*Road Accident: तुमच्याकडून अपघात झाल्यास खरंच भरपाई द्यायची असते का?*
गाडी चालवताना बऱ्याचदा अपघाताच्या (Road Accident) घटना घडतात. आपल्या गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिल्याने त्या गाडीचे नुकसान होऊ शकते किंवा त्यात एखादी व्यक्ती जखमी होऊ शकते. अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. अशावेळी समोरचा गाडी चालक पैशांची मागणी करतो. नुकसान भरपाईच्या नावाखाली जास्त पैसे मागतो. तुमच्याबाबतीत असं घडलं तर समोरच्या गाडी चालकाला पैसे देण्याची गरज नाही.अशा परिस्थितीत घाबरुन जाऊ नका. आपल्या गाडीचा विमा असेल तर घटनास्थळावर तडजोड करु नका. अशावेळी काही निश्चित कार्यपद्धती पाळल्या पाहिजे किंवा दुसऱ्या पार्टीला पोलिसांकडे (Police) जाण्यास सांगितले पाहिजे. जर आपल्या गाडीचा विमा असेल तर नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनीची असते. तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर नेमकं काय करावे हे आपण जाणून घेणार आहोत...
*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा. संतोष विठ्ठल साळवे 7900094419*
तुमच्या गाडीमुळे अपघात झाल्यास घटनास्थळी कोणत्याही प्रकारच्या करारावर सही करु नका. आपल्या गाडीचा विमा असेल तर त्याची सर्व जबाबदारी विमा कंपनीची आहे. तसंच समोरच्या गाडीचं नुकसान झालं असेल तर त्या गाडीचा मालक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करु शकतो. बऱ्याचदा असं होतं, की नुकसान झालेल्या गाडीचा मालक तुमच्याकडे नुकसान भरपाईची मागणी करतो आणि परत आपल्या विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करतो. अशापद्धतीने तो दोन्हीकडून फायदा घेतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पोलिसांकडे जाणे आणि आपल्या विमा कंपनीला माहिती देणे योग्य असते.
*पोलिसांना माहिती का द्यावी?*
तुमच्या गाडीनं अपघात झाला असेल तर सर्वात आधी पोलिसांना कळवा आणि आपल्या गाडीच्या कागदपत्रांची फोटो कॉपी त्यांना द्या. अशा परिस्थितीत तुम्ही पोलीस किंवा कोणत्याही एजन्सीला सहकार्य केलं पाहिजे.
*विमा कंपनी घेईल सर्व जबाबदारी*-
अपघाताबद्दल विमा कंपनीला सर्व माहिती द्या. त्यासोबत पॉलिसी नंबरची सर्व माहिती द्या. अपघातात जर कोणी जखमी झाला असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल तर यासाठी तुमची कोणतीही जबाबदारी असणार नाही. सर्व जबाबदारी विमा कंपनीची असेल आणि ते आपला खटला कोर्टात लढवतील.
वाहन विमा : लाखमोलाचे सुरक्षा कवच
*विम्याच्या माध्यमातून किती नुकसान भरपाई मिळते* -
कलम 2-1(आय) अधिनियमात असे म्हटले आहे की, जर आपल्या गाडीच्या धडकेत कोणी जखमी झाला असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल तर जास्तीत जास्त रक्कम दिली जाते. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 2-1 नुसार नुकसानीसाठी थर्ड पार्टीला 7.5 लाख रुपयांपर्यंत कव्हर करावे लागते.
रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. हा वाहन विमा काढण्यात पळवाटाही आहेत. पोलिसी कारवाई टाळण्यासाठी किंवा प्रीमीयम कमी असतो म्हणून कमी किमतीचा विमा काढतात. परंतु हा 'शॉर्टकट' आर्थिक फटका देणारा ठरू शकतो.
वाहन विमा आपल्या वाहनाला होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देतो.
काही गोष्टी ध्यानात ठेवा...
१) वाहनाचा विमा वेळेत काढणे आवश्यक आहेच. परंतु, विमा वैध असला म्हणजे झाले, असे नसते. वाहन चालवताना वैध वाहन परवाना, वाहनाची आवश्यक कागदपत्रे अशा अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. अपघात झाल्यानंतर क्लेम करताना या गोष्टी तपासल्या जातातच, त्याशिवाय विमा कंपनी दावा मंजूर करत नाही.
२) भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांसाठी वाहन विम्यावर एक क्युआर कोड प्रिंट करणे बंधनकारक केले होते. याद्वारे ग्राहकाला आपल्या विम्याचे पूर्ण तपशील मिळतात. भारतात डिसेंबर २०१५नंतर विम्यावर क्युआर कोड दिला जातो.
३) वाहनांचा विमा नवीन अथवा अनोळखी कंपनीकडून खरेदी करू नका. विमा काढल्यानंतर त्या कंपनीच्या विम्यावर, व्यवहारांवर संशय असल्यास 'आयआरडीए'च्या संकेतस्थळावर परवानाधारक कंपन्यांच्या यादीत कंपनीचे नाव तपासता येते.
४) विमा ओळखीच्या व्यक्तीकडूनच खरेदी करावा. ऑनलाइन विमा संबंधित कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच खरेदी करा. विमा खरेदी करताना केवळ धनादेश किंवा ऑनलाइन व्यवहार करावेत, तसेच धनादेश देताना केवळ कंपनीच्या नावाने द्या. कोणत्याही व्यक्तीच्या नावाने चेक देऊ नका. फसवणूक होण्याची शक्यता असते.
पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा.
*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419 संतोष विठ्ठल साळवे*
नैसर्गिक आपत्ती वेळी...
१) नैसर्गिक आपत्तीत वाहनावर झाड किंवा अन्य कुठली वस्तू पडून नुकसान झाल्यास ४८ तासांच्या आता विमा कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर फोन करावा. घटनेची व वाहनाची संपूर्ण माहिती द्यावी.
२) वाहनावर पडलेले झाड किंवा वस्तू काढायचा प्रयत्न करू नका. आहे त्या परिस्थितीत वाहनांची माहिती देणे सोयीचे होते. वाहनावर पडलेल्या वस्तू हटवल्यास भरपाई मिळणे कठीण होते.
३) ऑनलाइन किंवा मोबाईलद्वारे विम्याचा क्लेम करण्याची परवानगी विमा कंपन्यांना देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्जासाठी वाहनाचा बाहेरून, आतून फोटो काढून तो विमा कंपनीला पाठवता येतो.
दावा का फेटाळला जातो?
१) वाहन चालवताना वाहनचालकाचा परवाना अवैध असणे.
२) विम्याचा दावा करताना नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र नसणे.
३) अपघाताच्या वेळी चालकाने मद्यप्राशन केलेले असल्यास दावा फेटाळला जातो.
४) वैयक्तिक खासगी वापराचे वाहन व्यावसायिक कामासाठी वापरल्यास.
बोगस कंपन्यांचाही सुळसुळाटदेशात प्रसिद्ध कंपन्यांखेरीज बोगस विमा कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. ट्रकचालक आणि दुचाकीस्वार यांची यात फसवणूक होते. वैध विम्याची किंमत साधारण १० हजारांच्या घरात असते. परंतु, बोगस विमा चार ते सहा हजारांपर्यंत मिळतो. यात फसवणूक होण्याची शक्यता असते. पोलिस तपासणीत उपयोगी पडणार असल्याने बहुतांश ग्राहक खोटा विमा खरेदी करतात, असे 'आयआरडीए'च्या आकडेवारीतून समोर आले आहे. हा शॉर्टकट महागात पडू शकते.
*कोर्टात योग्य माहिती द्या* -
जर तुम्हाला कोर्टाकडून समन्स मिळालं असेल तर तुम्ही कोर्टात हजर राहा आणि अपघाताबाबत योग्य माहिती द्या. अपघात कसा झाला याचा नकाशा तयार करुन तुम्ही कोर्टाला देऊ शकता. तुम्ही अचूक माहिती दिली तर खटल्याचा निकाल लवकर लागेल.
*ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्रं आवश्यक*
जर तुमच्या गाडीने अपघात झाला असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी विमा कंपनी घेईल. त्यासाठी गाडी चालवणाऱ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे सर्व कागदपत्रं असणं आवश्यक आहे. जर असं नसेल तर विमा कंपनी दावा स्वीकारणार नाही आणि सर्व जबाबदारी तुमच्यावर येईल.
*मद्यपान केले असेल तर अवघड होईल*-
मद्यपान केल्यानंतर जर तुमच्या गाडीचा अपघात झाला आणि अपघातात कोणी जखमी किंवा त्याचा मृत्यू झाला तर तुम्ही नक्कीच अडचणीत येऊ शकता. अशा परिस्थितीत विमा कंपनी कोणतीही जबाबदारी घेत नाही. सर्व जबाबदारी तुम्हाला उचलावी लागेल आणि तुम्हालाच कोर्टात खटला लढवावा लागेल.
*निष्काळजीपणा पडेल महागात* -
गाडी चालवताना निष्काळजीपणा करु नका. जर पोलीस तपासात तुम्ही निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याचं कळालं तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. नवीन मोटर कायद्यात तीन वर्षांपर्यंत तुरुंगावासाची शिक्षा नमूद करण्यात आली आहे. तसंच, मोटारवाहन कायद्याच्या कोणत्याही तरतूदीचे उल्लंघन केल्यास तुमच्या अडचणी वाढतील.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! -------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा