हा ब्लॉग शोधा

बुधवार, २६ मे, २०२१

तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती.वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला व याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच हा दिवस आपण “बुद्ध पौर्णिमा” म्हणून साजरा करतो. आणि विशेष म्हणजे आजच्याच दिवशी त्यांचे निर्वाण झाले.

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

 

                                                                  *नमोबुद्धाय !*

तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती.वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला व याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच हा दिवस आपण “बुद्ध पौर्णिमा” म्हणून साजरा करतो. आणि विशेष म्हणजे आजच्याच दिवशी त्यांचे निर्वाण झाले. 

आज संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांती तसेच विज्ञानवादी दृष्टिकोण देणाऱ्या दुःख मुक्तीसाठी अष्टांगिक मार्ग  सांगत मानवमुक्ती घडवून आणणाऱ्या जगातील सर्वप्रथम मानसोपचार तज्ञ सृष्टीचा अर्थ लावणारे प्रत्येक गोष्टीला कारण आहे हे सिद्ध करणारे प्रथम शास्त्रज्ञ तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती.वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला व याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच हा दिवस आपण “बुद्ध पौर्णिमा” म्हणून साजरा करतो. आणि विशेष म्हणजे आजच्याच दिवशी त्यांचे निर्वाण झाले. हा अनोखा योग जगात केवळ भगवान बुद्धांच्या बाबतीत घडलेला आहे.

संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली.



*🌼धम्मविचार🌼 

*ज्या पद्धतीने *गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत* हा निसर्गामध्ये आधीपासूनच होता, त्याला *आयझॅक न्यूटन* ने फक्त लोकांसमोर मांडले. त्याच पद्धतीने *विपश्यनाचा सिद्धांत* हा देखील निसर्गामध्ये आधीपासूनच होता, परंतु खूप परिश्रम व पुरुषार्थ करून *विश्वगुरु तथागत बुद्धांनी* त्याला शोधले व लोकांसमोर मांडले, आणि अश्याप्रकारे लोकांना *दुःख मुक्तीचा मार्ग* मिळाला. 

Youtubr Link : 👇

https://youtu.be/cJQwzN3hGwY

भगवान बुद्धांचे संदेश

ईतर धर्मसंस्थपाक, बुवा, महाराज आपल्या उपासकांना केवळ माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतो तेच अंतिम सत्य समजा असे सांगतात पण भगवान बुद्ध आपल्या उपासकांना कालामसुत्तात उपदेश देतात कि केवळ पूर्वजांनी सांगितले, धर्मग्रंथात लिहिले, परंपरा आहे, साधू संतांनी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नका तर तर्काच्या विवेकाच्या कसोटीवर एखादी गोष्ट स्वतःच्या बुद्धीला पटली आणि जर ती गोष्ट तुमच्या व इतरांच्या सुद्धा भल्याची असेल तरच स्वीकारा.

शाक्य गणराज्याचे राजे शुद्धोधन व महाराणी महामाया किंवा मायादेवी ह्यांच्या पोटी गौतम बुद्ध ह्यांचा जन्म झाला. त्यांच्या मातापित्यांनी त्यांचे नाव “सिद्धार्थ” असे ठेवले.परंतु त्यांच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्यांच्या मातेचे निधन झाले व त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने म्हणजेच महाप्रजापती गौतमी ह्यांनी केला.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

त्यांच्याच नावावरून गौतम बुद्ध ह्यांना “गौतम” असे नाव मिळाले.

गौतम बुद्ध ह्यांचा सांभाळ करणारी त्यांची दुसरी आई म्हणजेच मावशी महाप्रजापती गौतमी ह्या अर्हत पद प्राप्त झालेल्या महान भिक्खुणी होत्या. त्यांना जगातील पहिल्या भिक्खुणी मानले जाते.पुढे गौतम बुद्ध ह्यांचा यशोधरा ह्या राजकन्येशी विवाह झाला आणि त्यांना राहुल हा पुत्र झाला.


 महाज्ञानी गौतम बुद्ध ह्यांना जगातील दु:ख बघून संसारातून विरक्ती आली व त्यांनी सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून बोधिवृक्षाखाली तपश्चर्या केली.

अविरत तपस्येनंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि त्यांनी बौद्धधर्माची शिकवण देऊन जगाला जीवनाचा खरा मार्ग व उद्देश दाखवला.

अनेक लोक असा प्रश्न उपस्थित करतात की, तथागत बुद्ध ह्यांचा जन्म नेपाळमध्ये झाला असूनही सर्व भारतीय त्यांना “आपले” का म्हणवतात? तर ह्याचे उत्तर असे आहे की, खरं तर हे महापुरुष कुठल्या एका देशाचे नसतात. सर्व जग त्यांचे व ते सर्व जगाचे असतात. भारतीयांसाठी तर तथागत बुद्ध हे दैवतच आहेत.कारण त्यांचा जन्म जरी नेपाळमध्ये झाला असला, तरीही त्यांच्या आयुष्यातील सर्व महत्वाच्या गोष्टी ह्या भारतात घडल्या.


गौतम बुद्ध ह्यांचा जन्म इसवी सन पूर्ण ५६३ साली नेपाळ मधील “लुंबिनी” ह्या ठिकाणी झाला 

असला तरीही,त्यांनी ज्या ठिकाणी ध्यान व तप करून ज्ञान प्राप्त केले.

*आर्य सत्य*

भगवान बुद्धांनी चार आर्य सत्य सांगितली आहेत. आर्य म्हणजे महान सत्य, वस्तुनिष्ठ सत्य, व व्यवहार्य स्वरूप सिद्ध करणारे सत्य या तत्वज्ञानाचा मध्यम मार्ग, तर्कशुद्ध, विशुद्ध मानवी जीवन मार्ग होय.

*पहिले आर्य सत्य - दुःख*

जगात दुःख आहे, सर्व जग दुःखाने भरलेले आहे, हे दुख शारीरिक व मानसिक असू शकते, विश्वामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला दुःख भोगावे लागते. पाच उपादन स्कंध दुःख आहे. यालाच दुःख आर्य सत्य म्हणतात.

*दुसरे आर्य सत्य - म्हणजे दुःख समुदाय*

मानवी जीवनात असलेले दुःख याला कारण आहे, कोणतेही दुःख आपोआप निर्माण होत नाही त्याला काहीतरी कारण असतेच, दुःख मनुष्याची तृष्णा म्हणजे तिला अतृप्ती, असंतोष, हाव, मोह, लोभ, काम, द्वेष, घोर निराशा, चिंता असे म्हणतात. तृष्णा दुःखाचे मूळ कारण आहे.

१) काम तृष्णा म्हणजे जे भोगविलासाची तृष्णा म्हणजे आसक्ती आहे, वस्तू सुख व आसक्ती निर्माण होते, ही  तृष्णा जीवनात दुःख निर्माण करते.

२) भवतृष्णा म्हणजे जीवनासक्ती अस्तित्वासाठी असलेली तृष्णा.

३) विभव - तृष्णा म्हणजे भयंकर निराशेने ग्रासून उत्पन्न झालेली मरणाशक्ती तृष्णा. अशी दुःखाची कारणे आहेत.

*तिसरे आर्य सत्य म्हणजे - दुःख निरोध* 

दुःख आहे म्हणून त्याचे कारणही आहे, या गोष्टीचे आकलन करून ते नष्ट करणे, दुःखाचा निरोध करणे, थांबविणे किंवा नष्ट करणे शक्य आहे. सत्य जाणून घेणे व निरोध करणे म्हणजे आपल्या तृष्णेला, वासनेला, विकाराला थांबविणे याला दुःख निरोधाचे तिसरे आर्यसत्य म्हणतात.

महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी विस्तृत जागेत पसरलेले जगप्रसिद्ध बौध्द विहार


*चौथे आर्य सत्य म्हणजे - दुःख निरोधगामिनी प्रतिपदा किंवा दुःख मुक्तीचा मार्ग*

भगवान बुद्धांनी दुःख मुक्तीचा आर्य अष्टांगिक मार्ग तीन भागात विभागलेला आहे.

१) प्रज्ञा

२) शील

३) समाधी

*आर्य अष्टांगिक मार्ग* 

१) सम्यक दृष्टी 

२) सम्यक संकल्प

३) समय वाचा

४) सम्यक कर्मांत 

५)सम्यक आजीविका

६) सम्यक व्यायाम 

७) सम्यक स्मृती

 ८) सम्यक समाधी

दुःखातून मुक्त होणे, निर्वाण प्राप्त करून घेणे म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय, यालाच निर्वाणाकडे जाणारा मार्ग म्हटले आहे आणि हे चौथे आर्य सत्य आहे.

“राजपुत्र सिद्धार्थ गौतम” चे “महाज्ञानी गौतम बुद्ध” झाले ती जागा म्हणजे भारतातील बोधगया होय.

बोधगया बिहार ह्या राज्यात आहे हे तर सर्वांना माहित असेलच. 

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच हा दिवस आपण “बुद्ध पौर्णिमा” म्हणून साजरा करतो.

ज्ञानप्राप्तीनंतर महाज्ञानी बुद्धांनी पाच पंडितांना उपदेश केला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्कपवत्तन’ किंवा ‘धम्मचक्रप्रवर्तन’ असे म्हणतात.

ह्या प्रवचनात गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची मुलतत्वे सांगितली.

त्यांनी ज्या ठिकाणी हे प्रवचन केले ती जागा म्हणजे सारनाथ होय. सारनाथ हे उत्तर प्रदेश येथे आहे.

तसेच गौतम बुद्धांनी ज्या नालंदा विश्वविद्यालयात ज्ञानदान केले ते नालंदा विश्वविद्यालय सुद्धा बिहारमध्ये म्हणजेच भारतातच आहे.

अनेकांना बौद्ध धर्माची शिकवण दिल्यानंतर त्याचा आणखी प्रसार करण्यासाठी गौतम बुद्ध ह्यांनी मगध राज्य व महाजनपदांत प्रवास करून हजारो लोकांना बौद्ध धर्माची शिकवण दिली.

हे सर्व कार्य त्यांनी भारतातच केले. इसवी सन पूर्व ४८३ मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले.

 कुशीनगर हे शहर देखील उत्तर प्रदेशातच म्हणजे भारतातच आहे. गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ भारतातच व्यतीत केला.

त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शरीराचे ७ अवशेष भारतातच. ठेवण्यात आले व एक अवशेष शाक्य पंथीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली बौद्ध परिषद बिहार येथील राजगृह येथे झाली होती. अजातशत्रू राजा व साधू महाकश्यप ह्यांनी ही परिषद आयोजीत केली होती.

ह्या परिषदेचे उद्दिष्ट्य भगवान बुद्धांच्या विनय व सुत्तांचे जतन करणे हे होते.

ह्याचप्रकारे दुसरी बौद्ध परिषद वैशाली येथे, तिसरी पाटलीपुत्र येथे तर चौथी बौद्ध परिषद कुंडलवन म्हणजेच काश्मीर येथे झाली होती. ह्या परिषदांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करण्याविषयी चर्चा झाली होती.

आता ऐतिहासिक दृष्ट्या बघायचे झाले तर इसवी सन पूर्व २०० -३०० मध्ये नेपाळ ह्या देशाचे अस्तित्व सुद्धा नव्हते.

भारतीय उपखंडात मौर्यांचे राज्य होते व मौर्यांची राजधानी ही पाटलीपुत्र होती. पाटलीपुत्र म्हणजेच बिहारची राजधानी पटना शहर होय. मौर्यांचे साम्राज्य हे जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक होते.

गौतम बुद्ध ह्यांचा व बौद्धधर्माचा सर्वात मोठा अनुयायी म्हणजे मौर्य वंशीय सम्राट अशोक ! हा सम्राट अशोक एक भारतीय राजा होता.

ह्यानेच आशिया खंडात बौद्धधर्माचा प्रसार केला. सम्राट अशोकाने सर्वत्र बौद्ध धर्माचा प्रसार केल्यामुळे जग हे भारताला गौतम बुद्धांची भूमी म्हणून ओळखते.

जगभरातून लाखो लोक बोधगया, सारनाथ व कुशीनगर येथे दर्शनासाठी येतात. जितके लोक भारतात येतात तितके नेपाळला दर्शनासाठी जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

म्हणजेच फक्त भारतीयच नव्हे तर अख्खं जगच भारताला गौतम बुद्धांची भूमी म्हणून ओळखतं!

भारतात बौद्धधर्माची अनेक पवित्र स्थाने आहेत. पटना, राजगिर, नालंदा, श्रावस्ती, वैशाली, सांची येथे दर वर्षी अनेक बौध्दधर्मीय जाऊन दर्शन घेतात. येथील विहारांमध्ये ध्यान करतात.

बौद्ध धर्माचे मूळ भारतातच आहे.

बौद्धधर्मातील महत्वाची स्थाने व विहारांवरूनच ह्या राज्याला “बिहार” हे नाव पडले असे म्हणतात.

जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडावर मौर्यांचे राज्य होते. नेपाळचाही अर्ध्यापेक्षा अधिक भाग भारतात होता. व उरलेल्या भागात म्हणजेच आज जिथे चीन आहे तो भाग प्रोटो तिबेटी राज्यात होता. भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी ह्या शहरात झाला.हे शहर कपिलवास्तू ह्या राज्यात होते.

भगवान बुद्धांचे वडील महाराज शुद्धोधन हे शाक्य साम्राज्याचे म्हणजेच कपिलवास्तूचे प्रमुख होते. हे कपिलवास्तू राज्य भारतातल्या १६ महाजनपदांपैकी एक होते.म्हणजेच तेव्हा हे राज्य म्हणजे भारताचाच एक भाग होता.त्यानंतर सुद्धा लिच्छवींच्या काळात हा प्रदेश लिच्छवी अधिराज्यात वृज्जी महाजनपदांच्या अखत्यारीत येत होता.

ह्या साम्राज्याची राजधानी वैशाली होती. त्यानंतर ह्या प्रदेशावर अजातशत्रू ह्या राजाचे राज्य आले. त्या काळात सुद्धा हा प्रदेश भारतीय भूमी म्हणूनच ओळखला जात असे.इसवी सन २०० ते ५०० दरम्यान गुप्त व हुणांच्या काळात नेपाळचा जन्म झाला.त्या आधी हा प्रदेश भारतभूमिचाच भाग होता. म्हणूनच भगवान बुद्धांचा जन्म सुद्धा भारताच्याच भूमितला आहे.

म्हणूनच भारतीय भगवान बुद्धांना आपले म्हणतात व जग सुद्धा भारताला “भगवान बुद्धांची भूमी” असे समजते.

ज्या महापुरुषाने सर्व जगाला आपले मानून सत्य व अहिंसेची शिकवण दिली ते भगवान बुद्ध साऱ्या जगाचे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

प्राचीन भारतातील तक्षशिला विश्वविद्यालय 

Youtubr Link : 👇

https://youtu.be/7rqAEr8n_74

बौद्ध शिक्षणाचं सर्वात जुनं  केंद्रबिंदू म्हणून आपण तक्षशिला ह्या विद्यापीठाकडे पाहतो .सम्राट अशोकांनी आपल्या कारकिर्दीत असे अनेक विद्यापीठ उभारून बौद्ध संस्कृती जीवंत ठेवली होती आणि जगभर बौद्ध शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला होता जगाला जर शिक्षणाचं महत्व कोणी समजावलं तर ते म्हणजे सम्राट सशोक आहेत.

मात्र काळाच्या आड बौद्ध संस्कृती आणि साहित्य जमिनी आड दडली आणि हजारो वर्षे आपण बौद्ध शिक्षणापासून अलिप्त राहिलो. 

ज्याचा आदी, अंत, आणि मध्य कल्याणकारी आहे, सुखकारक आहे अश्या धम्म जगाला देणाऱ्या शाक्यमुनी भगवान बुद्धांना वंदन.

नमो बुध्दाय!

 *तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!    

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविध 

https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc 

मंगळवार, २५ मे, २०२१

*हे ब्रॅण्ड्स तुम्हाला “भारतीय वाटतात – पण अजिबातच भारतीय नाहीत!*

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 



*हे ब्रॅण्ड्स तुम्हाला “भारतीय वाटतात – पण अजिबातच भारतीय नाहीत!*

भारतातील वयस्क माणसे अगदी चोखंदळ पणे शोधून शोधून भारतीय किंवा ‘मेड इन इंडिया’ टॅग च्या वस्तू खरेदी करतात.भारतीय बनावटीच्या वस्तू आता आंतरराष्ट्रीय बाजारात देखील उपलब्ध आहेत.कित्येक वेळा आपण खरेदी करायला गेलो की, वाटू वरचा टॅग किंवा कंपनीचे नाव वाचून ठरवतो ती घ्यायची की नाही ते. परदेशी ब्रँड तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असतात. त्याच्या व्यतिरिक्त असणारे म्हणजे भारतीय असे समजून आपण ते विकतही घेतो.पण कधी कधी आपली फसवणूक होते.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

*अस्सल देशी वाटणारे कित्येक ब्रँड चक्क भारतीय नसून बाहेरील देशातील आहेत.*

विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. खालील काही ब्रॅण्डस हे नावाने वाटले तरी भारतीय अजिबातच नाहीत. ही फसवी नावे आणि त्यांची माहिती वाचून तर पाहा.

*१) इंडियन मोटरसायकल ( Indian Motorcycle )*

इंडियन म्हणजे भारताचे’ पण ह्या मोटरसायकल खरेचं भारताच्या आहेत का?

खरं तर ही अमेरिकेची कंपनी आहे. हिचं आधीचं नाव हिंडी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असे होते, पण १९२८ साली त्यांनी नाव बदलून इंडियन मोटरसायकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असे नामकरण केले.गमतीची बाब अशी की त्यांचे भारतातील पहिले शोरूम मात्र त्यांनी २०१४ मध्ये उघडले.

*२) हिंदुस्थान युनिलीवर लिमिटेड ( Hindusthan Unilever Limited )*

भारताचे इतिहासापासून कायम वापरण्यात आलेले नाव म्हणजे ‘हिंदुस्तान’. पण नावात हिंदुस्तान असले तरी ही कंपनी हिंदुस्थानी नाही.

ही कंपनी एका युनिलीवर नावाच्या अँग्लो-डच कंपनिच्या मालकीची आहे. मार्च २०१५ पासून ६७% शेअर्स ह्याच कंपनीच्या नावे आहेत.

*३) बाटा शूज ( Bata )*


ह्यानावाने तर नक्कीच धक्का बसेल. लहान पणापासून शाळा सुरू होताना शाळेच्या बूट आणि सॉक्सची खरेदी बाटा मधूनच ठरलेली असायची.

मजबूत बनावटीची पादत्राणे कायमच भारतीयांच्या पसंतीस उतरली आहेत. आता इतर फॉरेन ब्रॅण्डसच्या स्पर्धेत टिकून राहायला बाटा ने नवीन फॅन्सी शूजचे पण कलेक्शन आणले आहे.कित्येक वर्षे आपण बाटा ही भारतीय कंपनी मानत आलो आहोत. आणि म्हणून बिनदिक्कतपणे तिथून खरेदी करत आलो आहोत.‘ द बाटा शु कंपनी’ १८९४ मध्ये झलीन, मोराविया इथे उभारण्यात आली.कॉब्लर म्हणजे कर्माने चांभार असलेले टॉमस बाटा, त्यांचा भाऊ अंटॉनिन आणि बहीण ऍना ह्यांनी मिळून ही कंपनी थाटली.आता जगभरात प्रसिद्ध असलेला हा ब्रँड भारतातही आपलासा वाटतो. ह्याचे हेड क्वार्टर लोसॅन, स्वित्झर्लंड इथे आहे.

*४) कोलगेट ( Colgate )*

वर्षानुवर्षे भारतीयांची सकाळ ज्या पेस्टने सुरू होते ती म्हणजे कोलगेट.

ही पेस्ट इतक्या वर्षांपासून भारतात वापरली जाते की, ही भारतीय नसून बाहेरील देशातून आलेली आहे ह्याचा विसर सगळ्यांना पडलेला आहे. इतका की ‘पेस्ट’ हा शब्द कोलगेट म्हणूनच वापरला जातो.. अमेरिकेच्या कोलगेट पामोलिव्ह ह्या कंपनीचे कोलगेट हे प्रॉडक्ट आहे. जगभरात साबण, डिटर्जंट, मुखशुद्धीची प्रसाधने कोलगेट तर्फे बनवून विकली जातात.

*५) टट्रा ट्रक्स ( Yatra )*

भारतीय लष्करात जे ट्रक वापरले जातात त्यांची जडणघडण अगदी भारतीय वाटते. त्यांची बनावट भारतीय रस्त्यांवर उपयोगाला येईल अशीच आहे. पण हे ट्रक भारतीय नाहीत.टट्रा ही झेक रिपब्लिक ह्या देशातील आहे. १८५० साली ही बनवण्यात आली.टट्रा पर्वत रांगांवरून हे नाव कंपनीला देण्यात आले आहे. भारत अर्थ मूव्हर्स ह्या कंपनी सोबत भारतीय पद्धतीचे ट्रक ही ‘टट्रा कंपनी’ बनवते.

*६) स्टार टीव्ही ( Star Tv )*

केबल टीव्ही आल्यापासून प्रसिद्ध सिरीयल पाहणे सुरू झाले ते स्टार टीव्ही वर.स्टार नेटवर्क हे भारतातील जवळपास सगळ्या भाषेत उपलब्ध आहे. स्टेट लेवल वरच्या सीरिअल, बातम्या आणि मनोरंजनाचे कार्यक्रम स्टार चॅनेल वरून घराघरात पोहोचले आहेत.भारतातील प्रत्येक टीव्ही वर दिसणारे हे स्टार नेटवर्क २१st सेंच्युरी फॉक्स ह्या अमेरिकन मल्टिनॅशनल मास मीडिया कंपनीचा भाग आहे आणि स्टार इंडियन हे युनिट भारतात प्रक्षेपण करते.

*७) नेस्ले ( Nestle )*

रोजच्या खाण्यात असलेले मॅगी नूडल्स आणि किटकॅट सारख्या चॉकलेट्स ची जननी नेस्ले कंपनी आहे. पण ही भारतीय नसून स्वित्झर्लंड ची कंपनी आहे.स्वित्झर्लंड मध्ये वेवे येथे त्यांचे हेड क्वार्टर आहे. जगभरात प्रसिद्ध असलेली ही फूड आणि बेव्हरेज कंपनी भारतातही आहे.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

*८) बोस स्पीकर्स ( Bose )*

बोस हे बंगाली आडनाव आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे बोस स्पीकर्स भारतीयच असले पाहिजेत असा आपला गोड गैरसमज होऊ शकतो.गम्मत अशी की हे खरेच बंगाली आडनाव आहे आणि अमर बोस ह्या माणसाने हे प्रॉडक्ट बाजारात आणले आहे. मग तरीही हे भारतीय कसे नाही बुवा?कारण जरी अमर बोस ने हे बनवलेले असले तरी ही कंपनी अमेरिकन आहे आणि ही व्यक्ती सुद्धा NRI आहे.१९६४ साली फार्मिंगहॅम मसच्युसेटस येथे स्थापण्यात आली आणि ऑडिओ रेंज चे सगळे इक्विपमेंट्स ही कंपनी बनवते.

*९) गुंडांग गरम सिगारेट्स ( Gudang Garam )*

नावात भारतीय भाषेतील शब्द असले तरी हा सिगरेट चा ब्रँड भारतीय नाही.१९५८ साली इंडोनेशिया मध्ये जोआ इंग हवी नामक माणसाने ही मसाला सिगरेट बनवली आणि अंतर राष्ट्रीय बाजारात आणली.गुंडांग गरम ह्याचा इंडोनेशियन भाषेतील अर्थ म्हणजे ‘मिठाचे आगार’…

*१०) वेदांता रेसोर्सेस ( Vedanta )*

वेद पुराणे हे भारतीय संस्कृतीशी निगडित शब्द आहेत.भारतात वेद, वेदांत अशी लहान बाळांची नावे ठेवण्यात येतात. एखाद्या उद्योगाला देखील आशा प्रकारची नावे दिलेली आपण पाहतो.ओडिशा मध्ये खाण कामासाठी भली मोठी जमीन नावावर असलेली ही वेदांता रेसोर्सेस कंपनी भारतीय मात्र नाही.हिचे हेडक्वार्टर लंडन येथे आहे आणि ह्या कंपनीतील शेअर्स बऱ्याच ब्रिटिश लोकांकडे आहेत.

*११) टाईड डिटरजेंट ( Tide )*

सगळ्यात जास्ती सफेदी मिळवून देण्याचा दावा करणारी, पांढरे शुभ्र कपडे पाहून ‘चकित झालात’ अशी जाहिरात दाखवणारे टाईड डिटर्जंट आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे.घरोघरी वापरले जाणारे हे प्रॉडक्ट भारतीय बनावटीचे नसून प्रॉक्टर अँड गँबल ह्या अमेरिकन कंपनीत बनवले जाते.१९४६ साली अमेरिकेत स्थापलेली ही कंपनी इतके वर्ष जगभरात आपली उत्पादने विकत आहेत.

हे सगळे वाचून आपल्या भ्रमाचा भोपळा नक्कीच फुटला असेल.त्यामुळे जर आपण भारतीय वस्तू निग्रहाने वापरात असाल तर ह्यांचा ब्रँड तपासून बघून मगच वस्तू खरेदी करा.

बाकी ज्यांना वस्तूच्या ‘मेक’शी काहीही घेणे देणे नाही त्यांना ह्या वस्तू खरेदी करण्यास काहीच अडचण नसावी..!!

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.       https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc 

शनिवार, २२ मे, २०२१

*या मार्गांद्वारे तुम्ही पंतप्रधान मोदींशी संपर्क साधू शकता*

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

 

 *या मार्गांद्वारे तुम्ही पंतप्रधान मोदींशी संपर्क साधू शकता*

पंतप्रधानांबरोबर अपॉइंटमेंटसाठी कधी संपर्क करावा ?

सर्वात आधी तुमच्या क्षेत्रातील आमदार किंवा खासदार यांच्याकडे आपली तक्रार किंवा शंका कळवावी. तिथे तुमच्या शंकेचे निरासन न झाल्यास तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधावा.

हे सर्व करून देखील तुमच्या शंकेचे तुम्हाला समाधान मिळाले नसेल तर, तुम्ही थेट नरेंद्र मोदी यांच्याशी देखील संपर्क साधू शकता.

काही वर्षांपूर्वी रेल्वे मंत्री ‘सुरेश प्रभू’ यांना कोणीतरी ट्विटरद्वारे मदत मागितली होती, लगेच त्या ट्विटची दखल घेत त्या व्यक्तीला मदत मिळाली देखील. अशाच प्रकारे माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना विदेशात अडकलेल्या काही भारतीयांनी ट्विटर द्वारे मदत मागितली आणि ताबडतोब त्यांना देखील मदत मिळाली.

अगोदर काही तक्रारी असल्यास त्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत मोठ्या मुश्किलीने पोहोचायच्या किंवा पोहोचतही नव्हत्या. पण आता काळ बदलला आहे. आता एका ‘क्लिक’ वर देशाच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडे पोहचणे शक्य झाले आहे.

 *#तुमच्याविरुद्ध खोटी #FIR दाखल झाली तर काय कराल? समजून घ्या…*अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बाबतीत मागे नाहीत, त्यांनी यासाठी खास पावले उचलली आहेत. जनतेला संबोधित करण्यासाठी त्यांनी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सुरू केला. या द्वारे ते भारतातील तमाम जनतेला संबोधित करतात. भारतातील सामान्य नागरिकांना आपला मुद्दा, आपले विचार, आपले प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडायचे असतात.

तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही सुद्धा अगदी सहजपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपर्क करू शकता.

खाली दिलेल्या सोप्या स्टेप फॉलो करा, जेणेकरून तुम्ही अगदी सहजपणे पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधू शकाल.

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

                                 ESI व EPFO चे सर्व काम केले जातात. 7900094419


पंतप्रधानांबरोबर अपॉइंटमेंटसाठी कधी संपर्क करावा ?

सर्वात आधी तुमच्या क्षेत्रातील आमदार किंवा खासदार यांच्याकडे आपली तक्रार किंवा शंका कळवावी. तिथे तुमच्या शंकेचे निरासन न झाल्यास तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधावा.

हे सर्व करून देखील तुमच्या शंकेचे तुम्हाला समाधान मिळाले नसेल तर, तुम्ही थेट नरेंद्र मोदी यांच्याशी देखील संपर्क साधू शकता.

अधिकृत वेबसाईट द्वारे नरेंद्र मोदी यांच्याशी कसा संपर्क साधावा ?

स्टेप 1 – तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास PMO च्या अधिकृत वेबसाईटवर जावे. website : www.pmindia.gov.in

स्टेप 2 – आता ‘Write to the Prime Minister’ या option वर क्लीक करावे.

स्टेप 3 – तिथे दिलेल्या फॉर्ममध्ये योग्य ती डिटेल भरावी.

स्टेप 4 – फॉर्म सबमिट करावा.

स्टेप 5 – लवकरच पंतप्रधान कार्यालयातून तुमच्याशी संपर्क साधण्यात येईल.

पोस्टाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क कसा साधावा ?

ऑनलाईन माध्यमे खेड्यापाड्यांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाइन व्यतिरिक्त पोस्टाद्वारे सुद्धा तुम्ही पंतप्रधानांशी संपर्क साधू शकता. त्यासाठीचा पत्ता खालील प्रमाणे आहे.

पंतप्रधान कार्यालय (Prime Ministers Office)

साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली 110011 (South Block, New Delhi 110011)

NaMo App’ द्वारे पंतप्रधानांशी संपर्क कसा साधावा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आणखी एक पर्यायदेखील आहे. तो म्हणजे मोबाईल ॲप द्वारे संपर्क साधणे. तुमच्या मोबाईल मध्ये ‘नमो’ नावाचे ॲप डाऊनलोड करा. ह्या ॲपच्या साहाय्याने तुम्ही पंतप्रधानांपर्यंत आपले म्हणणे पाठवू शकता. हे ॲप iOS, Android किंवा Windows यामध्ये देखील उपलब्ध आहे.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

फॅक्सद्वारे पंतप्रधानांशी संपर्क कसा साधावा ?

आपण फॅक्सद्वारे पंतप्रधानांना आपले प्रश्न पाठवू शकता

Fax No - . 0091-11-23019545/0091-11-23016857

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ई-मेलद्वारे संवाद कसा साधावा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या ईमेल ॲड्रेस द्वारे संपर्क साधावा.

Email : narendramodi1234@gmail.com

सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कसा संपर्क साधावा ?

