हा ब्लॉग शोधा

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

गाडीवर FASTag न लावल्यास दुप्पट टोल? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम, फास्टॅग (Fastag) जाणून घ्या सर्व काही!!



गाडीवर FASTag न लावल्यास दुप्पट टोल? जाणून घ्या सरकारचा नवीन नियम, फास्टॅग (Fastag) जाणून घ्या सर्व काही!!

सर्व चारचाकी वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. होय, सरकारकडून FASTag शी संबंधित एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता सरकारने वाहनाच्या विंडशील्डवर FASTag चिकटविणे अनिवार्य केले आहे.

बरेच लोक FASTag विंडशील्डवर चिकटवण्याऐवजी कारच्या आत किंवा खिशात ठेवतात. ज्यामुळे टोल प्लाझावर विनाकारण विलंब होतो आणि इतर राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांची गैरसोय होते.

गाडीवर FASTag न लावल्यास दुप्पट टोल

राष्ट्रीय महामार्गावरील वापरकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने वाहनाच्या आतील बाजूस विंडशील्डवर FASTag चिकटविणे अनिवार्य केले आहे. या नवीन नियमानुसार, FASTag विंडशील्डवर आढळला नाही, तर वापरकर्त्यांना दुप्पट टोल फी भरावी लागेल, असे सांगण्यात आले आहे. अधिकृत प्रकाशनातून असे समोर आले आहे की, NHAI ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत की, समोरच्या विंडशील्डवर FASTag आतून न आढळल्यास टोल लेनमध्ये प्रवेश करणाऱ्या वापरकर्त्यांकडून दुप्पट शुल्क आकारले जाईल.


वारंवार 'असे' केल्यास तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महामार्गावर वाहन चालवताना फास्टॅगच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांकडून केवळ दुप्पट टोलच आकारला जाणार नाही. तर, CCTV मध्ये रेकॉर्ड केलेल्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकाद्वारे युजर्सना ब्लॅकलिस्टमध्ये देखील टाकले जाईल.

जर तुम्हाला फास्टट्रॅग रिचार्ज करायचा असेल तर संपर्क साधा  7900094419
                          



https://www.facebook.com/watch/?v=958467078018572

कार विकायची असेल तर फास्टॅगचे काय होईल? जाणून घ्या.

आपण कार विकल्यास काय होईल?

आपण आपली कार विकल्यास, आपल्याला आपला फास्टॅग बदलावा लागेल, कारण फास्टॅग आपल्या बँक खात्याशी संलग्न असेल. अशा परिस्थितीत आपल्याला आपला फास्टॅग बंद करावा लागेल. एक गोष्ट लक्षात असू द्या की आपला फास्टॅग हस्तांतरित अर्थात ट्रान्सफर केला जात नाही. तथापि, सध्या काही पेमेंट प्लॅटफॉर्मवर फास्टॅग हस्तांतरीत करण्याचा पर्याय दिला जात आहे. ज्या माध्यमातून वाहन हस्तांतरणासह फास्टॅगदेखील हस्तांतरीत होत आहे. या प्रक्रियेमुळे आपला फास्टॅग दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याशी जोडणे शक्य होत आहे.

फास्टॅग बंद किंवा हस्तांतरीत कसा करू शकतो?

आपला फास्टॅग बंद करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक किंवा वॉलेट कंपनीशी संपर्क साधावा लागेल. आपण ग्राहक सेवा केंद्राच्या नंबर्सवर कॉल करून आपण सहजपणे फास्टॅग बंद करू शकतो. आवश्यक असल्यास आपला नवीन टॅग बनवून घेता येईल. याशिवाय पेटीएममध्ये फास्टॅग हस्तांतरीत करण्याचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. त्याआधारे आपण आपला फास्टॅग इतर कोणत्याही फोन नंबरवर हस्तांतरीत करू शकतो. त्यानंतर फास्टॅग दुसऱ्या नंबरशी संलग्न केला जाईल. आपण पेटीएमच्या अ‍ॅपवरून हे कार्य करू शकतो. फास्टॅग बंद करण्यासाठी आपल्याला ग्राहक सेवा केंद्राशी बोलून घेणे आवश्यक आहे.


काच किंवा टॅग फुटल्यास काय करावे?

जर तुमच्या कारची काच फुटली किंवा टॅग तुटला तर तुम्ही नवीन फास्टॅग मिळवू शकता. यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल किंवा जेथे फास्टॅग उपलब्ध असेल तेथे तुम्हाला जावे लागेल. तेथे जाऊन तुम्ही नवीन फास्टॅग घेऊ शकता. फास्टॅगकडून हा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या गाडीची काच फुटली वा या ना त्या कारणामुळे फास्टॅग तुटला तर अशा परिस्थितीत आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा.

