हा ब्लॉग शोधा

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

*''आयुष्मान भारत योजना'' काय आहे ही योजना,या योजनेचा कसा लाभ घ्यायचा ते जाणून घेऊ...*

( BLOGGER ) संतोष साळवे...7900094419 

                  वाचाल तर...  वाचाल !!! 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

*''आयुष्मान भारत योजना'' काय आहे ही योजना,या योजनेचा कसा लाभ घ्यायचा ते जाणून घेऊ...

गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबविण्यात येत आहेत. 

"महात्मा फुले जन आरोग्य योजना"                           तुम्हाला माहिती आहे का ? अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

*योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत अटी*

1) ग्रामीण भागातील (Rural Area)ज्या नागरिकांकडे स्वतःचे पक्के घर नाहीअशी व्यक्ती पात्र ठरते.

2) कुटुंबात कोणीही वयस्कर (16 ते 59 वर्षे) व्यक्ती नाही.

3) जे कुटुंब महिला चालवतात.

4) कुटुंबात कोणी दिव्यांग असेल तर.

5) कुटुंब अनुसुचित जाती- जमातीतील असेल तर.

6) व्यक्ती भूमिहीन/मजूर,बेघर,आदिवासी किंवा कायदेशीर मान्यता असलेला पारंपरिक मजूर असेल तर.

7) शहरी भागातील (Urban Area)निराधार,कचरा उचलणारा कामगार,घरकाम करणारी व्यक्ती,फेरीवाले,प्लंबर,गवंडी,कामगार,पेंटर,वेल्डर,सुरक्षा रक्षक,हमाल,सफाई कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

*आयुष्यमान भारत कार्ड* *( तुमच्या परिवाराला मिळतो 5 लाखाचा आरोग्य विमा )* नविन लिस्ट आली आहे. तुमच्या गावात ली लिस्ट पाहण्यासाठी *संपर्क करा. सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* https://chat.whatsapp.com/CqVBloErtgwC6N1JRQkVpf *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!*

*विविध आजारांवरील उपचार आणि तपासण्यांचा समावेश*

या योजनेशी खासगी रुग्णालयांना देखील जोडण्यात आले आहे. या विम्यातंर्गत जवळपास सर्व आजार कव्हर केले जातात. कॅन्सर शस्त्रक्रिया,रेडिएशन थेरपी,केमोथेरपी,हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया,मणक्याची शस्त्रक्रिया,दातांची शस्त्रक्रिया,डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यासह एमआरआय (MRI)आणि सीटी स्कॅन (CT Scan)सारख्या तपासण्यांचा योजनेत समावेश आहे. सर्दी,खोकला,तापासारख्या आजारांचा या योजनेत समावेश नाही. परंतु,कोरोनाची हीच लक्षणे असल्याने त्याचा समावेश योजनेत आहे.


*कोरोनासाठी मिळणार उपचार*

कोरोनाची लक्षणे सर्दी,खोकला,ताप यासारखीच आहेत. परंतु,यात आरटीपीसीआर ही एक वेगळ्या प्रकारची टेस्ट करावी लागते. कोणत्याही आजारावर इलाज करण्यासाठी रुग्णाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याकरिता एक दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागते. यातच तुम्ही जर कोरोना पॉझिटिव्ह असालआणि उपचारांसाठी रुग्णालयात भरती झाला असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे प्रथम तुम्हाला तपासावे लागेल. योजनेसाठी तुमची पात्रता तपासण्याकरिता तुम्ही www.pmjay.gov.in या वेबसाईटवरऑनलाईन किंवा 14555,1800111565 या हेल्पलाईवर संपर्क साधू शकता. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आयुष्मान भारत योजनेतील खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनावर उपचार घेऊ शकता. जर तुम्हाला कोरोनामुळे खासगी रुग्णालयात क्वारंटाईन व्हावे लागले तरी देखील त्याचा खर्च या विम्यात कव्हर होईल.

*खासगी रुग्णालयातही मिळणार उपचार*

देशातील शासकीय रुग्णालयांमध्ये गरीबांवर मोफत उपचार पूर्वीपासूनच होतात. या कामात खासगी रुग्णालयांचा समावेश करणं हे आयुष्मान योजनेचं उदिदष्ट आहे. त्यानुसार,आयुष्मान भारत योजनेच्या पॅनेलला देशभरातील खासगी रुग्णालये जोडण्यात आली आहेत. तुम्ही गरजेवेळी तुमच्या नजीकचे कोणते खासगी रुग्णालय या योजनेशी जोडले आहे याबाबतची माहिती आॅनलाईन किंवा हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून घेऊ शकता. त्यानंतर या रुग्णालयातील एक आयुष्मान मित्र किंवा आरोग्य मित्र तुम्हाला दस्तावेज तपासणीसाठी मदत करेल.

*योजनेच्या लाभासाठी ही कागदपत्रे आवश्यक*

1) आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीला ई-कार्ड किंवा अन्य दस्तावेज सादर करुन आपली पात्रता सिध्द करावी लागते.

2) तसेच आधार कार्ड (Aadhar Card),मतदार कार्ड किंवा रेशन कार्ड पैकी एक ओळखपत्र सादर करावे लागते.

3) आरोग्य मित्र पात्र व्यक्तीला रुग्णालयात मोफत उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करतात.

*हे खर्च विम्यात होतात कव्हर*

1) आयुष्मान भारत योजने अंतर्गत रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि नंतरच्या 15 दिवसांपर्यंत उपचार आणि औषधे मोफत मिळतात.

2) या योजनेत 1393 पॅकेजचा समावेश करण्यात आला आहे.

3) या पॅकेज अंतर्गत रुग्णालयात आयसीयू,लॅबोरेटरी तपासण्या,रुग्णालयात राहण्याचा खर्च आदी बाबी कव्हर होतात.ayushman bharat yojana

 भारत सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जाहीर केली. केंद्र सरकारद्वारे या योजनेत द्वितीय आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आलं आहे. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र, आयुष्यमान भारत योजनेची माहिती बऱ्याच जणांना माहिती नसते. आयुष्यमान भारत-प्राधनमंत्री जन आरोग्य योजनेविषयी माहिती असणं गरजेचे आहे.                    

*योजनेचा लाभ कुणाला?*

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ 2011 मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेतील ग्रामीण व नागरी भागातील वंचित व व्यवसाय निकषांवर आधारित कुटुंबाना मिळतो. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते.प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंद झालेल्या 83.63 लाख कुटुंबातील सदस्यांना संगणकीकृत ई-कार्ड चा वापर करुन योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयात उपचार घेता येतो. 

पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे गरजेचे आहे. जर  तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पीएफचे पैसे दिले जातात.सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही. नॉमिनी करून घेण्यासाठी संपर्क करा 7900094419 संतोष साळवे.

*आमच्याकडे पीएफ आणि ई एस आय संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad व इतर सर्व कामे केले जाते .संपर्क करा. 7900094419  संतोष विठ्ठल साळवे*  

*आयुष्यमान भारत योजनेचा लाभ किती?*

आयुष्यमान भारत योजनेत 30 हजारांपासून तीन लाखांपर्यतचे उपचार घेता येतात. तर पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. आयुष्यमान भारत ही योजना कागदपत्र विरहित योजना आहे.

*ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?*

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र किंवा ही ओळखपत्र उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका व छायाचित्रासह असणारे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उतारा आवश्यक असतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं निर्धारित केलेली ओळखपत्र यासाठी ग्राह्य धरली जातात.

*आयुष्यमान भारत योजनेचा लाभ कसा घ्यावा?*

या योजनेत रुग्णालयात 3 दिवस अगोदर आणि उपचारानंतरच्या 15 दिवसांची क्लिनिकल ट्रीटमेंट आणि औषधं कवर होतात. या योजनेचा लाभ सूचीबद्ध असलेल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतात. 

मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!                                            

---------------------------------------------------------------

    *संतोष साळवे.. एक जनजागृती चळवळ- 7900094419 https://chat.whatsapp.com/K09N1M2BD2j4KhRO8eBCXc                                               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...