( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
*नमोबुद्धाय !*
संपूर्ण जगाला अहिंसा व सत्याची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्वज्ञ होते. त्यांनीच बौद्ध धर्माची स्थापना केली.
*🌼धम्मविचार🌼
*ज्या पद्धतीने *गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत* हा निसर्गामध्ये आधीपासूनच होता, त्याला *आयझॅक न्यूटन* ने फक्त लोकांसमोर मांडले. त्याच पद्धतीने *विपश्यनाचा सिद्धांत* हा देखील निसर्गामध्ये आधीपासूनच होता, परंतु खूप परिश्रम व पुरुषार्थ करून *विश्वगुरु तथागत बुद्धांनी* त्याला शोधले व लोकांसमोर मांडले, आणि अश्याप्रकारे लोकांना *दुःख मुक्तीचा मार्ग* मिळाला.
Youtubr Link : 👇
भगवान बुद्धांचे संदेश
ईतर धर्मसंस्थपाक, बुवा, महाराज आपल्या उपासकांना केवळ माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतो तेच अंतिम सत्य समजा असे सांगतात पण भगवान बुद्ध आपल्या उपासकांना कालामसुत्तात उपदेश देतात कि केवळ पूर्वजांनी सांगितले, धर्मग्रंथात लिहिले, परंपरा आहे, साधू संतांनी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नका तर तर्काच्या विवेकाच्या कसोटीवर एखादी गोष्ट स्वतःच्या बुद्धीला पटली आणि जर ती गोष्ट तुमच्या व इतरांच्या सुद्धा भल्याची असेल तरच स्वीकारा.
शाक्य गणराज्याचे राजे शुद्धोधन व महाराणी महामाया किंवा मायादेवी ह्यांच्या पोटी गौतम बुद्ध ह्यांचा जन्म झाला. त्यांच्या मातापित्यांनी त्यांचे नाव “सिद्धार्थ” असे ठेवले.परंतु त्यांच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्यांच्या मातेचे निधन झाले व त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशीने म्हणजेच महाप्रजापती गौतमी ह्यांनी केला.
*सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या. विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*
त्यांच्याच नावावरून गौतम बुद्ध ह्यांना “गौतम” असे नाव मिळाले.
गौतम बुद्ध ह्यांचा सांभाळ करणारी त्यांची दुसरी आई म्हणजेच मावशी महाप्रजापती गौतमी ह्या अर्हत पद प्राप्त झालेल्या महान भिक्खुणी होत्या. त्यांना जगातील पहिल्या भिक्खुणी मानले जाते.पुढे गौतम बुद्ध ह्यांचा यशोधरा ह्या राजकन्येशी विवाह झाला आणि त्यांना राहुल हा पुत्र झाला.
अविरत तपस्येनंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि त्यांनी बौद्धधर्माची शिकवण देऊन जगाला जीवनाचा खरा मार्ग व उद्देश दाखवला.
अनेक लोक असा प्रश्न उपस्थित करतात की, तथागत बुद्ध ह्यांचा जन्म नेपाळमध्ये झाला असूनही सर्व भारतीय त्यांना “आपले” का म्हणवतात? तर ह्याचे उत्तर असे आहे की, खरं तर हे महापुरुष कुठल्या एका देशाचे नसतात. सर्व जग त्यांचे व ते सर्व जगाचे असतात. भारतीयांसाठी तर तथागत बुद्ध हे दैवतच आहेत.कारण त्यांचा जन्म जरी नेपाळमध्ये झाला असला, तरीही त्यांच्या आयुष्यातील सर्व महत्वाच्या गोष्टी ह्या भारतात घडल्या.
गौतम बुद्ध ह्यांचा जन्म इसवी सन पूर्ण ५६३ साली नेपाळ मधील “लुंबिनी” ह्या ठिकाणी झाला
असला तरीही,त्यांनी ज्या ठिकाणी ध्यान व तप करून ज्ञान प्राप्त केले.
*आर्य सत्य*
भगवान बुद्धांनी चार आर्य सत्य सांगितली आहेत. आर्य म्हणजे महान सत्य, वस्तुनिष्ठ सत्य, व व्यवहार्य स्वरूप सिद्ध करणारे सत्य या तत्वज्ञानाचा मध्यम मार्ग, तर्कशुद्ध, विशुद्ध मानवी जीवन मार्ग होय.
*पहिले आर्य सत्य - दुःख*
जगात दुःख आहे, सर्व जग दुःखाने भरलेले आहे, हे दुख शारीरिक व मानसिक असू शकते, विश्वामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला दुःख भोगावे लागते. पाच उपादन स्कंध दुःख आहे. यालाच दुःख आर्य सत्य म्हणतात.
*दुसरे आर्य सत्य - म्हणजे दुःख समुदाय*
मानवी जीवनात असलेले दुःख याला कारण आहे, कोणतेही दुःख आपोआप निर्माण होत नाही त्याला काहीतरी कारण असतेच, दुःख मनुष्याची तृष्णा म्हणजे तिला अतृप्ती, असंतोष, हाव, मोह, लोभ, काम, द्वेष, घोर निराशा, चिंता असे म्हणतात. तृष्णा दुःखाचे मूळ कारण आहे.
१) काम तृष्णा म्हणजे जे भोगविलासाची तृष्णा म्हणजे आसक्ती आहे, वस्तू सुख व आसक्ती निर्माण होते, ही तृष्णा जीवनात दुःख निर्माण करते.
२) भवतृष्णा म्हणजे जीवनासक्ती अस्तित्वासाठी असलेली तृष्णा.
३) विभव - तृष्णा म्हणजे भयंकर निराशेने ग्रासून उत्पन्न झालेली मरणाशक्ती तृष्णा. अशी दुःखाची कारणे आहेत.
*तिसरे आर्य सत्य म्हणजे - दुःख निरोध*
दुःख आहे म्हणून त्याचे कारणही आहे, या गोष्टीचे आकलन करून ते नष्ट करणे, दुःखाचा निरोध करणे, थांबविणे किंवा नष्ट करणे शक्य आहे. सत्य जाणून घेणे व निरोध करणे म्हणजे आपल्या तृष्णेला, वासनेला, विकाराला थांबविणे याला दुःख निरोधाचे तिसरे आर्यसत्य म्हणतात.
महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी विस्तृत जागेत पसरलेले जगप्रसिद्ध बौध्द विहार
*चौथे आर्य सत्य म्हणजे - दुःख निरोधगामिनी प्रतिपदा किंवा दुःख मुक्तीचा मार्ग*
भगवान बुद्धांनी दुःख मुक्तीचा आर्य अष्टांगिक मार्ग तीन भागात विभागलेला आहे.
१) प्रज्ञा
२) शील
३) समाधी
*आर्य अष्टांगिक मार्ग*
१) सम्यक दृष्टी
२) सम्यक संकल्प
३) समय वाचा
४) सम्यक कर्मांत
५)सम्यक आजीविका
६) सम्यक व्यायाम
७) सम्यक स्मृती
८) सम्यक समाधी
दुःखातून मुक्त होणे, निर्वाण प्राप्त करून घेणे म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय, यालाच निर्वाणाकडे जाणारा मार्ग म्हटले आहे आणि हे चौथे आर्य सत्य आहे.
“राजपुत्र सिद्धार्थ गौतम” चे “महाज्ञानी गौतम बुद्ध” झाले ती जागा म्हणजे भारतातील बोधगया होय.
बोधगया बिहार ह्या राज्यात आहे हे तर सर्वांना माहित असेलच.
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच हा दिवस आपण “बुद्ध पौर्णिमा” म्हणून साजरा करतो.
ज्ञानप्राप्तीनंतर महाज्ञानी बुद्धांनी पाच पंडितांना उपदेश केला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्कपवत्तन’ किंवा ‘धम्मचक्रप्रवर्तन’ असे म्हणतात.
ह्या प्रवचनात गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची मुलतत्वे सांगितली.
त्यांनी ज्या ठिकाणी हे प्रवचन केले ती जागा म्हणजे सारनाथ होय. सारनाथ हे उत्तर प्रदेश येथे आहे.
तसेच गौतम बुद्धांनी ज्या नालंदा विश्वविद्यालयात ज्ञानदान केले ते नालंदा विश्वविद्यालय सुद्धा बिहारमध्ये म्हणजेच भारतातच आहे.
अनेकांना बौद्ध धर्माची शिकवण दिल्यानंतर त्याचा आणखी प्रसार करण्यासाठी गौतम बुद्ध ह्यांनी मगध राज्य व महाजनपदांत प्रवास करून हजारो लोकांना बौद्ध धर्माची शिकवण दिली.
हे सर्व कार्य त्यांनी भारतातच केले. इसवी सन पूर्व ४८३ मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले.
कुशीनगर हे शहर देखील उत्तर प्रदेशातच म्हणजे भारतातच आहे. गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ भारतातच व्यतीत केला.
त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शरीराचे ७ अवशेष भारतातच. ठेवण्यात आले व एक अवशेष शाक्य पंथीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली बौद्ध परिषद बिहार येथील राजगृह येथे झाली होती. अजातशत्रू राजा व साधू महाकश्यप ह्यांनी ही परिषद आयोजीत केली होती.
ह्या परिषदेचे उद्दिष्ट्य भगवान बुद्धांच्या विनय व सुत्तांचे जतन करणे हे होते.
ह्याचप्रकारे दुसरी बौद्ध परिषद वैशाली येथे, तिसरी पाटलीपुत्र येथे तर चौथी बौद्ध परिषद कुंडलवन म्हणजेच काश्मीर येथे झाली होती. ह्या परिषदांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करण्याविषयी चर्चा झाली होती.
आता ऐतिहासिक दृष्ट्या बघायचे झाले तर इसवी सन पूर्व २०० -३०० मध्ये नेपाळ ह्या देशाचे अस्तित्व सुद्धा नव्हते.
भारतीय उपखंडात मौर्यांचे राज्य होते व मौर्यांची राजधानी ही पाटलीपुत्र होती. पाटलीपुत्र म्हणजेच बिहारची राजधानी पटना शहर होय. मौर्यांचे साम्राज्य हे जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक होते.
गौतम बुद्ध ह्यांचा व बौद्धधर्माचा सर्वात मोठा अनुयायी म्हणजे मौर्य वंशीय सम्राट अशोक ! हा सम्राट अशोक एक भारतीय राजा होता.
ह्यानेच आशिया खंडात बौद्धधर्माचा प्रसार केला. सम्राट अशोकाने सर्वत्र बौद्ध धर्माचा प्रसार केल्यामुळे जग हे भारताला गौतम बुद्धांची भूमी म्हणून ओळखते.
जगभरातून लाखो लोक बोधगया, सारनाथ व कुशीनगर येथे दर्शनासाठी येतात. जितके लोक भारतात येतात तितके नेपाळला दर्शनासाठी जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
म्हणजेच फक्त भारतीयच नव्हे तर अख्खं जगच भारताला गौतम बुद्धांची भूमी म्हणून ओळखतं!
भारतात बौद्धधर्माची अनेक पवित्र स्थाने आहेत. पटना, राजगिर, नालंदा, श्रावस्ती, वैशाली, सांची येथे दर वर्षी अनेक बौध्दधर्मीय जाऊन दर्शन घेतात. येथील विहारांमध्ये ध्यान करतात.
बौद्ध धर्माचे मूळ भारतातच आहे.
बौद्धधर्मातील महत्वाची स्थाने व विहारांवरूनच ह्या राज्याला “बिहार” हे नाव पडले असे म्हणतात.
जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडावर मौर्यांचे राज्य होते. नेपाळचाही अर्ध्यापेक्षा अधिक भाग भारतात होता. व उरलेल्या भागात म्हणजेच आज जिथे चीन आहे तो भाग प्रोटो तिबेटी राज्यात होता. भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी ह्या शहरात झाला.हे शहर कपिलवास्तू ह्या राज्यात होते.
भगवान बुद्धांचे वडील महाराज शुद्धोधन हे शाक्य साम्राज्याचे म्हणजेच कपिलवास्तूचे प्रमुख होते. हे कपिलवास्तू राज्य भारतातल्या १६ महाजनपदांपैकी एक होते.म्हणजेच तेव्हा हे राज्य म्हणजे भारताचाच एक भाग होता.त्यानंतर सुद्धा लिच्छवींच्या काळात हा प्रदेश लिच्छवी अधिराज्यात वृज्जी महाजनपदांच्या अखत्यारीत येत होता.
ह्या साम्राज्याची राजधानी वैशाली होती. त्यानंतर ह्या प्रदेशावर अजातशत्रू ह्या राजाचे राज्य आले. त्या काळात सुद्धा हा प्रदेश भारतीय भूमी म्हणूनच ओळखला जात असे.इसवी सन २०० ते ५०० दरम्यान गुप्त व हुणांच्या काळात नेपाळचा जन्म झाला.त्या आधी हा प्रदेश भारतभूमिचाच भाग होता. म्हणूनच भगवान बुद्धांचा जन्म सुद्धा भारताच्याच भूमितला आहे.
म्हणूनच भारतीय भगवान बुद्धांना आपले म्हणतात व जग सुद्धा भारताला “भगवान बुद्धांची भूमी” असे समजते.
ज्या महापुरुषाने सर्व जगाला आपले मानून सत्य व अहिंसेची शिकवण दिली ते भगवान बुद्ध साऱ्या जगाचे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्राचीन भारतातील तक्षशिला विश्वविद्यालय
Youtubr Link : 👇
बौद्ध शिक्षणाचं सर्वात जुनं केंद्रबिंदू म्हणून आपण तक्षशिला ह्या विद्यापीठाकडे पाहतो .सम्राट अशोकांनी आपल्या कारकिर्दीत असे अनेक विद्यापीठ उभारून बौद्ध संस्कृती जीवंत ठेवली होती आणि जगभर बौद्ध शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला होता जगाला जर शिक्षणाचं महत्व कोणी समजावलं तर ते म्हणजे सम्राट सशोक आहेत.
मात्र काळाच्या आड बौद्ध संस्कृती आणि साहित्य जमिनी आड दडली आणि हजारो वर्षे आपण बौद्ध शिक्षणापासून अलिप्त राहिलो.
ज्याचा आदी, अंत, आणि मध्य कल्याणकारी आहे, सुखकारक आहे अश्या धम्म जगाला देणाऱ्या शाक्यमुनी भगवान बुद्धांना वंदन.
नमो बुध्दाय!
*तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-----------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419। साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविध
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा