरकारने नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यानुसार सामाजिक न्याय मंत्रालयाने आदेश काढला होता.
भारतीय संविधानाने निश्चित केलेल्या यंत्रणा आणि प्रशासनाची पद्धत यावर भारतीय नागरिकांचा असलेला विश्वास हा दिवस साजरा केल्याने दृढ होतो. राज्यघटनेत नमूद केलेल्या देशाच्या लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांची आठवण हा दिवस आपल्याला करून देतो.
जगातील आदर्श ''भारतीय संविधान''
ज्यघटना हा देशाचा मूलभूत पाया आहे. राज्यघटनेद्वारे सरकारचे अधिकार, मर्यादा आणि नागरिकांचे हक्क, कर्तव्ये यांची स्पष्टता मांडलेली आहे. राज्यघटना एक अत्यावश्यक दस्ताऐवज आहे, जो देशाच्या शासनाची चौकट निश्चित करतो.त्याद्वारे जुलूम आणि सत्तेच्या गैरवापरापासून संरक्षक म्हणून काम करतो.
अनेक जाती, भाषा, धर्म, पंथ, रीतीरीवाज, ठराविक अंतरावर बदलणारी भौगोलिक परिस्थिती इतक्या सगळ्या हजारो वेगवेगळ्या घटकांना संविधानाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न घटनाकारांनी केला आहे.
संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो.
1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची स्थापना करण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची सभेचे स्थायी अध्यक्ष आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.मसुदा तयार करण्यासाठी 13 समित्यांची स्थापना केली. संविधान निर्मितीमध्ये 389 सदस्य होते. काही कारणांमुळे त्यातील काही जण बाहेर पडले. त्यामुळे संविधान सभेच्या सदस्यांची संख्या 299 राहिली.
जवळपास तीन वर्षे संविधान निर्मितीचे काम चालले. अनेक सदस्य आरोग्य समस्यांमुळे आणि देशातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असल्याने प्रवास करताना येणाऱ्या अडचणींमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे मसुदा बनवण्याची जबाबदारी मुख्यत्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पार पाडावी लागली.
घटनादुरुती
भारताची घटना दृढता आणि लवचिकतेचे मिश्रण आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 मध्ये घटनादुरुस्तीबद्दल तरतुदी देण्यात आल्या आहे. यात प्रामुख्याने दोन प्रकारे घटनादुरुस्ती करता येईल, हे विशद केलेले आहे.घटनेच्या काही भागांत विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करता येऊ शकते. इतर भागांत घटनादुरुस्ती करण्यासाठी विशेष बहुमतासह अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांच्या मंजुरीची गरज असते.
संविधान हे केवळ एक कायद्याचे पुस्तक आहे का?
आम्ही भारताचे लोक... ही ओळ वाचली की, आपल्याला आठवते ती भारतीय संविधानातील उद्देशिका. आपल्या संविधानाची निर्मिती ही भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटना समितीने म्हणजेच आम्ही भारतीयांनी तयार केली आहे.
आपल्या संविधानाने आपल्याला मुख्यतः दोन प्रकारचे हक्क दिले आहेत. एक कायदेशीर हक्क आणि दुसरे मूलभूत हक्क. संविधानाने आपल्याला ज्या मूलभूत हक्कांची हमी दिली आहे तीच मुळात नागरिकांना आपले आयुष्य एक मनुष्यप्राणी म्हणून अर्थपूर्ण जगता यावे, प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार स्व-विकास साधता यावा, सुसंस्कृत जीवन जगता यावे म्हणून. मूलभूत हक्क व्यक्तीच्या, विचार, उच्चार, हिंडण्या-फिरण्याच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करते. आपल्याला शिक्षण, कौशल्ये आणि रोजगाराची समान संधी मिळते ती मूलभूत हक्कांमुळे. अभिव्यक्ती-धार्मिक-शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यामुळे व्यक्तीला स्व-विकासाची संधी मिळतेच, पण सोबत समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी आणि लोकशाही टिकवून ठेवण्यास मदत होते.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ! हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकले असेल. असे म्हटले जाण्याचे एक कारण, आपण सर्वजण आपल्या हक्कांविषयी जितके जागरूक असतो त्या प्रमाणात आपल्या कर्तव्याबाबत दक्ष असतोच असे नाही. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी संविधानाने सुरुवातीपासूनच आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. इतकेच नाहीतर त्यांचे संरक्षण व्हावे याची ' अनुच्छेद-32 ' द्वारे तरतूद करून ठेवली आहे. यासोबतच संविधानात लोककल्याण आणि राज्याच्या विकासाला प्राथमिकता देत कोणतेही धोरण आखताना किंवा कायदा करताना सरकारने ' राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे ' लक्षात घ्यायला हवीत, असे निर्देश राज्याला दिले आहेत. आपण स्वीकारलेल्या लोकशाही पद्धतीत आपले लोकप्रतिनिधी आपल्या वतीने शासन आणि प्रशासन चालवतात. जर का आपण एक जबाबदार नागरिक म्हणून ठरवून दिलेली काही कर्तव्ये पार पाडली तर लोककल्याण आणि राज्याच्या विकासात आपला देखील प्रत्यक्ष सहभाग राहू शकेल.
सहज पाळता येणारी कर्तव्ये
लोकशाहीचे दायित्व स्वीकारणारे नागरिक तयार व्हावेत, नागरिकांचा लोकशाहीतील प्रत्यक्ष सहभाग वाढावा, समाज विघातक कृतीपासून नागरिकांनी दूर राहावे व आपल्या देशाची सुरक्षा, एकात्मता आणि सार्वभौमत्व टिकून राहावे यासाठी भारतीय संविधानाचे पालन करणे, राष्ट्रीय आदर्शांची जोपासना करणे, भारताची सार्वभौमत्वता, एकता व एकात्मतेचे संरक्षण करणे, देशवासीयांमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, आपल्या संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे जतन करणे, वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी यांचा विकास करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे, राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे, यासारखी कुणाही नागरिकाला सहज पाळता येणारी कर्तव्ये दिली आहेत.
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------
*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419
----------------------------------------------------------
*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419