हा ब्लॉग शोधा

बुधवार, २ एप्रिल, २०२५

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोणते कोर्सेस उपलब्ध असतात याबाबत आपण आज माहिती करून घेणार असून नोकरीच्या संधी कुठं कुठं आहेत जे तुमच्या कौशल्यांच्या आधारे चांगले नोकरीच्या संधी देऊ शकतात याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

1तंत्रशिक्षण (ITI - Industrial Training Institute)

विविध ट्रेड्समध्ये प्रशिक्षण घेतले जाऊ शकते जसे की वेल्डिंग, इलेक्ट्रीशियन, फिटर, मोटर यांत्रिकी, आणि इतर तांत्रिक कामकाजचे कोर्स करून तुम्ही ITI मध्ये शिक्षण घेतल्यावर तुम्हाला औद्योगिक क्षेत्रात चांगली नोकरीं करण्याची संधी उपलब्ध होऊ शकत.

2. डिप्लोमा इन इंजिनीअरिंग

इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, आयटी, इ. शाखांमध्ये डिप्लोमा कोर्स. हे कोर्स १० वी नंतर नोकरी मिळवण्यासाठी चांगले आहेत, विशेषतः औद्योगिक क्षेत्रात तुम्हाला मोठी संधी मिळू शकते.

3. कंप्युटर कोर्सेस (CCNA, Tally, MS Office, Programming)

21 शतकातीलआधुनिककाळात कॅम्प्युटरचा वापर वाढत चालला आहे.मोठ्याकंपन्याअसो की लहानमोठे व्यावसायिक आपला व्यापार स्मार्ट करण्यासाठी कॉम्प्युटर चा वापर होतांना दिसतो. त्यामुळे CCNA, Tally, वर्डप्रोसेसिंग, ग्राफिक्स डिझाईनिंग आणि प्रोग्रामिंग भाषांमध्ये कोर्स करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.हे कोर्स केल्यावर तुम्हाला जॉब साठी पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि चांगला पगार देखील मिळेल.

4. फॅशन डिझायनिंग किंवा ब्युटी कोर्सेस

फॅशन डिझायनिंग, ब्युटी थेरपी, हेअर स्टायलींग यांसारखे कोर्सेस, ज्यामुळे तुम्हाला सेल्फ-एंप्लॉयमेंट किंवा नोकरी मिळवता येईल.

5. होटेल मॅनेजमेंट

हा कोर्स तुमच्या हॉटेल, रिसॉर्ट, आणि इतर खाद्य उद्योगांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त असतो. तसेच, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देखील असू शकते.

6. एअर होस्टेस किंवा कॅबिन क्रू

एअर होस्टेस प्रशिक्षण किंवा कॅबिन क्रू प्रशिक्षण देखील 10 वी नंतर केला जाऊ शकतो. हे एक आकर्षक आणि मागणी असलेले क्षेत्र आहे.

7. मेडिकल क्षेत्र (Nursing, Medical Lab Technology, Physiotherapy)

• 10 वी नंतर, नर्सिंग, मेडिकल लैब टेक्नॉलॉजी किंवा फिजिओथेरपीचे कोर्स देखील एक उत्तम पर्याय असू शकतात. यामुळे आरोग्यसेवा क्षेत्रात नोकरी मिळवता येऊ शकते.

8. डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंगच्या कोर्समध्ये ऑनलाइन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, एसईओ (SEO) इत्यादी शिकता येते. हे सध्याच्या काळात एक लोकप्रिय आणि मागणी असलेले क्षेत्र आहे.

9. सिक्योरिटी गार्ड, ड्रायव्हिंग, किंवा इतर सफाई आणि सेवा क्षेत्रे

विविध सर्विस सेक्टर कोर्सेस, जसे की सिक्योरिटी गार्ड ट्रेनिंग, ड्रायव्हिंग, इत्यादी देखील नोकरीच्या संधी देऊ शकतात.

10. हेल्थ आणि फिटनेस (योगा, जिम ट्रेनिंग)

योगा आणि फिटनेस कोर्सेस किंवा प्रमाणित जिम ट्रेनिंग सर्टिफिकेट देखील नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

10 वी पास नंतर नोकरीच्या काही चांगल्या संधींमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:

1. Data Entry Clerk - डेटा एंट्रीसाठी बरेच संधी असतात. काही ठिकाणी फक्त 10 वी पास असणं आवश्यक आहे.

2. Retail Jobs - मोठ्या शॉपिंग मॉल्स आणि दुकांमध्ये विक्रेत्याच्या किंवा कस्टमर सर्विसचे काम असू शकते.

3. Call Center Jobs - कॉल सेंटरमध्ये काम करणे एक चांगला पर्याय असू शकतो, जेथे संवाद कौशल्यावर आधारित काम असते.

4. Field Sales - विक्रीची कामे, जसे की सेल्स एक्झिक्युटिव्ह असणे किंवा मार्केटिंग एजंट असणे, यासाठी 10 वी नंतर संधी आहेत.

5. Delivery Jobs - ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये डिलीव्हरी करणे किंवा लॉजिस्टिक कंपन्यांमध्ये काम करणे.

6. Government Exams - काही सरकारी परीक्षांसाठी 10 वी पास असणं पुरेसं आहे. जसे की, ग्रामसेवक, तलाठी, चपराशी इत्यादी.

7. Teacher Assistant - प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक सहाय्यक म्हणून काम करता येऊ शकते.

8. Hospitality Industry - हॉटेल किंवा रिसॉर्ट मध्ये वेटर, किचन स्टाफ, फ्रंट डेस्क सहाय्यक अशी कामे असू शकतात.

.खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपच्या लिंक वर क्लिक करूनआमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा!!

9. Skilled Trades - 10 वी नंतर विविध कौशल्य प्रशिक्षण घेऊन इलेक्ट्रीशियन, प्लंबर, मेकॅनिक इत्यादी बनता येऊ शकता.

10. Freelancing - जर तुम्हाला लेखन, ग्राफिक्स डिझाईन, किंवा इतर कौशल्य असतील, तर तुम्ही ऑनलाइन फ्रीलान्सिंग देखील करू शकता.

तुम्ही तुम्हाला आवडेल अशी एक नोकरी शोधू शकता ज्यात तुमच्या आवडीनुसार कौशल्यांचा उपयोग केला जातो.

फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. 

------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि  फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

--------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शुक्रवार, १४ मार्च, २०२५

UPSC च्या तयारीची मोफत पुस्तके कशी मिळतील? जाणून घ्या एका क्लिकवर

UPSC च्या तयारीची मोफत पुस्तके कशी मिळतील? जाणून घ्या एका क्लिकवर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांना एनसीईआरटीची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला जातो. एनसीईआरटीची पुस्तके तयारीसाठी आधार प्रदान करतात आणि प्रत्येक विषयाच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यास मदत करतात.

आता जास्त खर्च न करता UPSC च्या तयारीसाठी लागणारी पुस्तके मिळू शकतील. दरवर्षी लाखो तरुण नागरी सेवा परीक्षेची तयारी करतात, पण अनेक विद्यार्थ्यांना महागडी पुस्तके विकत घेणे अवघड जाते. अशा वेळी अभ्यास साहित्य मोफत मिळणे हा मोठा दिलासा ठरू शकतो.

एनसीईआरटीच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करा

UPSC च्या तयारीसाठी, विशेषत: पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी एनसीईआरटीची पुस्तके खूप महत्वाची आहेत. एनसीईआरटी http://ncert.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावरून इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या सर्व विषयांची पुस्तके पीडीएफ म्हणून मोफत डाऊनलोड करू शकता. ही पुस्तके वाचणे म्हणजे UPSC च्या तयारीचा पाया रचण्यासारखे आहे.

ई-पाठशाळा प्लॅटफॉर्मचा लाभ घ्या

http://epathshala.nic.in एक सरकारी प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण एनसीईआरटीची विविध विषयांची पुस्तके ऑनलाइन वाचू आणि डाउनलोड करू शकता. दृकश्राव्य कंटेंट येथे उपलब्ध आहे, ज्यामुळे तुमची समज आणखी सुधारते.

मोफत ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म

टेस्टबुक, बायजू आणि खान अ‍ॅकॅडमी सारख्या वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स UPSC च्या तयारीसाठी विनामूल्य अभ्यास साहित्य, नोट्स आणि मॉक टेस्ट प्रदान करतात. त्यांच्या विनामूल्य आवृत्तीमध्ये बरीच उपयुक्त कंटेंट देखील उपलब्ध आहे. तसेच, अनेक ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्म UPSC च्या तयारीसाठी लाइव्ह क्लासेस, नोट्स आणि टेस्ट सीरिज देखील विनामूल्य देतात.

शासकीय ग्रंथालयाचा लाभ घ्या

आपल्या शहरातील शासकीय ग्रंथालयाचे सभासदत्व मिळवा. UPSC शी संबंधित हजारो पुस्तके दिल्ली पब्लिक लायब्ररी, नॅशनल लायब्ररी आणि स्टेट सेंट्रल लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. सदस्यत्वासाठी तुम्हाला फक्त ID प्रूफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफ द्यावा लागेल. बहुतांश ग्रंथालयांमध्ये वार्षिक सभासदत्व शुल्क नाममात्र असते.

किंडल रीडिंग अ‍ॅप वापरा

आपल्या फोनवर किंडल वाचन अ‍ॅप डाउनलोड करा आणि किंडलवर विनामूल्य पुस्तके शोधा. येथे तुम्हाला अनेक क्लासिक आणि जनरल नॉलेजशी संबंधित पुस्तके मोफत मिळतील, जी UPSC अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरू शकतात.

सोशल मीडिया आणि ऑनलाइन ग्रुपमध्ये सामील व्हा

फेसबुक, टेलिग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर असे अनेक ग्रुप आहेत जिथे UPSC चे उमेदवार अभ्यास साहित्य सामायिक करतात. या ग्रुपमध्ये सामील होऊन तुम्हाला मौल्यवान नोट्स, सराव प्रश्न आणि चालू घडामोडींचे साहित्य मोफत मिळू शकते.

शासकीय मोफत कोचिंग योजनेचा लाभ घ्या

एससी, एसटी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी अनेक राज्य सरकारे आणि संस्था मोफत UPSC कोचिंग देतात. आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय किंवा समाजकल्याण विभागाकडून याबाबत माहिती मिळवा. या कार्यक्रमांतर्गत मोफत अभ्यास साहित्यही दिले जाते. लक्षात ठेवा, योग्य संसाधने आणि स्मार्ट रणनीतीसह, आपण जास्त खर्च न करता UPSC ची चांगली तयारी करू शकता.

फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. 

------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि  फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

--------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

कोणत्या हॉस्पिटलमध्ये बिल होतात माफ; कोणत्या रुग्णांना होतो फायदा?

कोणत्या हॉस्पिटलमध्ये बिल होतात माफ; कोणत्या रुग्णांना होतो फायदा?

पैसे भरले नाही म्हणून उपचार नाही : गोरगरीब रुग्ण एखाद्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला की, तिथं उपचार करण्यासाठी त्याला खूप खर्च सांगितला जातो. मग अशावेळी अशा रुग्णानं किंवा त्याच्या नातेवाईकांनं काय करावं? किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला मोफत उपचार मिळतील? हे कसं ओळखावं हे आपण जाणून घेणार आहोत.

या' हॉस्पिटलमध्ये मिळतात मोफत उपचार 

आपण जेव्हा एखाद्या खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला उपचारासाठी दाखल करू, तेव्हा त्या हॉस्पिटलच्या बाहेर 'धर्मादाय रुग्णालय' असं लिहिलं असतं. तेव्हा आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनांसह मोफत उपचार मिळतात. पुणे तसेच मुंबई शहरात जवळपास 100 ते 150 असे हॉस्पिटल आहेत. तर राज्यात जवळपास 450 हून अधिक 'धर्मादाय रुग्णालय' आहेत. त्यामुळं अशा हॉस्पिटलमध्ये आपल्याला मोफत उपचार घेता येतात.

हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी राखीव जागा 

धर्मादाय रुग्णालय' हे गोरगरीब तसेच ज्यांच्याकडं विमा नाही अशा लोकांसाठी आहे. या हॉस्पिटलमध्ये जवळपास 10 हजारहून अधिक खाटा या राखीव असतात. ज्याद्वारे गोरगरीब रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात. 

महाराष्ट्रातील धर्मादाय हॉस्पिटल म्हणजेच ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी 20 टक्के खाटा या राखीव असतात. त्यापैकी 10 टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी मोफत तर 10 टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात असतात. राज्यात असे एकूण 476 हॉस्पिटल आहेत आणि तब्बल 10, 447 खाटा या त्यांच्यासाठी राखीव आहेत. राखीव ठेवलेल्या या खाटा आणि उपचार हे गरीब-निर्धन रुग्णांचा हक्क आहे. जिथं कुणाकडूनही शिफारस न घेता सन्मानानं उपचार घेऊ शकतात.

रुग्णाचं संपूर्ण बिल होतं माफ

स्वयंसेवी संस्थेनं सामाजिक उद्देशानं उभारलेले मोफत उपचारांची हॉस्पिटल पुणे, मुंबईत सर्वत्र दिसतात. हे सामाजिक हेतूने तयार केलेले हॉस्पिटल जरी असलं तरी उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांना मोफत उपचार देणं बंधनकारक आहे. हॉस्पिटलची इमारत, गेट आणि इमारतीवरील नाम फलकावर 'धर्मादाय रुग्णालय' असा उल्लेख करणं शासनानं बंधनकारक केलं आहे.

तर 50 टक्के बिल माफ 

ज्यांचं बिल एक लाख 80 हजार रुपये आहे, त्यांचं संपूर्ण बिल 100 टक्के माफ होतं. तर ज्यांचं बिल 1 लाख 81 हजार ते 3 लाख 60 हजार रुपये आहे, त्यांचं अर्धे म्हणजेच 50 टक्के बिल माफ होतं.

फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. 

------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि  फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

--------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंटची शिवीगाळ आणि धमकी?, घाबरू नका, 'अशी' करा तक्रार

कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंटची शिवीगाळ आणि धमकी?, घाबरू नका, 'अशी' करा तक्रार

कर्ज घेतल्यानंतर, काही कारणास्तव परतफेड करणे शक्य न झाल्यास, बँका आणि फायनान्स कंपन्या वसुलीसाठी रिकव्हरी एजंटची नेमणूक करतात.

मात्र, अनेकदा हे एजंट कर्जदारांना धमकावणे शिवीगाळ करणे किंवा अपमानास्पद वागणूक देतात. अशा परिस्थितीत घाबरून न जाता, तुम्ही याविरोधात आवाज उठवू शकता आणि तक्रार करू शकता.

बँकेकडे तक्रार: 

सर्वप्रथम, ज्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे, त्यांच्याकडे लेखी तक्रार करा. बँकेच्या ग्राहक सेवा विभागात किंवा नोडल अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवू शकता.

पोलिसांत तक्रार: 

जर रिकव्हरी एजंटने तुम्हाला धमकावले, शिवीगाळ केली किंवा तुमच्यासोबत गैरवर्तन केले, तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता.

कोर्टात तक्रार: 

बँकेने किंवा पोलिसांनी दखल न घेतल्यास, तुम्ही कोर्टात दावा दाखल करू शकता. यासाठी वकिलाची मदत घेऊ शकता.

RBI कडे तक्रार: 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिकव्हरी एजंटसाठी काही नियम बनवले आहेत. जर एजंट या नियमांचे उल्लंघन करत असेल, तर तुम्ही आरबीआयकडे तक्रार करू शकता.

रिकव्हरी एजंटचे नाव, तो ज्या कंपनीसाठी काम करतो त्या कंपनीचे नाव आणि संपर्क क्रमांक याची नोंद ठेवा.

तुम्हाला आलेल्या धमक्या, शिवीगाळ किंवा गैरवर्तनाचे पुरावे (ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग, एसएमएस, व्हॉट्सॲप मेसेज) असल्यास ते जपून ठेवा.

तुमच्या तक्रारीची प्रत (Copy) आणि बँकेकडून मिळालेला प्रतिसाद जपून ठेवा.

सन्मानाने वागणूक मिळवण्याचा अधिकार: रिकव्हरी एजंट तुम्हाला अपमानास्पद वागणूक देऊ शकत नाही.

गोपनीयतेचा अधिकार: रिकव्हरी एजंट तुमच्या कर्जाची माहिती तुमच्या परवानगीशिवाय इतरांना देऊ शकत नाही.

योग्य वेळेत संपर्क साधण्याचा अधिकार: रिकव्हरी एजंट तुम्हाला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच संपर्क साधू शकतात.

तक्रार करण्याचा अधिकार: रिकव्हरी एजंटच्या गैरवर्तनाविरोधात तुम्हाला तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

कर्ज वसुलीसाठी येणारे रिकव्हरी एजंट जर तुम्हाला त्रास देत असतील, तर घाबरून न जाता, धीराने वागा आणि तुमच्या अधिकारांचा वापर करून तक्रार करा.

फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. 

------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि  फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

--------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...