हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ११ मे, २०२१

*भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम नगरसेवक, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची करा तक्रार कस ते पहा*


भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम नगरसेवक, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची करा तक्रार कस ते पहा

आपल्या गावातील शासकीय कामे जर होत नसतील, किंवा शासकीय योजना आपल्या पर्यंत पोचत नसतील, तर त्याची तक्रार कोठे करायची याची सविस्तर माहिती आपण येथे घेणार आहोत. या तक्रारीद्वारे शासकीय अधिकाऱ्यांना त्या तक्रारींचे निवारण करावेच लागते, व केलेल्या तक्रारीचा अहवालाची प्रत तुम्हाला पाठवावी लागते. ही तक्रार प्रणाली मुख्यमंत्री यांच्या देखरेखीखाली काम करते.

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*

आपले सरकार वेबसाईट:

महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहोत.

आपली तक्रार योग्य वर्गवारीत दाखल करायची आहे. (जिल्हा प्रशासन / मंत्रालयातील विभाग). एकदा आपण तक्रार दाखल केली की, आपला ट्रेकिंग क्रमांक तयार होईल. त्या ट्रेकिंग क्रमांकावरूनच नागरीकांना आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करता येईल. आपल्या तक्रारीची सद्यस्थिती तुम्हाला त्यावरूनच कळेल. सक्षम अधिकारी यांचा आपली तक्रार 21 दिवसात निवारण करण्याचा प्रयत्न असेल.

 आपल्या तक्रारीचे समाधान झाले की नाही याबाबत नागरिक "समाधानी आहोत" किवा "समाधान झाले नाही" या दोन पर्यायांच्या माध्यमातून आपला प्रतिसाद देवू शकतात. 

https://grievances.maharashtra.gov.in/mr

पुढे तक्रार निवारण, माहितीचा अधिकार, माझे सरकार ,महा योजना असे पर्याय दिसतील त्यापैकी "तक्रार निवारण" या पर्यायावर क्लिक करा.

 तक्रारीचे स्वरूप:

तक्रारीचे स्वरुपा मध्ये गावातील विविध शासकीय कामे आणि योजना संबंधी तक्रारीसाठी खालील विविध तक्रारीचे स्वरुप पहा किंवा इतरही ग्रामपंचायत संबंधी तक्रारिचे स्वरूप निवडा. 

1) ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना

2) ग्रामपंचायत प्रशासन- संबधित बाबी

3) जि.प. प्राथमिक नविन शाळांना मान्यता/वाढीने वर्गांना मान्यता

4) प्राथमिक शाळागृहांची/शैाचालय- दूरूस्ती

5) शालेय पोषण आहार बाबत

6) प्राथमिक शाळाविषयी इतर बाबी

7) माध्यमिक शाळाविषयी इतर बाबी

8) पाळणाघर चालविणे

9) अंगणवाडी इमारत / शौचालय बांधकाम

10) कुपोषित मुला-मुलींसाठी अतिरिक्त आहार.

11) जि.प.शाळेतील इ.5वी ते 7वी तील मुलींना सायकल पुरविणे

12) अंगणवाडी केंद्रातील मुला मुलींसाठी गणवेश पुरविणे

13) प्राथमिक उपचार, प्रतिबंधात्मक सेवा

14) रोगांचे प्रतिबंध व नियंत्रण कार्य

15) प्रजनन व बाल आरोग्य सेवा

16) आरोग्य व आहार विषयक शिक्षण

17) विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम

18) शालेय आरोग्य तपासणी/अंगणवाडी तपासणी.

19) मदत गट

20) इंदिरा आवास योजना

21) पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम

22) दारिद्र्य रेषेखाली असणार्‍या कुटुंबांकरीता कल्याणकारी योजना राबविने

23) कृषी संबधी

24) पाणीपुरवठा योजनेंतर्गत अस्तीत्वातील विहीरींचे रुंदीकरण व खोलीकरण/दुरुस्ती

25) नविन पाणी पुरवठा योजना

26) विंधन विहीर (हातपंप)

27) ग्रामीण रस्ते- मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व दुरुस्ती

28) तिर्थक्षेत्र/ पर्यटन विकास कार्यक्रम

29) स्मशानभुमी/ अंगणवाडी इमारत बांधकामे

30) अभिकरण (वि. प. स./ वि. स. स./डोंगरी/ खासदार निधी)

31) १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमतेचे पाझर तलाव, साठवण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे

32) जवाहर विहिरी

33) जनावरांना उपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया इ.

34) दलितवस्ती सुधार योजना

35) अपंगांना शाळा, मागास विद्यार्थींना शिष्यवृत्या, अनुदानित वसतिगृहे इ.

36) ग्रामीण भागातील बेरोजगार मुलीं व महिलां साठीच्या योजना

37) मुलींना स्वसंरक्षणा साठी  व त्यांच्या शारीरिक विकासा साठी प्रशिक्षण योजना

38) महिलां साठी समुपदेशन केंद्र चालविणे

39) महिलांना कायदेशीर / विधी विषयक सल्ला देणे

40) विविध कामांच्या देयकांची रक्कम संबधितांना अदा करणे

41) कर्मचारी नेमणूका, पदोन्नती, जिल्हा बदल्या/नियतकालिक बदल्या इ.

42) जिल्हा परिषद मालकीच्या इमारतींचे देखभाल व दुरुस्ती

43)  इतर 

तुमची तक्रार: या पर्यायामध्ये तुमचे नाव, ग्रामपंचायत गावाचे नाव लिहून, वरील एका तक्रारीच्या स्वरूपा नुसार कमाल 2000 शब्दामध्ये तक्रारींचे विवरण करा.

प्रतिमा अपलोड करा:

या पर्यायामध्ये तक्रारीचा प्रतिमा (फोटो) पुरावा म्हणून अपलोड करू शकता (फाईल्स २ एमबी पेक्षा कमी असाव्यात. मान्य फाईल प्रकार: png jpg jpeg.).

दस्तऐवज अपलोड करा: या पर्यायामध्ये तक्रारीच्या PDF फाईल  पुरावा म्हणून अपलोड करू शकता (फाईल्स २ एमबी पेक्षा कमी असाव्यात.मान्य फाईल प्रकार: PDF.).

प्रतिमेतील कोड प्रविष्ट करा (केस सेन्सेटिव्ह): या पर्यायामध्ये वर दिलेला प्रतिमेतील कोड प्रविष्ट करा. 

पुढे ""Preview"" वर क्लिक करून आपण करत असलेल्या तक्रारीचे पूर्वावलोकन पहा आणि योग्य "प्रशासन पातळी", "प्रशासन प्रकार" आणि "तक्रारींचे स्वरूप" निवडलेली नसल्यास कृपया दुरुस्त (Edit) करा.

आपली तक्रार पूर्वावलोकन "Preview" मध्ये योग्य दिसत असेल तर तक्रारीची पुष्टी करण्यासाठी "Confirm & Submit" वर क्लिक करा.

सबमिट झाल्यावर तुमची तक्रार SAVE झाल्याचा आपल्याला एक टोकन मॅसेज येतो.

*आपल्या तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करून तक्रार यादीतून तक्रार निवडा किंवा टोकन नंबर*

https://grievances.maharashtra.gov.in/mr/citizens/login?redirect=%2Fmr%2Fpost-grievance

-–----––--------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!

---------------------------------------------------------------

 संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419,                                                                       https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...