हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

*स्वतःच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी हे गॅजेट तुमच्याकडे असायलाच हवेत*

संतोष साळवे...7900094419


हेल्थ इन्शुरन्स...

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक 
ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

*स्वतःच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी हे गॅजेट तुमच्याकडे असायलाच हवेत*

सध्या करोना १९. हा संसर्गजन्य रोग जगभरातल्या सगळ्या देशात पसरला आहे.भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास अजूनही करोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे,या वाढत्या रुग्णांनामुळे विविध आरोग्य यंत्रणेवर ताणही वाढत आहे.करोना कधी संपणार आहे याचीही माहिती नसल्यामुळे आता प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात आपण तंत्रज्ञानाचा (Health Gadgets) वापर करून स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकता.
तुमच्या आरोग्यावर देखरेख ठेवणाऱ्या काही गडेट्सबद्दल.

*कॉन्टॅक्टलेस थर्मल स्कॅनर (thermometer)*

कोणत्याही आजाराची सुरवात बहुधा तापावरून होते. सध्याचं बोलायचं झाल्यास करोनाचे मुख्य लक्षण म्हणजे तापच. हा संसर्गजन्य आजार असल्याने आपल्याला सोशल डिस्टन्सचे भान राखून वापर केला पाहिजे. कॉन्टॅक्टलेस थर्मल स्कॅनरचा वापर केल्याने त्याची पूर्तता होते. हे Health Gadget इन्फ्रारेड किरणांनाच्या मदतीने व्यक्तीचे तापमान मोजते. सध्या सरकारी आणि मोठ्या खाजगी कार्यालयात दिसणारे हे स्कॅनर भविष्यात प्रत्येकाच्या घरी हवेच.

*प्लस ऑक्सिमीटर (pulse oximeter)*


'6 मिनिट वॉक टेस्ट' काय आहे? त्याने फुप्फुसांचं आरोग्य कसं तपासायचं?   खालील लिंक वर क्लिक करा                                                        https://fb.watch/5nhX5feyxr

रक्तातील ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी प्रामुख्याने प्लस ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. रक्तातील ऑक्सिजन एका ठराविक पातळीच्या खाली गेल्यास श्वास घेण्यास त्रास होतो, आणि हे करोनाचे मुख्य लक्षण आहे.त्यामुळे सध्या तरी स्वतःच्या शरीरातील ऑक्सिजन नियमित तपासणे गरजेचे आहे. Health Gadget प्लस ऑक्सिमीटर वापरला अगदी सोपे आहे, यामध्ये हाताचे बोट ठेवल्यास अगदी काही सेकंदात तुमच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कळेल. काही प्लस ऑक्सिमीटर साधने तुमचा Heart Rate सुद्ध सांगतात.आपल्याला अस्वस्थता जाणवत आहे तर सर्वप्रथम स्वतःकडे लक्ष द्या आणि बघा की गेल्या 5 दिवसांपासून आपले आरोग्य स्थिर आहे की अस्वस्थता अधिक जाणवत आहे. अशा परिस्थितीत पल्‍स ऑक्सिमीटरची गरज असते.ते वापरावे.

 *रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419* 

तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.)

आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)

आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड.......  संपर्क करा ..साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419*  (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.)


पल्‍स ऑक्सिमीटर कसे वापरावे ?

* ऑक्सिमीटर दररोज वापरा.
* नेलपेंट काढून घ्या.
* एकाच बोटात लावून तपासण्या ऐवजी हातातील
   इतर बोटांमध्ये देखील लावून बघा.
* ऑक्सिमीटर लावल्यावर थोड्यावेळ तसेच राहू द्या.
* दोन तीन वेळा तपासल्यावर जी सर्वात जास्त रिडींग येईल त्यालाच बरोबर मानावे.
   हा उपाय प्रभावी आहे-
* किमान सहा मिनिटे वॉक करा. नंतर ऑक्सिमीटरचा वापर करून ऑक्सिजनची पातळी तपासा.
* वॉक केल्यावर देखील ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजनची पातळी 4 टक्क्याने खाली येते तर आपल्याला पुढील चाचणीची गरज आहे.
* वॉक केल्यावर देखील ऑक्सिजनची पातळी 94 च्या वर येत आहे तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. आपण बरे आहात.

संसर्गाला कसे ओळखावे-

* आपल्या लक्षणांकडे लक्ष द्या.
* आराम करा.
* चांगले आहार घ्या.
* काळजी करू नका.
* या नंतर देखील अस्वस्थता जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावे.                                     

*ब्लड प्रेशर मॉनिटर  (blood pressure monitor)*


ताण तणाव आणि ब्लड प्रेशर यांचं अनोखे नाते आहे. धावपळीच्या या जीवनात अनेकांना त्यांचा ताण कसा सांभाळायचा हे माहीतच नाही परिणामी ब्लड प्रेशर या विकाराने ग्रासले जाते. करोनाच्या या काळात तर याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे रक्तदाब मोजण्यासाठी प्रत्येकवेळी दवाखान्यात जाण्यापेक्षा Blood Pressure Monitor ने घरीच मोजता येईल.

*ग्लुकोमीटर (glucometer)*




कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्यामध्ये मधुमेहाची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांनाची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यावेळी मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे फारच आवश्यक आहे. रुग्णांनी त्यांच्या रक्तात असलेल्या साखरेच्या प्रमाणावर लक्ष देने गरजेचे आहे पण यासाठी सतत दवाखान्यात जाणेही धोक्याचे आहे. Health Gadget ग्लुकोमीटरचा वापर करून तुम्ही साखर घरच्या घरी तपासू शकता आणि स्वतःला सुरक्षितही ठेवू शकता. यासाठी आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो निर्णय घ्यावा.

*पोर्टेबल ECG मीटर (portable ecg monitor)*




ही तरी बदल झालाच आहे आणि हा बदल प्रत्येकाला नैराश्य, चिंता आणि चिडचिडेपणा देत आहे. अर्थातच तो बदल कश्या स्वरूपाचा आहे यावर अवलंबून आहे पण बहुतेक बदल नकारात्मक असल्याने लोकांच्या हृदयावर परिणाम जाणवू लागला आहे. ECG म्हणजे तुमच्या हृदयाचे कामकाज योग्य चालले आहे की नाही हे तपासण्याचे माप. प्रत्येकाच्या घरी हा पोर्टेबल Health Gadget ECG मीटर असणे आवश्यक ज्यामुळे तुम्ही वेळीच सावध होऊ शकता. आता हे पोर्टेबल ECG मीटर वापरण्यासाठी योग्य मार्गदर्शन घ्या, Google वरून कोणतीही माहिती वाचून घाबरून जाऊ नका. 

    

                                                                                                                                                                       महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद!!
 ----------------------------------------------------------------संतोष विठ्ठल साळवे:- 7900094419.


गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना व पीएम कुसुम योजना अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती



मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना व पीएम कुसुम योजना अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती

आपल्याकडे शेती असल्यास किंवा आपण शेती करीत असाल तर ही माहिती आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकेल. आपल्या शेतात विजेची मोठी समस्या असेल्यामुळे आपण आपल्या शेतात सौर पंप स्थापित करण्याचा विचार करीत असाल तर, ही माहिती आपल्याला दिशादर्शक ठरू शकते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकर्‍यांसाठी बऱ्यांच योजना आयोजित केल्या आहेत. मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना हि सुद्धा एक महत्वकांक्षी योजना आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता.


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी देण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना सुरू केली आहे.
शेतातील विजेची समस्या असलेल्या कोणत्याही शेतकऱ्यासाठी आणि विजेमुळे जे शेतकरी शेताला पाणी देऊ शकत नाही अश्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंपमार्फत आपल्या शेतातील पाण्याच्या समस्येपासून आपण मुक्त होऊ शकता.

सौरकृषीपंपाचे फायदे

1) दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
2) दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
3) वीज बिलापासून मुक्तता
4) डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
5) पर्यावरण पुरक परिचलन
6) शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
7) औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमीकरणे

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? पीएम कुसुम योजना

या वेबसाइटला भेट द्या 

तिथे आपल्याला ए - 1 फॉर्म मिळेल, त्या फॉर्मवर आपल्याला सर्व माहिती योग्य मार्गाने भरावी लागेल.

ए -1 फॉर्मसह आपल्याला आपली काही कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.

सीएम सौर कृषी पंपसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

  • 7/12 उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  • आधारकार्ड प्रत.
  • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
  • पासपोर्ट आकाराचा फोटो,
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र ही सादर करावे लागेल.
लाभार्थी निवडीचे पात्रता निकष – (3 व 5 अश्वशक्ती) 

1) शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.
2) पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी.
3) 5 एकरापर्यंत शेतजमीन धारकास 3 अश्वशक्ती सौर कृषीपंप व 5 Absolutely जास्त शेतजमीन धारकास 5 अश्वशक्ती व 7.5 अश्वशक्ती सौर कृषीपंप देय असेल.
यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.
4) अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.
5) वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
6) “धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
7) महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.

लाभार्थी निवडीचे पात्रता निकष 7.5 अश्वशक्ती सौर कृषीपंप करिता:

1) विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
2) अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशत: शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.
3) अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) 60 टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.
4) खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणा-या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) अ.क्र.2 च्या अधीन राहून, नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.
कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये 60 मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.

      वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा:






  पीएम कुसुम योजना: 90 %  अनुदानावर लावा सोलर पॅनेल; लाखोंची कमाई करत मिळवा 'हे' जबरदस्त फायदे

  तुम्हाला सौरऊर्जेशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारच्या पंतप्रधान कुसुम योजनेत तुम्ही  सामील होऊ शकता. केंद्र सरकारचे 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम कुसुम. पीएम कुसुम योजना सन 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, त्यानंतर अर्थमंत्र्यांनी या योजनेचा विस्तार 2020 च्या अर्थसंकल्पात केला आहे.

या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना अनुदानावर सोलर पॅनेल्स मिळतात, ज्यामधून वीज मिळू शकेल. आवश्यकतेनुसार विजेचा वापर करून, उर्वरित विक्री करुन ते अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.या योजनेद्वारे इलेक्ट्रिक किंवा डिझेलवर चालणारे सिंचन पंप सौर ऊर्जेवर चालणार्‍या पंपमध्ये रुपांतरित केले जातील. त्यांच्या सिंचन कामात सौर पॅनल्समधून निर्माण होणारी वीज प्रथम वापरली जाईल. त्याशिवाय जादा सोडली जाणारी वीज विद्युत वितरण कंपनीला (DISCOM) विक्री करुन 25 वर्षे पैसे मिळू शकतात.

याचा आणखी एक फायदा म्हणजे सौरऊर्जेमुळे डिझेल आणि विजेवरील खर्चही कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल. सौर पॅनेल 25 वर्षे चालेल आणि त्याची देखभाल देखील सोपी आहे.या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या जागेत सौर पॅनेल बसविण्यासाठी केवळ 10% रक्कम द्यावी लागेल. केंद्र व राज्य सरकारे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 60 टक्के अनुदान देतात. केंद्र व राज्यांकडून समान योगदानाची तरतूद आहे. त्याचबरोबर बँकेकडून 30 टक्के कर्जाची तरतूद आहे. शेतकरी आपल्या कमाईद्वारे हे कर्ज सहज भरू शकतात.

पीएम कुसुम योजनेंतर्गत अर्जासाठी अधिकृत वेबसाइट 

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

वर भेट देऊन नोंदणी करावी लागेल. यासाठी आधार कार्ड, मालमत्तेची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. सौर प्रकल्प उभारण्यासाठी जमीन उर्जा उपकेंद्राच्या पाच किमीच्या परिघात असावी. शेतकरी स्वतःला किंवा डेवलपरला सौरऊर्जा भाड्याने देऊ शकतात.

पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकर्‍यांना सर्वात मोठा फायदा म्हणजे सिंचनासाठी त्यांना विनामूल्य वीज मिळेल. या योजनेमुळे डिझेल आणि केरोसीन तेलावरील शेतकर्‍यांचे अवलंबन कमी होईल. आणखी एक फायदा म्हणजे ते त्याद्वारे तयार केलेली अतिरिक्त वीज कंपनीला विकू शकतील. ज्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढेल.

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!     

 ------------------------------------------------------------------------ 


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वाचा बाबासाहेबांचं जीवन चरित्र



डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वाचा बाबासाहेबांचं जीवन चरित्र

बहुआयामी विद्वान

आधुनिक भारताचे निर्माते

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

पहिले कायदेमंत्री, व मानवी हक्कांचे कैवारी

भारतरत्न

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर १९५६), हे भारतीय न्यायशास्त्र, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात..


राज्यसभेचे सदस्य

भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री

कार्यकाळ:- १५ ऑगस्ट १९४७ – ६ ऑक्टोबर १९५१

संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष

कार्यकाळ:- २९ ऑगस्ट १९४७ – २४ जानेवारी १९५०

भारतीय संविधान सभेचे सदस्य

कार्यकाळ:- ९ डिसेंबर १९४६ – २४ जानेवारी १९५०

मजूरमंत्री, ऊर्जामंत्री व बांधकाममंत्री, व्हाईसरॉयचे कार्यकारी मंडळ

कार्यकाळ:- २० जुलै १९४२ – २० ऑक्टोबर १९४६

 मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते

 .कार्यकाळ:- स. १९३७ – इ.स. १९४२

मुंबई विधानसभेचे सदस्य

कार्यकाळइ:-.स. १९३७ – इ.स. १९४२

मुंबई विधिमंडळाचे सदस्य

कार्यकाळडि:- सेंबर इ.स. १९२६ – इ.स. १९३७

जन्म

१४ एप्रिल, इ.स. १८९१ महू, मध्य प्रांत, ब्रिटिश भारत (सध्या भीम जन्मभूमी, मध्य प्रदेश)

मृत्यू

६ डिसेंबर, १९५६ (वय ६५) नवी दिल्ली, दिल्ली, भारत (सध्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, दिल्ली)

राष्ट्रीयत्व

भारतीय

राजकीय पक्ष

• स्वतंत्र मजूर पक्ष

 • शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन

 • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

मागील इतर राजकीय पक्ष सामाजिक संस्था :

 • बहिष्कृत हितकारिणी सभा

 • समता सैनिक दल

शैक्षणिक संस्था 

 • डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी

 • द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट

 • पिपल्स एज्युकेशन सोसायटी

धार्मिक संस्था 

भारतीय बौद्ध महासभा

आई

भीमाबाई सकपाळ

वडील

रामजी सकपाळ

पत्नी

 • रमाबाई आंबेडकर:-(विवाह १९०६ - निधन १९३५)

 • सविता आंबेडकर:-(विवाह १९४८ - निधन २००३)

आंबेडकर कुटुंब पहा

आपत्य

यशवंत आंबेडकर

निवास

राजगृह मुंबई

धर्म

बौद्ध धर्म

सही


 बाबासाहेबांविषयीच्या खास दहा गोष्टी…यातल्या तुम्हाला किती माहितीये?


प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या :                                                               

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या घेतल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ                                                                     

Caste in Hindu (1916), 

The problem of Rupee (1923), 

Annhilation of Caste (1935), 

Federation Versus Freedom (1939)

Ranade, Gandhi and Ginnah (1943)

Communal Deadlock and a Way to solve it (1945)

What congress and Gandhi have done to the untouchables? (1945) 

Pakistan or Partition of India (1945)

State and Minorities (1947)

Maharashtra as a Linguistic state (1948)

The untouchable (1948), Who were shudra (1945)

Buddha and his Dhammas (1957).


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे :                                                     

मूकनायक (१९२०)

बहिष्कृत भारत (१९२७)

समता (१९२८)

जनता (१९३०)

प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).


महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने :                   

महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७) 

मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७) 

शेतकऱ्यांची चळवळ (१९२८)

पर्वती देवालय प्रवेश (१९२९)

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१)

पुणे करार (१९३२)

येवला परिषद (१९३५)

बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.


बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :                                                                

बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४)

समता सैनिक दल (१९२७)

स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६)

शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२)

पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५)

भारतीय बौद्ध महासभा (१९५५).


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा :                                                            

‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’. ‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’ ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ ‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’ ‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’


बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान :

१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.


बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :

चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती. पत्रकार :‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते. राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते. अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.


बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी :                                                        

दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., 'दामोदर नदी खोरे' आणि 'सोने नदी खोरे' प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या 'हिराकुड धरण' प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. 'जय भीम' या घोषणेनंतर देशात 'जय हिंद' ही घोषणा सुरु झाली.


बाबासाहेबांचे लेखन :

भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

 ----------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..एक जनजागृती चळवळ 7900094419*    https://chat.whatsapp.com/CEujEQSOix79UmL41Vxa4h


मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

*पेट्रोल पंपावर 'या' सुविधा असणे बंधनकारक; मोफत हवा मारुन मिळाली नाही तर 'अशी' करा तक्रार*

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

वाचाल तर... वाचाल!!!


