शेळी पालन करण्यासाठी राज्य सरकार देते अनुदान, जाणून घ्या.
शेळीपालन योजनेद्वारे राज्यातील खेडोपाडी वसलेल्या व्यक्तींना रोज़गार उपलब्ध व्हावा हा मुख्य उद्देश आहे. खादी ग्रामोद्योग व संबंधित संस्थांकडून शेळी पालन संबंधित सर्व माहिती जसे की बकरीच्या जाती, त्यांची वैशिष्ट्ये, आहार, त्यांना राहण्यासाठी शेड आणि रोग आणि उपचारांविषयी अचूक माहिती तुम्हाला सांगतील. शेळी पालन 2021 या योजनेसाठी सरकार कडून अनुदान देखील मिळत असते.परंतु अर्जदारस त्यासाठी पात्र असावे लागते. बकरी पालन-पोषण करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्थानिक बाजारपेठ यासाठी उपलब्ध आहे. ज्यामुळे मालाला बाजाराचा त्रास होत नाही.महाराष्ट्र सरकारने शेळी पालन करण्यासाठी 5 ते 6 लाख रुपयांचे अनुदान देखील जाहीर केले आहे.
शेळी पालन योजना 2021 साठी पात्रता
-लाभार्थ्याकडे मॉडेल प्रोजेक्ट अहवाल असावा - त्यामध्ये बकरी विकत घेतल्याबद्दल बकरीची खरेदी किंमत, घर खर्च आणि लाभांश दर्शविला जाणे आवश्यक आहे.
-जमीन - 100 बकर्यांसाठी 9000 चौ.मी. असावी अर्ज करताना, जमीन भाड्याची पावती / एलपीसी / लीज कागदपत्रे, जागेचा नकाशा तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे.
-रक्कम - लाभार्थ्याला त्याच्या वतीने दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. जर शेतकरी कर्ज घेण्यास तयार असेल तर त्याच्याकडे 1 लाख रुपयांचा चेक / पासबुक / एफडी किंवा कर्ज घेण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे असले पाहिजेत.
शेळी पालन योजना 2021 साठी आवश्यक कागदपत्रे
-आधार कार्ड,
-पॅनकार्ड,
-अर्जदाराचे छायाचित्र,
-रहिवासी दाखला-
जात प्रमाणपत्र
शेळी पालन योजना 2021' या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्या देवी महाराष्ट्र मेंढी आणि शेली विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागे.(http://mahamesh.co.in/ )
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? लाभ घेण्यासाठी नेमका कुठे व कसा करायचा अर्ज?* अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
शेळी पालन व्यवसाय या विषयी माहिती
( ही माहिती शेळी पालन करणाऱ्या माझ्या एका शेतकरी मित्राकडून घेण्यात आलेलली आहे. ही माहिती मी तुम्हाला शेअर करतो)*
शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील, पण शेळी हा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्योग ठरू शकतो.
ज्यांना शेती कमी आहे व शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन हा एक चांगला शेतीपूरक व्यवसाय आहे. शेळी पालन करण्यासाठी आपल्याला कमी जागा, कमी भांडवल लागते आणि आपण शेती करत-करत हा व्यवसाय करू शकतो. शेती करत आपण बंदिस्त शेळी पालन करू शकतो.
शेळयांना ईतर जनावरपेक्षा कमी चारा आणि पानी लागते, एक गाईला जेवढा चारा लागतो त्यामध्ये 10 शेळ्या जगू शकतात. त्यामुळे ज्यांना कमी शेती आहे त्यांसाठी हा व्यवसाय चांगला आहे.
जे लोक शेती करत शेळी पालन करण्याचा विचार करत असतील त्यांना शेळ्यांसाठी वेगळ्या शेडची गरज पडत नाही, आपण आपल्या घरामध्ये शेळ्या बांदू शकतो. जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात शेळयांचे पालन करता त्यावेळी तुम्हाला शेडची आवश्यकता पडते, यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.
शेळीपालन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे कमी खर्चात अधिक नफा हे सूत्र होय. शेळी आणि बकरीचा अनेक कारणांसाठी उपयोग होतो. देशातील भूमिहीन, लहान आणि अल्पभूधारक शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यास शेळीपालनाचा महत्वाचा हातभार लाभतो. त्यामुळे शेळीला गरीब शेतकऱ्यांची गाय असं म्हटलं जातं.
कमी सुपीक जमिनीत वाढणारी झुडपे आणि झाडे यांची पाने शेळ्या खातात त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रतिकूल वातावरणामध्ये टिकू शकतात. शेळी पालन व्यवसायात सुरुवातीता खर्च कमी आहे. इतर प्राळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळीचा प्रजनन काळ कमी आहे. कोलेस्टेरॉल कमी असल्यामुळे शेळी, बकरी आणि बोकडाच्या मांसाला खूप मागणी असते. त्याचबरोबर गायीच्या दुधाच्या तुलनेत शेळीचे दूध सहज पचवता येते.
आज महाराष्ट मध्ये जास्त करून शेतकरी शेती करत हा व्यवसाय करत असतो, त्यामध्ये त्यांना शेतामध्ये जो चारा निगतो ते शेळयांना घालत आहेत किवा रिकाम्या वेळी हे लोक शेळयांना चरण्यासाठी बाहेर घेऊन जात आहेत, जास्त करून हे लोक बंदिस्त किवा निंबंदिस्त शेळी पालन करत आहेत.
शेळी पालन करत असताना आपण दोन प्रकारे पैसे कमवू शकतो एक म्हणजे त्याचे मास विकून किवा दूध विकून.
*आरोग्य विमा
सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे.
कोरोना काळात प्रत्येकजण आरोग्य विमा काढत आहे. हा एक समजदारीचा निर्णय आहे. परंतु आरोग्य विमा महागड्या खर्चाला वाचवण्यासोबतच तुमचा टॅक्सदेखील वाचवू शकतो. जर तुम्ही 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहात तर आरोग्य विमाच्या माध्यमातून तुम्ही 25 हजारापर्यंत रक्कम वाचवू शकता. तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांचे प्रीमियम करू शकता. त्यामुळे सेक्शन 80 डी च्या माध्यमातून सूट मिळू शकते. यामध्ये आपण मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर घेऊ शकतो. जर तुमचे वय 60 वर्षाहून अधिक आहे. तर तुम्हाला 50 हजारापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो.आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419*
शेळीपालनासाठी शासनाचं अनुदान
पशुपालकांनी उत्पादनाचे ध्येय ठेऊन शेळीची जात निवडावी. जमुनापारी, सिरोही, बार्बारी आणि जाखराणा जातीच्या शेळ्यांचं पालन साधारणपणे केलं जातं. एका शेळी आणि बकरीला अंदाजे एक चौरस मीटर क्षेत्र आवश्यक असते. या आधारावर आपण शेळ्यांसाठी घरे तयार करू शकता. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळी आणि बकरीला कमी चारा लागतो. सामान्यतः बकरीला दोन किलो चारा आणि अर्धा किलो धान्य देणे चांगले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शेळी आणि बकरी पालन करण्यासाठी सरकारकडूनही मदत मिळते. यासाठी 25 ते 33.3 टक्के अनुदान केंद्र आणि राज्य सरकारांकडून दिलं जातं आहे. शेळीपालनाच्या यशस्वी व्यवसायासाठी ते निरोगी राहणे आवश्यक आहे. आजार झाल्यास त्वरित उपचार दिले पाहिजेत. बहुतेक रोग केवळ पाऊस पडल्यासच होण्याची शक्यता असते, या काळात शेतकऱ्यांनी शेळी आणि बकऱ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
शेळी पालनाचे प्रकार
शेळी पालनाचे एकूण तीन प्रकार आढळतात एक परंपरागत पद्धत, दुसरी अर्धबंदिस्त पद्धत आणि तिसरा बंदिस्त पद्धत.
1) परंपरागत पद्धत
परंपरागत पद्धतीमध्ये शेळ्यांना मोकळे चरायला सोडले जाते, ह्या प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी एक वेगळा माणूस असतो तो रोज शेळ्यांना बाहेर चरण्यासाठी घेऊन जातो.
ह्या प्रकारच्या व्यवसायमध्ये जास्त खर्च लागत नाही, शेळ्या फक्त बाहेर चरून जगू शकतात. आणि अशा प्रकारामध्ये शेळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. एकदा का शेळ्यांसाठी शेडची उभारणी केली की तुम्हाला जास्त खर्च येत नाही.
2) अर्धबंदिस्त पद्धत
ज्यांना रोज शेळ्यांना बाहेर चरायला घेऊन जाने शक्य नाही आणि आपल्या शेतीला एक जोड धंदा म्हणून अर्धबंदिस्त शेळी पालन सुरू करू शकतो.
या प्रकारच्या शेळीपालनामध्ये शेळ्यांना पूर्ण वेळ बाहेर चरायला सोडले जात नाही. काही लोक शेळ्यांना ज्या सीजन मध्ये चरायला चारा आहे त्या सीजन मध्ये सोडतात आणि अन्य सीजनमध्ये त्यांना आपल्या शेड मध्ये चारा पुरवण्याचे काम करतात.
तसेच मोकाट शेळीपाळांनामध्ये आंतर प्रजनन होत असते, त्यामुळे शेळीचा दर्जा कमी होतो पण अर्धबंदिस्त शेळी पाळांनामध्ये हे थोड अवगड आहे बंदिस्त शेळी पाळणापेक्षा.
3) बंदिस्त पद्धत
बंदिस्त शेळी पाळांनामध्ये शेळ्यांना 24 तास शेडमध्ये बांधून ठेवले जाते. यामध्ये खर्च थोडा जास्त आहे.
हा व्यवसाय जे शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून काही थोड्या शेळ्या पाळून बंदिस्त शेळीपाळण करतात किवा काही लोक मोठ्या प्रमाणात शेळीपालनाचा व्यवसाय करण्यासाठी ही पद्धत वापरतात.
यासाठी एक चांगली जागा, सेपरेट शेड, शेळ्यांना चारा त्यांचा दवाखाना, एत्यादी प्रकारचे खर्च येतात. हा एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे.
हे कोण सुरू करू शकते?
1) लघु आणि मध्यम शेतकरी.
2) ज्यांच्याकडे जमीन नाही असे श्रमिक.
3) सामान्य कुरणांची उपलब्धता.
4) सुरू करण्याची कारणे.
5) कमी भांडवल निवेश आणि लवकर प्राप्ती होणे.
6) साधे आणि लहान शेड पुरेसे आहे.
7) स्टॉल (एका जनावरास बांधण्याची जागा) फेड स्थितीत ठेवल्यास नफा देणारे.
8) शेळ्यांचा उच्च प्रजोत्पादन दर.
9) वर्षभराचे काम.
10) चर्बी नसलेले मांस आणि कमी वसा असलेले व सर्व लोकांना आवडणारे.
11) केव्हां ही विकून पैसे मिळविता येतात.
तुमच्यासाठी कोणती प्रजाति चांगली आहे?
1) जमुनापारी शेळी
चांगली उंची असलेले जनावर।
ही शेळी इटावा, मथुरा इत्यादी ठिकाणी आढळते. याचे पालन दूध आणि मांस यासाठी केले जाते. ही शेळ्यांची सगळ्यात मोठी जात आहे.
याचा रंग पांढरा आणि शरीरमध्ये भुर्या रंगाचे धब्बे आढळतात, याचे कान खूप मोठे असते, यांचे शिंग 8 ते 9 सेंटिमिटर असतात आणि रोज 2 ते 2.5 लीटर दूध देण्याची क्षमता असते.
