हा ब्लॉग शोधा

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

पंचायत समिती सदस्य व्हायचंय ना? मग जाणून घ्या की निवड प्रक्रिया, अधिकार, कर्तव्य आणि जबाबदारी

 ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

वाचाल तर... वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

 
                         

पंचायत समिती सदस्य व्हायचंय ना? मग जाणून घ्या की निवड प्रक्रिया, अधिकार, कर्तव्य आणि जबाबदार

पंचायत समिती हा गटस्तरावर (तालुकास्तरावर) कार्यरत असणारा पंचायत राजचा घटक आहे.

• ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणून पंचायत समितीस विशेष महत्त्व आहे.
 गटविकास अधिकारी (BDO) हा पंचायत समितीचा सचिव असतो.

• महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961, च्या कलम (56) नुसार प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समितीची तरतूद केलेली आहे. पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख 'सभापती' असतात .

*पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायती होणार मालामाल!* अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

पंचायत समितीची रचना : '

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या 56 व्या कलमात पंचायत समितीच्या स्थापनेसंबंधी तरतूद आहे. या कलमात असे म्हटले आहे की, 'प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असेल; आणि या अधिनियमान्वये किंवा अन्यथा तिच्यामध्ये विहित केलेली सर्व कार्ये ही पंचायत समितीची कार्ये असतील.



समितीचा पंचायत कार्यकाल : 

पंचायत समितीचा कार्यकाल सर्वसाधारण स्थितीत 5 वर्षे असतो.दार 5 वर्षाने पंचायत समितीच्या निवडणूक होतात. परंतु राज्यशासनास पंचायत समितीचा कार्यकाल कमी जास्त करण्याचा अधिकार असतो.

पंचायत समिती सदस्य पात्रता :

1) तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा.
2) त्या व्यक्तीच्या वयाची 21 वर्ष पूर्ण असावीत.
3) त्या व्यक्तीच्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.
4) दिनांक 12 सप्टेंबर 2001 नंतर त्याला तिसरे अपत्य नसावे.
5) स्वात:च्या घरी स्वच्छतागृह असणे आवश्यक.

*बेरोजगारांना सुवर्णसंधी.. ऑनलाईन पद्धतीने नामांकित कंपन्या देणार नोकरी..* 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने * स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑनलाईन पद्धतीने *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.* या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे  ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत.नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास नोंदणी करावी. तसेच, शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.सेवायोजन ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संपर्क करा.

*साळवे इंटरप्राईजेस /  सृष्टी महा ई सुविधा.. संतोष विठ्ठल साळवे.. 7900094419


पंचायत समितीचे विभाग :

1) सर्वसाधारण प्रशासन विभाग
2) वित्त विभाग
3) सार्वजनिक बांधकाम विभाग
4) शेती विभाग
5) आरोग्य विभाग
6) शिक्षण विभाग
7) समाज कल्याण विभाग

वरील प्रत्येक विभागासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते. हे अधिकारी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात.



निवडणूक पद्धती : 

पंचायत समितीची निवडणूक पद्धती हि प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धती असते.

अधिनियमाच्या कलम (५७) नुसार पंचायत समितीवर खालीलप्रमाणे सदस्यांची नियुक्ती केली जाते

संबंधित गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्षरीत्या निवडून गेलेले प्रतिनिधी.

गटातून पंचायत समितीवर प्रत्यक्ष निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या ही त्याच गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्य संख्येच्या दुप्पट असते कारण, दर 20.000 लोकसंख्येमागे एक सदस्य पंचायत समितीवर निवडून जातो तर दर 40.000 लोकसंख्येमागे एक सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून जाते. म्हणजेच जिल्हा परिषदेच्या एका वॉर्डमध्ये पंचायत समितीचे दोन वॉर्डस् समाविष्ट असतात.

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

आरक्षण :

1) महिलांकरिता (अनु. जाती-जमाती व मागास प्रवर्गासह) 50% जागा राखीव असतात.
2) नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी : 27% जागा राखीव असतात.
3) अनुसूचित जाती-जमातींसाठी गटातील एकूण लोकसंख्येशी असलेल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात.

सभापती व उपसभापती : 

पंचायत समितीचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभापती म्हणून व दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड करतात. पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेने पंचायत समितीच्या पहिल्याच सभेत केवळ सभापतीची निवड केली जाते.
यानंतरच्या दुसऱ्या सभेत उपसभापतींची निवड केली जाते.सभापती-उपसभापतींच्या निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यास त्यांची निवड सभेच्या
चिठ्या टाकून केली जाते.



सभापती व उपसभापती कार्यकाल : 

पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल अडीच वर्षे इतका असतो.

सभापतींची कार्ये :

1) पंचायत समितीच्या सभा बोलाविणे व त्यांचे अध्यक्षपद भूषविणे.
2) सभापतीस पंचायत समितीच्या विविध अधिकाऱ्यांकडून कामाचा अहवाल, हिशेब व इतर आवश्यक कागदपत्रे मागविण्याचा अधिकार आहे.
3) पंचायत समिती वा जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची पाहणी करणे.
4) पंचायत समितीची मालमत्ता तपासण्याचा अधिकार असतो.

पंचायत समिती सदस्य मानधन : 

सभापती याना दरमहा रु. 10.000/- अधिक भत्ते,इतके मानधन भेटते .तर उपसभापती याना दरमहा रु. 8.000/- अधिक भत्ते इतके मानधन भेटते.



पंचायत समितीची कामे : 

पंचायत समिती आपल्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन खालीलप्रमाणे विकासकामे करते.

1) ग्रामपंचायतींवर देखरेख करणे.

2) प्राथमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करणे.

3) कृषी / शेती विषयक सुधारणा योजनेची अंमलबजावणी करणे.

कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय

प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.



4) पाझर तलावाच्या कामांना गती देणे.

5) जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे.

6) पशुवर्धन /पशुधनाचा विकास करणे.

7) गावा - गावाला जोडणारे रस्त्याची दुरुस्ती करणे.

8) लघुउद्योग / कुटिर उद्योग यांना प्रोत्सहान तसेच चालना देणे.

9) वनांचे संरक्षण करणे.

10) समाजकल्याणाच्या विविध योजना राबविणे.

11) दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे.

12) सार्वजनिक आरोग्याच्या सोयी उपलब्ध करणे.

*भ्रष्टाचारी किंवा अकार्यक्षम सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तुम्हालाही घाबरतील फक्त हे काम करा* आधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://digitalsalve.blogspot.com/2021/05/blog-post_86.html। 

जिल्हा परिषदेकडे सोपविलेली कामे पंचायत समितीमार्फत करण्यात येतात. त्याशिवाय पुढील कामे पंचायत समिती स्वतंत्रपणे करू शकते.

पंचायत समितीने आपल्या निधीच्या उपलब्धतेनुसार या विषयांच्या बाबतीत योग्य तरतूद करण्याची प्राथमिक जबाबदारी ही पंचायत समितीची राहील. या सूचीवरुन पंचायत समितीला या विषयांवर खर्च करण्याची मुभा कायद्याने दिलेली असते. मात्र पंचायत समितीच्या उत्पन्नाची मर्यादा लक्षात घेता इतक्या व्यापक विषयांच्या बाबतीत स्वतंत्र निर्णय घेऊन पुरेशी तरतूद करणे अशक्य आहे.



पंचायत समितीने आपल्या मर्यादित उत्पन्नाचा विचार करुन आपल्या क्षेत्रातील कामांची विकास योजना जिल्हा परिषदेला पाठविली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या विकास योजना अंमलात आणणे, त्यांच्याकडे लक्ष देणे आणि त्यांची प्रशासकीय व्यवस्था करण्याचे काम पंचायत समितीचे राहील. जिल्हा परिषदेने पंचायत समिती क्षेत्रातील कोणतेही काम हस्तांतरित केल्यास ते काम पंचायत समितीस करता येईल. आपल्या क्षेत्रात,जिल्हा परिषदेने कोणते काम घ्यावे याची शिफारस पंचायत समिती करु शकेल, व त्यात किती प्रमाणात स्थानिक साधने उपलब्ध होऊ शकतील हेही नमूद करु शकेल. प्रत्यक्ष व्यवहारात पंचायत समिती जिल्हा परिषदेची प्रतिनिधी म्हणून काम करते.

पंचायत समितीला गट अनुदानातून स्वतंत्र काम व विकास योजना घेता येतात. या रकमेतूने शक्यतो परिषदेतील योजनेत आपल्या गटातील कामे व विकास कार्यक्रमाचा समावेश करण्याचा व त्याप्रमाणे आराखडा तयार करण्याचे काम पंचायत समितीचे राहील. पंचायत समिती जिल्हा परिषदेची कामे व विकास कार्यक्रम अंमलात आणणे, देखभाल करणे, देखरेख ठेवणे व प्रशासकीय व्यवस्था करण्याचे काम करील. गटविकास अधिका-याच्या कामावर सर्वसाधारण देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे कामही पंचायत समिती करेल.

राजीनामा : 

पंचायत समिती सदस्य व उपसभापती यांचा राजीनामा द्यायचा असल्यास ते आपला राजीनामा सभापतींकडे यांच्याकडे देतात.व सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात.

रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!*

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत.

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते.

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा. साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* 

अविश्वास ठराव : 

निवडणूक झाल्यानंतर पहिले 6 महिने अविश्वास ठराव मांडता नाही येत.अधिनियमातील कलम 72 नुसार पंचायत समितीच्या सभेस उपस्थित राहणाऱ्या व मतदानाचा अधिकार असणाऱ्या सदस्यांपैकी एक तृतीयांश सदस्यांनी मागणी केल्यास सभापती-उपसभापती यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो.

अविश्वास ठराव संमत होण्यासाठी जिल्हाधिकारी वा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने बोलाविलेल्या खास सभेत 2/3 सदस्यांचेवरील प्रत्येक विभागासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते हे अधिकारी गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 
----------------------------------------------------------------

साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...