हा ब्लॉग शोधा

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना

 


अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना 


राज्यातील अनुसुचीत जाती व नवबौध्द घटकातील लोकांचे राहणीमान उांचावणे व त्याांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्याांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकासाठी घरकुल योजना सन 2008 पासून रमाई आवास घरकुल योजना राबवण्यात येते.


या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपये तर शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंत आहे. सदर योजनेंतर्गत ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी प्रती घरकुल (शौचालय बांधकामासह) 1 लाख 32 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. शहरी भागात प्रति घरकुल 2 लाख 50 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.

अटी व शर्ती

1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये 15 वर्षाचे वास्तव असणे आवश्यक आहे.

2. एक कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.

3. लाभार्थ्यांने इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.



अनुसूचित जातींमधील जे अपंग लाभार्थी दारिद्रय
रेषेखाली नाहीत, ज्याचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा अधिक
आहे व वार्षीक उत्पन्न 1 लाखा पर्यंत व त्या पेक्षा कमी
आहे अशा अपंग लाभार्थ्यांना, ते योजनेच्या उर्वरीत अटी
व शर्तीची पूर्तता करित असल्यास त्यांना रमाई आवास
घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत 
लाभार्थ्यांसाठी असलेली दारिंद्र 
रेषेच्या खालील लाभार्थी असण्याची 
अट अपंग लाभार्थ्यांसाठी शिथिल
करण्याबाबत तारीख: 31 डिसेंबर,2015
GR link 👇


शासन निर्णय :-

  • शासन निर्णय क्रमांक- बीसीएच-2008/प्र.क्र.36/मावक-२ दिनांक 15 नोव्हेंबर 2008

  • शासन निर्णय क्रमांक बीसीएच-2009/प्र.क्र.159/मावक-२ दिनांक 9 मार्च 2010

  • शासन पूरक पत्र क्रमांक- बीसीएच-2009/प्र.क्र.159/मावक-२ दिनांक 29 सप्टेंबर 2011

  • शासन ज्ञापन सान्याविसवि/क्र.रआयो-2014 प्र.10 /बांधकामे दि. 18 जुलै 2014

  • ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक ईआयो 2015 प्र.क्र.200 योजना 10 दिनांक 30.12.2015

  • शासन निर्णय क्रमांक रआयो -2015 /प्र.क्र.420/बांधकामे, दि. 31.12.2015

  • शासन निर्णय क्रमांक रआयो -2015 /प्र.क्र.85/बांधकामे, दि. 15.03.2016

  • शासन निर्णय क्रमांक रआयो -2016 /प्र.क्र.578/बांधकामे, दि. 04.01.2017

  • शासन ननणगय क्रमाांकः रआयो -2018/प्र.क्र.137/बाांधकामे दि. 13. 02. 2019


या योजनेच्या लाभासाठी नागरी क्षेत्रातील लाभार्थ्यांनी संबंधित महानगरपालिका कार्यालय, नगर परिषद किंवा नगर पंचायत कार्यालयात तर ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत,

------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि  फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

--------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...