मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना व पीएम कुसुम योजना अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्याकडे शेती असल्यास किंवा आपण शेती करीत असाल तर ही माहिती आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकेल. आपल्या शेतात विजेची मोठी समस्या असेल्यामुळे आपण आपल्या शेतात सौर पंप स्थापित करण्याचा विचार करीत असाल तर, ही माहिती आपल्याला दिशादर्शक ठरू शकते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकर्यांसाठी बऱ्यांच योजना आयोजित केल्या आहेत. मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना हि सुद्धा एक महत्वकांक्षी योजना आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- 7/12 उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
- आधारकार्ड प्रत.
- रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
- पासपोर्ट आकाराचा फोटो,
- शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र ही सादर करावे लागेल.
तुम्हाला सौरऊर्जेशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारच्या पंतप्रधान कुसुम योजनेत तुम्ही सामील होऊ शकता. केंद्र सरकारचे 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम कुसुम. पीएम कुसुम योजना सन 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, त्यानंतर अर्थमंत्र्यांनी या योजनेचा विस्तार 2020 च्या अर्थसंकल्पात केला आहे.
या योजनेंतर्गत शेतकर्यांना अनुदानावर सोलर पॅनेल्स मिळतात, ज्यामधून वीज मिळू शकेल. आवश्यकतेनुसार विजेचा वापर करून, उर्वरित विक्री करुन ते अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.या योजनेद्वारे इलेक्ट्रिक किंवा डिझेलवर चालणारे सिंचन पंप सौर ऊर्जेवर चालणार्या पंपमध्ये रुपांतरित केले जातील. त्यांच्या सिंचन कामात सौर पॅनल्समधून निर्माण होणारी वीज प्रथम वापरली जाईल. त्याशिवाय जादा सोडली जाणारी वीज विद्युत वितरण कंपनीला (DISCOM) विक्री करुन 25 वर्षे पैसे मिळू शकतात.
याचा आणखी एक फायदा म्हणजे सौरऊर्जेमुळे डिझेल आणि विजेवरील खर्चही कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल. सौर पॅनेल 25 वर्षे चालेल आणि त्याची देखभाल देखील सोपी आहे.या योजनेंतर्गत शेतकर्यांना त्यांच्या जागेत सौर पॅनेल बसविण्यासाठी केवळ 10% रक्कम द्यावी लागेल. केंद्र व राज्य सरकारे शेतकर्यांच्या बँक खात्यात 60 टक्के अनुदान देतात. केंद्र व राज्यांकडून समान योगदानाची तरतूद आहे. त्याचबरोबर बँकेकडून 30 टक्के कर्जाची तरतूद आहे. शेतकरी आपल्या कमाईद्वारे हे कर्ज सहज भरू शकतात.
पीएम कुसुम योजनेंतर्गत अर्जासाठी अधिकृत वेबसाइट
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
वर भेट देऊन नोंदणी करावी लागेल. यासाठी आधार कार्ड, मालमत्तेची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. सौर प्रकल्प उभारण्यासाठी जमीन उर्जा उपकेंद्राच्या पाच किमीच्या परिघात असावी. शेतकरी स्वतःला किंवा डेवलपरला सौरऊर्जा भाड्याने देऊ शकतात.
पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकर्यांना सर्वात मोठा फायदा म्हणजे सिंचनासाठी त्यांना विनामूल्य वीज मिळेल. या योजनेमुळे डिझेल आणि केरोसीन तेलावरील शेतकर्यांचे अवलंबन कमी होईल. आणखी एक फायदा म्हणजे ते त्याद्वारे तयार केलेली अतिरिक्त वीज कंपनीला विकू शकतील. ज्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्नही वाढेल.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
------------------------------------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे..7900094419 साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा। https://chat.whatsapp.com/CqVBl oErtgwC6N1JRQkVpf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा