( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
आपल्याला कोणताही आजार नाही आणि होणार नाही असा विचार करून बरेच लोक आरोग्य विमा खरेदी करणे टाळतात. मात्र ज्यावेळेस या लोकांच्या हातात हॉस्पिटलचे भले मोठं बिल येत, यावेळीस त्यांना आरोग्य विमा खरेदी करण्याचे फायदे कळतात.
का खरेदी करावा विमा?
आरोग्य विमा ही काळाची गरज बनली आहे.आरोग्य विमा हा एक विम्याचा प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वैद्यकीय आणि शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी दावा करू शकता. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आजारपणात हॉस्पिटलायझेशन आणि औषधांचा खर्च तुमच्या खिशातून जाणार नाही. हा संपूर्ण खर्च तुमच्या पॉलिसीनुसार विमा कंपनी उचलते.
कसा काम करतो विमा?
आरोग्य विमा प्रदान करणाऱ्या विमा कंपन्यांचे प्रमुख रुग्णालयांशी करार असतात. ज्यामुळे विमाधारकांना कॅशलेस उपचार प्रदान करता येतात.तथापि, जर त्या विमा कंपनीचा रुग्णालयाशी करार नसेल, तर ती पॉलिसीधारकाला त्याच्या उपचारांवर खर्च केलेल्या बिलांच्या आधारे परतफेड मिळते.
आरोग्य विमा का गरजेचा?
आरोग्य विमा घेणे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खुप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही विमाधारक असाल, तर तुम्हाला कॅशलेस उपचार मिळू शकतात, तर विमा पॉलिसीमध्ये ६० दिवसांच्या कालावधीसाठी हॉस्पिटलायझेशन पूर्व आणि नंतरचे शुल्क देखील समाविष्ट असते. तसेच रूग्णाच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिकेची रक्कम देखील यामध्ये समाविष्ट आहे. विमा पॉलिसीमध्ये आरोग्य तपासणीचे पर्यायही दिले जातात.
आरोग्य विमा कसा निवडावा?
विमा पॉलिसी घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करायला हवा. तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कव्हर करणारी पॉलिसी देखील निवडू शकता. विमा कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो नक्की तपासा. पॉलिसीमध्ये दिलेल्या नेटवर्क हॉस्पिटल्सची यादी नीट तपासा. तुमच्या पॉलिसीमध्ये कॅशलेस पेमेंट आणि रिइम्बर्समेंट या दोन्ही गोष्टींचा समावेश असल्याची खात्री करा.
ही कागदपत्रे आवश्यक
आरोग्य विमा घेताना वयाचा पुरावा, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही वैयक्तिक किंवा कौटुंबिक विमा घेऊ शकता. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांसाठी पॉलिसी घेऊ शकतात
विमा पॉलिसी काढताना माहीत असाव्यात कायद्याच्या बाजू !
आज रोजच्या पैसे कमावण्यासाठीच्या धावपळीच्या जीवनात सामान्य मनुष्य स्वतःचे व आपल्या कुटुंबांचे संरक्षण कसे होईल यासाठी उपाययोजना आखत असतो. आजच्या अनिश्चितेच्या काळात स्वतःचे व आपल्या कुटुंबांचे आकस्मित येणाऱ्या संकटाशी तोंड देण्यासाठी विमा पॉलिसी काढणे यांस प्राधान्य दिले जाते.
विमा पॉलिसीचे आरोग्य विमा, मोटर वाहन विमा, जीवन विमा अपघात विमा या सारखे प्रकार आहेत. ज्या व्यक्तीस आपल्या कुटुंबांच्या संरक्षणासाठी जी विमा पॉलिसी भविष्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरेल व केलेल्या गुंतवणूकीवर खात्रीशीर परतावा मिळेल अशी विमा पॉलिसी काढणे कधीही फायद्याचे ठरते.
विमा पॉलिसी काढणाऱ्या व्यक्तीने कोणत्या उद्देशाने विमा काढत आहोत हे समजून घेणे गरजेचे आहे. कुटुंबासाठी काढत असताना आरोग्य विमा, अपघात विमा फायद्याचे ठरतात.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
तुम्ही कोणतीही विमा पॉलिसी काढता तेव्हा विमा कंपनी व तुमच्यात जो करार होतो त्या करारामधील अटी व शर्ती तपासून घ्याव्यात व आपण ज्या उद्देशाने विमा पॉलिसी काढत असू तो उद्देश पूर्ण होतो का हे पाहावे. विमा कंपनी सोबत करत असलेल्या विमा पॉलिसी करारात तीन वर्षाचा हरकत घेण्याचा काळावधी दिलेला असतो. पॉलिसीधारकाने विमा कंपनी सोबत केलेल्या विमा पॉलिसी करारात जर त्याला काही त्रुटी आढळून येत असतील तर सदर विमा पॉलिसीधारकाने तीन वर्षाच्या काळावधीच्या आत आपली हरकत नोंदवावी त्यानंतर पॉलिसी मध्ये काही बदल करता येत नाही.
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताय? 'या' गोष्टी तपासून घ्या.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
विमा कंपनी कोणत्याही विमा पॉलिसीधारकास त्याच्या काराराप्रमाणे ठरलेल्या मासिक अथवा वार्षिक देय हप्ते यांमध्ये तफावत अथवा थकबाकी केलेली असल्यास पॉलिसी पूर्तता काळावधीच्या वेळी पैसे देण्यास नकार देऊ शकते. मृत्यू विमा पॉलिसी काढलेली असताना आत्महत्या अथवा पॉलिसी करार मध्ये मृत्यूचे कारण नमूद नसलेल्या आकस्मिक कारणाने सदर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याचे पैसे देण्यास विमा कंपनी नकार देऊ शकते.
तुम्ही जर मृत्यू विमा पॉलिसी अथवा वाहन विमा काढला असेल तर पॉलिसीधारक याच्या मृत्यूच्या नंतर 30 दिवसाच्या आत विमा कंपनीकडे विम्याचेपैसे मिळवण्यासाठी दावा करणे करणे अनिवार्य आहे. तसेच वाहन चोरीला गेल्यास देखील 30 दिवसाच्या आत दावा करावा.जर पॉलिसीधारकाने विमा कंपनीकडे आपल्या वाहनाची माहिती देण्यास उशीर केला असेल तर सदर विमा कंपनी पॉलिसीधारकास आपल्या पॉलिसीच्या ठरलेल्या रक्कमेचा दावा करण्यास अथवा पैसे देण्यास नकार देऊ शकत नाही.
जर कोणत्याही विमा कंपनीने पॉलिसीधारकास त्याच्या ठरलेल्या विमा पूर्ती काळावधीच्या वेळी करारातील अटी व शर्ती प्रमाणे ठरलेले पैसे देण्यास नकार दिला तर पॉलिसीधारक ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 (1) अन्वये जवळच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगा कडे तक्रार अर्ज करू शकतो. सदर तक्रार अर्ज सहा महिन्याच्या आत निकाली लावण्याचे तरतूद कायद्यात आहे.
साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे.. 7900094419*
https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा