स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय कोणत्याही हमीशिवाय कर्ज; काय आहे पीएम स्वनिधी योजना?
गरीब लोकांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करावा यासाठी पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार कोणत्याही हमीशिवायज कर्ज देते.
पीएम स्वनिधी योजना ही रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात हानी झाली होती.त्यानंतर विक्रेत्यांचे खीप हाल झाले. त्यामुळे पीएम स्वनिधी योजना सुरु केली.
पीएम स्वनिधी योजनेत सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना काम करण्यासाठी कर्ज देते. यामध्ये फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि फास्ट फूड स्टॉल चालवणाऱ्या लोकांना कर्ज दिले जाते.
केंद्र सरकार पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे कर्ज देते. हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला विश्वासार्हता निर्माण केली जाते.
या योजनेत तुम्हाला सर्वप्रथम 10,000 रुपयांचे कर्ज मिळेल. या कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला नंतर 20,000 रुपयांचे कर्ज दिले जाते. त्यानंतर तिसऱ्यांदा 50 हजार रुपये दिले जातात.या योजनेत सरकार कर्जावर सबसिडीदेखील देते.
पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही हमीची गरज नाही. या योजनेत घेतलेली रक्कम तुम्ही 1 वर्षाच्या कालावधीत परत करु शकतात. दर महिन्याला हप्त्यांमध्ये ही रक्कम परत केली जाऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज करु शकतात.
आम्ही ऑनलाईन अर्ज करून देऊ
Santosh Salve - 7900094419
------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा