( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
स्वत:चा व्यवसाय करायचाय? PM SVANidhi योजना करेल आर्थिक मदत, अर्ज कसा करायचा जाणून घ्या..
भारत सरकार स्वयंरोजगाराला चालना देत आहे. यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना पीएम स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana) आहे. या योजनेत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.
केंद्र सरकारने रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी ही योजना सुरू केली आहे.
पीएम स्वानिधी योजना (PM SVANidhi Yojana) –
पीएम स्वानिधी योजनेत कर्जाद्वारे नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. कोविड महामारीनंतर ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत सरकार 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देते.
मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.
जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 10,000 रुपयांचे कर्ज मिळणार आहे.
दुसऱ्यांदा 20,000 रुपये आणि
तिसऱ्यांदा 50,000 रुपये कर्ज दिले जाईल. या योजनेंतर्गत मिळालेली कर्जाची रक्कम 12 महिन्यांच्या आत परत करावी लागते.
पीएम स्वानिधी योजनेचे फायदे –
यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते.
-कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीवर 7 टक्के सबसिडी दिली जाते.
-डिजिटल पेमेंट करताना सरकार कॅशबॅकचा लाभ देते.
-लाभार्थ्याला 25 रुपये ते 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळतो.
अर्ज कसा करायचा ?
तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.
– या योजनेसाठी तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म भरल्यानंतर, तुम्ही त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडाल.
– आता तुम्ही हे कर्ज कोणत्या व्यवसायासाठी घेत आहात हे सांगावे लागेल.
– यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला कर्ज दिले जाते.
आवश्यक कागदपत्र काय आहे?
-आधार कार्ड
-बँक खाते क्रमांक (बँक खाते तपशील)
-पत्त्याचा पुरावा
– मोबाईल नंबर
– पॅन कार्ड
----------------------------------------------------------
*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा