हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंटची शिवीगाळ आणि धमकी?, घाबरू नका, 'अशी' करा तक्रार

 

कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंटची शिवीगाळ आणि धमकी?, घाबरू नका, 'अशी' करा तक्रार

कर्ज घेतल्यानंतर, काही कारणास्तव परतफेड करणे शक्य न झाल्यास, बँका आणि फायनान्स कंपन्या वसुलीसाठी रिकव्हरी एजंटची नेमणूक करतात.

मात्र, अनेकदा हे एजंट कर्जदारांना धमकावणे शिवीगाळ करणे किंवा अपमानास्पद वागणूक देतात. अशा परिस्थितीत घाबरून न जाता, तुम्ही याविरोधात आवाज उठवू शकता आणि तक्रार करू शकता.

बँकेकडे तक्रार: 

सर्वप्रथम, ज्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे, त्यांच्याकडे लेखी तक्रार करा. बँकेच्या ग्राहक सेवा विभागात किंवा नोडल अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवू शकता.


पोलिसांत तक्रार: 

जर रिकव्हरी एजंटने तुम्हाला धमकावले, शिवीगाळ केली किंवा तुमच्यासोबत गैरवर्तन केले, तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता.

कोर्टात तक्रार: 

बँकेने किंवा पोलिसांनी दखल न घेतल्यास, तुम्ही कोर्टात दावा दाखल करू शकता. यासाठी वकिलाची मदत घेऊ शकता.

RBI कडे तक्रार: 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिकव्हरी एजंटसाठी काही नियम बनवले आहेत. जर एजंट या नियमांचे उल्लंघन करत असेल, तर तुम्ही आरबीआयकडे तक्रार करू शकता.

रिकव्हरी एजंटचे नाव, तो ज्या कंपनीसाठी काम करतो त्या कंपनीचे नाव आणि संपर्क क्रमांक याची नोंद ठेवा.

तुम्हाला आलेल्या धमक्या, शिवीगाळ किंवा गैरवर्तनाचे पुरावे (ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग, एसएमएस, व्हॉट्सॲप मेसेज) असल्यास ते जपून ठेवा.

तुमच्या तक्रारीची प्रत (Copy) आणि बँकेकडून मिळालेला प्रतिसाद जपून ठेवा.


सन्मानाने वागणूक मिळवण्याचा अधिकार: रिकव्हरी एजंट तुम्हाला अपमानास्पद वागणूक देऊ शकत नाही.


गोपनीयतेचा अधिकार: रिकव्हरी एजंट तुमच्या कर्जाची माहिती तुमच्या परवानगीशिवाय इतरांना देऊ शकत नाही.


योग्य वेळेत संपर्क साधण्याचा अधिकार: रिकव्हरी एजंट तुम्हाला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच संपर्क साधू शकतात.


तक्रार करण्याचा अधिकार: रिकव्हरी एजंटच्या गैरवर्तनाविरोधात तुम्हाला तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

कर्ज वसुलीसाठी येणारे रिकव्हरी एजंट जर तुम्हाला त्रास देत असतील, तर घाबरून न जाता, धीराने वागा आणि तुमच्या अधिकारांचा वापर करून तक्रार करा.

फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. 

------------------------------------------------------------------

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि  फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! 

--------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे.. सामाजिक जनजागृती चळवळ .. 7900094419

https://chat.whatsapp.com/F7iTKNNFTmQ6NAAB9zMhJp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...