हा ब्लॉग शोधा

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना*



डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

 महाराष्ट्राच्या कृषी विभागाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली असून, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देऊन आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हा प्रयत्न केला जाईल.त्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.

खुशखबर | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी तत्काळ घरगुती वीज जोडणी योजना अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://digitalsalve.blogspot.com/2021/06/blog-post_18.html  

राज्यातील फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि ते स्वावलंबी होतील. बासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 27 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली असून, ही योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.


अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात असलेली अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता एकच राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सध्याची प्रचलीत विशेष घटक योजना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ या नावाने राबविण्यास शासनाने 27 एप्रिल 2016 च्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात )  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेद्वारे या गोष्टींवर अनुदान मिळणार -

या योजनेअंतर्गत विहीर बांधण्यासाठी, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सिंचन संच (तुषार सिंचन व ठिबक सिंचन) पी व्ही सी पाईप, परसबाग इत्यादी गोष्टीवर अनुदान मिळणार आहे.

खर्चाच्या 90 टक्के किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जे कमी असेल, ते अनुदान मिळेल.

या योजनेमध्ये घटकनिहाय अनुदान मर्यादा 

1) नवीन विहीरीसाठी उच्चतम अनुदान मर्यादा- 4 लाख  रुपये. 

2) जुनी विहीर दुरुस्तीसाठी- 1 लाख रुपये, 

3) इनवेल बोअरींगसाठी- 40 हजार रुपये, 

4) पंप संच- 40 हजार रुपये, 

5) वीज जोडणी आकार- 20 हजार रुपये, 

6) शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण- 2 लाख रुपये

7) ठिबक सिंचन 97 तुषर हजार  किंवा 

8) तुषार सिंचन करिता 47 हजार रुपये.

9) पी वी सी पाईप साठी 50 हजार रुपये


लाभार्थी पात्रतेच्या अटी

लाभार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे. 

लाभार्थी जमिनीचा सातबारा 8अ उतारा सादर करणे बंधनकारक आहे.

शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. 

शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:च्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. 

तसेच विहिरीच्या खोलीची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे

लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व ते बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. 

दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य.

दारिद्र्यरेषेखालील नसलेले अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे मिळणारे वार्षिक उत्पन्नची अट नाही

अर्जदार अपंग किंवा महिला प्रव्रग्स विशेष प्राधान्य देण्यात येते .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेकरीता आवश्यक कागदपत्रे -

आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खाते पासबुक
जात प्रमाणपत्र SC/ ST
उत्पन्नाचा दाखला
जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा

1) नवीन विहिरिकरिता आवश्यक कागदपत्रे -


शेतीचे सातबारा 8अ उतारा

नुसूचित जातीचे प्रमाणपत्र

लाभार्थीच्या प्रतिज्ञा पत्र 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

तलाठी यांच्याकडील दाखला

भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धचा दाखला

गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र.

ज्या जागेवर विहीर आहे त्या जागेचा विशिष्ठ खूनेसह लाभार्थ्यासहित फोटो

ग्राम सभेचा ठराव


2) जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोरिंग आवश्यक कागदपत्रे -

सूक्ष्म प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र

जमीन धारणेचा अद्यावत सातबारा दाखला व 8

 अ उतारा.ग्राम सभेचा ठराव.

तलाठी यांच्याकडील दाखला.

लाभार्थ्यांचे बंधनपत्र 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

कृषी अधिकारी यांचे क्षेत्र पाहणी व शिफारस पत्र

गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र

ज्या विहिरीवर जुनी विहीर दुरुस्ती किंवा इनवेल बोरिंग चे काम करायचे आहे, त्याविहिरीचा काम सुरू होण्या आधीचा एका खुणेसहित अर्जदाराचा फोटो

भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.

अपंग असल्यास प्रमाणपत्र.

3) शेततळ्यात अस्तरीकरण / वीज जोडणी अकर / पंप संच / सूक्ष्म सिंचन संच आवश्यक कागटपत्रे -

सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र

जमीन धरणेचा अद्यावत सातबारा दाखला 8 अ उतारा

ग्राम सभेची शिफारस/ मंजुरी

तलाठी यांच्याकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचां दाखला ( 0.20 ते 6 हेक्टर मर्यादित)

काम सुरू कारण्या पूर्वीचा फोटो ( महत्वाच्या खुनेसह )
शेततळे अस्तरीकरण पूर्णत्वाबाबतचे हमी पत्र ( 100/ 500 स्टॅम्प पेपरवर)


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी. प्रस्ताव गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करुन अर्जाची मूळ प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह कृषी अधिकारी (वि.घ.यो.) यांच्याकडे स्व:हस्ते जमा करावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी (वि.घ.यो.) पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

------------------------------------------------------------


साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc. *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...