Facebook – https://www.facebook.com/narendramodi/

Twitter – https://twitter.com/narendramodi?s=20

Youtube – https://www.youtube.com/c/NarendraModi

Instagram – https://instagram.com/narendramodi?igshid=tmos1eycq204

पंतप्रधानांबरोबर अपॉइंटमेंटसाठी कधी संपर्क करावा ?

सर्वात आधी तुमच्या क्षेत्रातील आमदार किंवा खासदार यांच्याकडे आपली तक्रार किंवा शंका कळवावी. तिथे तुमच्या शंकेचे निरासन न झाल्यास तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधावा.

हे सर्व करून देखील तुमच्या शंकेचे तुम्हाला समाधान मिळाले नसेल तर, तुम्ही थेट नरेंद्र मोदी यांच्याशी देखील संपर्क साधू शकता

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.        https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc  

शुक्रवार, २१ मे, २०२१

*भारतीय रेल्वेतील जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल या शब्दांचा अर्थ काय? जाणून घ्या*

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 


*भारतीय रेल्वेतील जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल या शब्दांचा अर्थ काय? जाणून घ्या*

भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. देशभरात तब्बल 7 हजार 349 रेल्वे स्थानक आहेत. भारतात दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. अनेकांना एखाद्या ठिकाणी प्रवास करायचे असल्यास तर ते रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. भारतात अशी फार कमी लोक आहेत ज्यांनी कधीही ट्रेनने प्रवास केलेला नाही.

तुम्हीही जर भारतीय रेल्वेचे नियमित प्रवासी असाल, तर तुम्हाला प्रवासादरम्यान अनेक रेल्वे स्थानक दिसत असतील. यातील काही रेल्वे स्थानकांच्या नावापुढे जंक्शन, सेंट्रल किंवा टर्मिनस असे शब्द लिहिलेले असतात. या शब्दांचा नेमका अर्थ काय असतो? फक्त काही स्थानकांपुढे हे विशिष्ट शब्द का लिहिलेले असतात? असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असेल. आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नांची उत्तर देणार आहोत.

*भारतातील स्थानकांची चार विभागत विभागणी* 

भारतीय रेल्वेमध्ये असलेली हजारो रेल्वे स्थानक ही काही विशिष्ट श्रेणीमध्ये विभागली गेली आहे. त्या प्रत्येक श्रेणीच्या नावाचा एक अर्थ असतो. तसेच ती श्रेणी एक विशेष संदेशही देते. यात जंक्शन, टर्मिन्स, सेंट्रल आणि स्टेशन या तीन श्रेणींचा समावेश आहे.

*Aadhar card प्रिंट बंद केल्याची UIADI ची मोठी घोषणा, आधार कार्डला आता नवा पर्याय*

यापुढे ग्राहकांना मोठ्या आकाराची Aadhar card प्रिंट बंद केले आहे. त्याऐवजी क्रेडिट कार्डच्या आकाराचे PVC आधार कार्ड दिले जाणार आहे.या PVC कार्डचा आकार डेबिट कार्ड इतकाच लहान आहे. हे कार्ड आधीच्या आधार कार्डपेक्षा तुलनेने लहान असल्याने खिशात   पॅकेटमध्ये सहज ठेवता येणार आहे. UIDAI ने आपल्या वेबसाइटवरून आधार रिप्रिंट करण्याचा पर्याय देखील काढून टाकला आहे.  अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा.. *(आधार कार्ड आणि पॅन कार्ड ची कामे केली जातील.)*सतोष विठ्ठल साळवे... सृष्टी महा ई सुविधा..7900094419* आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!*


*💠 जंक्शन -Junction*

ज्या रेल्वेस्थानकातून दोन किंवा अधिक मार्ग निघतात त्यांना जंक्शन असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या स्टेशनवरुन जर तीन वेगवेगळ्या ठिकाणावरुन रेल्वे येत असेल आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही रेल्वेतून जाऊ शकत असाल, तर त्याला जंक्शन असे म्हटलं जाते. भारतामध्ये 300 पेक्षा जास्त जंक्शन आहेत. भारतातील सर्वात मोठे जंक्शन हे मथुरा आहे. या ठिकाणी सर्वाधिक सात मार्ग निघतात.

तर सेलम जंक्शनवरुन सहा मार्ग तर विजयवाडावरुन पाच मार्ग निघतात, हे देखील सर्वात मोठ्या जंक्शनच्या यादीत येतात. तसेच दिल्ली जंक्शनमधून चार मार्ग निघतात. दिल्ली जंक्शन ते दिल्ली शाहदरा, सबजी मंडी, सदर बाजार आणि दिल्ली किशनगंज रेल्वे स्थानक मार्ग देशाच्या विविध भागात जातात. दिल्ली जंक्शन व्यतिरिक्त हावडा जंक्शन, पटना जंक्शन, प्रयागराज जंक्शन, दिवा जंक्शन, कल्याण जंक्शन देशातील प्रमुख जंक्शनमध्ये आहेत.

*💠 सेंट्रल – Central*

ज्या रेल्वे स्थानकाच्या नावाच्या पुढे सेंट्रल असते, ते स्टेशन शहरातील सर्वात जुने आणि प्रमुख रेल्वे स्टेशन मानले जाते. तसेच हे स्टेशन शहरातील मुख्य परिवहन केंद्रही मानले जाते. सेंट्रल लिहिलेल्या स्थानकांवर इतर रेल्वे स्थानकांपेक्षा जास्त सेवा पुरविल्या जातात. हे रेल्वे स्थानक शहरातील इतर स्थानकांपेक्षा जास्त व्यस्त असते. ही रेल्वे स्थानके बरीच मोठी असतात. या स्थानकांवर देशातील प्रमुख शहरे जोडणार्‍या रेल्वे मोठ्या संख्येने ये-जा करतात. देशातील प्रमुख मध्य रेल्वे स्थानकांमध्ये मुंबई सेंट्रल, कानपूर सेंट्रल, चेन्नई सेंट्रल इत्यादींचा समावेश आहे. 

*💠 टर्मिनस/टर्मिनल – Terminus / Terminal*

जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसविषयी अनेकदा ऐकले असेल. कित्येदा या स्थानकावरुन प्रवासही केला असेल. टर्मिनल किंवा टर्मिनसचा अर्थ म्हणजे शेवटचे स्टेशन. या स्टेशनच्या नंतर कोणतेही स्टेशन किंवा कोणताही रेल्वेचे स्थानक नसते. टर्मिनल रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या ट्रेनच्या गाड्या फक्त एकाच दिशेने जातात.

देशभरात एकूण 27 टर्मिनस स्टेशन आहेत. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दोन टर्मिनस स्टेशन आहेत. या दोन्ही स्थानकावरुन फक्त एकाच दिशेला ट्रेन धावतात.

*💠 स्टेशन – Station*

आता वरील एखाही विभागणी सहभागी न होणाऱ्या जागेला स्टेशन असेल म्हणतात. या ठिकाणी रेल्वेचा थांबा दिला जातो. प्रवाशांची ये-जा असते. भारतात हजारो रेल्वे स्थानक आहेत.-

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

-----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.  https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc  

गुरुवार, २० मे, २०२१

जाणून घ्या आयकर विभाग ( .incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

 


जाणून घ्या आयकर विभाग ( .incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी

करदात्यांना आता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. या उद्देशाने कर विभागाने ७ जून रोजी ई-फाइलिंग पोर्टल सुरू केले आहे. या नवीन वेबसाइटमध्ये, आयकर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेत नवे बदल केले आहेत.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आयकर विभाग ७ जून रोजी www.incometax.gov.in  या ई-फाइलिंग पोर्टलची सुरूवात केली आहे. यामुळे करदात्यांना अधिक सोयीचा आणि आधुनिक अनुभव मिळेल. असे त्यांनी म्हटले आहे. या नव्या वेबसाईटमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे करदात्यांना सोयीचे होणार आहे.


सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते, ...संतोष विठ्ठल साळवे. संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही)

आयकरच्या नव्या वेबसाईट बाबत या 'दहा' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

१) ७ जून पासून नवी ई-फाईलिंग लिंक - www.incometax.gov.in आताची असणारी लिंक www.incometaxindiaefiling.gov.in या लिंकच्या जागेवर असेल.

२) नवा आयकर ई- फायलिंग पोर्टल आयकर रिटन्सच्या प्रक्रियेवर आयकर दात्यांना परतावा मिळवण्यासाठी काम करते.

३) आयकर दात्यांना पाठपुरावा तसेच अपलोड प्रक्रिया, संवाद एकाच डॅशबोर्डवर करता येणार आहे.

४) आयटीआर प्रिपरेशन सॉफ्टवेअर फ्रीमध्ये असणार आहे. यासह परस्पर प्रश्नही विचारु शकता.

५) आयटीआर १, ४ (ऑनलाइन, ऑफलाइन) आणि आयटीआर २ (ऑफलाइन) करदात्यांसाठी विनामूल्य आयटीआर सॉफ्टवेअर उपलब्ध असेल.

६) आयटीआर ३,५,६,७ च्या तयारीसाठी सॉफ्टवेअर लवकरच उपलब्ध करुन दिले जाईल.

७) करदाते आपले प्रोफाईल अपडेट करु शकतात. यासाठी त्यांना आपली सॅलरी, घर मालमत्ता, व्यवसाय याचा उल्लेख करावा लागेल, जो आयटीआरच्या प्रीफिलिंगमध्ये वापरला जाऊ शकतो.

८) नव्या वेबसाईटसोबत आता कॉल सेंटरचा समावेश केला आहे. यामुळे करदात्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

९) ई-फायलिंग सोबत मोबाईल ॲप १८ जून रोजी सुरु होणार आहे.

१०) TDS आणि SFT स्टेटमेंट, सॅलरी इनकम, व्याज, डिविडंट आणि भांडवली नफा, प्री-फायलिंग ३० जून २०२१ पर्यंत उपलब्ध असणार आहे.

तुमच्या या उत्पन्नावर एक रुपयाचाही लागत नाही कर, जाणून घ्या त्यासंबंधित सर्व बाबी

प्राप्तिकर कायद्यात विविध प्रकारच्या उत्पन्नावरील करात सूट मिळण्याची तरतूद आहे. यामध्ये वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेपासून ते भेटवस्तू इत्यादींचा समावेश आहे. 


भारतात एका आर्थिक वर्षात अडीच लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळविणार्‍या लोकांना कर भरावा लागतो. आयकर केवळ नोकरीच नव्हे तर इतर अनेक स्रोतांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावरही भरावा लागतो. यामध्ये व्याजातून मिळणारे उत्पन्न, साईड व्यवसाय, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक इत्यादींचा समावेश आहे. परंतु हे सर्व असूनही प्राप्तिकर कायद्यात अशा काही तरतुदी आहेत ज्या अंतर्गत सामान्य लोकांना कोणताही कर भरावा लागत नाही. म्हणजेच अशी काही स्त्रोत देखील आहेत जिथून आपल्याला उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*


शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर

शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. कर कायद्यांतर्गत कृषी उत्पन्नास सूट देण्यात आली आहे. त्याच बरोबर, याखेरीज, जर तुम्ही एखाद्या फर्ममध्ये भागीदार असाल आणि तुम्हाला त्याच्या नफ्याचा वाटा मिळाला असेल तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. वास्तविक, फर्मकडून आधीच त्यावर कर भरलेला असतो. हेच कारण आहे की भागीदारीत मिळविलेल्या नफ्यावर कोणताही कर आकारला जात नाही.

भेटवस्तूंवरील कर

प्राप्तिकर कायद्याच्या कलम (56 (2) (x) नुसार अनेक प्रकारच्या भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर तुम्हाला लग्नात 50 हजार किंवा त्याहून कमी किमतीची भेट मिळाली असेल तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, त्याच्यासाठी एक अट आहे की ही भेट केवळ लग्नाच्या दिवशी किंवा आसपासच्या तारखेलाच मिळाली पाहिजे. यामध्ये एखाद्या नातेवाईकाकडून मिळालेली भेट, वारसा किंवा मृत्यूपत्रानुसार मिळालेले गिफ्ट कर माफीच्या कक्षेत येते.

याशिवाय पंचायत / नगरपालिका, नगरपालिका समिती व जिल्हा मंडळ, छावणी मंडळ किंवा कोणतीही पायाभूत संस्था, विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था इत्यादींकडून मिळालेल्या भेटवस्तूसुद्धा कर माफीच्या कक्षेत येतात. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 12 ए आणि 12 एए अंतर्गत नोंदणीकृत चॅरिटेबल किंवा धार्मिक ट्रस्टकडून प्राप्त भेट देखील कर सूटच्या कक्षेत येते.

ग्रॅच्युइटीची रक्कमवरील कर

जर एखाद्या संस्थेने 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ एखाद्या संस्थेत काम केले असेल तर नोकरी सोडल्यावर मिळालेल्या ग्रॅच्युइटीची रक्कम देखील कर सूटच्या कक्षेत येते. तथापि, सरकारी कर्मचार्‍यांना जास्तीत जास्त 20 लाख रुपयांच्या ग्रॅच्युइटीवरच कर सवलत मिळते. खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. याशिवाय कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीतून काढलेले पैसेदेखील कर माफीच्या कक्षेत येतात. तथापि, ही सूट 5 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केल्यावरच उपलब्ध आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील कर

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणे देखील कर सूटच्या कक्षेत येते. पीपीएफमध्ये गुंतविलेल्या रकमेवर, व्याज आणि त्याच्या मॅच्युरिटीच्या कालावधीत प्राप्त झालेल्या रकमेवर कोणताही कर लागू नाही. ते ईईई प्रकारात येते.

शिष्यवृत्तीवर किंवा अनुदानावरील कर 

प्राप्तिकर अधिनियमान्वये एखाद्या व्यक्तीस अभ्यासासाठी किंवा संशोधनासाठी सरकारी किंवा खासगी संस्थांकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीवर किंवा अनुदानावर कर भरावा लागत नाही. शाळा, महाविद्यालय किंवा परदेशात शिक्षण घेत असताना मिळालेल्या शिष्यवृत्तीदेखील कर माफीच्या कक्षेत येतात.

कौटुंबिक वारसाने मिळणाऱ्या दागिने किंवा रोख रक्कमेवरील कर

एखाद्या व्यक्तीला त्याचे आई-वडिल किंवा कौटुंबिक वारसाने मिळणाऱ्या दागिने किंवा रोख रक्कमेवर कर भरावा लागत नाही. मृत्यूपत्राद्वारे मिळणाऱ्या मालमत्तेवरही कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, अशा व्यवहारांवर आयकर विभागाद्वारे प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ शकते.

ITR दाखल झाला की नाही? 'या' मार्गाने जाणून घ्या

कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख पुन्हा वाढविली आहे. आपल्यातील अनेक जणांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेच पाहिजे. परंतु असे असूनही बरीच लोकं इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याबाबत संशयी आहेत. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हा प्रत्येकाला जमतेच असे नाही. जेव्हा आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरता तेव्हा आपल्याला एका फॉर्ममध्येच बरेच फॉर्म भरावे लागतात. अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा चूक होण्याची शक्यता असते आणि ज्यामुळे आपला रिटर्न भरला जात नाही. आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेवटी त्याचे व्हेरिफिकेशन करावे लागेल.

त्याचे व्हेरिफिकेशन कसे करावे याविषयी सांगणार आहोत. ज्याद्वारे आपल्याला सहजपणे कळेल की आपला रिटर्न भरला आहे कि नाही.

आधार कार्डद्वारे व्हेरिफिकेशन  

इन्कम टॅक्स रिटर्नच्या व्हेरीफिकेशनचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी रिटर्न भरताना तुम्हाला आधार OTP व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडावा लागेल. जेव्हा आपण हा पर्याय निवडल्यानंतर प्रक्रिया कराल, तेव्हा आपल्यास आधार कार्डशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP मिळेल. जो व्हेरीफिकेशनसाठी एंटर केला जावा. हे पूर्ण होताच आपल्या आयटीआरचे व्हेरीफिकेशन केले जाईल.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

नेटबँकिंगद्वारे EVC जनरेट करणे 

यासाठी तुम्हाला नेटबँकिंगद्वारे EVC जनरेट करुन ITR दाखल करण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर, आपली बँक निवडल्यानंतर, त्यात लॉगिन करा आणि टॅक्स टॅबवर क्लिक करा, त्यानंतर आपल्याला पुन्हा इन्कम टॅक्स वेबसाइटवर रीडायरेक्ट केले जाईल. तेथे My Account टॅबमध्ये, Generate EVC चा पर्याय निवडा. यानंतर, आपल्या मोबाईलवर आणि ईमेलवर 10-अंकी अल्फा न्यूमेरिक कोड पाठविला जाईल, जो 72 तासांसाठी वैध असेल. येथून, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर My Account टॅब अंतर्गत ई-व्हेरिफिकेशन पर्यायावर जा आणि I have EVC already हा पर्याय निवडून आपल्या मोबाइल नंबरच्या मदतीने आपला ITR व्हेरिफाय करा.

EVC जनरेट करून बँक खात्याद्वारे

पहिले आपण आपल्या ई-फाइल खात्याच्या प्रोफाइल सेटिंग वर जा आणि तेथे आपले बँक खाते प्री-व्हॅलिडेट करावे लागेल. जेव्हा पॅन आणि आपले नाव बँक खात्याशी जुळते तेव्हाच प्री-व्हॅलिडेट होईल. एकदा प्री-व्हॅलिडेट झाल्यानंतर आपण EVC जनरेट करू शकता आणि नंतर मोबाइल नंबरवर OTP च्या मदतीने तुमचा ITR व्हेरिफाय करू शकता.

ITR-V च्या कॉपीद्वारे व्हेरिफिकेशन 

जर तुमचा ITR वरीलपैकी कोणत्याही पद्धतींनी व्हेरिफाय केला जात नसेल. तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आपण आपल्या ITR-V च्या कॉपीद्वारे देखील व्हेरिफाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला ITR-V कॉपीवर निळ्या पेनसह सिग्नेचर करावी लागेल आणि नंतर ती कॉपी CPC, Post Box No - 1, Electronic City Post Office, Bangalore - 560100, Karnataka, India येथे स्पीड पोस्टद्वारे पाठवावी लागेल. सर्व्हिस ऑफ इंडिया पोस्ट पाठवावी लागेल तिथे आपली कॉपी मिळताच आपल्या मोबाइल नंबर आणि ईमेलवर एक नोटिफिकेशन येईल आणि त्याच प्रकारे आपल्या ITR चे व्हेरिफिकेशन केले जाईल.

*अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी*
Accidental Death & Compensation:
(Income Tax Return Required)

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. 

जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील 3 वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या 10 पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.
हा एक सरकारी नियम / लिखीत तरतूद आहे. 
(खाली कायदा सेक्शन नंबर नमूद केला आहे)

उदाहरण दाखल: अपघात झालेल्या माणसाची मागील 3 वर्षांची वार्षिक मिळकत आय : 4 लाख, 5 लाख, 6 लाख असा असेल.
तर त्या 3 ही वर्षांचे सरासरी होणार 5 लाख रूपये आणि त्याच्या 10 पट म्हणजेच 50 लाख रूपये सरकार कडून घेण्याचा अधिकार प्रत्येक आयटिआर भरणार्या व्यक्तिच्या परिवाराला आहे.

बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही.

पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे.
मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

जरी सलग 3 वर्ष ITR returns दाखल केले नसेल तर, परिवाराला पैसा मिळणार नाही असे काही नाही; पण अशा परिस्थितीत सरकार कडून एखाद दिड लाख देऊन केस बंद केली जाते. पण जर 3 वर्षाचे सलग फाईलींग नोंद असेल तर ह्या स्थितीत बाजू आणखीन बळकट बनते आणि असे समजले जाते की मयत व्यक्ति त्या परिवाराची कमवणारी व्यक्ति होती. जर ती जिवंत राहीली असती तर त्याच्या परिवाराला ती पुढील 10 वर्षामध्ये आताच्या वार्षिक आयच्या 10 पट कमवले दिले असते आणि कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषणही केले असते.

आपल्यापैकी नोकरी (सर्विस) करणारे बरेच लोग आहेत आणि ते कमवणारे सुद्धा आहेत परंतू , त्यातील बहुतांशी लोक ITR (Return filing) नोंदवत नाही. 

अशाने कंपनीद्वारे कपात केलेला हक्काचा पैसा सरकार कडून आपण परत घेत नाही आणि तसेच अशा अपघाती मृत्यूनंतर परिजनांना आपल्या पछ्यातही काही आर्थिक लाभ नाही.

माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत अपघाती मृत्यू अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे. 

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. 

Source - *Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008) Dt 31 Oct 2013.

*Income TAX: पत्नीदेखील तुम्हाला आयकरात सूट मिळवून देऊ शकते; जाणून घ्या तीन पर्याय....*

लग्नानंतर माणसाचे आयुष्य एकदम बदलून जाते. नव्या जबाबदाऱ्यांसह वेगवेगळी आव्हाने वाढू लागतात. आयुष्यात बदलांबरोबरच ही आव्हाने पेलण्यासाठी तुम्हाला जीवनसाथीदेखील ममचा इन्कम टॅक्स देखील वाचवू शकतो. चला जाणून घेऊया कसे....

तुमची पत्नी नोकरी किंवा कमावती नसली तरी देखील ती तुम्हाला पैसे वाचविण्यात नक्कीच मदत करते. घरातील वस्तू, भाजीपाला घासाघीस करून कमी भावाने कसे आणायचे, हे एक महत्वाचे कामही करते.

*पहिला प्रकार... जॉईंट होम लोन अकाऊंट*

जर तुम्ही घर खरेदी करणार असाल तर तुम्हाला जॉईंट होम लोन कर वाचविण्यासाठी मदतीचे आहे. या प्रकारे तुम्ही दोघेही होम लोनवर करात सूट मिळवू शकता. 80 सी अनुसार पती आणि पत्नी दोघांनाही 15.-1.5 लाखांची सूट मिळू शकते. तर सेक्शन 24 (बी) नुसार दोघांनाही 2-2 लाखांची सूट मिळू शकते. म्हणजे दुप्पट फायदा मिळू शकतो.

*दुसरा..... हेल्थ इन्शुरन्स...*

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सर्वांसाठी वेगवेगळा प्लॅन घेऊ शकता. मात्र, फॅमिली फ्लोटर प्लॅन चांगला. यामुळे कमी खर्चात अधिक फायदा मिळतो.
जर तुम्ही एकट्यासाठी इन्शुरन्स घेतला असाल तर कमी पैशांवर तुम्हाला करात सूट मिळणार आहे. जर पत्नी आणि मुलांसाठी देखील एकच स्कीम असेल तर तुम्ही अधिकचा फायदा मिळवू शकणार आहात. सेक्शन 80डी अनुसार तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट मिळवू शकणार आहात.

*तिसरा...जीवन विमा*

लग्नाच्या वेळी प्रत्येकजण आपल्या पत्नीच्या संरक्षणाचे वचन देतो. तुम्ही हे वचन जीवन विमा पॉलिसीच्या मदतीने आणखी मजबूत बनवू शकता. जर तुम्ही जॉईंट विमा पॉलिसी घेतली तर पत्नीला काही झाल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संकटाला सामोरे जावे लागणार नाही. जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

जॉईंट विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला कमी प्रिमिअममध्ये अधिक फायदा मिळतो. 80सी नुसार आयकरात सूट देखील मिळते.

*...अन्यथा Income Tax खात्याची तुमच्यावर नजर गेली म्हणून समजा; 'या' ६ गोष्टी लक्षात ठेवा* 

वर्षभरात तुमच्याकडून अजाणतेपणी वा अन्य कोणत्याही कारणांमुळे रोखीचे व्यवहार झाले तर प्राप्तिकर विभागाकडून तुम्हाला नोटीस येण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा पुढील सहा गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा प्राप्तिकर खात्याची तुमच्यावर नजर गेली म्हणून समजा...

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes- CBDT) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवून दिली आहे.

1) १० लाखांहून अधिक रकमेची एफडी 

एका वर्षात गुंतवणूकदाराने १० लाख रुपये वा त्याहून अधिक रोख रकमेची एफडी केली तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस दिली जाऊ शकते. या पैशांच्या स्रोताची माहिती देण्याची मागणी प्राप्तिकर विभाग नोटिशीद्वारे करू शकतो. त्यामुळे एफडी करतेवेळी शक्यतो चेकद्वारेच पैसे जमा करावेत

2) बँक खात्यात रोख रक्कम जमा करू नका

एखाद्याने कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक वा सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भरली तर त्यासंदर्भातील माहिती संबंधित बँक वा सहकारी बँकेला प्राप्तिकर विभागाला द्यावी लागेल. एका आर्थिक वर्षात एखाद्याने एक वा अधिक बँक खात्यांत १० लाख रुपये वा त्याहून अधिक रक्कम रोखीत जमा केली तर प्राप्तिकर विभाग संबंधिताला नोटीस पाठवून पैशाच्या स्रोताची मागणी करू शकेल

3) क्रेडिट कार्डाचे बिल रोखीने भरू नका

तुमच्या क्रेडिट कार्डाचे बिल एक लाखांहून अधिक आले आणि तुम्ही बिल एकरकमी भरले तर प्राप्तिकर खाते तुम्हाला नोटीस पाठवू शकते तसेच आर्थिक वर्षात १० लाखांहून अधिक रुपयांचे क्रेडिट कार्डचे बिल रोखीत केले तर तुमच्याकडे विचारणा होऊ शकते असे व्यवहार केले असल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विवरणपत्रात भरणे गरजेचे आहे.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

4) मालमत्ता खरेदी रोखीत केल्यास

मालमत्ता खरेदी करताना रोख रकमेचा वापर केल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाऊ शकते. ३० लाख वा त्याहून अधिक किमतीची मालमत्ता तुम्ही रोखीत खरेदी करत असाल वा विकत असाल तर प्रॉपर्टी रजिस्ट्राद्वारा त्यासंदर्भातील माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते. स्रोतांविषयी प्राप्तिकर खाते चौकशी करू शकते

5) शेअर्स, म्युच्युअल फंड्स गुंतवणूक

शेअर्स, म्युच्युअल फंड्स वा बाँड्स या सर्व व्यवहारांत तुम्ही रोख रकमेचा वापर करत असाल तर तुम्ही  अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये एका आर्थिक वर्षात १० लाख रुपयांपर्यंतचाच रोख व्यवहार करता येऊ शकतो. त्याहून अधिक रकमेचे व्यवहार केल्यास प्राप्तिकर विभागाची तुमच्यावर नजर पडू शकते.

6) २ लाखांहून अधिक किमतीचे गिफ्ट 

प्राप्तिकर कायद्याच्या २६९एसटी या सेक्शननुसार कोणतीही व्यक्ती २ लाख वा अधिक रक्कम रोख स्वरूपात घेत असेल तर त्या व्यक्तीला दंड ठोठावला जातो. त्यामुळे तुम्ही २ लाख रुपये रोखीत न स्वीकारता अकाऊंट पेयी, चेक, बँक ड्राफ्ट किंवा ईसीएस यांच्या माध्यमातून स्वीकारावे.

आयकर रिफंडवर सगळ्यांनाच मिळत नाही व्याज; जाणून घ्या तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो का?

अनेक लोक इनकम टॅक्स रिटर्न (आयकर विवरण) भरतात. ज्यांनी गेल्या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे, ते सध्या रिफंडची वाट बघताहेत. अनेक लोकांना या रिफंडबरोबरच त्यावर व्याज किती मिळणार आहे याची उत्सुकता लागली आहे. या लोकांना वाटते की रिफंडवर व्याज मिळेल व आपण त्या माध्यमातून कुठल्यातरी गरजेची पूर्तता करू. जर तुम्हीही रिफंडवर व्याजाची प्रतिक्षा करणाऱ्या मंडळींपैकी एक असाल, तर चिंता करू नका.रिफंडवर व्याज मिळणार आहे की नाही, यासाठी तुम्ही हक्कदार आहात की नाही, ते तुम्ही आधी तपासून घ्या. नियमानुसार प्रत्येक करदात्याला आयकर परताव्याच्या रिफंडवर व्याज मिळत नाही, हेही तुमच्या लक्षात असू द्या.

हे लोक ठरतात व्याजाचे हक्कदार

ज्या लोकांनी टीडीएस, टीसीएस, अ‍ॅडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ अ‍ॅसेस टेस्टमार्फत कर भरला आहे आणि कर भरल्याची रक्कम ही कराच्या देय रक्कमेपेक्षा अधिक आहे, अशाच लोकांना रिफंडवर व्याज मिळू शकेल. जर तुम्हाला 80 हजार रुपयांचा कर भरावा लागत असेल आणि तुम्ही 1 लाख रुपयांची रक्कम भरली आहे तर त्या रिफंडवर तुम्हाला व्याज मिळेल. अशा प्रकारचे व्याज मिळवण्यासाठी काही विशेष नियम आहेत. त्यानुसार ठराविक कालावधीच्या आत आयटीआर फाईल केला तर व्याजाचा लाभ मिळू शकेल.

किती प्रमाणात मिळते व्याज

जर रिफंडची रक्कम ही कराच्या मर्यादेपुढे जात असेल तर त्या रिफंडवर व्याज देण्यात येते. तसेच रिफंड टीडीएस, टीसीएस किंवा अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या रुपात येत असेल तर दरमहा 0.5 टक्क्यांच्या हिशोबाने व्याजाची भर पडू शकेल. प्रत्येक वर्षी एप्रिलमध्ये व्याजदराची गणना सुरू होते. जर कोणता करदाता निर्धारीत तारखेच्या आधी किंवा त्या दिवसापर्यंत आयटीआर भरत असेल तर त्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून व्याजाची रक्कम जोडली जाते. रिफंडची रक्कम दिली जाईपर्यंत हे व्याज दिले जाते. निर्धारीत तारखेनंतर आयटीआर फाईल केला असेल तर आयटीआर फाईल केल्याच्या तारखेपासून रिफंड जारी केला जाईपर्यंत व्याज मिळते.

अशा प्रकारे रिफंड तपासू शकता     

 सामान्य नियमांनुसार जर तुम्ही आपला आयटीआर भरला असेल तर तुम्हाला रिफंड देखील येणार. रिफंडबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. तेथे तुम्ही my account-my returns/forms सेक्शनमध्ये जाऊ शकता. तुमचा आयटीआर प्रोसेस झाला आहे का? आयकर विभाग आता आपल्याला रिफंड देणार आहे का किंवा त्यावर किती व्याज देणार आहे, अशा विविध प्रश्नांबाबत तुम्हाला सद्यस्थिती कळू शकेल. 

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                         

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.         https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc  

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...