हा ब्लॉग शोधा

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

SRA म्हणजे काय?

Bloggar:- संतोष साळवे...7900094419


 👉 SRA म्हणजे Slum Rehabilitation Authority म्हणजेच मराठीतून झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प.

👉 म्हणजेच एखाद्या झोपडपट्टी मधील सर्व झोपड्या हटवून अधिकृत झोपडपट्टी धारकांना नवीन इमारतीमध्ये पक्की घरे किंवा सदनिका देण्याची योजना. सदर योजना एखद्या बिल्डर मार्फत राबवली जाते. म्हणजे बिल्डर इमारत बांधतो व झोपडपट्टी धारकांना सदनिका देतो तेही फुकटात. 

👉 मग आता यात बिल्डर एवढी समाजसेवा का बरे करत असेल ? तर यामध्ये बिल्डर ला तिप्पट FSI मिळतो. आणि नवीन SRA प्रोजेक्ट ला चौपट FSI करण्याचा प्रस्ताव लवकरच येणार आहे. म्हणजेच समजा एखद्याला घर बांधायचे असेल तर आपल्याला अंदाजे एक FSI मिळतो बर्याचदा तो पूर्ण एक FSI नसतो तर ०.८५ एवडाच FSI असतो.  म्हणजे माझ्याकडे ३००० चोरस फुट जागा असेल तर मी  फक्त ३००० चौरस फुट च बांधकाम करू शकतो. शिवाय मी जागा अगोदर विकत घेतलेली असते किंवा मला जागा विकत घ्यावी लागते . पण SRA मध्ये झोपडपट्टी धारकांची जागा बिल्डर ला फुकटात मिळते. त्याबदल्यात बिल्डर तिप्पट बांधकाम करू शकतो समजा ३००० चौरस फुट जागा असेल तर ९००० चौरस फुट बांधकाम करू शकतो, त्यातील निम्मे बांधकाम झोपडपट्टी धारकांच्या सदनिकांसाठी वापरले जाते तर निम्मे बांधकाम खुल्या बाजारात विक्रीसाठी वापरले जाते.

*घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करुन घ्या*

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक. कोविड-19 (Covid-19) संकटकाळात खाजगी वाहनांचा वापर करण्यावर अनेकांचा भर आहे. वाहन वापरताना त्याची योग्य कागदपत्रे विशेषत: लायसन्स जवळ असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच त्याची मूदत संपलेली असल्याचे ते रिन्यूव्ह करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अन्यथा वाहतुक पोलिसांनी पकडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. यापूर्वी लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओ (RTO) कार्यालयात जावे लागत असे. आता मात्र आरटीओच्या खेपा घालण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु शकता. आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा (संपुर्ण महाराष्ट्रातुन कामे केली जाईल.) संपर्क करा *साळवे इंटरप्राईजेस.. सृष्टी महा ई सुविधा.  संतोष विठ्ठल साळवे 7900094419*

 👉 म्हणजे बिल्डर ४५०० / ४५०० चौरस फुटाचे दोन प्रोजेक्ट बनवतो एका प्रोजेक्ट मध्ये झोपडपट्टी धारकांच्या सदनिका तर दुसर्या प्रोजेक्टमधील सदनिका बाजारभावाने विकतो . म्हणजे स्वत जागा विकत घेऊन एखादा प्रोजेक्ट करून फक्त एक FSI घेऊन बिल्डिंग बांधायची त्यापेक्षा झोपडपट्टीची जागा फुकटात घेऊन SRA प्रोजेक्ट करून बिल्डर जास्ती चा नफा कमावतो. शिवाय झोपडपट्टी धारकांना सदनिका देऊन त्यांच्यावरही उपकार करतो. 

✅ एकदा का तुमचे हक्काचे घर तोडलं की बिल्डर भाडं देणं थांबवतो.

✅ वेळेवर भाडे देत नाही, 

✅ अर्धवट भाडे देतो, 

✅ वारंवार झोपू कार्यालयात चकरा मारूनही मदत होत नाही.

✅ बिल्डरांच्या ऑफिसला चकरा मारून मारून सर्वसामान्य माणूस अक्षरशः हैराण होतो. 

👉 त्यामुळे झोपू प्राधिकरणाने 06 जून 2015 रोजी परिपत्रक काढले आहे व त्या परिपत्रकामध्ये काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

👉 बिल्डरने किमान एक वर्षाचे भाडे दिले पाहिजे, दरवर्षी कमीतकमी 5 ते 10 टक्के भाडे वाढ केली पाहिजे आशा सूचना त्यामध्ये आहेत.

👉 06 जून 2015 चे परिपत्रक अपलोड केलं आहे त्याची लिंक देत आहे पुढे ते डाऊनलोड करून वाचा,         

https://m.facebook.com/groups/701981657422356/permalink/787603068860214/

👉 एखादी पात्र व्यक्ती जर का मयत झाली तर काय कार्यवाही करायची आहे याबाबत 05 जून 2015 चे परिपत्रक अपलोड केलं आहे त्याची लिंक देत आहे पुढे ते डाऊनलोड करून वाचा,

https://m.facebook.com/groups/701981657422356/permalink/787603918860129/

👉 पुढे SRA ची वेबसाईट देत आहे त्यावरून परिपत्रके डाउनलोड करून वाचावीत ही विनंती आहे. 

परिपत्रके मराठीतच आहेत नावे इंग्लिश मध्ये दिसत आहेत.

👉 SRA https://sra.gov.in//circularm

☑️☑️ मित्रांनो आपण वाचत नाही, आपल्याला पत्रव्यवहार करायचे कळत नाही, आपण कसे पुरावे तयार करून ठेवावेत हे आपल्याला समजत नाही!

आणि सगळ्यात मोठे दुर्दैव आपण चर्चा करत नाही, कोणाला विचारत नाही, मार्गदर्शन घेत नाही.

आणि वेळ निघून गेल्यावर रडत बसतो...  

वाचाल तर वाचाल!

मित्रांनो, सगळ्या पोस्ट माहितीपूर्ण असतात त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाव्यात, वाचाव्यात, लोकांची फसवणूक होऊ नये हा हेतू असतो.

पोस्ट लाईक, शेअर, कमेंट्स, कॉपी पेस्ट जरूर करा, वेगवेगळ्या वॉट्सउप ग्रुपवर जास्तीत जास्त व्हायरल करा....

तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.! *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!      ----------------------------------------------------------------- Bloggar:-संतोष विठ्ठल साळवे 7900094419*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

१० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या

  १० पास नंतर लगेच नोकरी पाहिजे तर 'हे' कोर्सेस करा ; नोकरीच्या संधी जाणून घ्या 10 वी नंतर लगेच नोकरी हवी असणाऱ्या युवकांसाठी कोणकोण...