( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
मतदार यादीत नाव शोधायचे आहे का? मतदान कार्ड,नसेल तरीही करता येईल मतदान; मोबाईलवर घरबसल्या मिळेल बूथ मतदार स्लीप मतदान केंद्रापासून ते मतदार स्लिपपर्यंतची माहिती होईल उपलब्ध
निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या मतदार स्लिप सहज कशा मिळवू शकता हे सांगणार आहोत. यासोबतच तुम्हाला मतदार ओळखपत्राचा तपशील जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणत्या क्रमांकावर मेसेज करावा लागेल.
नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी...
जिल्हाधिकारी कार्यालय संकेतस्थळ : https://electoralsearch.eci.gov.in/
राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ : https://ceoelection.maharashtra.gov.in/search/
केंद्रीय निवडणूक आयोग संकेतस्थळ : https://voters.eci.gov.in
हेल्पलाइन ॲप : voter helpline app
हेल्पलाइन क्रमांक : 1950
मतदान बूथ स्लीपसाठी एसएमएस सुविधा
ECI (तुमचा मतदार आयडी नंबर) 1950 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर आपल्याला केवळ 15 सेकंदात मतदार म्हणून नोंद असलेली बूथ स्लीप मिळेल. मतदानाला जाताना आपल्याजवळ ही स्लीप असावी, जेणेकरून आपल्याला सहजपणे मतदान करता येईल. पुन्हा केंद्रावर जाऊन आपल्याला मतदान बूथ स्लीप घेण्याची आवश्यकता भासणार नाही. आता शिक्षक तथा बीएलओंच्या माध्यमातून स्लीप वाटप सुरू आहे, पण अनेकांना त्या मिळालेल्या नाहीत. त्यांच्यासाठी हा एसएमएसचा पर्याय उत्तम आहे.
जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल आणि तुमचे वय १८ वर्षे असेल तर तुम्ही अगदी सहज मतदान करू शकता. तुम्हाला खालील कागदपत्रे मतदान केंद्रावर न्यावी लागतील. सर्व मतदारांना कोणताही त्रास न होता मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मतदान कार्ड नसल्यास 'हे' पुरावे ग्राह्य
- पासपोर्ट
- वाहन परवाना
- राज्य व केंद्र सरकार
- सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
- पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले फोटो ओळखपत्र
- बँक/पोस्ट ऑफिसमार्फत दिलेले स्मार्टकार्ड
- पॅनकार्ड
- आरजीआय/एनपीआरमार्फत दिलेले स्मार्टकार्ड
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा जॉबकार्ड)
- कामगार मंत्रालय अंतर्गत स्वास्थ्य विमा स्मार्टकार्ड
- फोटोयुक्त पेंशन दस्ताऐवज खासदार, आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले कार्यालयीन ओळखपत्र
- आधारकार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखविल्यास मतदान करता येणार आहे.
मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.
----------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419