हा ब्लॉग शोधा

बुधवार, १२ मे, २०२१

NEET परीक्षेत अपयश आलं? मग चिंता करू नका; NEET न देताही करू शकता 'हे' मेडिकल कोर्सेस 'हे' आहेत १२ वी नंतरचे पर्याय*

   ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.


NEET परीक्षेत अपयश आलं? मग चिंता करू नका; NEET न देताही करू शकता 'हे' मेडिकल कोर्सेस 'हे' आहेत १२ वी नंतरचे पर्याय*

नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेशद्वार मानले जाते. NEET ची काठीण्य पातळी खूप उंच असते, त्यामुळे भल्या भल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देताना घाम फुटतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगत आहोत असे पर्याय जे तुम्हाला नीटशिवाय वैद्यकीय क्षेत्राचा मार्ग मोकळा करून देतात.बारावीनंतर असे बरेच वैद्यकीय कोर्स आहेत ज्यांना नीटची आवश्यकता नाही. या लेखात अशा काही अभ्यासक्रमांविषयी जाणून घेऊ...

*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

नीट परीक्षा देणाऱ्या या लाखो विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि आरोग्य सेवा क्षेत्रात करियर करायचे असते. परंतु तुम्ही नीट क्वालिफाय करण्यास अक्षम ठरल्यास निराश होऊ नका. असे अनेक कोर्स आहेत ज्याद्वारे तुम्ही आरोग्य सेवा क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकता. यासाठी नीट देखील आवश्यक नसते. असे काही अभ्यासक्रम पुढे दिले जात आहेत-

बॅचलर इन फार्मसी (B.Pharmacy)


याला सामान्यत: बीफार्मा (BPharma) असेही म्हणतात.

यामध्ये औषधांचा अभ्यास केला जातो. औषधे तयार करण्याचे तंत्र शिकवले जाते. भारतासह अनेक देशांमध्ये फार्मसिस्ट होण्यासाठी ही पदवी आवश्यक आहे.

याद्वारे आपण फार्मास्युटिकल उद्योग, हर्बल उद्योग, सौंदर्यप्रसाधन उद्योग किंवा क्लिनिकल संशोधन क्षेत्रात उत्तम करियर करू शकता. या व्यतिरिक्त उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, संशोधन आणि विकास इत्यादी सरकारी विभागांमध्येही रोजगार निर्माण होतात. बरीच विद्यापीठे व संस्था स्वतंत्र प्रवेश परीक्षेद्वारे या कोर्सला प्रवेश देतात. नीट परीक्षा आयोजित करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) संस्था देखील फार्मसीसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा घेते.
या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना चार वर्षे अभ्यास करावा लागेल. 2-5 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळू शकते.

बीटेक बायोमेडिकल (BTech Biomedical)


बीटेक इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम (Biomedical Engineering) आहे. १२ वी नंतर विज्ञानात या प्रवेश घेता येतो. यानंतर बायोमेडिकल तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता आणि बायोकेमिस्ट म्हणून काम करण्याचा मार्ग मोकळा होतो.
बायोमेडिकलचा हा 4 वर्षांचा कोर्स केल्यानंतर, व्यक्तीला वार्षिक 4 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

बीएससी न्यूट्रिशन (BSc Nutrition


 हा तीन वर्षांचा यूजी कोर्स आहे. यात विज्ञान आणि आहार आणि पौष्टिक मूल्यांच्या सर्व बाबींबद्दल तपशीलवार शिकवले जाते. पोषण व आहारशास्त्रात बीएससी केल्यानंतर उमेदवार रुग्णालये, आरोग्य दवाखाने, आरोग्य केंद्रे किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आहारतज्ज्ञ किंवा पोषण विशेषज्ञ म्हणून काम करू शकतात. पगारही चांगला मिळतो.
हा तीन वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स केल्यानंतर वर्षाला तीन लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.

बीए मानसशास्त्र (BA Psychology)


इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांप्रमाणे सायकॉलॉजीसाठी बारावीमध्ये सायन्स अनिवार्य नाही. कला किंवा वाणिज्य शाखेचे विद्यार्थी देखील मानसशास्त्रामध्ये पदवी प्राप्त करू शकतात. यानंतर, आरोग्य किंवा मेंटल केअर काऊन्सिलर, कन्स्ल्टंट म्हणून काम करता येते. किंवा मग क्रिमीनल जस्टीस किंवा किंवा सामाजिक कार्य क्षेत्रात करियर करता येते.

बीएससी फिजिओथेरपी (BSc Physiotherapy)


हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे. हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे व्याख्याता, फिजिओथेरपिस्ट, संशोधक, संशोधन सहाय्यक, क्रीडा फिजिओ रिहॅबिलिटेटर, थेरपी मॅनेजर यासह अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. एखाद्या रूग्णालयात किंवा खाजगी क्लिनिकमध्येही काम करता येते.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना 5 लाखांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.

B.Sc नर्सिंग- ( B.Sc Nursing )


हा
 अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीत पूर्ण करता येतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 3 ते 8 लाखांचे पॅकेज मिळू शकते.

हे अभ्यासक्रम देखील चांगले पर्याय


वर नमूद केलेल्या कोर्स व्यतिरिक्त असेही काही कोर्स आहेत जे तुम्ही १२ वी नंतर निवडू शकता. यासाठी नीट देखील आवश्यक नसते. हे आहेत -
 
बीएससी कार्डियाक परफ्यूजन (BSc Cardiac Perfusion)

बीएससी बायोटेक्नॉलॉजी (BSc Biotechnology)
B.Sc बायोटेक्नॉलॉजी हा तीन वर्षांचा अंडरग्रेजुएट कोर्स आहे, हा कोर्स पूर्ण करून, उमेदवार दरवर्षी 3 ते 4 लाखांपर्यंत कमवू शकतात.

बीएससी मायक्रोबायोलॉजी (BSc Microbiology)
हा देखील तीन वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम आहे, तो पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 3-4 लाखांपर्यंत मिळू शकते

बीएससी कार्डिओ-व्हस्कुलर टेक्नॉलॉजी (BSc Cardio-Vascular Technology)
 हा तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर आयुष्याला चांगले करिअरचे पर्याय मिळतात आणि पगारही चांगला मिळतो.

बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (B.O.Th) (Bachelor of Occupational Therapy)

बीएससी इन जेनेटिक्स ( B.Sc in Genetics )
जेनेटिक्समध्ये तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 5 लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. 

सायबर फॉरेन्सिकमध्ये B.Sc- ( Cyber ​​Forensics)
हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेतन 5 ते 7 लाखांपर्यंत असू शकते. 

या लेखामध्ये नमूद केलेले बहुतेक अभ्यासक्रम तीन वर्षांच्या कालावधीचे आहेत.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

---------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419,                                                                       https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7                             



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...