हा ब्लॉग शोधा

सोमवार, १८ मार्च, २०२४

निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, अॅपद्वारे करडी नजर; काय आहे CVIGIL App?

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, अॅपद्वारे करडी नजर; काय आहे CVIGIL App?

काय आहे cVIGIL ?

cVIGIL हे असेच एक मोबाइल ॲप आहे. या ॲपद्वारे मतदार आणि नागरिक निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी नोंदवू शकतात. उल्लंघनांमध्ये लाच देणे, मोफत वस्तु देणे, दारूच्या बाटल्या विकणे किंवा परवानगीपेक्षा जास्त वेळ लाऊडस्पीकर वाजवणे यांचा समावेश होतो. पुरावा म्हणून तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकता. निवडणूक आयोगाला तक्रार प्राप्त होताच लगेच कारवाई सुरू होते. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाची टीम 100 मिनिटांच्या आत लोकेशन ट्रेस करुन त्या जागेवर पोहोचेल.


cVIGIL App कसे करते काम?

  • युजरला निवडणुकीदरम्यानच्या गैरप्रकाराचा फोटो काढून किंवा दोन मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ॲपवर अपलोड करावा लागेल. यानंतर भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) नकाशावर स्थानाचा शोध घेईल. तक्रार सबमिट केल्यानंतर प्रत्येक रिपोर्टसाठी एक युनिक आयडी मिळेल.

  • तक्रार केल्यानंतर, माहिती जिल्हा नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचते आणि एका फील्ड युनिटला नियुक्त केले जातात, ज्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड आणि पाळत ठेवणाऱ्या पथकांचा समावेश आहे. ही पथके लोकेशनवर नेव्हिगेट करण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी 'cVIGIL Investigator' नावाचं मोबाइल ॲप वापरतात.

  • एकदा फील्ड युनिटने तक्रारीला प्रतिसाद दिल्यानंतर, ते cVIGIL Investigator द्वारे रिटर्निंग ऑफिसरला फील्ड रिपोर्ट पाठवतात. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर ती तक्रार निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर पाठवली जाते आणि नागरिकांना 100 मिनिटांत परिस्थितीची माहिती दिली जाते आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

cVIGIL ॲपची आवश्यकता का आहे?

cVIGIL ॲप निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यास मदत करते. निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेसोबत एकत्र काम करणे आवश्यक आहे, अशी या ॲपमागचा उद्देश आहे. cVIGIL ॲप कम्युनिटी पोलिसिंगप्रमाणे काम करते. हे ॲप नागरिकांना निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. निष्पक्ष निवडणुकांसाठी अधिकाऱ्यांनी जनतेसोबत मिळून काम केले पाहिजे या विश्वासावर ते आधारित आहे.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...