हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

*25 टक्क्यांपर्यंत सबसिडी घ्या अन् लगेच टाका डेअरी बिझनेस!*


 *25 टक्क्यांपर्यंत सबसिडी घ्या अन् लगेच टाका डेअरी बिझनेस!*

 मागील वर्षी आगमन झालेल्या कोविड-19 ने अनेकांचे रोजगार गिळंकृत करून देशोधडीला लावले. आता एक वर्षानंतर कोरोनाची दुसरी लाटही पुन्हा एकदा अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण करणार आहे. त्यावर मात करण्यासाठी डेअरी फार्मिंग (Dairy Farming) हा एक चांगला पर्याय असून विशेष म्हणजे त्यासाठी 25 टक्क्यांपर्यंत सरकारची सबसिडी मिळू शकते

डेअरी फार्मिंग हा असा व्यवसाय आहे की, ज्याद्वारे तुम्ही चांगली कमाई करू शकता. त्यात दूध विक्री आणि दुधापासून बनविलेले इतर प्रॉडक्टची विक्री करू शकता. सध्या किराणा, औषधी आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंवर आधारित उद्योगांना चांगले दिवस आले आहेत. लॉकडाऊनसारख्या परिस्थितीमुळे हे उद्योग करणाऱ्यांची चांदी होत आहे. जीवनावश्यक वस्तूंची विक्री यात असल्यामुळे त्याची विक्री कधीही थांबत नाही. एरव्हीही कोरोना काळ संपल्यानंतर डेअरी फार्मिंगला मरण नाही. त्यामुळे हा फायदेशीर उद्योग कसा करायचा याची माहिती आपण घेऊत..

डेअरी उद्योगांना प्रात्सोहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना चालवते. त्यातलीच एक म्हणजे डेअरी उद्योजकता विकास योजना (Dairy Entrepreneurship Development Plan) होय. या योजनेच्या मदतीने तुम्ही पशुपालन आणि डेअरी उद्योगाची उभारणी सहज करू शकता. केंद्र आणि राज्यातर्फे कर्ज आणि सबसिडीही मिळत असल्याने उद्योग उभारता येतो.

हेल्थ इन्शुरन्स...

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. हॉस्पिटलची बिले पाहून अनेकांना कोरोनापेक्षा या हॉस्पिटलचीच धास्ती वाटू लागली आहे. या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे समजुतदारपणाचा निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी संपर्क करा. 7900094419

*डेअरी फार्मिंगची कशी करणार सुरुवात?*

व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला उच्च प्रतीच्या गायी-म्हशींची निवड करावी लागेल. सुरुवातीला कमी प्रमाणात आणि नंतर या जनावरांची संख्या वाढवता येते. सुरुवातीला दोन गायी किंवा म्हशींची खरेदी केली तर त्यावर 35 ते 50 हजार रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते. डेअरी उद्योजकता विकास योजनेअंतर्गत तुम्ही प्रोजेक्ट फाईल जमा केल्यास 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना 33 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळू शकते. ही सबसिडी नाबार्डच्या (National Bank for Agriculture and Rural Development : NABARD) माध्यमातून मिळते.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

*किती कर्ज मिळू शकेल?*

डेअरी उद्योजकता विकास योजनेअंतर्गत किमान 2 पशुंच्या खरेदीसाठी कर्ज मिळते. जास्तीत जास्त 10 पशुंच्या खरेदीसाठी 7 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. त्यात सर्वसाधारण गटातील नागरिकांसाठी 25 टक्के तर मागासवर्गीयांसाठी 33 टक्के सबसिडी मिळते. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या Dairy Enterpreneurship Development Scheme (DEDS) या योजनेअंतर्गत एका पशुसाठी 17 हजार 750 रुपयांची सबसिडी मिळते. अनुसूचित जाती, जमातींसाठी ही सबसिडी 23 हजार 300 रुपये मिळते. या नुसार सर्वसाधारण गटातील व्यक्तीस 10 पशुंचे युनिट उघडायचे असेल तर 1 लाख 77 हजारांची सबसिडी मिळू शकते.

*डेअरी फार्मिंगसाठी माहिती सहज उपलब्ध*

डेअरी फार्मिंगविषयी माहिती मिळविणे आजकाल अवघड राहिलेले नाही. केंद्र सरकारतर्फे या क्षेत्रात तरुणांनी मोठ्या संख्येने यावे यासाठी अऩेक पोर्टल तयार करण्यात आले आहेत. त्यावर डेअरी फार्मिंग कसे सुरू करावे, त्यासंदर्भातील योजना आणि इतर मदत या विषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहे. पशुपालन आणि डेअरी फार्मिंगवर संपूर्ण माहिती येथे मिळते. गाय किंवा म्हैस खरेदी करायची असेल तर https://epashuhaat.gov.in या वेबसाईटवर मिळू शकते. ही एक सरकारी वेबसाईट आहे. अशाच प्रकारे इतर अनेक वेबसाईट भावी उद्योजकांच्या मदतीसाठी तयार करण्यात आल्या आहेत.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!              *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!       -----------------------------------------------------------------*Bloggar:-संतोष विठ्ठल साळवे 7900094419.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...