प्रौढ जमुनापारी शेळी मध्ये चांगले सुबक बाकदार रोमन नाक आणि किमान 12 इंच लांबीचे हेलकावे घेणारे कान
बोकडाचे वजन सुमारे 65 ते 85 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 45 ते 60 किलोग्राम असते
प्रत्येक विण्याच्या वेळी एकच करडू सहा महिन्यांच्या करड्याचे वजन सुमारे 15 किलोग्राम असते
दर रोज किमान 2-2.5 लिटर दुधाचे उत्पादन
2) तेलीचेरी
शेळ्यांचा रंग पांढरा, भुरा किंवा काळा असतो एका विण्यात 2-3 करडी
बोकडाचे वजन सुमारे 40 ते 50 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 30 किलोग्राम असते
3) बोअर
संपूर्ण विश्वभरात मांसाकरीता पाळतात.
4) उस्मानाबादी शेळी
नावाप्रमाणे ह्या प्रकारच्या शेळ्या महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात आढळतात. याचे पालन मांस यासाठी केले जाते. याचा रंग कळा आणि वर्षातून दोनदा हे बाळांना जन्म देतात.
ही शेळी जवळ-जवळ दोन बाळांना जन्म देते, त्याचे कान लांब 20 ते 25 सेंटिमिटर आढळतात आणि त्यांचे नाक रोमन असते.
5) सुरती शेळी
सुरती ही शेळी गुजरातमध्ये आढळते. ही दुभत्या जातीची बकरी आहे, याचा रंग पांढरा असतो आणि कान मध्यम आकाराचे. याची शिंगे लहान आणि वक्र असतात. तसेच सुरती प्रकाळच्या शेळ्या लांब चालण्यास सक्षम असतात.
6) मारवाडी शेळी
याचा रंग पुर्णपणे काळा असतो, याचे कान पांढरे असतात आणि याची शिंगे त्याची कॉर्कस्क्रूप्रमाणे असतात. मारवाडी शेळीचा आकार मध्यम असतो.
7) बार्बरी शेळी
8) बीटल शेळी
9) काळी बेंगल शेळी
10) सिरोही शेळी
11) कच्छ शेळी
12) गद्दी शेळी
शेळीपालनाचे फायदे
शेळीपालन हा शेतीला जोड धंदा म्हणून केला जातो व याचे फायदेही शेतकर्यांसाठी खूप आहेत. आता आपण शेळीपालनाचे कोणते फायदे आहेत हे माहीत करून घेऊया.
- गरजेच्या वेळी शेळ्या विकून पैसे प्राप्त करू शकतो.
- शेळी पालन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची टेक्निकची गरज पडत नाही.
- हा व्यवसायाचा विस्तार खूप फास्ट मध्ये होतो त्यामुळे कमी खर्चात जास्त फायदा होतो.
- ज्यांना शेती कमी किवा काहीच नाही त्यांसाठी हा व्यवसाय चांगला आहे.
- शेळ्या एका वर्षातून दोनदा बाळाला जन्म देतात त्यामुळे जास्त नफा होतो.
- शेळी दोन किवा त्यापेक्षा जास्त पिल्लांना
बोकडाचे वजन सुमारे 110 ते 135 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 90 ते 100 किलोग्राम असते 90 दिवसांच्या करड्याचे वजन 20-30 किलोग्राम असते.आहार प्रबंधन चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो
*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा. संतोष विठ्ठल साळवे 7900094419*
प्रोटीनयुक्त हिरवा चारा जसे अकेसिया, ल्यूसर्न आणि कसावा तसेच आहारात नायट्रोजन स्त्रोत असणे महत्वपूर्ण आहे.
शेतकरी शेताच्या कडेने अगाथी, सबाबुल आणि ग्लॅरिसिडियाची झाडे लावू शकतात आणि हिरवा चारा म्हणून देऊ शकतात.
एक एकराच्या जमिनीच्या क्षेत्रात उगविलेली झाडे आणि चारा 15 ते 30 शेळ्यांना पोसण्यासाठी पुरेसा आहे.करड्यांना पहिल्या 10 आठवड्यांत 50-100 ग्राम घन/सांद्रित आहार द्यायला पाहिजे.वाढत्या वयाच्या करड्यांना 3-10 महिन्यांपर्यंत दररोज 100-150 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.गाभण असलेल्या शेळीला दररोज 200 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
1 लिटर दूध देणाऱ्या दुधारू शेळ्यांना दररोज 300 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.शेळ्यांच्या स्टॉलमध्ये उत्तम प्रकारच्या तांब्याने युक्त (950-1250 पीपीएम) असलेले मिनरल ब्लॉक्स पुरविण्यात यायला हवे.लाभदायक शेळी पालनासाठी 2 वर्षांमध्ये शेळीने 3 वेळा व्यायला (किडिंग) हवे.तीव्र वाढीच्या व मोठ्या आकाराच्या शेळ्यांचा वापर प्रजोत्पादनासाठी करावा.
प्रजोत्पादनासाठी एक वर्ष वयाच्या मादीचा उपयोग करावा.
मादींनी एका किडिंग नंतर 3 महिन्यांतच पुन्हां गर्भ धारण केल्यासच 2 वर्षांत 3 वेळा प्रजोत्पादन होऊ शकते.
शेळ्या सुमारे 18 ते 21 दिवसांच्या अंतराने माजावर येतात आणि ही अवस्था 24-72 तास टिकते.माद्या माजावर आल्यावर काहीतरी दुखत असल्यासारखे जोराने ओरडतात. माजावर आल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे शेपटी जोर-जोराने इकडे-तिकडे हलविणे. त्याच्या जोडीला, त्यांचे बाह्य जननेंद्रिय थोडे-से सुजल्यासारखे आणि योनिमार्गातील स्त्रावामुळे ओले व घाणेरडे दिसते. त्यांची भूक मंदावते आणि मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. माजावर आलेली मादी स्वत: नर असल्यासारखी इतर मादीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते किंवा इतर मादीस अंगावर चढू देते.माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यावर 12 ते 18 तासांच्या काळांत मादीचा समागम घडविण्यात येतो.काही माद्यांमध्ये माज 2-3 दिवस टिकतो. त्यामुळे त्यांचा समागम पुन्हां दुसऱ्या दिवशी घडवायला हवा.गर्भावस्था काळ सुमारे 145 ते 150 दिवसांचा असतो, पण एक आठवडा पुढे-मागे होऊ शकतो. आधीच तयार राहिलेले बरे.
लशीकरण
करड्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोज 8 महिन्यांच्या वयात आणि पुन्हां 12 आठवड्याची झाल्यावर द्यावा.माद्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि विण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावा.
नरांना वर्षातून एकदा एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज द्यावा.
संगोपनाच्या पध्दती
सेमी इंटेन्सिव्ह सिस्टम (अर्ध-गहन पध्दती)
कमी कुरणे असतील अशा जागा, शेळ्यांना मुबलक हिरवा चारा देणे शक्य असेल आणि चरल्या नंतर घन आहार देता येईल.इंटेन्सिव्ह सिस्टम शेडमध्ये शेळ्यांना हिरवा चारा आणि घन आहार देण्यात येतो.कुरणात चारणे नाही.शेळ्यांसाठी गोठा (किंवा आश्रयस्थाने) डीप लिटर किंवा रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टमची असावीत.
शेळ्यांचा विमा
4महिने वयापासून शेळ्यांचा विमा जनरल इन्शुअरन्स कंपनीज् मार्फत काढला जाऊ शकतो.
अपघात किंवा रोगामुळे शेळीला मरण आल्यास विम्याचा दावा केला जाऊ शकतो.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! ----------------------------------------------------------------संतोष विठ्ठल साळवे..7900094419-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा