महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
शिक्षण, लग्न ते व्यवसाय.; महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारच्या 'या' 11 खास योजना
आज महिला अनेक क्षेत्रात प्रगती करत आहेत. अगदी कृषी क्षेत्रापासून अंतराळ क्षेत्रापर्यंत महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत, पण दुसरीकडे ग्रामीण भागात आणि निमशहरी भागातील महिलांना रोज अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.
अशा परिस्थितीत महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी राज्य सरकारमार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत. मुलींच्या जन्मापासून ते शिक्षण आणि विवाहानंतरही अनेक योजनांचा लाभ घेता येतो. दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या महिला दिनानिमित्त आपण केंद्र शासन आणि महाराष्ट् सरकारच्या वतीने खास महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी जाणून घेणार आहोत.
आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. भारत सरकार आणि राज्य सरकारने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संधी निर्माण करून देण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. या महिलांसाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजना सुरू आहेत ते जाणून घेऊया.1) माझी कन्या भाग्यश्री योजना
महाराष्ट्र शासनाने एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
2) लेक लाडकी योजना
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी चालवण्यात येणारी आणखी एक योजना म्हणजे, लेक लाडकी योजना. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर, प्रबळ बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.3) महिला उद्योगिनी योजना
महिलांना समाजात मानसन्मान मिळावा आणि विविध उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून त्या सक्षम व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने केवळ महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे.
4) सुकन्या समृद्धी योजना
पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याविषयी असलेल्या चिंतेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने 22 जानेवारी 2015 पासून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली.5) जननी सुरक्षा योजना
देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी जननी सुरक्षा योजना सुरू केली.6) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0
केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
7) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
एखाद्या महिलेच्या पतीचे अकस्मिक निधन झाले किंवा अन्य काही कारणाने मृत्यू झाल्यास महिलांना समाजात एकटं वावरताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि स्वबळावर आयुष्य जगण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.8) महिला समृद्धी कर्ज योजना
महाराष्ट्र शासनाकडून फक्त महिलांसाठी राबवण्यात येणारी ही व्यावसायिक कर्ज योजना आहे. व्यावसायिक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली.
9) लखपती दीदी योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2023 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशातील खेड्यापाड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
10) कन्यादान योजना
विवाह समारंभावर होणारा फालतू खर्च टाळण्यासाठी आणि सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने कन्यादान योजना, महाराष्ट्र सुरू केली आहे.11) महिला सन्मान योजना: महाराष्ट्रातील सरकारी बसमध्ये महिलांसाठी 50% सवलत.
महिला सन्मान योजनेंतर्गत, महिला प्रवाशांना 17 मार्चपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकिटांवर 50 टक्के सवलत मिळत आहे
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
----------------------------------------------------------