हा ब्लॉग शोधा

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

*Proning: कोरोनाबाधितांना श्वास घेण्यास अडचण? कमी होतेय ऑक्सिजन पातळी?; आरोग्य मंत्रालयाने सुचविले घरगुती उपचार*

 संतोष साळवे...7900094419


    अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
                                                  https://fb.watch/591XEkAryj/

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

* कोरोनाबाधितांना श्वास घेण्यास अडचण? कमी होतेय ऑक्सिजन पातळी?; आरोग्य मंत्रालयाने सुचविले घरगुती उपचार*

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर मोठ्या संख्येने कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, परंतु देशभरात ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे बरेच रुग्ण आपला जीव गमावत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी श्वास घेण्याच्या (proning) काही सोप्या पद्धती सुचविल्या आहेत. प्रोनिंग प्रक्रियेने कोरोना रूग्णांच्या ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.


*Proning म्हणजे नेमकं काय?*

आरोग्य मंत्रालयाच्या मते, प्रोनिंग ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे कोरोना रूग्ण स्वतःच स्वतःची ऑक्सिजनची पातळी योग्य राखू शकतो.प्रोन पोझिशन ऑक्सिजनेशन प्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या ८० टक्के पर्यंत प्रभावी आहे. ऑक्सिजनची पातळी ९४ च्या खाली गेल्यास, घरच्या घरी प्रोनिंग करावे. प्रोनिंग करण्यासाठी, रुग्णाला पोटावर पालथे पडून डोके आणि मान खाली असेल अशा स्थितीत झोपायचे आहे. होम आयसोलेशनमध्ये असताना बाधिताला प्रोनिंग फायदेशीर आहे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते तेव्हा ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रोनिंग करणं सुरक्षित असते. याचा आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रूग्णावरही चांगला परिणाम झाल्याचे यला मिळाले आहे.


*असे करा प्रोनिंग*

प्रोनिंग प्रक्रिया रुग्णाला पोटावर पालथे झोपू द्या. त्याच्या मानेखाली उशी ठेवा, नंतर छाती आणि पोटाखाली एक-दोन उशी ठेवा आणि दोन उशी पायाच्या खाली ठेवा. ३० मिनिटांपासून २ तास या स्थितीत पडून राहिल्यास रुग्णाला फायदा होऊ शकतो. अशी प्रक्रिया केल्यास फुफ्फुसांमध्ये रक्ताभिसरण चांगले होऊ लागते. फुफ्फुसात असलेला द्रव व्यवस्थित पसरतो, ज्यामुळे ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये सहज पोहोचतो. ऑक्सिजनची पातळी देखील खाली घसरत नाही.


*कधी करावे प्रोनिंग*

जेव्हा कोरोना रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि ऑक्सिजनची पातळी ९४ च्या खाली घसरली असेल तेव्हा ही प्रक्रिया केली पाहिजे. तुम्ही होम आयसोलेशनमध्ये असल्यास, वेळोवेळी तुमच्या ऑक्सिजनची पातळी तपासून पहा. या व्यतिरिक्त ताप, रक्तदाब, ब्लड शुगर हे देखील वेळोवेळी तपासून घ्या. योग्य वेळी कोरोना बाधिताने प्रोनिं केल्यास त्याला ते फायदेशीर ठरू शकते. यामुळे बर्‍याच लोकांचे जीवन वाचविण्यास मदत झाली आहे

 महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 ---------------------------------------------------------------*संतोष विठ्ठल साळवे  एक जनजागृती चळवळ 7900094419*                                                                       https://chat.whatsapp.com/CEujEQSOix79UmL41Vxa4h

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

UPSC च्या तयारीची मोफत पुस्तके कशी मिळतील? जाणून घ्या एका क्लिकवर

UPSC च्या तयारीची मोफत पुस्तके कशी मिळतील? जाणून घ्या एका क्लिकवर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उम...