*OTT म्हणजे काय? भारतातील OTT चे लोकप्रिय प्रकार आणि प्लॅटफॉर्म कोणते? जाणून घ्या सर्वकाही*
OTT ची लोकप्रियता पाहता हल्ली अनेक चित्रपट हे चित्रपटगृहांऐवजी OTT Apps किंवा OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होऊ लागले आहेत.
इंटरनेटमुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले. आता प्रत्येक क्षेत्रात इंटरनेट चा वापर केला जातो. इंटरनेट तसेच नवीन टेक्नॉलॉजीमुळे आपल्या काम करण्याचा पद्धतीत आमूलाग्र बदल झाले. अशाच प्रकारे ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मने सुद्धा मनोरंजन क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले. आजच्या काळात OTT Platforms खूप लोकप्रिय होत आहेत. आजची युवा पिढी OTT Platforms ना खूप जास्त महत्त्व देत आहेत.
OTT ची लोकप्रियता पाहता हल्ली अनेक चित्रपट हे चित्रपटगृहांऐवजी OTT Apps किंवा OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित (Release) होऊ लागले आहेत. गेल्या 13-14 महिन्यांपासून जगभरात कोरोना या रोगाने थैमान घातले आहेत. गेल्या वर्षभरापासून जगभरातील अनेक देशांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केली. कधी लॉकडाऊन तर कधी अनलॉक असा खेळ जगभर सुरु आहे. अशा परिस्थिती चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे जगभरात मोठ्या हजारो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले.
मनोरंजन क्षेत्र सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहे. या ओटीटीबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत. यातील बहुतेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला या बातमीत मिळतील. OTT काय आहे? याबद्दल बहुतांश लोकांना माहिती नाही आहे. तर आज आम्ही तुम्हाला OTT काय आहे आणि OTT Apps म्हणजे काय याबद्दल माहिती देणार आहोत.
OTT म्हणजे काय? | OTT Meaning
OTT चा फुल फॉर्म Over-The-Top (ओव्हर-द-टॉप) असा आहे. OTT वर तुम्हाला नवीन प्रदर्शित चित्रपट, वेब सीरिज किंवा अन्य मीडिया कंटेंट पाहायला मिळतो. थोडक्यात सांगायचे झाले तर OTT ही Video Streaming Service आहे. अमेरिकेत पूर्वी याला खूप मागणी होती. परंतु आता जगभरात याला डिमांड आहे. भारतात तर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय या ओटीटीच्या माध्यमातून होत आहे.
*सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419*
ओटीटी अॅप काय आहे? | What is OTT Apps
आपण OTT Apps वर वेब सीरिज, चित्रपट, मालिका इत्यादी पाहू शकतो. हे OTT Apps मोबाईल वर किंवा स्मार्ट टीव्ही वर सुद्धा डाऊनलोड करून वापरता येतात. OTT Apps वर टेलिव्हिजन कंटेंटदेखील उपलब्ध केला जातो. प्रेक्षक त्यांच्या आवडीनुसार हवे तेव्हा इंटरनेटच्या साहाय्याने आवडीचे कार्यक्रम, मालिका आणि टीव्ही शोज पाहू शकतात. अनेक ओटीटी अॅप हे त्यांच्या वेब सीरिज मुळे लोकप्रिय झाले आहेत.
OTT चे फायदे
Over-The-Top (OTT) चे अनेक फायदे आहेत. आपल्याला आपल्या आवडीचे कार्यक्रम किंवा चित्रपट टीव्हीवर पाहण्यासाठी केबल किंवा D2h कनेक्शन ची गरज लागते. पण ओटीटी कंटेंट व शोज पाहण्यासाठी केवळ इंटरनेटची आणि एका स्मार्टफोनची आवश्यकता असते. ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा ओटीटी अॅपवर आपण ओरिजनल कंटेंट, वेब सीरिज, नवीन चित्रपट तसेच जुने चित्रपट, डॉक्युमेंट्री इत्यादी पाहू शकतो. हा कंटेंट इतरत्र कुठेही सहज उपलब्ध नसतो.
गेल्या काही वर्षांपासून अनेक ओटीटी सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म जसे की, Amazon Prime, Netflix त्यांचा स्वतःचा ओरिजनल कंटेंट, वेब सीरिज तसेच चित्रपट बनवत आहेत. हा कंटेट इतरत्र कुठेही मिळत नाही, केवळ त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कंटेट उपलब्ध असतो. Over-The-Top (OTT) सर्व्हिस प्रेक्षकांसाठी खूप सोयीची आहे. लोक त्यांच्या सोयीनुसार हवं तेव्हा, हवं त्या ठिकाणी ओटीटी अॅपचा वापर करू शकतात. ओटीटी अॅप जसे की स्मार्ट टीव्ही, टॅबलेट, स्मार्टफोन, इत्यादींवर चित्रपट आणि ओरिजनल कंटेंट बघितले जाऊ शकतात.
स्मार्टफोन, टॅबलेट मध्ये ओटीटी उपलब्ध आहेत. हे अॅप गुगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोर वरून डाउनलोड करता येतात. आजकाल बाजारात मिळणाऱ्या स्मार्ट टीव्हींवर मध्ये सुद्धा OTT App चा सपोर्ट असतो. लॅपटॉप तसेच कॉम्पुटरवर सुद्धा OTT App सर्व्हिस उपलब्ध आहे. तसेच Streaming Device च्या साहाय्याने सुद्धा ओटीटी कंटेंट पाहता येतो. बाजारात मिळणाऱ्या Amazon Fire Tv Stick, Apple Tv, Chromecast इत्यादींच्या साहाय्याने OTT कंटेंट पाहता येतो.
ओटीटी सर्व्हिसचे प्रकार | Types Of OTT Services
1) Transactional Video On Demand (TVOD)
या प्रकारच्या ओटीटी सर्व्हिस मध्ये कोणताही चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो फक्त एकदा बघण्यासाठी रेंट (भाडे) वर दिला जातो किंवा विकत घेण्यासाठी उपलब्ध असतो. Apple iTunes याचे एक उदाहरण आहे.
2) Subscription Video On Demand (SVOD)
या सर्व्हिस मध्ये व्हिडिओ स्ट्रिमिंग कंटेंट पाहण्यासाठी पैसे देऊन त्या अॅप चे मासिक किंवा वर्षाचे सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागते. अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स हे ग्राहकांसाठी सबस्क्रिप्शन सुविधा पुरविते. हे प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन च्या आधारावर त्यांचे ओरिजनल कंटेंट आणि वेब सीरिज ग्राहकांना उपलब्ध करून देतात.
*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा. संतोष विठ्ठल साळवे 7900094419*
या ओटीटी सर्व्हिस मध्ये युजरला जाहिरात (Advertise) पाहावी लागते. या ओटीटी सुविधेमध्ये युजरला कंटेंट मोफत उपलब्ध करून दिला जातो. पण त्यासोबत युजरला Ads पाहाव्या लागतात. या Ads व्हिडिओ स्वरूपात पाहाव्या लागतात.
भारतातील लोकप्रिय OTT Platforms
1) Netflix
2) Disney+ Hotstar
3) SonyLIV
4) Voot
5) Amazon Prime Video
6) Zee5
7) ALTBalaji
8) JioCinema
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा