हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २० मे, २०२१

जाणून घ्या आयकर विभाग ( .incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

 


जाणून घ्या आयकर विभाग ( .incometax ) त्यासंबंधित सर्व बाबी

करदात्यांना आता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. या उद्देशाने कर विभागाने ७ जून रोजी ई-फाइलिंग पोर्टल सुरू केले आहे. या नवीन वेबसाइटमध्ये, आयकर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेत नवे बदल केले आहेत.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आयकर विभाग ७ जून रोजी www.incometax.gov.in  या ई-फाइलिंग पोर्टलची सुरूवात केली आहे. यामुळे करदात्यांना अधिक सोयीचा आणि आधुनिक अनुभव मिळेल. असे त्यांनी म्हटले आहे. या नव्या वेबसाईटमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे करदात्यांना सोयीचे होणार आहे.


सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस (नॉमिनी) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते, ...संतोष विठ्ठल साळवे. संपर्क करा.  7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही)

आयकरच्या नव्या वेबसाईट बाबत या 'दहा' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

१) ७ जून पासून नवी ई-फाईलिंग लिंक - www.incometax.gov.in आताची असणारी लिंक www.incometaxindiaefiling.gov.in या लिंकच्या जागेवर असेल.

२) नवा आयकर ई- फायलिंग पोर्टल आयकर रिटन्सच्या प्रक्रियेवर आयकर दात्यांना परतावा मिळवण्यासाठी काम करते.

३) आयकर दात्यांना पाठपुरावा तसेच अपलोड प्रक्रिया, संवाद एकाच डॅशबोर्डवर करता येणार आहे.

४) आयटीआर प्रिपरेशन सॉफ्टवेअर फ्रीमध्ये असणार आहे. यासह परस्पर प्रश्नही विचारु शकता.

५) आयटीआर १, ४ (ऑनलाइन, ऑफलाइन) आणि आयटीआर २ (ऑफलाइन) करदात्यांसाठी विनामूल्य आयटीआर सॉफ्टवेअर उपलब्ध असेल.

६) आयटीआर ३,५,६,७ च्या तयारीसाठी सॉफ्टवेअर लवकरच उपलब्ध करुन दिले जाईल.

७) करदाते आपले प्रोफाईल अपडेट करु शकतात. यासाठी त्यांना आपली सॅलरी, घर मालमत्ता, व्यवसाय याचा उल्लेख करावा लागेल, जो आयटीआरच्या प्रीफिलिंगमध्ये वापरला जाऊ शकतो.

८) नव्या वेबसाईटसोबत आता कॉल सेंटरचा समावेश केला आहे. यामुळे करदात्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

९) ई-फायलिंग सोबत मोबाईल ॲप १८ जून रोजी सुरु होणार आहे.

१०) TDS आणि SFT स्टेटमेंट, सॅलरी इनकम, व्याज, डिविडंट आणि भांडवली नफा, प्री-फायलिंग ३० जून २०२१ पर्यंत उपलब्ध असणार आहे.

तुमच्या या उत्पन्नावर एक रुपयाचाही लागत नाही कर, जाणून घ्या त्यासंबंधित सर्व बाबी

प्राप्तिकर कायद्यात विविध प्रकारच्या उत्पन्नावरील करात सूट मिळण्याची तरतूद आहे. यामध्ये वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेपासून ते भेटवस्तू इत्यादींचा समावेश आहे. 


भारतात एका आर्थिक वर्षात अडीच लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळविणार्‍या लोकांना कर भरावा लागतो. आयकर केवळ नोकरीच नव्हे तर इतर अनेक स्रोतांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावरही भरावा लागतो. यामध्ये व्याजातून मिळणारे उत्पन्न, साईड व्यवसाय, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक इत्यादींचा समावेश आहे. परंतु हे सर्व असूनही प्राप्तिकर कायद्यात अशा काही तरतुदी आहेत ज्या अंतर्गत सामान्य लोकांना कोणताही कर भरावा लागत नाही. म्हणजेच अशी काही स्त्रोत देखील आहेत जिथून आपल्याला उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*


शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर

शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नाही. कर कायद्यांतर्गत कृषी उत्पन्नास सूट देण्यात आली आहे. त्याच बरोबर, याखेरीज, जर तुम्ही एखाद्या फर्ममध्ये भागीदार असाल आणि तुम्हाला त्याच्या नफ्याचा वाटा मिळाला असेल तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. वास्तविक, फर्मकडून आधीच त्यावर कर भरलेला असतो. हेच कारण आहे की भागीदारीत मिळविलेल्या नफ्यावर कोणताही कर आकारला जात नाही.

भेटवस्तूंवरील कर

प्राप्तिकर कायद्याच्या कलम (56 (2) (x) नुसार अनेक प्रकारच्या भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर तुम्हाला लग्नात 50 हजार किंवा त्याहून कमी किमतीची भेट मिळाली असेल तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, त्याच्यासाठी एक अट आहे की ही भेट केवळ लग्नाच्या दिवशी किंवा आसपासच्या तारखेलाच मिळाली पाहिजे. यामध्ये एखाद्या नातेवाईकाकडून मिळालेली भेट, वारसा किंवा मृत्यूपत्रानुसार मिळालेले गिफ्ट कर माफीच्या कक्षेत येते.

याशिवाय पंचायत / नगरपालिका, नगरपालिका समिती व जिल्हा मंडळ, छावणी मंडळ किंवा कोणतीही पायाभूत संस्था, विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था इत्यादींकडून मिळालेल्या भेटवस्तूसुद्धा कर माफीच्या कक्षेत येतात. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 12 ए आणि 12 एए अंतर्गत नोंदणीकृत चॅरिटेबल किंवा धार्मिक ट्रस्टकडून प्राप्त भेट देखील कर सूटच्या कक्षेत येते.

ग्रॅच्युइटीची रक्कमवरील कर

जर एखाद्या संस्थेने 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ एखाद्या संस्थेत काम केले असेल तर नोकरी सोडल्यावर मिळालेल्या ग्रॅच्युइटीची रक्कम देखील कर सूटच्या कक्षेत येते. तथापि, सरकारी कर्मचार्‍यांना जास्तीत जास्त 20 लाख रुपयांच्या ग्रॅच्युइटीवरच कर सवलत मिळते. खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. याशिवाय कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीतून काढलेले पैसेदेखील कर माफीच्या कक्षेत येतात. तथापि, ही सूट 5 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केल्यावरच उपलब्ध आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील कर

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणे देखील कर सूटच्या कक्षेत येते. पीपीएफमध्ये गुंतविलेल्या रकमेवर, व्याज आणि त्याच्या मॅच्युरिटीच्या कालावधीत प्राप्त झालेल्या रकमेवर कोणताही कर लागू नाही. ते ईईई प्रकारात येते.

शिष्यवृत्तीवर किंवा अनुदानावरील कर 

प्राप्तिकर अधिनियमान्वये एखाद्या व्यक्तीस अभ्यासासाठी किंवा संशोधनासाठी सरकारी किंवा खासगी संस्थांकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीवर किंवा अनुदानावर कर भरावा लागत नाही. शाळा, महाविद्यालय किंवा परदेशात शिक्षण घेत असताना मिळालेल्या शिष्यवृत्तीदेखील कर माफीच्या कक्षेत येतात.

कौटुंबिक वारसाने मिळणाऱ्या दागिने किंवा रोख रक्कमेवरील कर

एखाद्या व्यक्तीला त्याचे आई-वडिल किंवा कौटुंबिक वारसाने मिळणाऱ्या दागिने किंवा रोख रक्कमेवर कर भरावा लागत नाही. मृत्यूपत्राद्वारे मिळणाऱ्या मालमत्तेवरही कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, अशा व्यवहारांवर आयकर विभागाद्वारे प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ शकते.

ITR दाखल झाला की नाही? 'या' मार्गाने जाणून घ्या

कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख पुन्हा वाढविली आहे. आपल्यातील अनेक जणांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेच पाहिजे. परंतु असे असूनही बरीच लोकं इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याबाबत संशयी आहेत. कारण इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हा प्रत्येकाला जमतेच असे नाही. जेव्हा आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरता तेव्हा आपल्याला एका फॉर्ममध्येच बरेच फॉर्म भरावे लागतात. अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा चूक होण्याची शक्यता असते आणि ज्यामुळे आपला रिटर्न भरला जात नाही. आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेवटी त्याचे व्हेरिफिकेशन करावे लागेल.

त्याचे व्हेरिफिकेशन कसे करावे याविषयी सांगणार आहोत. ज्याद्वारे आपल्याला सहजपणे कळेल की आपला रिटर्न भरला आहे कि नाही.

आधार कार्डद्वारे व्हेरिफिकेशन  

इन्कम टॅक्स रिटर्नच्या व्हेरीफिकेशनचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी रिटर्न भरताना तुम्हाला आधार OTP व्हेरिफिकेशनचा पर्याय निवडावा लागेल. जेव्हा आपण हा पर्याय निवडल्यानंतर प्रक्रिया कराल, तेव्हा आपल्यास आधार कार्डशी जोडलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP मिळेल. जो व्हेरीफिकेशनसाठी एंटर केला जावा. हे पूर्ण होताच आपल्या आयटीआरचे व्हेरीफिकेशन केले जाईल.

*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

नेटबँकिंगद्वारे EVC जनरेट करणे 

यासाठी तुम्हाला नेटबँकिंगद्वारे EVC जनरेट करुन ITR दाखल करण्याचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर, आपली बँक निवडल्यानंतर, त्यात लॉगिन करा आणि टॅक्स टॅबवर क्लिक करा, त्यानंतर आपल्याला पुन्हा इन्कम टॅक्स वेबसाइटवर रीडायरेक्ट केले जाईल. तेथे My Account टॅबमध्ये, Generate EVC चा पर्याय निवडा. यानंतर, आपल्या मोबाईलवर आणि ईमेलवर 10-अंकी अल्फा न्यूमेरिक कोड पाठविला जाईल, जो 72 तासांसाठी वैध असेल. येथून, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर My Account टॅब अंतर्गत ई-व्हेरिफिकेशन पर्यायावर जा आणि I have EVC already हा पर्याय निवडून आपल्या मोबाइल नंबरच्या मदतीने आपला ITR व्हेरिफाय करा.

EVC जनरेट करून बँक खात्याद्वारे

पहिले आपण आपल्या ई-फाइल खात्याच्या प्रोफाइल सेटिंग वर जा आणि तेथे आपले बँक खाते प्री-व्हॅलिडेट करावे लागेल. जेव्हा पॅन आणि आपले नाव बँक खात्याशी जुळते तेव्हाच प्री-व्हॅलिडेट होईल. एकदा प्री-व्हॅलिडेट झाल्यानंतर आपण EVC जनरेट करू शकता आणि नंतर मोबाइल नंबरवर OTP च्या मदतीने तुमचा ITR व्हेरिफाय करू शकता.

ITR-V च्या कॉपीद्वारे व्हेरिफिकेशन 

जर तुमचा ITR वरीलपैकी कोणत्याही पद्धतींनी व्हेरिफाय केला जात नसेल. तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आपण आपल्या ITR-V च्या कॉपीद्वारे देखील व्हेरिफाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला ITR-V कॉपीवर निळ्या पेनसह सिग्नेचर करावी लागेल आणि नंतर ती कॉपी CPC, Post Box No - 1, Electronic City Post Office, Bangalore - 560100, Karnataka, India येथे स्पीड पोस्टद्वारे पाठवावी लागेल. सर्व्हिस ऑफ इंडिया पोस्ट पाठवावी लागेल तिथे आपली कॉपी मिळताच आपल्या मोबाइल नंबर आणि ईमेलवर एक नोटिफिकेशन येईल आणि त्याच प्रकारे आपल्या ITR चे व्हेरिफिकेशन केले जाईल.

*अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी*
Accidental Death & Compensation:
(Income Tax Return Required)

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. 

जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील 3 वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या 10 पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.
हा एक सरकारी नियम / लिखीत तरतूद आहे. 
(खाली कायदा सेक्शन नंबर नमूद केला आहे)

उदाहरण दाखल: अपघात झालेल्या माणसाची मागील 3 वर्षांची वार्षिक मिळकत आय : 4 लाख, 5 लाख, 6 लाख असा असेल.
तर त्या 3 ही वर्षांचे सरासरी होणार 5 लाख रूपये आणि त्याच्या 10 पट म्हणजेच 50 लाख रूपये सरकार कडून घेण्याचा अधिकार प्रत्येक आयटिआर भरणार्या व्यक्तिच्या परिवाराला आहे.

बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही.

पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे.
मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

जरी सलग 3 वर्ष ITR returns दाखल केले नसेल तर, परिवाराला पैसा मिळणार नाही असे काही नाही; पण अशा परिस्थितीत सरकार कडून एखाद दिड लाख देऊन केस बंद केली जाते. पण जर 3 वर्षाचे सलग फाईलींग नोंद असेल तर ह्या स्थितीत बाजू आणखीन बळकट बनते आणि असे समजले जाते की मयत व्यक्ति त्या परिवाराची कमवणारी व्यक्ति होती. जर ती जिवंत राहीली असती तर त्याच्या परिवाराला ती पुढील 10 वर्षामध्ये आताच्या वार्षिक आयच्या 10 पट कमवले दिले असते आणि कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषणही केले असते.

आपल्यापैकी नोकरी (सर्विस) करणारे बरेच लोग आहेत आणि ते कमवणारे सुद्धा आहेत परंतू , त्यातील बहुतांशी लोक ITR (Return filing) नोंदवत नाही. 

अशाने कंपनीद्वारे कपात केलेला हक्काचा पैसा सरकार कडून आपण परत घेत नाही आणि तसेच अशा अपघाती मृत्यूनंतर परिजनांना आपल्या पछ्यातही काही आर्थिक लाभ नाही.

माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत अपघाती मृत्यू अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे. 

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. 

Source - *Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008) Dt 31 Oct 2013.

*Income TAX: पत्नीदेखील तुम्हाला आयकरात सूट मिळवून देऊ शकते; जाणून घ्या तीन पर्याय....*

लग्नानंतर माणसाचे आयुष्य एकदम बदलून जाते. नव्या जबाबदाऱ्यांसह वेगवेगळी आव्हाने वाढू लागतात. आयुष्यात बदलांबरोबरच ही आव्हाने पेलण्यासाठी तुम्हाला जीवनसाथीदेखील ममचा इन्कम टॅक्स देखील वाचवू शकतो. चला जाणून घेऊया कसे....

तुमची पत्नी नोकरी किंवा कमावती नसली तरी देखील ती तुम्हाला पैसे वाचविण्यात नक्कीच मदत करते. घरातील वस्तू, भाजीपाला घासाघीस करून कमी भावाने कसे आणायचे, हे एक महत्वाचे कामही करते.

*पहिला प्रकार... जॉईंट होम लोन अकाऊंट*

जर तुम्ही घर खरेदी करणार असाल तर तुम्हाला जॉईंट होम लोन कर वाचविण्यासाठी मदतीचे आहे. या प्रकारे तुम्ही दोघेही होम लोनवर करात सूट मिळवू शकता. 80 सी अनुसार पती आणि पत्नी दोघांनाही 15.-1.5 लाखांची सूट मिळू शकते. तर सेक्शन 24 (बी) नुसार दोघांनाही 2-2 लाखांची सूट मिळू शकते. म्हणजे दुप्पट फायदा मिळू शकतो.

*दुसरा..... हेल्थ इन्शुरन्स...*

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सर्वांसाठी वेगवेगळा प्लॅन घेऊ शकता. मात्र, फॅमिली फ्लोटर प्लॅन चांगला. यामुळे कमी खर्चात अधिक फायदा मिळतो.
जर तुम्ही एकट्यासाठी इन्शुरन्स घेतला असाल तर कमी पैशांवर तुम्हाला करात सूट मिळणार आहे. जर पत्नी आणि मुलांसाठी देखील एकच स्कीम असेल तर तुम्ही अधिकचा फायदा मिळवू शकणार आहात. सेक्शन 80डी अनुसार तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट मिळवू शकणार आहात.

*तिसरा...जीवन विमा*

लग्नाच्या वेळी प्रत्येकजण आपल्या पत्नीच्या संरक्षणाचे वचन देतो. तुम्ही हे वचन जीवन विमा पॉलिसीच्या मदतीने आणखी मजबूत बनवू शकता. जर तुम्ही जॉईंट विमा पॉलिसी घेतली तर पत्नीला काही झाल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संकटाला सामोरे जावे लागणार नाही. जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

जॉईंट विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला कमी प्रिमिअममध्ये अधिक फायदा मिळतो. 80सी नुसार आयकरात सूट देखील मिळते.

*...अन्यथा Income Tax खात्याची तुमच्यावर नजर गेली म्हणून समजा; 'या' ६ गोष्टी लक्षात ठेवा* 

वर्षभरात तुमच्याकडून अजाणतेपणी वा अन्य कोणत्याही कारणांमुळे रोखीचे व्यवहार झाले तर प्राप्तिकर विभागाकडून तुम्हाला नोटीस येण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा पुढील सहा गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा प्राप्तिकर खात्याची तुमच्यावर नजर गेली म्हणून समजा...

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes- CBDT) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवून दिली आहे.

1) १० लाखांहून अधिक रकमेची एफडी 

एका वर्षात गुंतवणूकदाराने १० लाख रुपये वा त्याहून अधिक रोख रकमेची एफडी केली तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस दिली जाऊ शकते. या पैशांच्या स्रोताची माहिती देण्याची मागणी प्राप्तिकर विभाग नोटिशीद्वारे करू शकतो. त्यामुळे एफडी करतेवेळी शक्यतो चेकद्वारेच पैसे जमा करावेत

2) बँक खात्यात रोख रक्कम जमा करू नका

एखाद्याने कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक वा सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भरली तर त्यासंदर्भातील माहिती संबंधित बँक वा सहकारी बँकेला प्राप्तिकर विभागाला द्यावी लागेल. एका आर्थिक वर्षात एखाद्याने एक वा अधिक बँक खात्यांत १० लाख रुपये वा त्याहून अधिक रक्कम रोखीत जमा केली तर प्राप्तिकर विभाग संबंधिताला नोटीस पाठवून पैशाच्या स्रोताची मागणी करू शकेल

3) क्रेडिट कार्डाचे बिल रोखीने भरू नका

तुमच्या क्रेडिट कार्डाचे बिल एक लाखांहून अधिक आले आणि तुम्ही बिल एकरकमी भरले तर प्राप्तिकर खाते तुम्हाला नोटीस पाठवू शकते तसेच आर्थिक वर्षात १० लाखांहून अधिक रुपयांचे क्रेडिट कार्डचे बिल रोखीत केले तर तुमच्याकडे विचारणा होऊ शकते असे व्यवहार केले असल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विवरणपत्रात भरणे गरजेचे आहे.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

4) मालमत्ता खरेदी रोखीत केल्यास

मालमत्ता खरेदी करताना रोख रकमेचा वापर केल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाऊ शकते. ३० लाख वा त्याहून अधिक किमतीची मालमत्ता तुम्ही रोखीत खरेदी करत असाल वा विकत असाल तर प्रॉपर्टी रजिस्ट्राद्वारा त्यासंदर्भातील माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते. स्रोतांविषयी प्राप्तिकर खाते चौकशी करू शकते

5) शेअर्स, म्युच्युअल फंड्स गुंतवणूक

शेअर्स, म्युच्युअल फंड्स वा बाँड्स या सर्व व्यवहारांत तुम्ही रोख रकमेचा वापर करत असाल तर तुम्ही  अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये एका आर्थिक वर्षात १० लाख रुपयांपर्यंतचाच रोख व्यवहार करता येऊ शकतो. त्याहून अधिक रकमेचे व्यवहार केल्यास प्राप्तिकर विभागाची तुमच्यावर नजर पडू शकते.

6) २ लाखांहून अधिक किमतीचे गिफ्ट 

प्राप्तिकर कायद्याच्या २६९एसटी या सेक्शननुसार कोणतीही व्यक्ती २ लाख वा अधिक रक्कम रोख स्वरूपात घेत असेल तर त्या व्यक्तीला दंड ठोठावला जातो. त्यामुळे तुम्ही २ लाख रुपये रोखीत न स्वीकारता अकाऊंट पेयी, चेक, बँक ड्राफ्ट किंवा ईसीएस यांच्या माध्यमातून स्वीकारावे.

आयकर रिफंडवर सगळ्यांनाच मिळत नाही व्याज; जाणून घ्या तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो का?

अनेक लोक इनकम टॅक्स रिटर्न (आयकर विवरण) भरतात. ज्यांनी गेल्या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे, ते सध्या रिफंडची वाट बघताहेत. अनेक लोकांना या रिफंडबरोबरच त्यावर व्याज किती मिळणार आहे याची उत्सुकता लागली आहे. या लोकांना वाटते की रिफंडवर व्याज मिळेल व आपण त्या माध्यमातून कुठल्यातरी गरजेची पूर्तता करू. जर तुम्हीही रिफंडवर व्याजाची प्रतिक्षा करणाऱ्या मंडळींपैकी एक असाल, तर चिंता करू नका.रिफंडवर व्याज मिळणार आहे की नाही, यासाठी तुम्ही हक्कदार आहात की नाही, ते तुम्ही आधी तपासून घ्या. नियमानुसार प्रत्येक करदात्याला आयकर परताव्याच्या रिफंडवर व्याज मिळत नाही, हेही तुमच्या लक्षात असू द्या.

हे लोक ठरतात व्याजाचे हक्कदार

ज्या लोकांनी टीडीएस, टीसीएस, अ‍ॅडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ अ‍ॅसेस टेस्टमार्फत कर भरला आहे आणि कर भरल्याची रक्कम ही कराच्या देय रक्कमेपेक्षा अधिक आहे, अशाच लोकांना रिफंडवर व्याज मिळू शकेल. जर तुम्हाला 80 हजार रुपयांचा कर भरावा लागत असेल आणि तुम्ही 1 लाख रुपयांची रक्कम भरली आहे तर त्या रिफंडवर तुम्हाला व्याज मिळेल. अशा प्रकारचे व्याज मिळवण्यासाठी काही विशेष नियम आहेत. त्यानुसार ठराविक कालावधीच्या आत आयटीआर फाईल केला तर व्याजाचा लाभ मिळू शकेल.

किती प्रमाणात मिळते व्याज

जर रिफंडची रक्कम ही कराच्या मर्यादेपुढे जात असेल तर त्या रिफंडवर व्याज देण्यात येते. तसेच रिफंड टीडीएस, टीसीएस किंवा अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या रुपात येत असेल तर दरमहा 0.5 टक्क्यांच्या हिशोबाने व्याजाची भर पडू शकेल. प्रत्येक वर्षी एप्रिलमध्ये व्याजदराची गणना सुरू होते. जर कोणता करदाता निर्धारीत तारखेच्या आधी किंवा त्या दिवसापर्यंत आयटीआर भरत असेल तर त्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून व्याजाची रक्कम जोडली जाते. रिफंडची रक्कम दिली जाईपर्यंत हे व्याज दिले जाते. निर्धारीत तारखेनंतर आयटीआर फाईल केला असेल तर आयटीआर फाईल केल्याच्या तारखेपासून रिफंड जारी केला जाईपर्यंत व्याज मिळते.

अशा प्रकारे रिफंड तपासू शकता     

 सामान्य नियमांनुसार जर तुम्ही आपला आयटीआर भरला असेल तर तुम्हाला रिफंड देखील येणार. रिफंडबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. तेथे तुम्ही my account-my returns/forms सेक्शनमध्ये जाऊ शकता. तुमचा आयटीआर प्रोसेस झाला आहे का? आयकर विभाग आता आपल्याला रिफंड देणार आहे का किंवा त्यावर किती व्याज देणार आहे, अशा विविध प्रश्नांबाबत तुम्हाला सद्यस्थिती कळू शकेल. 

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                         

-------------------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..7900094419।  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.         https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...