हा ब्लॉग शोधा

शनिवार, १५ मे, २०२१

*रेल्वेने प्रवास करणार असाल तर हे नियम तुम्हाला ठाऊक असायलाच हवेत!*

 संतोष साळवे...7900094419


*रेल्वेने प्रवास करणार असाल तर हे नियम तुम्हाला ठाऊक असायलाच हवेत!*

रेल्वे ही जनसामन्यांसाठी बीएमडब्लू किंवा मर्सिडीजचं आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कमी खर्चामध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळेमध्ये पोहचवण्याचे काम रेल्वे करते. रेल्वेचा प्रवास हा कधीही न विसरता येण्यासारखा असतो.

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

          ESI व EPFO चे सर्व काम केले जातात.


गावाला जायचे असो किंवा फिरायला जायचे असो, नेहमी प्रवासासाठी पहिला पर्याय हा रेल्वेच असतो आणि तो आपल्याला आवडतो सुद्धा. याच रेल्वेचे काही असे नियम आहेत, जे कदाचित तुम्हाला माहित नसतील.चला मग त्या माहित नसलेल्या नियमांविषयी काही माहिती जाणून घेऊया.

 
                                                                                 
 १) तुम्हीही असा अनुभव घेतला असेल की, कधी कधी टीसी रात्रीचे तिकीट चेक करण्यासाठी येतात, त्यामुळे आपली झोप मोड होते. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेचा असा नियम आहे की,  रिझर्वेशन डब्यामधील प्रवाश्यांचे तिकीट प्रवास सुरू होण्याच्या आधीच तपासले गेले पाहिजेत.
एकदा तिकीट तपासल्यानंतर कोणतेही कारण नसताना परत प्रवाश्यांकडे तिकीटाची विचारणा करू शकत नाही. पण नव्या बदलण्यात आलेल्या नियमामध्ये काही अश्या तरतूदी करण्यात आल्या आहेत की, ज्यामुळे टीसी रात्री तिकीट तपासण्यासाठी येऊ शकतो.

– जर प्रवाश्याने रात्री १० वाजता प्रवास सुरू केला असेल तर, टीसी रात्री तिकीट तपासण्यासाठी येऊ शकतो किंवा जर प्रवास सकाळी ६ वाजेपर्यंत संपणार असेल तरी देखील टीसी रात्री तिकीट तपासण्यासाठी येऊ शकतो.                                                                                                                                                                                                   

.

२)  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, जर एखाद्या रिझर्वेशन असलेल्या व्यक्तीचं सामान प्रवासादरम्यान चोरी झाले, तर तो व्यक्ती रेल्वे बोर्डाकडून आपल्या सामानाची भरपाई मागू शकतो. त्यासाठी प्रवास करणाऱ्या व्यक्तीला रेल्वे पोलिसांना एफआयआरच्या बरोबर एक फॉर्म पण भरून द्यावा लागतो. ज्यामध्ये असा उल्लेख असतो की, जर प्रवाश्याला सहा महिन्यांच्या आत जर त्याचे सामान परत मिळाले नाही, तर तो त्या सामानाची नुकसान भरपाई मागण्यासाठी ग्राहक मंचाकडे सुद्धा जाऊ शकतो.

सामानाच्या किंमतीचे मुल्यांकन करून ग्राहक मंच रेल्वेला भरपाई देण्याचे आदेश देते. यामध्ये महत्त्वाचे हे आहे की, एफआयआर दिल्यानंतर लगेच जीआरपीने प्रवाश्याकडून ग्राहक मंचाचा फॉर्म भरून घेणे गरजेचे आहे.


३) प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे वेटिंग तिकीट असल्यास तो व्यक्ती रिझर्वेशनच्या डब्यामधून प्रवास करू शकत नाही. जर तो त्या डब्यामधून प्रवास करत असेल, तर त्याला कमीत कमी २५० रुपये दंड भरावा लागेल आणि नंतर त्याला पुढच्या स्थानाकापासून जनरल डब्यामधून प्रवास करावा लागेल.

पण जर चारपैकी दोन जणांची तिकिटे कन्फर्म झाली असतील, तर टीसीकडून परवानगी घेऊन बाकी दोघे त्यांच्या सीटवर जाऊन बसू शकतात.


४). रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, जर रेल्वेमध्ये कोणत्याही १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला विना तिकीट प्रवास करताना पकडल्यास, त्याच्याकडून तिकीट तपासणारा स्टाफ दंड आकारणार नाही, त्याच्याकडून केवळ प्रवासी तिकिटाचे भाडे घेण्यात येईल. या नियमामध्ये असे सुद्धा सांगितले आहे की, जर अश्या मुलाविरुद्ध काही कारवाई करायची असेल तर पहिल्यांदा रिपोर्ट बनवावा लागेल आणि त्यानंतरच कारवाई केली जाईल.

अजून काही नवीन नियम खालीलप्रमाणे आहेत-

– जर तुम्ही तात्काळ तिकीट रद्द केलेत, तर त्याच्या एकूण भाड्याच्या ५० % पैसे परत केले जातील, तात्काळ तिकीट बुकिंग करण्याच्या वेळत सुद्धा बदलण्यात करण्यात आला आहे.

– तात्काळ विंडो एसी कोचसाठी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आणि स्लीपर कोचसाठी ११ ते १२ वाजेपर्यंत चालू असते.

– राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये फक्त मोबाईल तिकीटच ग्राह्य मानले जात आहे.

– आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त प्रादेशिक भाषांमध्ये देखील तिकीट दिले जाणार आहे.

– आतापासून रेल्वेमध्ये वेकअप कॉल-डेस्टिनेशन अलर्ट सुविधा सुद्धा दिली जाणार आहे.

*रेल्वे चुकली तर आरक्षणाचे पैसे परत मिळवण्याची ‘स्टेप बाय स्टेप’ प्रक्रिया अशी आहे..*


आज ट्रेनने देशाचा एक खूप मोठा वर्ग प्रवास करतो. इतर कुठल्याही वाहतूक सुविधांपेक्षा ट्रेनला जास्त पसंती देतात. क्वचितच असं कोणी असेलं ज्याने आयुष्यात आजवर कधीही ट्रेनचा प्रवास केला नाही. कधी कुटुंबासोबत, कधी मित्रांसोबत तर कधी एकट्यानेही आपण बिनधास्तपणे ट्रेनचा प्रवास करतो. प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही म्हणून आपण रिझर्वेशन देखील करतो.पण जर कधी कुठल्या कारणामुळे तुमची ट्रेन सुटली तर? असं अनेकांसोबत होत असतं,शहरातलं ट्रॅफिक ही समस्या तर हमखास असतेच, अशावेळी हे एक कारणही ट्रेन चुकण्यासाठी पुरेस आहे.
अर्थात कारण कोणतंही असो, ट्रेन चुकण्याचा प्रसंग अनेकांवर येतोच. तुम्हालाही याचा अनुभव कधीतरी आला असेल.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

आपणही आपल्या प्रवासादरम्यान अश्या घटना बघत असतो.
पण अश्यावेळी नेमकं करावं काय हे कोणालाच सुचत नाही.
कोणत्याही कारणामुळे आपण प्रवास करु शकलो नाही, तरी आपल्याला नुकसान भरपाई मिळेल का याबाबत केवळ विचार केला जातो, मात्र कृती फारच कमी लोकं करतात.ज्यांना कायद्याची जाणं असते ते कायदेशीररित्या ह्यावर पाउल उचलतात. पण ज्यांना कायदा माहित नसतो ते निराश होऊन आता काय करायचं म्हणून तिथून निघून जातात.पण जर तुमची गाडी सुटली तर घाबरण्यापेक्षा, हताश निराश होऊन बसण्यापेक्षा हे जाणून घ्या की अश्या परिस्थितीत तुम्ही काय-काय करू शकता.


जर तुमची ट्रेन सुटली आणि त्या गाडीत तुमचं रिझर्वेशन असेलं तर पुढील २ स्टेशन पर्यंत टीटीई तुमची रिझर्व्ह सीट आणखी कोणालाही अलॉट करू शकत नाही.अश्यात तुम्ही पुढील दोन स्टेशनवर पोहोचून गाडी पकडू शकता.पण जर तुम्ही दोन स्टेशनवरही गाडी पकडण्यात यशस्वी झाला नाहीत तर तुमची रिझर्व्ह सीट आरएसी प्रवाश्याला अलॉट करण्यात येते. ट्रेन सुटल्यावर तुम्ही टीडीआर फाईल करू शकता. त्यामुळे तुम्हाला बेस फेअरच्या ५० % परत मिळेल. म्हणजेच तुमच्या तिकिटाचे अर्धे पैसे तुम्हाला परत मिळेल.


आता ट्रेन सुटल्यावर काय करावे हे तर तुमच्या लक्षात आलेच असेलं पण जर प्रवासाआधी तुमचं तिकीटं हरवलं तर तुम्ही काय करू शकता हे देखील जाणून घ्या.प्रवासाआधी जर तुमचं तिकीट हरवलं तर त्यात घाबरायचं कारण नाही.असं झाल्यास तुम्ही बोर्डिंग स्टेशनवर जाऊन तिथल्या चीफ रिझर्वेशन सुपरवायझरला डूप्लीकेट तिकीट जारी करण्यासाठी लिखित निवेदन देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचं एखादं आयडी प्रुफ सोबत घेऊन जावं लागेल.पण डूप्लीकेट तिकीट मिळविण्यासाठी तुम्हाला प्रवासाच्या २४ तासा अगोदर निवेदन करणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला डूप्लीकेट तिकीट मिळू शकेल त्यासाठी तुमच्याकडून काही चार्जेस देखील घेतले जाईल.पण जर त्यानंतर तुमचं हरवलेलं तिकीट सापडलं तर तुम्हाला डूप्लीकेट तिकीटासाठी घेतलेली फी सहजपणे परत मिळवू शकता.ह्याव्यतिरिक्त जर कुठल्या कारणास्तव ट्रेन रद्द झाली किंवा प्रवास पूर्ण होऊ शकला नाही किंवा रेल्वे इतर कुठलं ट्रान्सपोर्टच साधन उपलब्ध करू शकली नाही यात्री त्या प्रवासाचा पूर्ण रिफंड घेऊ शकतो.
त्यासाठी प्रवाश्याला आपले तिकीट स्टेशन मास्टरला सरेंडर करावे लागते.ट्रेनने प्रवास करताना जर कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवली तर तुम्ही काय काय पावलं उचलू शकता हे जाणून घेणं खरंच खूप गरजेचं असतं. ह्यामुळे तुम्ही स्वतःची तसेच गरज पडल्यास इतरांचीही मदत करू शकता.

तर मंडळी असे आहेत हे रेल्वेचे काही नवीन नियम, तुमच्या मित्र मंडळींसोबत हा लेख शेअर करा आणि त्यांना देखील ही माहिती पुरावा.

*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!   *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !                                             ---------------------------------------------------
 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा.7900094419          https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...