*पेट्रोल पंपावर 'या' सुविधा असणे बंधनकारक; मोफत हवा मारुन मिळाली नाही  तर'अशी' करा तक्रार* 

इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमसोबतच सर्व तेल कंपन्यांनी या सुविधांसंदर्भात एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पेट्रोल पंपावर तुम्हाला मिळणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला या सुविधा पेट्रोल पंपावर मिळाल्या नाहीत तर तुम्ही त्याची तक्रारही करु शकता.

सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

*१) मोफत हवा:*

अनिवार्य सुविधांचा विचार केला तर यामध्ये सर्वप्रथम येते हवा.ज्या वेळी तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जाता त्यावेळी तुम्ही गाडीत मोफत हवा भरु शकता. पेट्रोल पंप चालकांना अशी सुविधा पेट्रोल भरायला येणाऱ्या ग्राहकांसाठी करायची असते.

*२) पाण्याची व्यवस्था:*

प्रत्येक पेट्रोल पंपावर पाण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रवासा दरम्यान तुम्ही पेट्रोल पंपावर पाणी घेऊ शकता.

*३) तक्रार पुस्तिका:*

पेट्रोल पंपावर तक्रार पुस्तिका असणं गरजेचं आहे. जर पेट्रोल पंपावर एखाद्या कर्मचाऱ्यासंदर्भात किंवा सुविधेसंदर्भात तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही त्या नोंदवहीत करु शकता.

*४) काम करण्याची वेळ:*

पेट्रोल पंपावर किती तास काम केलं जातं याची माहितीही प्रमुख रुपात डिस्प्ले करणं आवश्यक आहे. त्यासोबतच कंपनीच्या अधिकाऱ्यांचा फोन नंबरही असणं आवश्यक आहे. म्हणजेच गरज पडल्यास ग्राहक त्या क्रमांकावर संपर्क करु शकतील.

*५) आपत्कालीन फोन* *(Emergency Phone Call):*

दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना अगदी अनपेक्षितपणे घडत असतात. जर कधी तुमचा अपघात झाला आणि तुम्हाला कोणाला निरोप द्यायचा असेल आणि जवळपास कोणी नसेल तर सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन आपत्कालीन फोन अगदी हक्काने करू शकता तोही अगदी मोफत.

अपघातच नाही तर प्रवास करताना तुमच्या मोबाईलची बॅटरी कधी संपली किंवा तुम्हाला इतर अगदी महत्वाचा निरोप पोहोचवायचा आहे अशा प्रसंगी तुम्ही एक ग्राहक म्हणून पेट्रोल पंपावर जाऊन अगदी मोफत आणि हक्काने हा फोन करू शकता.


*६) फर्स्ट एड बॉक्स:

तुम्हाला प्रत्येक पेट्रोल पंपावर फर्स्ट एड बॉक्स मिळेल. प्रवासादरम्यान तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या फर्स्ट एड बॉक्सच्या मदतीने प्रथमोपचार करु शकता.

*७) शौचालय आणि सुरक्षा:

पेट्रोल पंपावर शौचालयाची सुविधा असणं आवश्यक आहे. इतकेच नाही तर, एखाद्या संकटाच्या काळात परिस्थिती हाताळता यावी यासाठी पेट्रोल पंपावर सुरक्षेची सुविधा देखील आवश्यक असावी.

*८) पेट्रोल पंपा विरुद्ध तक्रार कोठे करावी:*

वरीलपैकी कोणत्याही सुविधा पेट्रोल पंपांवर विनाशुल्क दिल्या जात नसतील किंवा त्यासाठी पैसे आकारले जात असतील तर आपण पेट्रोल पंप मालकाविरूद्ध तक्रार करू शकता. ही तक्रार पेट्रोल पंप ज्या पेट्रोलियम कंपनीचा असेल त्या कंपनीकडे तक्रार करू शकता. यासाठी संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या संकेतस्थळावर ईमेल आयडी व संपर्क क्रमांक मिळू शकेल. 

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!      

 ---------------------------------------------------------------

संतोष विठ्ठल साळवे..एक जनजागृती चळवळ 7900094419*    https://chat.whatsapp.com/CEujEQSOix79UmL41Vxa4h

*ईपीएफओचा कोविडमध्ये मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियाना मोठा दिलासा, कामगार मंत्रालयाने आधीच्याच सुविधांमध्ये बदल केले आहेत.



*ईपीएफओचा कोविडमध्ये मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियाना मोठा दिलासा, कामगार मंत्रालयाने आधीच्याच सुविधांमध्ये बदल केले आहेत.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर कामगार मंत्रालयाने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कामगार मंत्रालयाने ईपीएफओअंतर्गत (EPFO) मोठा दिलासा कोरोनामुळे कुटुंबातील कमावता सदस्य गमावलेल्या कुटुंबाना दिल्या आहेत. यासाठी ईपीएफओ काही नवीन सुविधा देऊ केल्या आहेत तर काही आधीच्याच सुविधांमध्ये बदल केले आहेत. ईपीएफओमुळे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या या सुविधा कोणत्या आहेत ते विस्ताराने पाहूया. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देताना त्याचा भार केंद्र सरकार उचलणार असून त्याचा कोणताही अतिरिक्त भार कंपन्यांवर येणार नाही, असे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ईपीएफओअंतर्गत (EPFO) येणाऱ्या कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड विमा योजनेचा म्हणजेच ईडीएलआयचा (EDLI) लाभ कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना होणार आहे. या योजनेअंतर्गत (EDLI) देण्यात आलेल्या सुविधेनुसार ज्या कर्मचाऱ्याचा (खासगी आणि सरकारी) मृत्यू होईल त्याच्या कुटुंबियांना ग्रॅच्युईटी (Gratuity), फॅमिली पेन्शन (Family Pension) मिळण्यासाठी किमान सेवेची अट नसणार आहे. ईपीएफ अॅंड एमपी अॅक्टअंतर्गत तरतूदींनुसार जर एखादा कर्मचारी आजारी असेल आणि कार्यालयात येत नसेल तर ९१ दिवसांच्या वेतनाच्या ७० टक्के इतका आजारपणासाठी भत्ता दिला जातो. केंद्र सरकारने केलेले बदल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे असतील.

ईपीएफओच्या योजनेचे लाभ 

1)  ईपीएफओमार्फत पीएफ खातेधारकांना विमासंरक्षण देण्यात येते. याआधी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ६ लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षणाअंतर्गत मिळत होती. यापुढे विम्याची रक्कम वाढवून ७ लाख रुपये करण्यात आली आहे.

2) याआधी पीएफ खातेधारक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मिळणारा विम्याचा २.५ लाख रुपयांचा लाभ मिळण्यासाठी एकाच कार्यालयात किंवा कंपनीत सलग १२ महिने नोकरी करण्याचे बंधन होते. त्यामुळे कंत्राटी कामगार किंवा तात्पुरत्या स्वरुपात नोकरी करणारे कर्मचारी यांना हा लाभ मिळत नव्हता. यापुढे हे बंधन नसणार आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत सलग १२ महिने काम केले नसेल तरी त्याच्या कुटुंबियांना २.५ लाख रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे.

3) किमान २.५ लाख रुपयांचे विमा संरक्षण हे १५ फेब्रुवारी २०२० पासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पीएफधारक कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांनादेखील या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

4) ईपीएफओच्या अंदाजानुसार पुढील तीन वर्षात म्हणजेच २०२१-२२ ते २०२३-२४ या वर्षांदरम्यान ईडीएलआय फंडातून २,१८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ पात्र कुटुंबियांना मिळणार आहे.

5) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबरोबर इतरही कारणांनी मृत्यू पावलेल्या आणि ईडीएलआय योजनेचा लाभ, म्हणजेच विमा संरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची संख्या दरवर्षी ५०,००० इतकी असण्याचा अंदाज आहे. यात दरवर्षी १०,००० अधिक मृत्यूंचा अंदाज आहे. यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचाही समावेश आहे.

पीएफ खातेधारकांच्या कुटुंबियांना ईएसआयसी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभांमध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. यात काही अतिरिक्त लाभ दिले जाणार आहेत.

ईएसआयसीअंतर्गत मिळणारे लाभ

सध्या ईएसआयसीअंतर्गत विमाधारकाच्या मृत्यूनंतर कंपनीतील मृत्यू किंवा काम करत असताना जखमी झाल्यास) त्याच्या रोजच्या वेतनाच्या ९० टक्के इतकी रक्कम पेन्शन रुपात त्याच्या पत्नी, किंवा आईला आयुष्यभर दिली जाते. तर विमाधारकाच्या मुलांना त्यांचे वय २५ वर्षे पूर्ण होईपर्यत हे पेन्शन दिले जाते. जर विमाधारकाला मुलगी असेल तर पेन्शनची सुविधा तिचे लग्न होईपर्यत दिली जाते. ईएसआयसी योजनेअंतर्गत जखमी झाल्यास किंवा मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना जो लाभ मिळतो यापुढे ज्या कर्मचाऱ्यांची नोंदणी ईएसआयसीच्या पोर्टल कोरोना होण्यापूर्वी झाली आहे आणि ज्यांचा मृत्यू नंतर कोरोनामुळे झाला आहे अशांच्या कुटुंबियांना ईएसआयसी योजनेच्या विमाधारकांना मिळणारे सर्व लाभ मिळणार आहेत. त्यासाठी असणाऱ्या अटी पुढीलप्रमाणे आहेत.

1) ज्या विमाधारकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे त्या विमाधारकाची नोंदणी ईएसआयसीच्या ऑनलाईन पोर्टल त्याला कोविड होण्याच्या तीन महिने अगोदर झाली असली पाहिजे. 

2) विमाधारकाला कोविड होण्याआधी त्याची नोकरी किंवा काम किमान ७८ दिवस झालेले असले पाहिजे. म्हणजेच त्या कर्मचाऱ्याला कोरोनामुळे मृत्यू होण्यापूर्वी किमान ७८ दिवसांचे वेतन मिळालेले असले पाहिजे.

दोन वर्षांसाठी मिळणार लाभ

ईएसआयसीचे जे विमाधारक वरील अटींची पूर्तता करतील आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मासिक वेतनाच्या ९० टक्के इतकी रक्कम पेन्शन रुपाने दिली जाणार आहे. ही योजना २४ मार्च २०२० पासून दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.

या सुविधांमुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत होईल आणि कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणींमधून त्यांची सुटका होईल, असे मत सरकारने व्यक्त केले आहे.

Missed Call देऊन तपासा PF बॅलन्स

यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता

आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे 

*१ जून पासून तुमच्या PF खात्याबाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत.*


EPFO नेआपल्या खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. १ जून पासून तुमच्या PF खात्याबाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. खातेधारकाने आपले खाते आधार वेरिफाइड करायला हवे. असं न केल्याने तुम्हाला मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागू शकते. तसेच खात्यात येणारी नियमित रक्कम ही थांबू शकते. त्यासाठी गरजेचे आहे की, आपले PF खाते आपल्या आधारशी लिंक करावे. UAN सुद्धा आधार वेरिफाइड असणे गरजेचे आहे.

EPFO चे नवीन आदेश:

EPFO ने सोशल सेक्युरिटी कोड २०२० च्या सेक्शन १४२ अंतर्गत नवा निर्णय घेतला आहे. EPFOने कंपन्यांना निर्देश दिले आहेत. की १ जून नंतर खाते आधार कार्ड ला लिंक नसल्यास किंवा UAN आधार व्हेरिफाइड नसल्यास त्याचे ECR इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरला जाणार नाही. अशातच खातेधारकांनाचा कंपनीकडून मिळणारा हिस्सा देखील थांबू शकतो.
  
तुमच्या PF अकाउंट ला आधार कार्ड लिंक करायच असल्यास .संपर्क करा7900094419  संतोष विठ्ठल साळवे. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते.

*सर्व नोकरदारांना फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांची 'ही' सुविधा, जाणून घ्या केव्हा आणि कसा घेऊ शकता फायदा*

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या स्वताच्या सबस्क्रायबर्सला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी पेन्शन स्कीम (ईपीएस) शिवाय लाईफ इन्श्युरन्सचा आणखी एक मोठा फायदा देते. ईपीएफचे सर्व सबस्क्रायबर इम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम, 1976 (ईडीएलआय) अंतर्गत कव्हर होतात. ईडीएलआय स्कीम अंतर्गत प्रत्येक ईपीएफ अकाऊंटवर 

7 लाख रुपयांपर्यंतचे फ्री इन्श्युरन्स कव्हर मिळते. 

या स्कीममध्ये कर्मचार्‍याला कोणत्याही प्रकारचे योगदान द्यावे लागत नाही.जर एखाद्या ईपीएफओ मेंबर्सचा कोरोना संकटात मृत्यू झाला तर नॉमिनी लाईफ इन्श्युरन्सच्या रक्कमेवर क्लेम करू शकतो.
              
क्लेमसाठी र्फॉर्म - 5 IF जर जमा करणे आवश्यक. 
क्लेमसाठी र्फॉर्म - 5 IF साठी संपर्क करा.. 7900094419  - संतोष विठ्ठल साळवे



*केव्हा आणि कसा करावा क्लेम ?*

या रक्कमेसाठी क्लेम नॉमिनीकडून पीएफ खातेधारकाचा आजाराने, दुर्घटनेत किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर केला जाऊ शकतो. यामध्ये एकरक्कमी पैसे दिले जातात. हा इन्श्युरन्स कव्हर सबस्क्रायबरला फ्री मिळतो. यासाठी त्यांना कोणतीही रक्कम द्यावी लागत नाहीत. पीएफ अकाऊंटसोबत ते लिंक होते.
 
दावा कसा करावा?

जर ईपीएफ ग्राहक अकाली मरण पावला तर, त्याचा नॉमिनी किंवा कायदेशीर वारस विमा कवचा दावा करु शकतात. हक्क सांगणार्‍याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचा / तिचा पालक त्यांच्या वतीने दावा करु शकतात. यासाठी विमा कंपनीने अल्पवयीन नॉमिनीच्या वतीने पालकांनी केलेल्या दाव्यावर कर्मचार्‍यांचा मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, पालकत्व प्रमाणपत्र आणि बँक तपशील देणे आवश्यक आहे.

जर पीएफ खात्यावर कोणी नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारस यावर दावा करु शकतात.तस करताना कुटुंबांत वाद निर्माण होऊ शकतात तर 

कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल. आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad, Death claim   व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419संतोष विठ्ठल साळवे 

                                                ESI आणि EPFO ची सर्व कामे केली जाते


*PF Account सह मिळतात फ्री इन्श्युरन्स, पेन्शन आणि लोन सारखे अनेक फायदे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ, जाणून घ्या*

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) चे अनेक फायदे आहेत. एका कर्मचार्‍याला एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयापर्यंत पीएफ योगदानावर प्राप्तीकर कायदा कलम 80सी अंतर्गत प्राप्तीकरात सूट मिळते. याशिवाय असे अनेक फायदे आहेत जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या कर्मचार्‍यांना प्रदान करते. यामध्ये फ्री इन्श्युरन्स आणि पेन्शन लाभाचा समावेश आहे. पीएफसह मिळणार्‍या अशाच काही फायद्यांबाबत जाणून घेवूयात…

🔅मोफत वीमा :-

पीएफ खातेधारक आपल्या सेवाकाळात मृत्यु झाल्यास ईडीएलआय स्कीम अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत फ्री इन्शुरन्ससाठी पात्र असतो.
यापूर्वी हे कव्हर 6 लाख रुपये होते. यासाठी खातेधारकाला वेगळा इन्श्युरन्स प्रीमियम द्यावा लागत नाही.

🔅पेन्शन :-

पीएफ खातेधारक 58 वर्षाच्या वयानंतर पेन्शनसाठी पात्र होतो. मात्र, पेन्शन घेण्यासाठी पीएफ खात्यात किमान 15 वर्षे नियमित मासिक पीएफ योगदान असावे. पेन्शन लाभ कंपनीच्या योगदानातून मिळतो. कारण कंपनीच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के पीएफ खातेधारकाच्या ईपीएस खात्यात जातात.

🔅लोन :-

कर्मचार्‍याला पीएफमध्ये लोनची सुविधा सुद्धा मिळते. आर्थिक संकटात पीएफ खातेधारक पीएफ बॅलन्सच्या अगेन्स्ट लोन घेऊ शकतो. पीएफ लोनवर व्याजदर केवळ एक टक्का असतो. हे लोन कमी कालावधीसाठी असते आणि त्याची पूर्तता लोन मिळाल्याच्या 36 महिन्यांच्या आत करावे लागेल.

🔅अंशत: पैसे काढणे :-

ईपीएफओ मेडिकल आणि आर्थिक संकट आल्यास खातेधारकाला काही नियम आणि अटींसह अंशत: पैसे काढण्याची परवानगी देते.

🔅गृह कर्जाची परतफेड :-

कर्मचारी आपल्या पीएफ खात्याचा वापर होम लोनच्या परतफेडीसाठी सुद्धा करू शकतो. ईपीएफओच्या नियमानुसार, कर्मचारी नवीन घर खरेदी करणे किंवा घर बांधण्यासाठी आपल्या पीएफ खात्यातील 90 टक्केपर्यंत रक्कमेचा वापर करू शकतो. कर्मचारी आपल्या पीएफ बॅलन्सचा उपयोग करून जमीन सुद्धा खरेदी करू शकतो.

आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे 

*PF अकाऊंटशी संबंधित ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर पैसे कापले जाणार*

 ईपीएफओद्वारे अनेक खातेदारांना व्याजाच्या चांगल्या रक्कमेसह बरीच सुविधा मिळते. पण कधीकधी तुमच्या चुकांमुळे तुम्हाला काही त्रासही सहन करावा लागू शकतो. (Link PAN Card with EPF account)

*नियम काय?*

ईपीएफओने काही दिवसांपूर्वी एक अलर्ट जारी केला होता. त्यात त्यांनी अकाऊंट धारकांना पॅन कार्ड पीएफ खात्याशी जोडावे, अशी सूचना केली होती. जर पीएफ खातेधारकाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते, असेही ईपीएफओने सांगितले होते.

त्यामुळे जर तुमचे पीएफ खाते असेल तर तुमचे पॅनकार्ड ईपीएफओशी लवकरात लवकर लिंक करा. यासाठी ईपीएफओने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक संदेशही जारी केला होता. त्यात त्यांनी पॅनकार्ड ईपीएफओशी लिंक करणे गरजेचे आहे असे म्हटले होते.

*पॅनकार्ड लिंक नसेल तर काय?*

जर तुम्ही तुमचे पॅनकार्ड यूएएनशी लिंक केले नाही तर तुम्हाला पीएफचे पैसे काढताना आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जे लोक पॅन कार्ड लिंक करत नाहीत आणि पीएफ काढण्यासाठी अर्ज करतात त्यांचा जास्तीत जास्त टीडीएस (TDS) कापला जातो. त्या उलट जे खातेधारक पॅनकार्ड लिंक करता त्यांना दिलासा मिळतो.

दरम्यान जर तुमचे पीएफ खाते पाच वर्षांपेक्षा जुने असल्यास आणि खात्यात जमा केलेली रक्कम 50 हजारांपेक्षा जास्त असल्यात पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर वजा केला जातो.

 तुमच्या PF अकाउंट ला पॅन कार्ड लिंक करायच असल्यास .संपर्क करा7900094419  संतोष विठ्ठल साळवे            

*PF खात्यात पेंशन मिळवण्यासाठी किती वर्षे करावी लागते नोकरी? काय आहेत नियम व अटी? जाणून घ्या*

 सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरदार लोकांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हे अनिवार्य केले आहे. PFमुळे आपली नियमिक गुंतवणूक त्याचप्रमाणे कर बचत आणि भविष्यातील सुरक्षितता मिळते. PF खात्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला भविष्यात पेन्शनचा अधिकार आहे. भविष्यात जर PF खात्यात पैसे गुंतवले तर PF खात्यात पेंशन मिळवण्यासाठी किती वर्षे नोकरी करावी लागते? त्यासाठी नियम काय आहेत? कोणत्या अटी आहेत? जाणून घ्या.

*पेन्शनसाठी नियम*

EPFO सदस्यांना निवृत्ती वेतनाचा हक्क मिळवण्यासाठी सलग १५ वर्षे EPF खात्यात पैसे जमा करावे लागतात.

ज्यावेळेस कर्मचाऱ्यांचे EPF खाते उघडले जाते त्याचवेळेस EPS खातेही उघडले जाते.

खात्यात बेसिक वेतनाच्या १२ टक्के रक्कम भरावी लागते.

१२ टक्क्यांमधील ८.३३ टक्के पैसे EPS खात्यात जमा होतात तर ३.६७टक्के पैसे EPFखात्यात जमा केले जातात.

दरमहिन्याला EPS खात्यात १ हजारांहून अधिक रक्कम जमा केली जाऊ शकते.

EPFO पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी : जर तुमचा PPO क्रमांक हरवला तर ‘या’ पध्दतीनं परत मिळवा*

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने लाखो पेन्शनधारकांना (EPFO pensioners) मोठा दिलासा दिला आहे. आता जर तुमचा पीपीओ क्रमांक हरवला तर तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज नाही. आपण ते सहजपणे परत मिळवू शकता. आपल्याला हा क्रमांक पुन्हा मिळविण्यासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण  ते रिकव्हर करू शकता. कर्मचार्‍याच्या सेवानिवृत्तीनंतर, पीपीओ (PPO) क्रमांक ईपीएफओद्वारे जारी केला जातो.

*पीपीओ क्रमांक म्हणजे काय?*

पीपीओ हा एक युनिक क्रमांक आहे. पीपीओ क्रमांकाच्या साह्याने निवृत्तीनंतर पेन्शनधारकांना पेन्शन मिळते. भविष्य निर्वाह निधीच्या मदतीने आपण ते पुन्हा मिळवू शकता.

*पीपीओ नंबरसाठी काय करावे? पीपीओ क्रमांक कसा मिळवायचा*

>> आपल्याला ईपीएफओ https://www.epfindia.gov.in/site_en/index.php च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

>> आता डाव्या बाजूला असलेल्या ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’ विभागात ‘पेन्शनर्स पोर्टल’ या पर्यायावर क्लिक करा.

>> क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.

>> पेजच्या डाव्या बाजूला दिलेला ‘Know Your PPO No. पर्यायावर क्लिक करा.

>> आपल्याला आपल्या पेन्शन फंडाशी जोडलेला आपला बँक खाते क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.

>> याशिवाय तुम्ही तुमचा पीएफ नंबर (मेंबर आयडी) टाकून सर्च करू शकता.

>> एकदा तपशील सबमिट झाल्यावर पीपीओ नंबर स्क्रीनवर दिसून येईल.

येथून जीवन प्रमाणपत्राचे स्टेटस मिळवा

पेन्शनधारकांना ही लिंक https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ ओपन करावी लागेल. जीवन प्रमाणपत्र, पेमेंट आणि आपले पेन्शन स्टेटस याविषयी माहिती या पोर्टलवर मिळू शकते.

PPO क्रमांक महत्त्वाचा का आहे?

पीपीओ क्रमांक 12 डिजिटचा महत्त्वपूर्ण क्रमांक आहे. हा एक रेफ्रन्स क्रमांक आहे जो सेंट्रल पेन्शन लेखा कार्यालयात कोणत्याही कम्युनिकेशनसाठी असतो. पेन्शनधारकाच्या पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. पेन्शन खाते बँकेच्या एका शाखेतून दुसर्‍या शाखेत हस्तांतरित करण्यासाठी पीपीओ क्रमांक आवश्यक आहे.

 या नंबरचा मदतीने आपण तक्रार करू शकता

याव्यतिरिक्त आपण जर आपल्या पेन्शनधारकाशी संबंधित तक्रार ईपीएफओमध्ये दाखल केली असेल, तर येथे पीपीओ क्रमांक देणेदेखील बंधनकारक आहे. ऑनलाइन पेन्शनची स्थिती जाणून घेण्यासाठी पीपीओ नंबरदेखील आवश्यक आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करतांना दरवर्षी पी पी ओ  क्रमांकदेखील सादर करणे आवश्यक आहे.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                                  *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!                                                                       ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ *साळवे इंटरप्राईजेस...  सृष्टी महा ई सुविधा .संतोष विठ्ठल साळवे  7900094419*    https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8e

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

*देशातील या बाजारात तुम्ही किलोच्या भावाने घेऊ शकता कपडे*

 *देशातील या बाजारात तुम्ही किलोच्या भावाने घेऊ शकता कपडे* 

 देशात अशी अनेक मार्केट आहेत जिथे तुम्ही अतिशय कमी किमतीत कपडे विकत घेऊ शकतात. मी तुम्हाला देशातील अशा मार्केटची माहिती तुम्हाला देणार आहोत जिथे किलोच्या भावाने कपडे मिळतात.

हेल्थ इन्शुरन्स...

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

*दिल्लीचे कॅनॉट प्लेस-*                                                                                                                         सेकंड हँड कपडे मजनू का टिला, रघुबीर नगर, करोल बाग, इंद्रपुरी, इंद्रलोक, भरत नगर, लाल किला, चांदनी चौक, पश्चिम पुरी, ईस्ट दिल्लीसारख्या भागात मिळतात. किलोच्या भावाने ईस्ट दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी कपडे मिळतात. 20 रूपयांपासून 300 रूपयांपर्यंत कपडे या मार्केटमध्ये मिळतात. यात शर्ट, पँट, जिन्स, ड्रेस, सूट-सलवार, जॅकेट इत्यादी कपडे मिळतात. या बाजारातील अनेक दुकानात वेगवेगळे कपडे मिळतात.तुम्ही याठीकाणी बार्गेनदेखील करू शकता. तुम्ही याठीकाणी किलोच्या भावाने कपडे विकत घेऊ शकता. येथे तुम्ही 10 किलोपासून 50 किलोच्या बंडलमध्येही कपडे घेऊ शकता.सेकंड हँड कपडे भारतात इम्पोर्ट होतात. कोणीतरी वापरलेले हे कपडे असतात. या कपड्यांना सेकंड हँड कपडे विकत घेणारे व्यापारी विकत घेतात आणि त्यांना ड्रायक्लिनींग करून पुढे मार्केटमध्ये विकतात. भारतात हे सर्व कपडे चीनकडून पाठवण्यात येतात. कॉमर्स मिनिस्ट्रीच्या आकड्यांनुसार भारत देशातील टॉप 5 देशांपैकी आहे, जे संकड हँड कपडे इम्पोर्ट करतात.

*मुंबई कोलाबा मार्केट -*                                                                                                                        स्वस्त दरात कपडे मुंबईमध्ये कोलाबा मार्केट आणि क्रॉफोर्ड मार्केटमध्ये विकल्या जातात. येथे कलरफूल कुर्ते, काफ्तान, जिन्स, शर्ट इत्यादी कपडे मिळतात. स्वस्त कपडे क्रॉफोर्ड मार्केटमध्येही मिळतात. 50 रूपयांपासून 300 रूपयांपर्यंत हे कपडे मिळतात. कोलाबा मार्केट सोबतच, मुंबई चोर बाजार, दक्षिण मुंबईचे मटन स्ट्रीट, मोहम्मद अली रोड याठीकाणी सेकंड हँड कपड्यांचे मार्केट आहे. हे मार्केट अंदाजे 150 वर्षे जुने आहे. या बाजाराला सुरुवातील शोर बाजार म्हटले जात होते, कारण मोठ्याने आवाज करून येथील व्यापारी कपडे विकत होते. पण या शोरला इंग्रज चोर असा उच्चार करत होते त्यामुळे या मार्केटचे नाव चोर बाजार पडले. येथे कपडे, ऑटोमोबाईल्स पार्ट्स आणि ब्रँडेड घड्याळांच्या रेप्लीका आणि विंटेज आणि अँक सामानदेखील मिळते.

*चिकपेटे मार्केट बंगळुरू -*                                                                                                                रविवारी हे मार्केट बंगळुरूच्या चिकपेटे परिसरात भरते. तुम्ही येथे स्वस्त दरात कपडे घेऊ शकतात. फक्त कपडेच नाही तर येथे तुम्ही गुड्स, ग्रामोफोन, जुने गॅजेट्स, कॅमरा, अँटीक, इलेक्ट्रॉनिक आयटम आणि जिम इक्विमेंटदेखील मिळतात.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                                                                                               *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!                                                                                                    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------    संतोष विठ्ठल साळवे..7900094419*

भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा

  भोगवटा पत्राशिवाय घर घेणं ठरेल धोकादायक; प्लॉट, फ्लॅट वा शेतजमीन घेताना OC घेण्याची खातरजमा करा ...