*राज्यातले शेतकरी आता आधुनिक शेतीचा पर्याय स्वीकारत आहेत. शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शेतीला जलसिंचन करणं हे शेतकऱ्यांपुढील मोठं काम असतं. पारंपारिक पद्धतीनं पाणी दिल्यास इंधन, वेळ आणि पाण्याचा अपव्यय होतो. केंद्र आणि राज्य सरकार शेतीमध्ये सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर व्हावा म्हणून प्रयत्न करत आहे. सरकारकडून ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन्ही पद्धतींचा पुरस्कार करण्यात येतो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाते.
*ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर*
पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन.या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते. तुषार सिंचन हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जाते. ते थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते. तुषार सिंचन ही पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे.
*कोणते शेतकरी अर्ज करु शकतात ?*
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करावा.शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा असावा. शेतकरी अनुसूचित. जाती , अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. 2016-17 पूर्वी एखा्द्या शेतकऱ्यानं एखाद्या सर्व्हेनंबरसाठी लाभ घेतला असल्यास पुढील 10 वर्ष तर 2017-18 लाभ घेतला असल्यास पुढील 7 वर्ष त्या सर्व्हे नंबरवर योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्याकडं कायम स्वरुपी वीज कनेक्शन असावं. सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनधींनी तयार केलेली असावी. 5 हेक्टरच्या मर्यादेतील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 55 टक्के तर, इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान मिळते.
*आवश्यक कागदपत्रे*
आधार कार्ड
७/१२ उतारा
८ अ दाखला
वीज बिल
खरेदी केलेल्या संचाचं बिल
जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
स्वयं घोषणापत्र
पूर्वसंमती पत्र।
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!! ----------------------------------------------------------------*संतोष साळवे.. एक जनजागृती चळवळ 7900094419* https://chat.whatsapp.com/CUJuewT9TUt9dvoODZQqWz
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा