*माहिती अधिकार कायदा (RTI) कोणासाठी व कशासाठी? माहिती अधिकार कायद्याची व्याप्ती*
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
*रंगीत व्होटर आयडी हवंय? मग आताच संपर्क करा!* संतोष साळवे.. 7900094419*
तुम्हाला जर रंगीत मतदार ओळखपत्र हवं असेल तर आम्ही तुम्हाला बनवून देत आहोत. (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.)
आपल्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID) हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाकडे हे ओळखपत्र असायला हवं. कारण या ओळखपत्रामुळेच आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. हे ओळखपत्र आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) दिले जाते. ज्यास इलेक्टोरल फोटो आयडी कार्डदेखील म्हटले जाते. (How to Apply for Colour Voter ID card online)
आपल्याकडे असलेलं मतदार ओळखपत्र हे लॅमिनेटेड ब्लॅक अँड व्हाईट फोटो, नाव, पत्ता आणि काही माहितीसह बनवण्यात आलं आहे. नवीन मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र देण्यास निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाला त्यांचं जुनं ब्लॅक अँड व्हाईट ओळखपत्र बदलायचं आहे. तर तुम्ही बनवा रंगीत व्होटर आयडी कार्ड....... संपर्क करा ..साळवे इंटरप्राईजेस... *सृष्टी महा ई सुविधा.. संतोष साळवे.. 7900094419* (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.)
अर्ज करण्यापूर्वी सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी यांचे नाव व पत्ता, उल्लेख केलेली फी व फी देण्याची पद्धत पुन्हा एकदा तपासून पहा. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविण्यासाठी फी आकारण्याची तरतूद कायद्यात आहे मात्र अनुसूचित जाती/जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींकडून फी आकारण्यात येत नाही. ज्यांना फीमाफी हवी असेल त्यांनी अर्जासोबत अनुसूचित जाती/जमाती/दारिद्र्यरेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
*मोबाईलवरुन माहिती अधिकार अर्ज दाखल करा, तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा |*
माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये लागू करण्यात आला. माहिती अधिकार कायद्याद्वारे नागरिक त्यांना हवी असलेल्या विभागांसंदर्भातील प्रश्नांची माहिती मागवू शकतात. माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवायाची असेल तर काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन माहिती मिळवणं आता सोपं झालं आहे. नागरिक त्यांना हवी असलेली माहिती ऑनलाईन पद्धतीनं मागवू शकतात. केंद्र आणि राज्य सरकारनं यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार केल्या आहेत.
माहिती अधिकारासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वेबसाईट
केंद्र सरकारच्या विभागासंदर्भातील माहिती मागवायची असेल तर तुम्हाला https://rtionline.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कार्यकक्षेत येणाऱ्या विभागांसर्दभातील माहिती मागवायची असल्यास तुम्हाला https://rtionline.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार वेबसाईट द्वारे तुम्ही 200 विभागांची माहिती ऑनलाईन पद्धतीनं मागवू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागेल.
*ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी घ्यायची दक्षता*
माहितीच्या अधिकारांतर्गत ऑनलाईन माहिती अधिकाराचा अर्ज तसेच प्रथम अपील अर्ज दाखल करण्यासाठी पोर्टलचा वापर करता येईल. यासाठी लागणारे विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरता येईल. तुम्ही मागवलेली माहिती अधिक असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ऑनलाईन अर्जामध्ये जे रकाने देण्यात आले आहेत त्यामध्ये तुम्ही 15 शब्दांमध्ये तुमची माहिती लिहू शकता. त्यापेक्षा जास्त मजकूर असल्यास पीडीएफ फाईल अपलोड करावी लागेल.
*अर्जाचं शुल्क*
ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन माहिती मागवण्यासाठी 20 रुपये शुल्क भरावे लागले. तर, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यांना माहिती मागवण्यासाठी शुल्क भरावं लागणार नाही. अर्जाचं शुल्क भरण्यासाठी 1) इंटरनेट बँकींग 2) एटीएम-कम-डेबिट कार्ड 3) क्रेडिट कार्ड (मास्टर्स/व्हीसा) याचा वापर करता येईल.
*ऑनलाईन अर्ज कसा करणार?*
महाराष्ट्र शासनाच्या माहिती अधिकार कायदा ऑनलाईन अर्ज पोर्टला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर ऑनलाईन माहितीचा अधिकार पोर्टल वापरण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या वाचून समजून घ्या त्यानंतर मार्गदर्शक सूचना वाचल्याचं मान्य करुन अर्ज दाखल करण्याच्या बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला कोणत्या विभागाची माहिती हवी आहे तो निवडावा लागेल. अर्जदाराचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पत्ता, अर्ज दाखल करण्याचं कारण, अर्जदार दारिद्रय रेषेखालील आहे का ते निवडल्यानंतर हवी असलेल्या माहितीसंबंधी तपशील माहिती अधिकार विनंती अर्ज मजकूर नमुन्यात लिहावा. त्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करता येईल. त्यानंतर विहीत शुल्क भरुन तुम्ही हवी असलेली माहिती मिळवू शकता.
*महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर कोणत्या विभागांची माहिती*
मंत्रालयातील विविध विभाग, पोलीस आयुक्त कार्यालयं, महापालिका, जिल्हा परिषद, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जिल्हा पोलीस कार्यालय, तहसील कार्यालय आदी विभागांकडून माहिती मागवता येईल.सरन्यायाधीशांचे कार्यालय आता ‘आरटीआय’ अंतर्गत, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
*माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत पहिले अपील करण्यासाठी काही सुचना*
1) तुमचा अर्ज लोकमाहिती अधिकार्याने फेटाळला असेल तर.
2) ३० दिवस किंवा ४८ तासांच्या आत माहिती पुरवण्यास असमर्थ असेल तर.
3) जर सार्वजनिक आस्थापनाने माहितीचे अर्ज स्वीकारण्यासाठी किंवा माहिती पुरवण्यासाठी सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी नियुक्त केला नसेल तर.
4) सहाय्यक लोकमाहिती अधिकार्याने अर्ज स्वीकारण्यस किंवा लोकमाहिती अधिकार्याकडे पाठविण्यास नकार दिला तर.
5) जर लोकमाहिती अधिकार्याने दिलेला निकाल समाधानकारक नसेल तर.
दिलेली माहिती अपूर्ण, चुकीची किंवा दिशाभूल करणारी आहे असे वाटत असेल तर.
6) जर सरकारी अधिकार्याने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती देतांना घेतलेली फी अवाजवी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर.
*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा. संतोष विठ्ठल साळवे 7900094419*
राज्य/ केंद्रीय लोकमाहिती अधिकार्याने केलेला शेवटचा पत्रव्यवहार (निकाल किंवा विनंती नाकारल्याचे पत्र) मिळाल्याच्या तारखेपासून किंवा ठरवून दिलेली तारीख उलटल्यावर ९० दिवसांच्या आत.
अपीलकर्त्याला माहिती न देण्याचे कारण प्रथम अपीलीय अधिकार्यास मान्य असल्यास ९० दिवसांनंतर ही अपील करता येते.
*पहिल्या अपीलासाठी अर्ज लिहिणे:*
एका पांढर्या कागदावर तुमचा अर्ज लिहा
अर्ज हस्तलिखित किंवा टंकलिखित ही असू शकतो.
अर्ज इंग्रजी किंवा हिंदीत (केंद्रीय माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) किंवा त्या विशिष्ट राज्याच्या (राज्य माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) अधिकृत भाषेत असावा.
हवी असलेली माहिती अर्जात विहित नमुन्यात स्पष्टपणे नमूद करावी.
विनंतीअर्ज, फी दिल्याचा पुरावा, लोकमाहिती अधिकार्याने दिलेली पोचपावती, अर्जावर दिलेला निकाल, इ. कागदपत्रांची स्वसाक्षांकित छायाप्रत अर्जासोबत जोडा.
प्रत्येक कागदपत्राच्या छायाप्रती तयार करा आणि त्या स्वतःच्या संदर्भासाठी जपून ठेवा.
*पहिला अपील अर्ज कोठे पाठवावा:*
अर्ज त्याच आस्थापनाच्या प्रथम अपीलीय अधिकार्याकडे दाखल करावा.
श्रेणीमध्ये प्रथम अपीलीय अधिकारी लोकमाहिती अधिकारी आणि सहाय्यक माहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी असतो जो आवश्यक ती माहिती पुरवितो किंवा अर्ज नाकारू शकतो.
पहिला अपीलीय अर्ज दाखाल करताना त्यावरील प्रथम अपीलीय अधिकार्याचे नाव, फी, फी देण्याची पद्धत तपासून पहा. (काही राज्यांमध्ये पहिले अपील मोफत असते तर काही राज्यांत त्यासाठी फी आकारण्यात येते.)
*पहिला अपील अर्ज कसा पाठवावा:*
अर्ज केवळ रजिस्टर पोस्टाद्वारेच किंवा स्वहस्तेच पाठवावा.
कोरियर सेवा वापरणे टाळा.
तसेच अर्जासोबत पोचपावती देखील जोडा
माहिती पुरविण्यासाठी कालमर्यादा:
सर्वसामान्य प्रकरणांच्याबाबतीत निर्णय साधारणतः ३० दिवसांत दिला जातो. अपवादात्मक स्थितीत ही मर्यादा ४५ दिवसांपर्यंत जाऊ शकते.
प्रथम अपीलीय अधिकार्याकडे अर्ज पोहोचल्याच्या दिवसापासून निर्णयासाठी कालमर्यादा मोजली जाते.
*माहिती अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत दुसरे अपील करण्यासाठी काही सुचना*
1) माहितीचा अधिकार (RTI) अधिनियम २००५ अंतर्गत दुसरे अपील कधी दाखल करावे:
2) प्रथम अपीलीय अधिकार्याचा निकाल असमाधानकारक असेल तर.
3) अपीलीय अधिकार्याने दिलेली माहिती अपूर्ण, चुकीची किंवा दिशाभूल करणारी आहे असे वाटत असेल तर.
प्रथम अपीलीय अधिकारी यांनी तुमचा RTI अर्ज नाकारला असेल तर.
4) प्रथम अपीलीय अधिकार्याने दिलेल्या मुदतीमध्ये अर्जावर काही ही निर्णय दिलेला नसेल तर.
5) जर सहाय्यक लोकमाहिती अधिकार्याने राज्य/केंद्रीय लोकमाहिती अधिकार्याकडे किंवा राज्य/ केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज पाठवण्यास किंवा स्वीकारण्यास नकार दिलेला असेल तर.
6) जर सरकारी अधिकार्याने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती देतांना घेतलेली फी अवाजवी आहे असे तुम्हांला वाटत असेल तर.
*अपील कोठे दाखल करावे?*
1) राज्य माहिती आयोगाकडे (जर प्रकरण राज्याच्या सरकारी अधिकार्यांशी संबंधित असेल तर).
2) केंद्रीय माहिती आयोगाकडे (जर प्रकरण केंद्राच्या सरकारी अधिकार्यांशी संबंधित असेल तर).
*अपीलासाठी मुदत:*
प्रथम अपीलीय अधिकार्याने केलेला शेवटचा पत्रव्यवहार (निकाल किंवा विनंती नाकारल्याचे पत्र) मिळाल्याच्या तारखेपासून किंवा ठरवून दिलेली तारीख उलटल्यावर ९० दिवसांच्या आत.
अपीलकर्त्याला माहिती न देण्याचे कारण राज्य/केंद्रीय माहिती आयोगास मान्य असल्यास ९० दिवसांनंतर ही अपील करता येते.
कमी खर्चात लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचा तुमचा व्यावसाय
प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींग हि काळाची गरज झालेली आहे. आपण जर पारंपारिक पद्धतीने मार्केटिंग करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवत आहात. पारंपारिक पद्धतीने म्हणजे टिव्ही ला ऍड देणे, न्यूजपेपर मध्ये ऍड किंवा पॅम्प्लेट टाकणे, होर्डिंग्स लावणे इत्यादी. यात आपल्याला अपेक्षित Customer मिळत नाही.
अपीलासाठी अर्ज लिहिणे:
एका पांढर्या कागदावर तुमचा अर्ज लिहा किंवा इंडिया डेव्हलपमेंट गेटवे पोर्टलवरून अर्ज डाउनलोड करा.
अर्ज हस्तलिखित किंवा टंकलिखित असू शकतो.
अर्ज इंग्रजी किंवा हिंदीत (केंद्रीय माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) किंवा त्या विशिष्ट राज्याच्या (राज्य माहिती आयोगाकडे पाठवायचा असेल तर) अधिकृत भाषेत असावा.
अर्जाच्या फॉर्मची तयारी करणे:
हवी असलेली माहिती अर्जात विहित नमुन्यात स्पष्टपणे नमूद करावी.
एका पानावर अनुक्रमणिका तयार करा आणि त्यामध्ये अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची पृष्ठक्रमांकासह नावे लिहा.
प्रत्येक कागदपत्राच्या ५ प्रती तयार करा (2र्या अपीलाचा अर्ज, माहितीची विनंती, 1ल्या अपीलाचा अर्ज, लोकमाहिती अधिकार्याला फी दिल्याचा पुरावा, इ.) आणि त्या स्वसाक्षांकित करा. तुम्ही स्वतःसाठी आणखी एक प्रत तयार करू शकता.
अर्ज कसा पाठवावा?
अर्ज ५ प्रतींसह केवळ रजिस्टर पोस्टाद्वारेच पाठवावा.
तसेच अर्जासोबत पोचपावती देखील जोडा.
केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज ऑनलाईन ही पाठवाता येतो. त्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती पुरविण्यासाठी कालमर्यादा:
सर्वसामान्य प्रकरणांच्याबाबतीत निर्णय साधारणतः ३० दिवसांत देण्यात येतो. अपवादात्मक स्थितीत ही मर्यादा ४५ दिवसांपर्यंत जाऊ शकते.
राज्य/केंद्रीय माहिती आयोगाकडे अर्ज पोहोचल्याच्या दिवसापासून निर्णयासाठीची कालमर्यादा मोजली जाते.
राज्य/केंद्रीय माहिती आयोगानेदिलेला निर्णय दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. मात्र असंतुष्ट लोक अधिकारी राज्य/केंद्रीय माहिती आयोगाविरूध्द विरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकतात.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
-----------------------------------------------
संतोष विठ्ठल साळवे ....एक जनजागृतीची चळवळ 7900094419. https://chat.whatsapp.com/Kkc7ce7wmJe6W2ZfkH2tF7
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा