हा ब्लॉग शोधा

बुधवार, १ मे, २०२४

कोरोना विषाणूविरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली ही लस तयार करणाऱ्या अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे.

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.



कोरोना विषाणूविरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली ही लस तयार करणाऱ्या अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे.

कंपनीच्या या कबुली जबाबामुळे ही लस घेणाऱ्यांचे टेशन वाढले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात अ‍ॅस्ट्राझेनेकाने या प्रकारची कबुली पहिल्यांदाच दिली आहे. त्यामुळे कंपनीच्या या कबुली जबाबाची जगभरात चर्चा सुरू आहे. ही लस भारतात अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून तयारी केली होती. त्यानंतर ही लस भारतासह जगभरातील अनेक नागरिकांना देण्यात आली होती.

अ‍ॅस्ट्राझेनेकाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होत असल्याचा दावा ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने केला होता. तसेच त्याने अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीविरोधात तेथील न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

या याचिकेवर उत्तर देताना कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविराकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली. मात्र हे दुष्पपरिणाम क्वचितच आढळू शकतात. नागरिकांना घाबरू नये, असेही कंपनीबे स्पष्ट केले आहे.

जगभरातील अनेकांनी घेतली लस

भारतासह जगातील अनेकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविशील्ड ही लस घेतली आहे. कंपनीने ब्रिटनच्या न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कबूल केले आहे की त्यांच्या लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS)हे दुर्मिळ दुष्परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात. यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यासोबत प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जेव्हा असे होते तेव्हा व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

घाबरण्याचे कारण नाही

कोविशील्ड आणि Vaxzevria मुळे रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते. लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने देखील हे मान्य केले आहे. न्यूरो आणि स्पाइन सर्जन डॉ. विकास कुमार यांनी ट्विटरवर एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये या बातमीमुळे त्रासलेल्यांना दिलासा मिळू शकतो. डॉ.विकास यांनी या बातमीचे विश्लेषण करून काय काळजी घ्यावी या बाबत माहिती दिली आहे.

घाबरू नका हे उपाय करा

डॉ.विकास यांनी या बाबत काळजी करण्याबाबत माहिती दिली आहे. नागरिकांनी या बातमीवरून घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. लसीकरण झाल्यावर अटॅक येण्याची शक्यता ही जास्त असते. मात्र, काही दिवसानंतर मात्र, हा धोका कमी होतो, असे डॉ.विकास यांनी स्पष्ट केले आहे. या लसीमूळे फार क्वचित दुष्परिणाम होतात.

डॉक्टर विकास यांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी दिलेल्या टिप्स

1) फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. प्रक्रिया केलेल्या आणि ट्रान्स फॅट्सपासून दूर राहणे फायदेशीर आहे.

2) मिठाचा वापर कमी करा.

3) जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. निरोगी वजन राखणे गरजेचे आहे.

4) दररोज व्यायाम करा (दिवसातून 30-40 मिनिटे)

5) धूम्रपान टाळा.

6) तणाव व्यवस्थापित करा.

7) नियमित तपासणी करा (उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल)

तुम्ही कोणती वॅक्सिन घेतली होती तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या... खाली लिंक वर क्लिक करा.

https://selfregistration.cowin.gov.in/


--------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.


पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...