( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419
वाचाल तर... वाचाल !!!
राज्यातील विद्यार्थ्यासाठी अपघात विमा योजना (राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना ऐवजी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ) राबविण्याबाबत
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक पीआरई- २०११/प्र.क्र. २४९/प्राशि-१, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२. दिनांक ११ जुलै, २०११
राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना तुम्हाला माहिती आहे का?
राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आता प्रत्येकी दीड लाख रुपये मिळणार आहेत.या विमा योजनेसाठी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी पात्र आहेत.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास, संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांपैकी आई, आई हयात नसल्यास वडील किंवा विद्यार्थ्यांचे आई-वडील हयात नसल्यास १८ वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण आदींपैकी एकाला हे अनुदान दिले जाते.
या योजनेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणे, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू किंवा मोटार शर्यतीतील अपघाताने मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास विमा अनुदानाची रक्कम दिली जात नाही.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
योजनेअंतर्गत मिळणारी विमा रक्कम (रुपयांत)
1) विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास --- १ लाख ५० हजार.
2) अपघातामुळे विद्यार्थ्याला कायमचे अपंगत्व आल्यास --- १ लाख
3) कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा) --- ७५ हजार.
4) अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास --- प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा कमाल १ लाख.
5) सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास --- १ लाख ५० हजार.
6) कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास --- प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा कमाल १ लाख.
अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा सुधारित अध्यादेश हा २१ जून २०२२ ला प्रसिद्ध केला आहे.
राज्यातील विद्यार्थ्यासाठी अपघात विमा योजना (राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना ऐवजी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ) राबविण्याबाबत
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक पीआरई- २०११/प्र.क्र. २४९/प्राशि-१, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२. दिनांक ११ जुलै, २०११
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
साळवे एंटरप्राइज; सुष्टी महा ई सुविधा;.. संतोष साळवे.. 7900094419*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा