पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर मारहाण करू शकतात का? काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या.
देशात पोलिसांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील कायद्यांचे संरक्षण करण्यात पोलिसांची निर्णायक भूमिका असते. अशातच पोलीस हे देशातील कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक आहेत.
मित्रानो तुम्हालाही तुमचा पीएफ काढायचा असेल किंवा तुमचा पीएफ निघत नसेल किंवा तुम्हाला पीएफ पोर्टल मध्ये काही अपडेट करायचे असतील तर आजच आमच्या शी संपर्क साधा.
🙏🏻सृष्टी महा-ई-सुविधा आॕनलाईन सुविधा... तुमच्या वेळेत तुमच्या घरी (महाराष्ट्रात कोठेही व कधीही गेली 5 वर्ष निरंतर तुमच्या सेवेत )🙏🏻 संतोष विठ्ठल साळवे संपर्क .7900094419
पोलीस नसेल तर कोणत्याही देशाच्या आणि राज्याच्या प्रशासन व्यवस्थेची कल्पना करणे कठीण आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था नीट पाळली जात आहे का? त्यावर लक्ष ठेवणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र, अशी अनेक प्रकरणे देशात उघडकीस आली आहेत, जिथे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याला मारहाण केली. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत...
सर्वातआधी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की ताब्यात घेणं आणि अटक यात काय फरक आहे? ताब्यात असलेल्या व्यक्तीला चौकशीसाठी काही तासांसाठी कारागृहात नेले जाते.
तर अटकेत असलेली एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास किंवा गुन्हा केल्याचा संशय असल्यास त्याला तुरुंगात पाठवले जाते. मात्र अटक करण्यापूर्वी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले जाते. या काळात त्याला चौकशीसाठी किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगात पाठवले जाते.
आता प्रश्न असा आहे की, अटक केल्यानंतर किंवा ताब्यात घेल्यानंतर पोलीस त्या व्यक्तीला मारहाण करू शकतात का? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशही जारी केला आहे. जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर किंवा ताब्यात घेतल्यावर त्याला मारहाण केली, तर याला कस्टोडियन हिंसा, असे म्हटले जाईल. देशात ते बेकायदेशीर मानले जाते. न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलिसांना मारहाण करता येत नाही.
जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला मारहाण केली, तर अशा परिस्थितीत दंडाधिकारी पोलिसांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 अंतर्गत वॉरंट जारी करतात. दंडाधिकारी येथे अटक किंवा कारवाईचे आदेशही देऊ शकतात.
------------------------------------------------------------
*संतोष विठ्ठल साळवे.. एक जनजागृती चळवळ .. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा