हा ब्लॉग शोधा

शनिवार, ८ मे, २०२१

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मुंबई येथे दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली आहे,

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 



मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मुंबई येथे दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली आहे,


औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई येथे दि.३ जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in/संकेतस्थळावर दि.30 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज करावेत.

ITI Promotional song

👇🏻👇🏻

https://youtu.be/Z1brQYurtic

शासनातर्फे आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी पात्र उमेदवारांना दरमहा 500 रुपये विद्यावेतन देण्यात येते. तसेच प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्ष कालावधीसाठी विविध आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी करीता पाठविण्यात येते.


मित्रानो,आय टी आय ( ITI ) चे महत्व तुम्हाला माहिती आहे का ?

तांत्रिक शिक्षण हि काळाची गरज आहे. तांत्रिक शिक्षण हे तीन जागी मिळते ITI पॉलीटेकनिक आणि Engineering.आयटीआय मध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची अट 14 ते 40 वर्षे आहे. आणि शैक्षणिक अट दहावी उत्तीर्ण किंवा काही ट्रेड साठी अनुत्तीर्ण सुद्धा चालतात. यासाठी online पद्धतीने प्रवेश प्रकिया राबवली जाते. याचा कालावधी हा 1 किंवा 2 वर्षाचा असतो.यामध्ये भरपूर ट्रेड आहेत तुम्हाला ज्या व्यवसायात दाखल घ्यायचा आहे तुम्ही मेरिट नुसार घेऊ शकता.या मध्ये सेमिस्टर प्रमाणे MCQ पद्धतीने परीक्षा घेतली जाते. महत्वाचे म्हणजे ITI मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रात्यक्षिक शिकविले जातात, जेणेकरून तुम्ही एक कुशल कारागीर होऊ  शकता.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

                                       


तारतंत्री ( वायरमन ) ( Wireman )

पात्रता:- दहावी नापास   (दहावी पास सुद्धा पात्र आहेत)   कालावधी :- 2 वर्षे

जर तुम्हाला 10 वी मध्ये कमी मार्क्स असतील किंवा तुम्ही नापास असाल तर पुढील एक वर्ष वाया न घालवता तुम्ही या ट्रेड ला ऍडडमिशन घेऊ शकता.तारतंत्री हा एक वीजतंत्री (Electrician) सारखाच ट्रेड आहे. परंतु कोणास इलेकट्रीशियन ला ऍडमिशन नाही मिळाली तर तुम्ही वायरमन सुद्धा करू शकता. या दोन्ही ट्रेड मध्ये भरपूर साम्य आहे 

या ट्रेडमध्ये आपणास खालील कौशल्ये आत्मसाद करण्यास मिळतात.

वायरमन  ट्रेड मध्ये  तुम्हाला  मुख्य करून वायरिंग केबल्स, स्वीच, सॉकेट म्हणजेच वायरिंग चे साहित्य त्यांची ओळख त्यांचा उपयोग याबद्दल माहिती केली जाते ट्रेड चे  वैशिष्ठ  म्हणजे  तुम्हाला  यामध्ये  घरातील   वायरिंग , सर्व  प्रकारच्या  घरगुती व इंडस्ट्रियल मोटर्स  त्यांची  देखभाल  व  दुरुस्ती, घरगुती वायरिंग ची डिझाईन, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स तसेच   तुम्हाला  इंडस्ट्री  मध्ये  होणाऱ्या  सर्व  प्रकारच्या  इलेक्ट्रिकल  कामांविषयी  माहिती  दिली  जाते ट्रेड  चा  अभ्यासक्रम म्हणजे विजेचा  परिचय, विद्युत उपकरणे व एक्सेसरीज ची माहिती, विज कशी  तयार केली जाते त्याचे वहन वितरण, घरातील  उपकरणांची दुरूस्त.हा trade पुर्ण झाल्यावर तुम्हाला  पॉलिटेक्निक ला थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो.नाहीतर अँप्रेन्टिस  ऍक्ट  1961 च्या  नुसार  तुम्ही  एक वर्ष कोणत्याही  कंपनी  मध्ये  शिकाऊ   उमेदवारी  (Apprentice) करू  शकता.  काही  शासकीय  कंपन्या  अश्या  उमेदवारास नोकरीमध्ये प्राधान्य सुद्धा देते.


शासकीय  नोकरीच्या  संधी

सरकारी नोकरीसाठी केंद्र  शासनाच्या  अंडर  मध्ये  असलेल्या  शासकीय  क्मण्या  जसे  की  इंडियन  ऑइल  भारत  पेट्रोलियम , हिंदुस्थान  पेट्रोलियम , भारत  हेवी  इलेकट्रीकल्स  लिमिटेड , रेल्वे  आणि  आपल्या  राज्यातील  सर्वात  महत्वाची  आणि  सर्वांच्या  परिचयाची  असलेली  MSEB  (महाराष्ट्र  स्टेट  इलेक्ट्रिसिटी  बोर्ड) या सारख्या कंपनीत नोकरीची  संधी  उपलब्ध  होते. तसेच  तुम्हाला  आय टी आय  केल्यावर  आर्मी  नेव्ही  एअर  फोर्स मध्ये  सुद्धा  नोकरी  मिळते  तेथील  असलेल्या  टेकनिकल विंग  मध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही इंडियन  स्पेस रिसर्च  ऑर्गनायझेशन  (ISRO), भाभा  ऑटोमिक  रिसर्च सेंटर  (BARC) डिफेन्स  रिसर्च  अँड  डेव्हलपमेंट विंग (DRDO) यांसारख्या  गौरवशाली  संस्थांमध्ये तुम्ही  काम  करू  शकता. वेतन  30000-40000 महिना  मिळू  शकते .


खाजगी  क्षेत्रात  (Privet) 

खाजगी  कंपनीत टाटा, महिंद्रा, Reliance, यांसारख्या  नामांकित कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे. यामध्ये  तुम्हाला  Technician  या  पदावर  घेतले  जाते . तसेच  इलेक्ट्रिकल  उपकरणे  दुरूस्ती  त्याची  देखभाल  करणाऱ्या  अनेक  कंपन्या  भारतात  आहे  ज्यामध्ये  तुम्हाला  नोकरीची  संधी  उपलबध  होते एवढेच  नाही  तर  तुम्ही  स्वतःचा  व्यवसाय  सुरु  करू  शकता.घरगुती  वायरिंग, मोठ मोठ्या बिडिंग्स मधील दुरुस्तीचे कामे,  विद्युत  उपकरणे  दुरुस्ती  यांसारखे  व्यवसाय  तुम्ही  करू  शकता. अशे व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून सवलतीमध्ये कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते.तसेच वायरमन ट्रेड झाल्यावर तुम्हास इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर चे लायसन्स सुद्धा मिळते, ज्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या शासकीय कंत्राटाचे कामे घेऊ शकता. जशे कि गावात किंवा शहरात स्थानिक प्रशासनास लागत असलेल्या विदुत क्षेत्रासंबंधी निविदा निघत असतात.

                                      


संधाता ( वेल्डर -WELDER)

पात्रता :- १०th नापास  ( १०th पास सुद्धा करू शकता) कालावधी :- १ वर्ष

वेल्डिंग बद्दल तुम्हाला सर्वानाच माहिती असेलच आपण आपल्या आजूबाजूला बघतो कि लोंखडी नक्षीदार गेट्स खिडक्या इत्यादी असतात हे सर्व वेल्डेरच करतात . वेल्डिंग हे शेतातील अवजारे , रेल्वे गाड्या जवळपास सर्वच धातूशी निगडित व्यायसायामध्ये वापरल्या जाते . तर आपण बघूया कीं या ट्रेड मध्ये आपल्याला काय शिकवले जाते.या व्यवसायमध्ये तुम्हाला वेल्डिंग व्यवसाय बद्दलची प्राथमिक माहिती त्यामध्ये उपयोगात  होणारे अवजार व साधने त्याची माहिती दिली जाते. या ट्रेड  मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वेल्डिंगच्या पद्धती जसे आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, शिकवले जावे तसेच वेल्डिंग साठी वापरली जाणारे उपकरणाबद्दल माहिती दिली जाते तसेच त्या उपकरणाची देखभाल व दुरुस्ती सुद्धा शिकवली जाते . तसेच वेगवेगळे धातू त्यांचे गुणधर्म , धातूंचे मिश्रण याविषयीचे शिक्षण सुद्धा दिले जाते कारण तुम्हाला वेगवेगळ्या धातूवर काम करावे लागते त्यामुळे त्या धातूचे गुणधर्म तुम्हालां शिकवले जातात . तसेच गॅस मेटल आर्क वेल्डिंग, व अंडर वॉटर वेल्डिंग सुद्धा शिकवले जातात . तसेच  तुम्हाला डिजाईन चे बेसिक सुद्धा शिकवले जाते.

शासकीय  नोकरीच्या  संधी

सरकारी नोकरीसाठी केंद्र  शासनाच्या  अंडर  मध्ये  असलेल्या  शासकीय  कंपन्या जसे  की  इंडियन  ऑइल  भारत  पेट्रोलियम , हिंदुस्थान  पेट्रोलियम , भारत  हेवी  इलेकट्रीकल्स  लिमिटेड , रेल्वे   या सारख्या कंपनीत नोकरीची  संधी  उपलब्ध  होते.तसेच  तुम्हाला  आय टी आय  केल्यावर आर्मी  नेव्ही  एअर  फोर्स मध्ये  सुद्धा  नोकरी  मिळते  तेथील  असलेल्या  टेकनिकल विंग  मध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही इंडियन  स्पेस रिसर्च  ऑर्गनायझेशन  (ISRO), भाभा  ऑटोमिक  रिसर्च सेंटर  (BARC) डिफेन्स  रिसर्च  अँड  डेव्हलपमेंट   विंग (DRDO) यांसारख्या  गौरवशाली  संस्थांमध्ये तुम्ही  काम  करू  शकता. वेतन  30000-40000 महिना  मिळू  शकते .



खाजगी नोकरी  

लोंखडी फर्निचर  उत्पादन कंपनी , कृषीविषयक औजारे , जहाज बांधणी उद्योग यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे .महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःचा  व्यवसाय सुरु काऊ शकता सध्या शासनाचा स्किल इंडिया योजने सारखा भरपूर योजना आहेत ज्यामध्ये तुम्हाला व्यायसाय सुरु  करणासाठी शासन सुद्धा मदत करते.

                                          


विजतंत्री - Electrician

पात्रता:- दहावी पास ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक ) कालावधी :- 2 वर्षे

या ट्रेडमध्ये आपणास खालील कौशल्ये आत्मसाद करण्यास मिळतात.इलेक्ट्रीशियन ट्रेड मध्ये  तुम्हाला  जवळपास  इतर  सर्व  ट्रेड  बद्दल  बेसिक  माहिती  दिली  जाते.

मुख्य  ट्रेड चे  वैशिष्ठ  म्हणजे  तुम्हाला  यामध्ये  घरातील   वायरिंग , सर्व  प्रकारच्या  घरगुती व इंडस्ट्रियल मोटर्स  त्यांची  देखभाल  व  दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर चे कार्य ऊर्जा निर्मिती घरगुती वायरिंग ची डिझाईन, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स तसेच   तुम्हाला  इंडस्ट्री  मध्ये  होणाऱ्या  सर्व  प्रकारच्या  इलेक्ट्रिकल  कामांविषयी  माहिती  दिली  जाते Trade cha syllabus mhnje

विजेचा  परिचय, विद्युत उपकारणे व एक्सेसरीज ची महिती, विज कशी  तयार केली जाते त्याचे वहन वितरण, घरातील  उपकरणांची  दुरूस्ती, हा trade पुर्ण झाल्यावर तुम्हाला  पॉलिटेक्निक ला थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो नाहीतर अँप्रेन्टिस  ऍक्ट  1961 च्या  नुसार  तुम्ही  एक वर्ष कोणत्याही  कंपनी  मध्ये  शिकाऊ   उमेदवारी  (Apprentice) करू  शकत काही  शासकीय  कंपन्या  अश्या

शासकीय  नोकरीच्या  संधी

सरकारी नोकरीसाठी केंद्र  शासनाच्या  अंडर  मध्ये  असलेल्या  शासकीय कंपन्या जसे  की  इंडियन  ऑइल  भारत  पेट्रोलियम , हिंदुस्थान  पेट्रोलियम , भारत  हेवी  इलेकट्रीकल्स  लिमिटेड , रेल्वे  आणि  आपल्या  राज्यातील  सर्वात  महत्वाची  आणि  सर्वांच्या  परिचयाची  असलेली   MSEB  (महाराष्ट्र  स्टेट  इलेक्ट्रिसिटी  बोर्ड) या सारख्या कंपनीत नोकरीची  संधी  उपलब्ध  होते.तसेच  तुम्हाला  आय टी आय  केल्यावर  आर्मी  नेव्ही  एअर  फोर्स मध्ये  सुद्धा  नोकरी  मिळते  तेथील  असलेल्या  टेकनिकल विंग  मध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही इंडियन  स्पेस रिसर्च  ऑर्गनायझेशन  (ISRO), भाभा  ऑटोमिक  रिसर्च सेंटर  (BARC) डिफेन्स  रिसर्च  अँड  डेव्हलपमेंट   विंग (DRDO) यांसारख्या  गौरवशाली  संस्थांमध्ये तुम्ही  काम  करू  शकता वेतन  30000-40000 महिना  मिळू  शकते .

खाजगी  क्षेत्रात  (Privet)

खाजगी  कंपनीत टाटा  महिंद्रा  Reliance यांसारख्या  नामांकित  कमानी मध्ये  तुम्हाला  टेचणीचीण  या  पदावर  घेतले  जाते . तसेच  इलेक्ट्रिकल  उपकरणे  दुरूस्ती  त्याची  देखभाल  करणाऱ्या  अनेक  कंपन्या  भारतात  आहे  ज्यामध्ये  तुम्हाला  नोकरीची  संधी  उपलबध  होते एवढेच  नाही  तर  तुम्ही  स्वतःचा  व्यवसाय  सुरु  करू  शकता  घरगुती  वायरिंग ,  विद्युत  उपकरणे  दुरुस्ती  यांसारखे  व्यवसाय  तुम्ही  करू  शकता. अशे व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून सवलतीमध्ये कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते.

                                      


 मेकॅनिक मोटार वेहिकल ( MMV)

शैक्षणिक पात्रता :- दहावी पास कोर्सचा कालावधी 2वर्ष

तर बघूया यामध्ये आपल्याला काय शिकविले जातात

पहिल्या  वर्षी तुम्हाला ट्रेडची ओळख तसेच यामध्ये लागणारे हत्यारे व उपकरणे यांची माहिती दिली जाते. तुम्हाला गाडीच्या बॅटरी बद्दल माहिती दिली जाते.

तसेच तुम्हाला आर्क आणि गॅस वेल्डिंगचा वापर वेल्डिंगचा  करणे सुद्धा शिकविले जातात,  एअर आणि हायड्रॉलिक ब्रेक सिस्टममधील ओळखकरून दिली जाते. ४ व्हिलर चे डिझेल इंजिन उघडण्यास शिकविले जाते.. वर्कशॉप मॅन्युअलनुसार सिलिंडर हेड, व्हॉल्व्ह ट्रेन, पिस्टन, कनेक्टिंग रॉड असेंबली, क्रॅन्कशाफ्ट, फ्लायव्हील आणि माउंटिंग फ्लॅंगेज, स्पिगॉट आणि बीयरिंग्ज, कॅमशाफ्ट इत्यादीची ओळख होईल.  इंजिनवर चाचणी करा. तसेच इंजिनची कूलिंग, वंगण, सेवन आणि एक्झॉस्ट सिस्टमची दुरुस्ती व देखभाल करणे शिकविले जाते. डिझेल इंधन च्या , एफआयपी, गव्हर्नर आणि वाहनांच्या उत्सर्जनाचे परीक्षण करणे. कार व ट्रक इत्यादि सारखे मोठ्या वाहनांमधील  इंजिनमध्ये स्टार्टर, अल्टरनेटरची  देखभाल आणि दुरुस्ती शिकविल्या जाते.                                         

दुसर्‍या वर्षात, प्रशिक्षणार्थी हलके वाहन / अवजड वाहन ट्रांसमिशन युनिट्स ज्यात गियर बॉक्स, सिंगल प्लेट क्लच असेंबली, डायफ्राम क्लच असेंबली, कॉन्स्टन्ट जाल गियर बॉक्स, सिंक्रोमेश गियर बॉक्स, गियर लिंकेज, प्रोपेलर शाफ्ट , युनिव्हर्सल स्लिप जॉइंट, रियर एक्सेल असेंब्ली, डिफेरेन्सियल असेंब्ली याचे काम शिकविल्या जातात.वाहनाचे वैशिष्ट्य मानक दुरुस्तीच्या पद्धती, आणि सेवा शॅक, लीफ स्प्रिंग, फ्रंट एक्सल, फ्रंट अँड रियर सस्पेंशन, स्टीयरिंग गियरबॉक्स- अळी व रोलर प्रकार, स्टीयरिंग गियरबॉक्स- रेटिक्युलेटिंग बॉल प्रकार, मास्टर सिलिंडर, टॅन्डम मास्टर सिलिंडर, फ्रंट आणि रीअर ब्रेक, व्हील सिलिंडर, व्हॅक्यूम बूस्टर, एअर सर्व्हो युनिट, एअर टँक (जलाशय) इ. दुरुस्त करणे व देखभाल करणे शिकविल्या जाते. तसेच,व्हील बॅलेन्सिंग व व्हील अलाइनमेंट करणे सुद्धा शिकविले जातात. गाडीच्या प्राथमिक वायरिंग चे कनेक्शन सुद्धा समजावून सांगितल्या जाते.एकंदर वाहनांची कार्यपद्धत, त्यांची देखभाल व दुरुस्ती या सर्वांची माहिती या ट्रेड मध्ये दिल्या जाते.हा ट्रेड केल्यावर तुम्हाला पॉलीटेकनिक च्या मेकॅनिकल व ऑटोमोबाईल या ब्रान्च च्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

शासकीय नोकरी  

ज्या पण शासकीय संस्था अथवा कंपन्या गाड्यांशी निगडित आहे तेथे MMV या ट्रेड साठी जागा उपलब्ध आहे जसे कि आपल्या राज्यातील सर्वात मोठे आस्थापन महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ( S T महामंडळ), तसेच इंडियन रेल्वे मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जागा निघतात. तेथील डिझेल इंजिन च्या देखभाल व दुरुस्तीसाठी. तसेच आर्मी मध्ये टॅंक दुरुस्ती, नेव्हीमध्ये जहाज मधील इंजिन ची देखभाल व दुरुस्ती साठी, एअर फोर्स मध्ये सुद्धा या ट्रेडच्या बेसिस वर  तुम्हाला नोकरीची संधी आहे.एवढेच नव्हे तर इतरही शासकीय कंपन्यांमध्ये तुम्हाला या ट्रेड वर नोकरीची संधी उपलब्ध आहे

 खाजगी क्षेत्र 

मित्रानो तुम्हाला माहीतच आहे. कि वाढत्या लोकसंख्ये नुसार वाहन सुद्धा भरमसाठ वाढत आहे. त्यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रात सुद्धा नोकरीची सुवर्ण संधी आहे. यासाठी कार किंवा बाईक तयार करणाऱ्या कंपन्या जसे कि टाटा मोटर्स, महिंद्रा मोटर्स, अशोक लेलॅन्ड इत्यादी नामांकित कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे.तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता.जसे कि गॅरेज किंवा तुम्हाला गाड्यांच्या शोरूम मध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते.  


                                 

  कातारी ( TURNER )

पात्रता : १० वि पास कालावधी :- २ वर्ष 

टर्नर हा एक अभियांत्रिकी म्हणजेच  (mechanical engineering vocational) ट्रेड आहे .  या ट्रेड चा कालावधी हा दोन वर्षाचा आहे . ज्यामध्ये चार सेमिस्टर असतात. तर मित्रानो आपण बघूया या ट्रेड मध्ये तुम्हाला काय शिकवले जाते.

 या ट्रेड मध्ये तुम्हाला धातूपासून वेगवेगळे पार्ट कसे बनवले जाते ते शिकायला मिळते. जसे कि नट बोल्ट एखाद्या मशीनचे पार्टस इत्यादी . वेगवेगळे कटिंग टूल्स , लेंथ मशीन त्यांची माहिती व त्याचा त्यांचा उपयोग करून कश्याप्रकारे विशिष्ट डिझाईन साठी पार्टस बनवले जाते याची माहिती तुम्हाला दिली जाते वेगवेगळ्या कामासाठी ठराविक हत्यार व अवजारे निवडणे याचे ज्ञान दिले जाते . तसेच बनविलेले पार्टस हे व्यवस्थित आहे कि नाही यासाठी वेगवेगळे measuring  instruments  जसे कि कॅलीप मायक्रोमीटर  इत्यादी सुद्धा शिकवले जातात .लेंथ मशीन हाताळणे , त्याला ऑइलिंग करणे , त्याची देखभाल त्याची दुरुस्ती , कामानुसार मशीनची adjustment  शिकवली जाते . पार्टस डिझाईन करणे शिकवले जाते . ड्रिल्सचे वेगवेगळे प्रकार जसे फ्लॅट ड्रील , ट्विस्ट ड्रिल , सेटर ड्रिल त्यांचे भाग,  कटिंग कोन, ड्रीलिंग एकंदरीत वेगवेगळ्या धातूचा उपयोग करून गरजेनुसार पार्टस बनविणे हे काम टर्नर चे असते.

शासकीय नोकरी 

सरकारी नोकरीसाठी केंद्र शासनाच्या अंडर मध्ये असलेल्या शासकीय कंपन्यांमध्ये या ट्रेड ला नोकरीची संधी उपलब्ध आहे. शासनाच्या शिपयार्ड कंपन्या तसेच लिम्बस तयार करणाऱ्या कमान्यांमध्ये प्रामुख्याने या ट्रेड ला प्राध्यान्य आहे. भारतीय रेल्वे मध्ये सुद्धा  या ट्रेड ला भरपूर मागणी आहे.एवढेच नव्हे तर इतरही शासकीय कंपन्यांमध्ये तुम्हाला या ट्रेड वर नोकरीची संधी उपलब्ध आहे.

खाजगी नोकरी 

भारतात कित्येक अश्या मशीनचे गाड्यांचे सुटे पार्ट्स बनविणाऱ्या कंपन्या आहे . ज्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते .तसेच गाड्या बनवणाऱ्या टाटा , महिंद्रा ,सारख्या नामांकित  कंपनी मध्ये तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होते . 

                                    


फीटर ( Fitter )

 फिटर हा आय टी आय मधील सर्वात लोकप्रिय ट्रेड पैकी एक आहे.तर या ट्रेड चा अभ्यासक्रम आपण बघूया

पहिल्या वर्षी तुम्हाला बेसिक फिटटींग बद्दल माहिती दिली जाते. तसेच या ट्रेड शी संबंधित बाकी ट्रेड जसे कि शीत मेटल, वेल्डिंग इत्यादी ट्रेड ची पण प्राथमिक ओळख करून दिल्या जाते. याने तुम्हाला तुमच्या ट्रेड मध्ये कामी पडणाऱ्या बाकी ट्रेड ची ओळख होऊन जाते. बेसिक फिटींग मध्ये तुम्हाला मेटल कट करणे मार्किंग करणे,रिवेटिंग करणे, त्याला ड्रिलिंग करणे, व्यवस्थित माप घेणे इत्यादी गोष्टी शिकविल्या जातात.तुम्हाला सेफ्टी ट्रेनिंग दिल्या जाते. तसेच लेथ मशीन वरील सर्व कामे मशीन चे कार्य पण शिकविले जाते.

दुसऱ्या वर्षी तुम्हाला पॉवर टूल ऑपरेशन, वेगवेगळे किचकट असेम्ब्ली आणि फिटिंग, फास्टनिंग, लॅपिंग, गेज बनविणे, पाईपची कामे करणे आणि पाईप जोडणे, रिपेयर करणे आणि एकत्र करणे, tasech वाल्व्ह्स बद्दल सर्व माहिती सुद्धा आल्या जाते.ड्रिल जिग्स बनविणे आणि वापरणे, क्रिटिकल पार्टस बनविणे, दुरुस्ती आणि  देखभाल करणे, कॉम्पलेक्स गेज बनविणे, लेथ मशीन, ड्रिल मशीन, ग्राइंडिंग मशीन व इतर  टूल्सची तपासणी, देखभाल व दुरुस्ती.वेगवेगळ्या टूल्स व मशीन ची अचूकता टेस्ट करणे. आणि व्यावहारिक प्रशिक्षणाचा भाग म्हणून साध्या मशीनची उभारणी करणे.

लोहाचे विविध प्रकार, गुणधर्म आणि वापर, विशेष फाईल्स , धातूचे गुणधर्म, धातूंवर केले जाणारे वेगवेगळे प्रोसेस धातूंचे संरक्षण करण्यासाठी वापरलेले विविध कोटिंग्ज, वेगवेगळे बेअरिंग, स्टेनलेस स्टील, नॉन-फेरस धातू संबंधित विषय, ऑइलिंग करण्याची पद्धत या सर्व गोष्टी या ट्रेड मध्ये शिकविल्या जातात.


मशीन किंवा इतर धातू उत्पादनांच्या उत्पादन किंवा दुरुस्तीची साधने. फिटिंग्ज किंवा बनवण्यासाठी असेंब्लीचे तपशील आणि त्यांचे तपशील समजून घेणे  काम करण्यासाठी योग्य साहित्य, योग्य साधन आणि उपकरणे निवडने. चिपिंग, फाईलिंग, ग्राइंडिंग, ड्रिलिंग होल, स्क्रू कटिंग, स्क्रॅपिंग, कॅलिपर, मायक्रोमीटर, गेज इत्यादींचा वापर करुन आणि स्क्वेअरसह योग्य फाईलिंगसाठी तपासणी.एकंदरीत धातू, धातूवरील प्रक्रिया, मशीनचे वेगवेगळे पार्टस बनविणे हे काम फिटर करतो.हा ट्रेड केल्यावर तुम्हाला पॉलीटेकनिक च्या मेकॅनिकल व या ब्रान्च च्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो.

शासकीय नोकरी 

सरकारी नोकरीसाठी केंद्र  शासनाच्या  अंडर  मध्ये  असलेल्या  शासकीय  कंपन्यांमध्ये या ट्रेड ला नोकरीची संधी उपलब्ध आहे. शासनाच्या शिपयार्ड कंपन्या तसेच लिम्बस तयार करणाऱ्या कमान्यांमध्ये प्रामुख्याने या ट्रेड ला प्राध्यान्य आहे. भारतीय रेल्वे मध्ये सुद्धा फिटर या ट्रेड ला भरपूर मागणी आहे. एवढेच नव्हे तर इतरही शासकीय कंपन्यांमध्ये तुम्हाला या ट्रेड वर नोकरीची संधी उपलब्ध आहे.

खाजगी क्षेत्र 

मित्रानो वेगवेगळ्या उत्पादन कंपन्या आहेत ज्या मोठमोठ्या मशीन चे पार्टस बनवतात त्या कंपन्यांमध्ये पण नोकरीची संधी उपलब्ध आहे.

                                      


कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट ( COPA )

पात्रता १० वी पास

 कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजेच (COPA ) या ट्रेड ला COPA याच नावाने ओळखतात .हा १ वर्षीय २ सेमिस्टर चा ट्रेड आहे हा ट्रेड अगोदर १२ वी वर होता परंतु त्याला आत १० वी वर पण ऍडमिशन मिळते .

या ट्रेड ला सर्वसाधारण मुलींची जास्त पसंती असते .आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात Computer  व Technology  यांना किती महत्व आहे हे जवळपास आपल्यापैकी सर्वानाच माहित आहे.  येणाऱ्या काही वर्षात सर्वच जागी तंत्रज्ञानच असेल त्यामुळे या ट्रेड ला एक विशिष्ट महत्व आहे .आपण आता बघूया कि या ट्रेड मध्ये आपल्याला काय काय  शिकायला मिळणार आहे .

एका वर्षात  तुम्हाला संगणकाची संपूर्ण प्राथमिक माहिती .ते कसे कार्य करते  इंटरनेट काय आहे याबद्दल सांगितल्या जाते संगणकाची प्राथमिक दुरुस्ती त्याची भाग त्याच्या सोबत असणाऱ्या बाकी वस्तू जसे कि प्रिंटर, स्कॅनर  त्यांचा उपयोगात ते कसे इन्स्टॉल केले जाते हे सुद्धा तुम्हाला शिकविले जाते. पुढे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सएल, पॉवर पॉईंट सुद्धा शिकवले जाते . MS-CIT मध्ये जे शिकवले जाते ते व त्याच्या पुढील सर्व ऍडव्हान्स माहिती COPA मध्ये शिकविल्या जाते, संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टम  कशी लोड केल्या जाते. ते संगणकाची दुरुस्ती तसेच HTML, JAVA SCRIPT  यासारख्या संगणकीय भाषेचे ज्ञान सुद्धा दिले जाते तुम्ही त्याचा उपयोग करून वेबसाईट  बनवू शकता .ACCOUNTANCY मध्ये वापरले जाणारे TALLY  हे सॉफ्टवेअर सुद्धा पूर्ण शिकवले जाते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे CYBER SECURITY म्हणजेच वायरसव बाहेरील लोंकापासून आपली संगणक व आपली माहिती कशा प्रकारे सुरक्षित ठेवावी याचे ज्ञान तुम्हाला एका वर्षात या ट्रेड मध्ये मिळते .

 तुम्ही हा ट्रेड केल्यावर POLYTECHNIC च्या COMPUTER  ENGINEERING या ब्रांच च्या द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो . 

शासकीय नोकरीची संधी 

 जवळपास केंद्र राज्य शासनाच्या सर्वच विभागात या ट्रेड साठी जागा उपलब्ध होतात . कारण आज असा एकही विभाग नाही ज्यामध्ये संगणकाचे काम नाही. शासकीय बँक, इंडियन ऑइल सारख्या पेट्रोलियम कंपन्या, ISRO, DRDO सारख्या रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकते

खाजगी नोकरी  

प्रत्येक खाजगी कंपनी मध्ये कॉप्म्युटर ऑपरेटर ची गरज असते . तुम्ही नामांकित कंपनी मध्ये कॉप्युटर ऑपरेटर या पदावर चांगल्या पगारावर काम करू शकता. एयरपोर्ट, कॉम्पुटर सेंटर, वेगवेगळे शोरूम येथे सुद्धा जॉब ची संधी उपलब्द होते.

                                      


सुतारकाम ( Carpenter ) 

पात्रता :- १० वी पास कालावधी : - १ वर्ष

मित्रांनो आपल्या आजूबाजूला आपण टेबल, खुर्ची ,सोफा दिवाण , लाकडी कपाट, दरवाजे इत्यादी बघतो.हे सर्व कोण बनवते तर त्याचे उत्तर आहे सुतार. इति मध्ये सुद्धा सुतारकाम म्हणून ट्रेड आहे. ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व शिकविले जाते.तर बघूया या ट्रेड बद्दल ची माहिती.

या ट्रेड मध्ये तुम्हाला लाकूड , ISI मानकानुसार लाकडांचे वर्गीकरण, वेगवेगळ्या  लाकडांची माहिती, त्यांचा विशिष्ट कामासाठी उपयोग, लाकडावर होणारे रोग, वेगवेगळ्या प्रकारच्या आरी त्यांचे दाते व त्यानुसार त्यांचा उपयोग तसेच वेगवेगळ्या छन्नी, लोंखंडी हातोडे आणि लाकडी हातोडे याबद्दल माहिती दिली जाते. तसेच इतर उपकरणे त्यांची ओळख, उपयोग शिकवल्या जाते, जसे कि बेंच व्हॉइस, मीटर बोर्ड इत्यादी.पुढे तुम्हाला लाकडांचे जोड बनविणे, लाकांडावर रासायनिक प्रक्रिया करून लाकडांचे होणारे विघटन थांबविणे शिकविले जाते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिल मशीन त्यांच्या ड्रिल बिट, मशीनची ताकद व काम करावयाचे लाकूड या सर्वांना विचारात घेऊन विशिष्ट ड्रिल निवडणे सांगितले जाते. बेडरूम, किचन, लायब्ररी, ऑफिस, क्लास रूम इत्यादीनुसार डिझाईन करणे शिकविले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे सॅण्ड पेपर त्याचे वर्गीकरण, उपयोग हे सुद्धा शिकविले जातात.मशिन्स  बद्दल बोलायचे झाले तर, सुतारकाम क्षेत्रात ज्या सर्व मशिन्स वापरल्या जातात त्यांचा उपयोग, देखभाल व दुरुस्ती, तसेच त्यांचे प्रात्यक्षिक हे तुमच्या कडून करून घेतले जातात. म्हणजे एका वर्षानंतर तुम्ही एक कुशल कारागीर बनूनच बाहेर पडता.आपण यातल्या नोकरीच्या संधी सुद्धा बघू.

शासकीय नोकरी  

इंडियन रेल्वे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, यांसारख्या राज्य शासनाच्या  व केंद्र  शासनाच्या  अंडर  मध्ये  असलेल्या  शासकीय  कंपन्यांमध्ये या ट्रेड ला नोकरीची संधी उपलब्ध आहे. तसेच आर्मी, नेव्ही, मध्ये सुद्धा याला खूप मागणी आहे. जहाज बांधणी कंपन्या तसेच लिम्बस तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने या ट्रेड ला प्राध्यान्य आहे. एवढेच नव्हे तर इतरही शासकीय कंपन्यांमध्ये तुम्हाला या ट्रेड वर नोकरीची संधी उपलब्ध आहे.

खाजगी क्षेत्र 

 इंटेरिअर डिझाईन कंपन्या मध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे. तसेच मोठं मोठ्या कंपन्या आहेत ज्या रेडिमेड फर्निचर बनवतात अश्या कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला हा ट्रेड केल्यावर नोकरी मिळते.   

                                       


तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एककमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद!!

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.
    
------------------------------------------------
 *संतोष विठ्ठल साळवे.... एक जनजागृती चळवळ 7900094419                                             https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )   






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...