हा ब्लॉग शोधा

सोमवार, ११ जुलै, २०२२

पावसाळ्यात वीजपुरवठा बाबत घ्यायची काळजी

  ( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 


पावसाळ्यात वीजपुरवठा बाबत घ्यायची काळजी

वादळी व संततधार अथवा अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन झाडे व फांद्या कोसळल्याने वीजतारा तुटतात. ओलावामुळे विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट होऊ शकते. या कारणांमुळे पावसाळ्यात विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती योजयंत्रणा, उपकरणांपासून सावध व सतर्क राहावे.


तुमचे पीएफ आणि ESIC संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे घरबसल्या करून घ्या संपर्क करा... साळवे इंटरप्राईजेस... सृष्टी महा ई सुविधा..संतोष विठ्ठल साळवे 7900094419 ( संपूर्ण महाराष्ट्रात ) 

1) पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध

उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी

2) घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी

3) फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. त्यामुळे काही बिघाड झाल्यास वीजपुरवठा तत्काळ खंडित होतो

4) घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावा

5) ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये

6) विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी


7) विजेवर चालणारी सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावीत

8) विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणान्या नागरिकांनी पावसाळ्यात •अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात

9) ग्रामीण भागात विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत, दुचाकी टेकवून ठेवू नये  वीजतारांजवळ कपडे वाळत घालू नयेत

10) सार्वजनिक ठिकाणी असलेले वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे


येथे तक्रार करता येईल

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. 

यासह www.mahadiscom.in वेबसाइटद्वारेही तक्रारी स्वीकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space> <Consumer Number> हा 'एसएमएस' महावितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल,

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

----------------------------------------------------------------

*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ.. 7900094419*

https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...