हा ब्लॉग शोधा

रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार, प्रशिक्षणार्थ्यास मिळणार प्रति दिन 1000 रूपये

 


एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार

या प्रशिक्षणाचा उद्देश हा उत्पादन वाढविण्याच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीनंतरचे व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे आहे

या कार्यक्रमांतर्गत शेतकरी, क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिकांचे आयोजन तसेच, यशस्वी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या जाणार आहेत. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, एनआयपीएचटी, तळेगाव दाभाडे या संस्थेमार्फत ठाणे, पुणे व कोल्हापूर व अमरावती विभाग येथे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

प्रशिक्षण केंद्र

बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), 

नाशिकच्या आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, 

नागपूर येथील वरोरा, 

दापोली येथील हापूस आंबा गुणवत्ता केंद्र, 

पुणे येथील राहूरी डाळिंब गुणवत्ता केंद्र, 

छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्र, 

नागपूर येथील संत्रा गुणवत्ता केंद्र येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत (MIDH Scheme) शिक्षणासाठी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर

एकात्मिक फलोत्पादन विकास (MIDH Scheme) अभियानांतर्गत 2024-25 या वर्षासाठी मनुष्यबळ विकास घटकांतर्गत संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याकरिता 56 लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार

फळे व भाजीपाला रोपवाटीका, 

कृषी व्यापाराबाबत धोरण व निर्यातीबाबत माहिती, 

जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन (आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी), ड्रॅगन फ्रुट व जिरेंनियम व नाविण्यपूर्ण पिकांचे उत्पादनाचे तंत्रज्ञान, 

औषधी, सुगंधी व मसाला पिकांचे उत्पादन, 

प्रक्रिया व विपणन, 

हरितगृह, 

पॉली हाऊस व्यवस्थापन, 

हॉर्टीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स, 

काढणीपश्चात व्यवस्थापन (फळे व भाजीपाला), 

पीकनिहाय लागवड व प्रक्रिया (डाळींब, हळद व आले), या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सहभागी होण्यासाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा

शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमात साहित्य, चहा पान, भोजन व निवास व्यवस्था आदी सुविधा करण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या संस्थांना किंवा अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा (कंसात संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक)

पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, एनआयपीएचटी संस्था ( विश्वास जाणव, 0211- 4223980/942308589), 

कृषी विज्ञान केंद्र, बारामती जि.पुणे (श्री. यशवंतराव जगदाळे, 0211 - 2255227/9623384287), 

राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), चितगाव फाटा, दारणा. ता. निफाड, जि. नाशिक, (डॉ. पी. के. गुप्ता - 9422497764), 

आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, जि. चंद्रपूर (डॉ. अनिल भोगावे - 9579313179), 

हापूस आंबा गुणवत्ता केंद्र, दापोली (डॉ. महेश कुलकर्णी - 8275392315), 

डाळिंब गुणवत्ता केंद्र, राहुरी (डॉ. सुभाष गायकवाड 9822316109), 

केशर आंबा गुणवत्ता केंद्र, छत्रपती संभाजीनगर (डॉ. जी. एम. वाघमारे - 7588537696), 

संत्रा गुणवत्ता केंद्र, नागपूर (डॉ. विनोद राऊत - 9970070946) यांना संपर्क साधण्याचे आवाहन फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी केले आहे.

------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि  फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

--------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...