FASTag | आता व्हॉट्सॲपसह 'या' पाच पर्यायद्वारे बनवू शकता FASTag, वाचा सोपे पर्याय

रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर फास्‍टॅग (FASTag) अनिवार्य केले आहे. सरकारने 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सरकारकडून ही मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गाडीवर फास्टॅग लावलं नसेल, तर तुम्हाला टोल नाक्यावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (ICICI Bank FASTag Service)

जर तुम्हाला फास्टॅग काढायचा असेल, तर तो तुम्ही आता मोबाईल ॲप किंवा बँकद्वारेही काढू शकता. सध्या ICICI या बँकेकडूनही फास्टॅग दिला जात आहे. हा फास्टॅग तुम्ही पाच प्रकारे मिळवू शकता.विशेष म्हणजे तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक नसाल तरीही तुम्ही फास्टॅग बनवू शकता.

1).ICICI बँक फास्टॅग पोर्टल

ICICI बँकेच्या फास्टॅग पोर्टलवरुन फास्टॅग मिळवण्यासाठी www.icicibank.com/fastag या लिंकवर जा. यानंतर 'New Customer - Apply Now या ठिकाणी क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर थेट ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती आणि पैसे भरा. त्यानतंर तुमची फास्टॅगची ऑर्डर प्रोसेस केली जाईल. हा टॅग तुम्हाला तुमच्या पत्त्यावर मिळेल.

2).गुगल पे

गुगल पे द्वारे फास्टॅग घेण्यासाठी तुम्ही सर्वात आधी गुगल पे सुरु करा. यात Businesses या कॅटगरीत गेल्यानंतर त्याखाली 'ICICI Bank FASTag' या ठिकाणी क्लिक करा. यानंतर Buy new FASTag यावर क्लिक करा. यात तुमचा पॅन कार्ड, आरसी कॉपी, गाडीचा नंबर आणि पत्ता हा तपशील भरा. यानतंर तुमच्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून पैसे भरा. यानंतर तुमच्या फास्टॅगची प्रोसेस केली जाईल. हा फास्टॅग तुम्हाला तुमच्या घरी पाठवला जाईल.


3).iMobile Pay app

ICICI बँकद्वारे फास्टॅग बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरुन iMobile Pay app डाऊनलोड करावा लागेल. या ॲपवर लॉगिन केल्यानंतर तुम्ही Shop या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही FASTag हे क्लिक करा. यानंतर Buy New क्लिक करुन तुमच्या वाहनांसंबधीची माहिती भरा. यानंतर पेमेंट करुन फास्टॅगसाठीची ऑर्डर प्रोसेस करा.

4).ICICI बँक इंटरनेट बँकिंग

नेट बँकिंगद्वारे फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर बँकिंगवर खातं असणे गरजेचे आहे. यानंतर तुम्ही 'Payments & Transfer' वर क्लिक करा. यापुढे जाऊन 'Buy/Recharge FASTag' वर क्लिक करा. यानतंर तुम्ही आवश्यक ती माहिती आणि पैसे भरुन फास्टॅग प्रोसेस करता येईल. यानंतर तुमचा फास्टॅग प्रोसेस होईल आणि तो थेट तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.

5).व्हॉट्सॲप

व्हॉट्सॲपद्वारेही तुम्हाला फास्टॅगसाठी अप्लाय करता येईल. यासाठी तुम्हाला 8640086400 या मोबाईल क्रमांकावर Hi मॅसेज करावा लागेल. यानंतर 3 क्रमांकाचा 'ICICI Bank FASTag services' या पर्याय निवडा. यानंतर 'Apply for a new tag' यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक लिंक दिली जाईल. या लिंकवर केल्यानंतर तुम्ही ICICI फास्टॅग ॲप्लिकेशन पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. यात महत्त्वाची माहिती भरल्यानंतर त्याचे पेमेंट केले. यानंतर तुमचा फास्टॅग प्रोसेस केला जाईल. (ICICI Bank FASTag Service.                                                                                      जर तुम्हाला फास्टट्रॅग रिचार्ज करायचा असेल तर खालील नंबर वर संपर्क साधा..  7900094419     



मित्रांनो, माझ्या सर्व पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, जरूर करा, वेगवेगळ्या 
व्हाट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा.आणि फॉलो करायला विसरू नका.

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!  

------------------------------------------------------------------------   


संतोष विठ्ठल साळवे..7900094419  साळवे इंटरप्राईजेस...सृष्टी महा ई सुविधा।  https://chat.whatsapp.com/IOCRXc2XwpO00SF5TCBqTV

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...